श्वास घेण्यास कारण की...भाग 2

सिस्टर ने ऑपरेशन स्टार्ट करताना तिची केस वाचवून दाखवली आणि डॉक्टर अभिमान दीक्षित ने ऑपरेशन स्?

सानिकाच्या accident नंतर ताबडतोब ambulance आली आणि तिला घेऊन गेली. Ambulance कोणी बोलावली कधी बोलावली हे कोणाला कळलं नाही, चौकशी करण्याचा तितकासा वेळही नव्हता. गर्दीपैकीच कोणीतरी तिच्यासोबत ambulance मध्ये चढलं.

ज्या हॉस्पिटलमध्ये ती ambulance आली त्या हॉस्पिटलचा अंबियन्स पाहून तिच्यासोबत आलेला माणूस चाट पडला, त्याने नर्स ला विचारलं कोणी बोलावलीये ही अंबुलन्स तर तिने उत्तर दिले नाही. तो काउंटर जवळ गेला, तर तिच्या ऍडमिशन च्या सगळ्याच फॉर्मलिटीज ची कागदपत्रे रेडी होती, फक्त त्यावर तिच्या नातेवाईकाची सही बाकी होती. ते बघून तो आणखी गोंधळला. "ह्या पोरीची काहीतरी गडबड वाटतेय लेका, उगाच फसायचो आपण, तशीही हिची सगळी सोय झाली आहे इथे" म्हणत तो तिथून पळाला.
तिला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. थोड्यावेळाने तीन चार डॉक्टरस आत शिरले. आणि थोड्यावेळाने मेन सर्जन जे हॉस्पिटलचे डायरेक्टर म्हणून नावारूपाला आले होते त्यांनीही सरळ आत प्रवेश.
सरजन्स चे कपडे, पूर्ण चेहरा आणि केस झाकलेले की त्यातून फक्त त्यांचे तिक्ष्ण घारे डोळेच दिसत होते.
त्याने एक वेळ सानिकाच्या चेहऱ्यावर नजर टाकली आणि
"अनेस्थेशीया दिलाय सर, कॅन वि स्टार्ट?" तिथलाच एक डॉकटर म्हणाला.
"हम्म, सिस्टर रिपोर्ट सांगा."
सिस्टर ने ऑपरेशन स्टार्ट करताना तिची केस वाचवून दाखवली आणि डॉक्टर अभिमान दीक्षित ने ऑपरेशन स्टार्ट केले.
"सर, ह्यांच्या ह्रदयाला आधीच छिद्र आहे आणि खांद्याला जबरदस्त injuiry झालीये तिच्या, सर्जरी किचकट, हार्ट च्या थोडं वरती असल्याने वाचण्याचे चान्सेस तसे कमीच आहेत. आपण ही केस घ्यायला नको होती, हॉस्पिटलचं नाव.." एक डॉक्टर म्हणाला.,
"मी ही केस हातात घेतलीये याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे ना डॉक्टर. डोन्ट वरी अबाउट इट." अभिमान आपला हात चालवत म्हणाला.
"Ok सॉरी सर."
"Should not be.. seviour damage झालंय आतून. ह्यांच्या नातेवाईकांना बोलवलंत?"
"हो सर, ते आले आहेत"
"हम्म, हे नुकतेच कॉलेज paasout झालेले मुलं इतकी बेफिकीर गाडी चालवतात आणि आई वडिलांच्या जीवाला घोर लावतात." अभिमान म्हणाला.
ऑपरेशन theater मध्ये गप्पा गोष्टी करत कधी ऑपरेशन सस्केसफुल करण्याची अभिमान ची पध्दत होती, जसे काही लोकांना काम करतांना गाणी वैगरे ऐकायची सवय असते.
तीन चार तासांच्या ऑपरेशन नंतर "डन" म्हणत उरलेला पसारा हाताखालच्या doctors कडे सोपवत तो थिएटर च्या बाहेर पडला तेव्हा तिचे आईवडील बाहेरचं बसले होते त्यांनी अभिमान ला अडवलं.
