श्वास घेण्यास कारण की...भाग 10

story of two beautiful souls

अभिमान दुसऱ्याच दिवशी त्यांच्या नागपूर ला दुसऱ्या हॉस्पिटलला निघून गेला..म्हणजे ते हॉस्पिटल इथल्या हॉस्पिटल इतकं मोठं नव्हतं तरीही बऱ्यापैकी प्रसिद्धच होतं..नाही म्हणायला तिथेही हुशार लोकांचाच स्टाफ होता, पण एक फारच कॉम्प्लिकेटेड केस आली होती आणि माईंना कारणच मिळालं...
नागपूर म्हंटलं की अभिमान उत्साहित व्हायचा पण आज कोणास ठाऊक त्याला जायचं मन करत नव्हतं पण तरीही कामात टाळाटाळ करणारा तो नव्हता.. 
पोहोचल्या पोहोचल्या त्याने ऑपरेशनची तयारी करण्याचे आदेश दिले...आणि आजूबाजूचं सगळं विसरला..त्याचा स्वभावच होता तो..पेशंट समोर काहीही नाही, एक कर्तव्यदक्ष डॉक्टर, आपल्याला ह्या पेशंटला काहीही करून वाचवायचं आहे हेच डोक्यात असलेला...
तीन तास झाले, मग चार तास तरीही ऑपरेशन पूर्ण झालं नव्हतं...तेवढ्यात कोणीतरी फोन आणून दिला..
"सिस्टर, माईंचा फोन असेल तरच उचला आणि स्पीकरवर ठेवा.."
..
"माई, फोन स्पीकरवर आहे, बोल पटकन काय झालंय.."
"काही नाही, पोहोचल्यावर एक मेसेज करता येत नाही तुला?"
"ओह! Common माई, तुला माहिती आहे किती urgent आहे हे, आणि मी पोहोचल्याची वर्दी तुला कोणीतरी दिली असेलच म्हणून मी फोन हातात घेतलाही नाही..." 
"पण अभिमान तू नेहमी मला.." 
"माई, आज नाही करू शकलो, इट्स ओके ना, चल बाय.."
त्याने फोन कट करायची आणि तो फोन त्याच्या केबिनमध्ये परत सोडून आणायची सूचना दिली..
"माईसोबत मी असं वागायला नको होतं आत्ता.. असो हे एवढं झालं की लगेच फोन करतो तिला.." 
--
इकडे सानिकाचा अभिमानची वाट पाहून पाहून दुपारी डोळा लागला...तिला वाटलं निदान संध्याकाळी तरी तो येईल म्हणून ती आरामात झोपी गेली पण संध्याकाळीही तो आलाच नाही.. 
ती हिरमुसली...आणि तिच्या डोक्यावर कोणीतरी हात ठेवला.. तो तिच्या वडिलांचा होता..
"अरे..डॅड ला तर साफ विसरून गेले होते मी, कसंय ना अनोळखी माणसाची ओढ आपल्या लोकांना पण विसरायला भाग पाडते, सॉरी डॅड.." ती मनातच म्हणाली..पण दुसऱ्याच क्षणी तिला बाहेर त्यांनी मारलेली चपराक आठवली आणि हिने नजर दुसरीकडे फिरवली..
"कसं वाटतंय आता सानु?"
"---" 
"बोलणार नाहीये का सानु माझ्याशी?" 
"डॅड, मला काही वेळ एकटं राहू द्याल प्लिज?"
"अगं पण पिल्लु.. आपण काल पासून बोललेलो नाहीये ग! हवं तर मी तुझी माफी मागतो, खरंच चूक झाली माझ्याकडून.." 
"डॅड, प्लिज ना, मला नाही बोलायचं आहे कोणाचसोबत..तुम्ही जा बरं, मला आराम करायचा आहे.. आणि हो मी रागावली आहे तुमच्यावर..जोपर्यंत हा राग जात नाही तो पर्यंत मी बोलणार नाही..तुम्ही जा आता आणि आईला पाठवा.." 
ते हताश होऊन बाहेर निघून गेले..
हिच्या डोक्यात परत अभिमानचाच विचार..
"अरे यार का विचार करतेय मी याचा..जाऊदे.." तिने सहज म्हणून टाईमपास करण्यासाठी फोन हातात घेतला पण तिच्या लक्षात आलं, अभिमानने नंबर दिला होता की तिला..
तिने व्हाट्सएप उघडून बघितलं आणि नंबर सर्च केला तर होता तिथे..त्याने त्याचा पर्सनल नंबर दिला होता..
ती त्याच्या विंडो मध्ये गेली..
अरे यार, ह्याला लास्ट सीन बंद करून ठेवण्याची गरज काय होती.. 
तिने dp ओपन करून बघितला..कुठल्यातरी बर्फ़ाळ भागातला, गॉगल लावलेला सन किस्ड फोटो..
तिच्या चेहऱ्यावर आपसूकच स्माईल आली.. ये ना रे ऑनलाइन.. तिचं मन म्हणालं..

