भाग १
.मीनल कॉफीचा कप हातात घेऊन खडकीत बसली होती आणि हे सुरेल गाणं ऐकत होती ....ह्या गाण्यात जणू काही ती स्वतःला विसरली होती ..आज हि तिला मागचे काही महिने आठवत होते .
https://youtu.be/2B07Y-_WJxs
एखादी गोष्ट कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी ती आपण विसरू शकत नाही ,ती तेव्हा जास्तच आठवते ...मीनल च हि तसच झालं होत ..दिवस भर ऑफिस मध्ये स्वतःला व्यस्त करून घेत असे ती ,पण मग संध्याकाळ ..संध्याकाळ मात्र जुन्या आठवणींना घेऊन येत असे ....आज हि असच त्याची आठवण ,हे गाणं आणि पाणावलेले डोळे ....सगळ्या गोष्टी तिला जणू काही कालच घडल्याप्रमाणे भासत होत्या ..
मीनल च लग्न ठरलं होत ..अविनाश खूप चांगला,देखणा मुलगा ,एका मोठ्या ऑफिस मध्ये नोकरी करणारा.. आई वडिलांचं छत्र लहान वयातच हरवलेला तरीही स्वतः च्या हिमतीवर मोठा होणारा ..शहरात स्वतःचा मोठा फ्लॅट घेण्याचं स्वप्न होत
त्याच ..त्यांची भेट एका सेमिनार मध्ये झालेली ....पाहताक्षणी त्याला मीनल आवडली.. खर म्हणजे मीनल ला ही त्याच बोलणं ,राहणं खूप आवडू लागलं ....दोघे हि खूप खुश होते ..एकमेकांचा सहवास त्यांना हवाहवासा वाटू लागला ...मीनल ने घरी कल्पना दिली आणि दोघांच्या घरी पसंती झाली ..मीनल च लग्न ठरलं ...ऑफिस मध्ये हि आता सगळ्यांना माहित झालं होत कि मीनल लग्न करणार म्हणून .... रोज सकाळ ते संध्याकाळ गप्पा ,पार्टी सगळं सुरु होत ..एके दिवशी अविनाशच्या बॉस ने त्यांना पार्टी साठी बोलावले ....अविनाश तिला घ्यायला जाणार होता ....मीनल च्या घराच्या खाली येऊन त्यानं तिला फोन केला ,
"हॅलो ,ये ना लवकर ..उशीर होतोय .. लांब जायचं आहे .."-अवि .
"हो आलेच ,.."-मीनल
समोरून गुलाबी रंगाचा फुल्ल गाऊन घालून आलेली मीनल ,ओठांवर हलकीशी लिपस्टिक ,मोठे कानातले , डोळ्यात काजळ ,कपाळावर नाजुकशी टिकली ...आणि एका हेअर पिन हलकेच बांधलेलं केस ..एकंदरीतच खूप सुंदर दिसत होती मीनल ...
"काय रापचिक दिसते ग तू ?खूपच सुंदर ..तुझे डोळे ...तुझे डोळे खूप सुंदर आहेत ..असं वाटतंय कि तुला कुठेतरी घेऊन जावं आणि .."-अविनाश हलकेच तिच्या जवळ येतो आणि ती थांबवते ,
"ये ,आता तुला उशीर होत नाहीये का ?पुरे झालं चल आता .."-मीनल
"काय हे ,जाऊ दे,आम्ही इतकी छान तारीफ केली आणि आम्हाला काही मिळत हि नाही ..."-अविनाश हलकेच नाराज होऊन कार चालू करतो ...
दोघे हि पार्टी ला पोहचतात ...अविनाश मिनलची आपल्या बॉस ची आणि त्याच्या बहिणीची (रागिणी )ओळख करून देतो ..
मीनल खूप सुंदर दिसत असते .अविनाश चा बॉस हि तिची तारीफ करतो ...बराच वेळ अविनाश आणि त्याचा बॉस काहीतरी खास बोलत असतात ...मीनल आणि रागिणी सोबत बसतात ..रागिणी मीनल च खूप निरीक्षण करत असते. मीनल ला थोडं अवघडल्यासारखे होते ..पण काय करणार ? पार्टी खूप उशिरा संपते ...शेवटी पार्टी संपवून दोघे हि निघतात ...
"काय ग काय झालं ? गप्प का आहेस ?" अविनाश
"तुला एक विचारू ?"-मीनल
"हो विचार ना ..."-अविनाश
"रागिणी तुला कशी वाटते ..?"-मीनल
काय ? म्हणजे .. .."-अविनाश
"म्हणजे कशी आहे ती ..? स्वभावाने ..,कामाने ...अस विचारतेय ? तुझ्या सोबतच काम करते का ?"-मीनल
"ओह्ह् , जेलस.... हा.....छान आहे ,सुंदर आहे ..पण तुझ्याएवढी नाही बर का ?"-अविनाश मस्करीत ...
"जाऊ दे तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही "-मीनल
"मग काय तर ..?आपण आपल्याविषयी बोलू न सोड तिला ...मीनल ,पण खरंच तू खूप सुंदर दिसतेस आज ..." अविनाश परत तेच म्हणतो .तो विषय तिथेच सोडला मीनल ने ..
.अविनाश तिला घरी सोडून स्वतःच्या फ्लॅट वर जातो ..
दुसऱ्या दिवशी त्याला थोडं अस्वस्थ पणा जाणवतो
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा