श्वास घेण्यास कारण की... भाग 7

Story of two beautiful souls

श्वास घेण्यास कारण की... भाग 7
---
सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांची क्षमा मागते..हा भाग पोस्ट करायला काही वैयक्तिक कारणांमुळे भयंकर उशीर झालाय..क्षमस्व..
--
आधीच्या भागात - 

"डॅड बास आता.." इतक्या वेळ थरथरत उभी असलेली सहन होऊन जोरात ओरडली.
"यांची काहीच चूक नाहीये डॅड....मी लपून गाडी काढली, पार्क करायच्या  वेळी ह्यांच्या गाडीला ठोस मारली...चूक ह्यांची नाहीये, माझी आहे, ते सगळं मी खोटं बोलले होते डॅड, आय अम सो सॉरी..मी तुमच्यासोबत खोट नको होतं.." तेवढ्यात तिचे वडील तिच्या जवळ आले आणि सन्नकन् तिच्या कानाखाली वाजवली.. 
आधीच तिची इतकी नाजूक परिस्थिती, एक हात बांधलेला, हृदय गतीने धडधडत होतं, त्यातला त्यात अपमान...तिला सहन झाला आणि ती कोसळली पण अभिमान ने तिला अलगद झेंललं तेही आपल्या कवेत..तसंच त्याला बघत तिची शुद्ध हरपली..
----
एव्हाना ही बातमी पूर्ण हॉस्पिटलमध्ये पसरली आणि त्यांच्या अवतीभवती बघ्यांची गर्दी वाढली. 
"काय तमाशा चाललाय इथे?" एका स्त्रीचा भारदस्त आवाज आणि सगळ्यांची नजर त्या दिशेला वळली. हॉस्पिटलचा स्टाफ भानावर आला, गडबडला आणि पटापट आपापल्या कामाला लागला. सिक्युरिटी ने ही आलेल्या पेशन्ट्स ना व त्यांच्या नातेवाईकांना पांगावले. 
"माई, तू?" अभिमानही थोडा गडबडला. सानिका अजूनही त्याच्या कवेत होती, हे त्याच्या आणि बाकीच्यांच्या लक्षात आलं. 
माईंनी त्या दोघांनाही खालून वरपर्यंत न्याहाळले.
"स्ट्रेचर आणा..तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जा... ताबडतोब.." माईंनी ओरडून तिथल्या वॉर्ड बॉय ला आदेश दिला. 
तिच्यावर परत ट्रीटमेंट करे पर्यंत सगळं वातावरण शांत झालं होतं. माईंनी सगळी सूत्र हातात घेतली होती. सानिकाचे वडील घाबरून गेले होते. नचिकेत चोरट्या नजरेने माईच्या मागे असलेल्या मुलीला निरखत होता आणि अभिमानला काळजी करू की आनंद व्यक्त करू तेच कळत नव्हतं. त्याला त्याच्या कवेत असलेली सानु सारखी सारखी आठवत होती.
तेवढ्यात माईंच्या आवाजाणे त्याची तंद्री भंगली.
"हिच्या सोबत तुम्ही आहात." माई सानिकाच्या वडिलांकडे बघून म्हणाल्या तसे ते हात जोडून समोर आले. 