आता ती सारखी व्हाट्सअप्प उघडून त्याच्या विंडो मध्ये डोकावून बघायला लागली..
....
त्या सर्जरी मध्ये आठ दहा तास निघून गेले आणि ऑपरेशन सक्सेसफुल झालं.. त्यानंतरच्या त्याच्या फॉर्मलिटीज आणि बाकी गोष्टींमध्येही बराच वेळ गेला तोपर्यंत रात्र झाली आणि हा थकून भागून त्याने त्याच्यासाठी घेऊन ठेवलेल्या फ्लॅटवर आला आणि जेवण करून सरळ बेडवर पडलाच..
एकतर प्रवास, आल्या आल्या इतकं मोठं आणि किचकट ऑपरेशन त्यामुळे भयंकर थकला होता..
फोन चा तर अक्षरशः विसरच पडला होता त्याला...मध्ये माईचा विचार येऊन गेला..खरंच तुसड्यासारखं बोललो का मी तिच्याशी? पण मला माहितीये माईनी मुद्दामहून मला इकडे पाठवलं..तिने म्हंटलं असतं तर तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे पण असं षडयंत्र मग ते छोटंसं का होईना केलं ना ते नाही पटलं मला, विचार करतच त्याचा कधी डोळा लागला कळलंच नाही..
नंतर कधीतरी मध्यरात्री जाग आली आणि सानिकाचा चेहरा डोळ्यासमोर आला..  
त्याने व्हाट्सएप उघडलं..कितीतरी मेसेजेस ची गर्दी..ग्रुप चे काय, पर्सनल काय..पण त्याला हव्या असलेल्या व्यक्तीचा मेसेज अजूनही आला नव्हता.. 
त्याचा चेहराच उतरला..मी आज तिकडे एकदाही गेलो नाही, एकदाही बोललो नाही, तिला आठवण नसेल आली माझी?
त्याने हळूच तिच्या प्रोफाइल मध्ये डोकावून बघितलं..ती ऑनलाइन च होती..
अरे ही झोपली नाही अजून, कोणाशी बोलत असेल का? इतक्या रात्री? त्याला तिचा dp बघायची ईच्छा झाली पण त्याने ते टाळलं..माईने केलं तेच करेक्ट आहे बहुतेक..मी खरंच विसरून जायला पाहिजे तिला.. 
त्याने लगेच मोबाईल बंद केला, पण मेसेज ची टोन, नोटिफिकेशन बघितलं तर सानिकाचा मेसेज पण तिने तो आत्तापर्यंत डिलीट फॉर एव्हरीवन केला होता..
ह्याची झोपच उडाली..
"Hey, what was that? Your deleted msg.." ह्याने लगेच रिप्लाय केला
"हे, सॉरी, चुकून पाठवला होता..सो, डिलीट केला..सॉरी हं.."
"Aaa.. स्टॉप बिंग सॉरी, टेल मी व्हाट् वॉज दॅट?"
"काही नाही हो..ते..मी"
"ते..मी ..काय?" 
"ते मी हाय म्हणून msg केला..तुम्ही ऑनलाइन दिसलात सो.." 
अच्छा तर ही सुद्धा माझ्या विंडो मध्ये होती म्हणजे..तो हसला..
"सो व्हॉट, त्यात डिलीट करण्यासारखं काय आहे? आणि मी ऑनलाइन असो नसो..तुम्ही कधीही मला msg पाठवू शकता, काही प्रॉब्लेम नाही.."
"ओके डॉक्टर.." तिने हसण्याचा स्माईली पाठवला..
त्यानेही थम्ब अप पाठवले..
"झोपली नाहीस अजून?" तो अहो जाहो वरून  अरे तुरे वर आला..
"आता झोपते.."
"बरं वाटतंय का आता? काही त्रास नाही ना होत आहे.." 
"नाही नाही अजिबात नाही... ते डॉक्टर माने, तुमच्याऐवजी आलेत ते, त्यांचं लक्ष आहे..सो.." ती मुद्दामहून असं म्हणाली..
"हम्म.."
"एक विचारू? राग नाही ना येणार?"
"काहीही विचार.."
"डॉक्टर माने, म्हणजे चांगले आहेत ते तसे पण तुम्ही का नाही माझी ट्रीटमेंट करत?" 
"अच्छा..असंच काही नाही ग, आज मला इमर्जन्सी केससाठी इकडे नागपूरला यावं लागलं..आणि.."
"अच्छा म्हणून तुम्ही आज इकडे फिरकला नाहीत.." ती पटकन बोलून गेली आणि जीभ चावून मेसेज डिलीट करणार तोच रीड रिसीट मिळाली तिला..
"नाही म्हणजे मला म्हणायचं होत..आज दिसला नाहीत ना.." तिने लिहून पाठवलं पण ह्याने ती आपली वाट बघत होती हे ओळखलं..
"Oke, हो इकडे फार बिजी होतो.."मग तो कितीतरी वेळ इकडे नागपूरच्या हॉस्पिटल बद्दल आणि ऑपरेशन बद्दल तिला सांगत बसला, ती ही कुतूहलाने त्याचं सगळं बोलणं ऐकत म्हणजे वाचत होती..