"हो डॉक्टर दीक्षित.." 
"तुम्ही आत्ता बाहेर जे केलं ते मला अजिबात आवडलेलं नाही..एकतर तुम्ही इथल्या डायरेक्टर वर असा आरोप करून हॉस्पिटलचं रेप्युटशन खराब करण्याचा प्रयत्न केलात आणि..." 
"माई प्लिज..असू दे.." अभिमानने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पण माईंनी थांब असा इशारा केला तसा अभिमान खाली मान घालून उभा राहिला.. 
"हॉस्पिटलचं रेप्युटशन खराब करण्याचा प्रयत्न तर केलातच, वरून इतकी नाजुक अवस्था असलेल्या मुलीवर हात उचलला, डिस्चार्ज झाल्यावर, बाहेर गेल्यावर तुम्ही काहीही करा पण या हॉस्पिटलमध्ये असलेला प्रत्येक पेशंट हा कुठल्याही नात्यापेक्षा आम्हाला जास्त महत्वाचा आहे, त्यामुळे मुलगी तुमची असली तरी ती आमची पेशन्ट आहे आणि तिला काही झालं असतं तर आम्हाला कधीच चाललं नसतं." माई इतक्या करारी आवाजात बोलल्या की सानु च्या वडिलांचंही धाब दाणाणलं.
"डॉक्टर, आता कशी आहे ती?"
"येईल शुद्धीवर लवकरच. आज डिस्चार्ज चा दिवस होता पण तिची हिस्टरी पाहता अजून दोन दिवस तिला अंडर observation ठेवावं लागेल." 
"नर्स, डॉक्टर माने यांना ही केस समजवून सांगा आणि हिची केस त्यांच्याच हातात द्या." 
"अगं पण माई, मला माहिती आहे तिची कंडिशन..मी नक्कीच.." अभिमानच्या या बोलण्यावर माईंनी फक्त त्याच्या कडे रोखून बघितलं की तो शांत बसला..
"मला बोलायचं आहे तुझ्याशी अभिमान...लंच करायला माझ्या केबिन मध्ये ये.." म्हणत त्या तरतर निघून गेल्या. 
अभिमान ने कपाळावर हात लावला... "माई इथे यायला नको होती निदान आज तरी.." तो मनात म्हणाला. 
त्याने तिच्या डॅड कडे बघितलं ते हताशपणे मान खाली घालून उभे होते. 
तो निघणार तेवढ्यात त्याचं लक्ष नचिकेत कडे गेलं..तो समोरचं पाहत होता..तो कुठे बघतोय बघितलं तर..
"ऐ.. हे..केयु...कधी आलीस तू..." 
"अभिमान दा..काकी सोबतच आले अरे.."
"अगं इथे नाही, दिल्लीवरून कधी आलीस?" 
"कालच" ती नचिकेत कडे बघत म्हणाली. अभिमानचं लक्ष त्या दोघांकडेही गेलं, ते एकमेकांना पाहणं टाळत होते पण न राहवून बघत होते हे त्याच्या लक्षात आलं. 
तेवढ्यात नर्स ने येऊन केयुला माई बोलवत असल्याचं सांगितलं आणि अभिमान नचिकेतच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत "चल आपण दोघेही जाऊ" म्हणाला. 
---
ते निघून गेल्यावर नचिकेत ला केयु ही अभिमानच्या नात्यातली आहे बघितल्यावर धक्काच बसला. स्वतःला सावरून तो सानिकाच्या वडिलांकडे गेला आणि त्यांना शांत केलं. 
"मी या हाताने सानिकावर हात उचलला रे नचिकेत, तिची अवस्था काय आणि मी असं कसं करू शकतो? ती ठीक होईल ना रे नचिकेत? मला माफ करेल ना ती?" 
"अंकल, शांत व्हा प्लिज, तुम्ही जे काही केलं ते मुद्दाम नाही ना, सगळं रागाच्या भरात केलं..चूक सानिकाचीही होती, ती नाजूक आहे म्हणून आपण तिची बाजू नाही ना घेऊ शकत? एवढ्या मोठ्या डॉक्टर बद्दल ती खोटं बोलली आणि तिची चूक तिला कळली..शांत व्हा, तुम्ही घरी जा, आंटी ना समजवा..मी इथेच थांबतो..तुम्हीही फार थकला आहात." 
नचिकेतने त्यांना फार समजावल्यावर ते घरी गेले.
---
"केयु, तू त्या मुलाला ओळखतेस?"
"हो दादा..म्हणजे त्याची आणि माझी दिल्लीला असताना ओळख झाली."
"कोण आहे तो? आणि..आणि मिस सानिकाच्या ओळखीतला कसा?"
"मला नाही माहीत ती कोण आहे..." तोंडांत पुटपुटत" मला तेच तर कळत नाहीये.." 