"कधीचा मीच बोलतोय, कंटाळा नाही ना आला?" 

"नाही नाही, अजिबात नाही, उलट छान वाटतंय..मला वाटलं होतं तुम्हाला राग आला असेल मी जे काही केलं त्याचा पण तुम्ही उलट चांगलं बोलत आहात त्यामुळे रिलॅक्स आहे..डॅड ना पण काय गरज होती पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेट करण्याची..वरून मला चारचौघात बोलून अपमानित पण केलं, मी बोलत नाहीये त्यांच्याशी आणि कधीच बोलणार नाहीये.."

"एक सांगू राग येणार नसेल तर?"

"हं.."

"तुला खरंच असं वाटतंय का त्यांची काही चूक आहे ती? चूक तुझी जास्त आहे या सगळ्यांमध्ये..तू अल्लड आहेस सध्या त्यामुळे त्यांना काळजी वाटते, एखादा मुलगा आपल्या मुलीचा पाठलाग करतो आणि त्यामुळे तिचा एक्सिडेंट होतो हे कोणत्या बापाला आवडेल..काहीही झालं तरी तू खोटी बोलली होतीस..समजा..तू खरं काय ते सांगितलं च नसतं तर त्याचे परिणाम मलाही भोगायला लागले असते..नाही जाब नाही विचारत आहे किंवा कसला रागही नाही पण डॅडीशी अबोला करण्याची गरज नाहीये असं वाटतंय.. त्यांनाही त्रास होत असेलच की..तू उद्या मोकळ्या मनाने त्यांना माफ कर आणि बोल त्यांच्याशी..मी ही असाच करतो..कधी कधी आपल्या आई वडिलांचा ओव्हर पझेसिव्हनेस त्रासदायक वाटतो आपल्याला पण त्यामागे काही कारणं असतात.."
त्याने मेसेज सेंड केला पण तिने रीड केला नव्हता.. 
"आहेस का?"
"हॅलो आर यू देअर?" 
"झोपलीस का? ओके बाय गुड नाईट.." 
 खरोखर मोबाईल तसाच ठेवून तिला झोप लागून गेली होती... कोणीतरी व्यक्ती आत आली, तिच्या अंगावर पांघरून ठीक केलं आणि मोबाईल बघून बाजूला ठेवला आणि निघून गेली..

क्रमशः
©नेहा गोसावी

🎭 Series Post

View all