बोलत बोलत दोघेही माईंच्या केबिन पर्यंत पोहोचले. 
"माई, आज कशी काय तू इथे..?"
"ते महत्वाचं नाहीये अभिमान, मला सांग मघाशी काय झालेलं एवढं? तो माणूस तुला काय काय बोलला ते सगळं ऐकलंय मी...काय प्रकरण आहे, एक्सिडेंट काय , पाठलाग काय, काय चाललंय काय तुझं? हे सगळं करायला तुला वेळ मिळतोयच कसा.." 
अभिमान ने हळूच केयु कडे बघितलं आणि खाली मान घातली. माई त्याच्यावर चिडत होत्या, रागावत होत्या..पण असं दुसर्या कोणा समोर नाही, ते पण त्यांच्या घरातल्या स्वयंपाकीच्या मुलीसमोर नाहीच नाही 
केयु ला तर धडकीच भरली, आधीच ती नची च्या विचारात आणि माईंचा राग. 
"काकी, अगं मी येते..तुम्ही continue करा बोलणं.."
"नाही केयु, तू आमचीच आहेस, त्यामुळे आम्हाला चालेल तुझं इथं असणं..हो न स्वानंद, बाहेर तमाशा झाला तर इथेही व्हायला काहिच प्रोब्लेम नाही.." 
"न..न..नको..मी येते काकी थोड्यावेळात..तुमचं झालं की.." आणि कोणाचंच काहीच न ऐकता केयु ने काढता पाय घेतला...

"तू पण न माई, इतक्या दिवसांनी एक तर ती आली, त्यातल्या त्यात तुझं तिच्यासमोर माझ्यावर बंबार्डिंग..माझी बाजू ऐकूनच घायची नाहीये असं  ठरवलंय का तुम्ही लोकांनी."

"मी तेच म्हणतेय, तू मला सानिकाच्या केस बद्दल सगळं सांगितलं होतं ना मग हे काय मधेच..तू पाठलाग करत होता म्हणे.." 

"नाही ग, त्यांचा गैरसमज झालाय, सानु चं..आपलं सानिकाचं बोलणं ऐकलं न तू..आणि त्याच साठी तिने मार खाल्ला..मग मी कुठे दोषी आहे सांग ना.."

"बरं ठीक आहे, आता हा विषय माझ्यासाठी इथेच संपतोय.. आणि तुझा अपमान तो माझा अपमान, तू इथून पुढे त्या परिवाराच्या समोर सुद्धा जायचं नाहीयेस.. तुला पेशंट्सची कमी असेल  तर तू दोन दिवस कुठेतरी जाऊन रहा पण त्यांच्यासोबत ना तू राहायचं ना त्यांची ट्रीटमेंट करायची, दॅटस इट.." 

माई प्रचंड रागात आसल्या की त्यांच्यासमोर चूप बसणं हाच एक पर्याय असायचा..त्यामुळे अभिमान ओके म्हणून गप्प बसला.. तो अस्वस्थ झाला, सानिकाचा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला..त्याला माईच्या रागाची तशी अजिबात चिंता वाटली नाही पण तिला आपल्यामुळे इतक्या सगळी जणांमध्ये अपमान सहन करावा लागला याचं राहून राहून वाईट वाटत होतं. पश्चात्ताप होत होता..आपण रागाच्या भरात असं बिल पाठवायला नको होतं, तिच्या वडिलांना केबिन मध्ये बोलवून पण देता आलं असतं..पण आता काय फायदा होता..त्याचा एवढासा राग आणि कितीतरी जणांच्या रोषांना निमंत्रण देऊन गेला, त्यातला नची आणि केयुची आत्ता चालू झालेल्या
 लव्ह स्टोरी वर पण थोडा का होईना परिणाम झाला होता.

क्रमशः

🎭 Series Post

View all