"काळजी करू नका, पाच सहा तासांनी शुद्ध येईल त्यांना. तुम्ही 3 वाजता माझ्या केबीन मध्ये या आपण बोलूयात." म्हणत अभिमान तिथुन बाहेर पडला.
---
सानिका शुद्धीवर आली तेव्हा तिचा खांदा प्रचंड दुखायला लागला. तिच्या लक्षात आलं, आपला अपघात झालाय आणि आपण आता हॉस्पिटलमध्ये आहोत ते.
कोणी आणलं आपल्याला इथे ती विचार करू लागली तितक्यात तिचे आईवडील लगबगीने आत आले.
"मम्मा डॅडी..सॉरी" ती डोळ्यात पाणी येत म्हणाली.
"डोन्ट वरी बाळा..तू आता आधी ठणठणीत बरी हो बरं" तिची आई म्हणाली.
तिने डॅडी कडे बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावर तिच्याबद्दलचा राग स्पष्ट दिसत होता. ते काहीच बोलले नाहीत, फक्त तिच्या बाजूची फाईल घेऊन वाचण्याचं नाटक करीत राहिले.
"डॅडी म्हणाले ना सॉरी, आता असं नाही होणार माझ्याकडून." म्हणताना तिच्या डोळ्यांत पाणी आलं.
"सानिका, माझा राग सहजासहजी जात नाही तुला ही माहीत आहे, एक बाप म्हणून तर नाहीच नाही, पण आता तुला काही झालं असतं तर काय केलं असतं मी? असो, तू सुखरूप आहेस त्यातच सगळं आलं.."
"हे ना..ते सगळं त्या मर्सिडीजवाल्या मुळे झालं.." ती रडत म्हणाली, पुढे काही बोलणार तेवढयात..
"कोण मर्सिडीजवाला मिस सानिका?" आणि रूम मधल्या सगळ्या नजरा त्याच्याकडे वळल्या.
डॉक्टर अभिमान राउंडवर आला होता. जबरी personality असलेला, देखणा, उमदा, घाऱ्या डोळ्यांचा, आणि अत्यंत तल्लख बुद्धीचा डॉक्टर अभिमान दीक्षित.
सानिका ने गोंधळून त्याच्या कडे पाहिले, नंतर डॅडी कडे..
डॅडीने खुणेनेच तुझे डॉक्टर म्हणून सांगितलं.
तो तिच्या जवळ आला आणि "कसं वाटतंय आता?" विचारत तिच्या हाताची बोट किंचित उचलून बघितली.
ती कोणास ठाऊक त्याच्याच कडे पाहत होती.
"मिस सानिका, दुखतंय का आता?" त्याने परत एकदा हाक मारली तेव्हा ती भानावर येऊन "आई ग!" म्हणत जोरदार ओरडली.
"हम्म, त्रास होतोय, संवेदना जाणवतायत तिथपर्यंत is a good thing..मिस सानिका, लोखंडाची साळी तुमच्या खांद्याला स्पर्श करून गेलीये म्हणून तिथे गंभीर दुखापत झालीये. हाताची हालचाल अजून दोन महिने तरी करता येणार नाही तुम्हाला."
"Doctor इथून discharge?" सानिकाच्या वडिलांनी विचारलं.
"अजूनतरी पाच सहा दिवस under observation ठेवावं लागेल..ऑपरेशन जरी सस्केसफुल झालं असलं तरी अजुन काही कॉम्प्लिकेशन्स यायला नकोत ते बघावं लागेल." सानिका कडे तिरपा कटाक्ष टाकत अभिमान म्हणाला.
"ठीक आहे डॉक्टर, अजून एक, तिला इथे कोणी आणलं आणि तिच्या सगळ्या फॉर्मलिटीज मध्ये तत्परता कोणी दाखवली ते कळेल का?"
"वेल मिस्टर चौधरी ते तुम्हाला रिसेप्शनिस्ट कडून कळेल.."
म्हणत तो निघून गेला.
तो पाठमोरा जात असताना, त्याची चाल, रुबाब व त्याचं व्यक्तिमत्वाने भारावून जात चौधरी परिवार त्याच्याच कडे पाहत होता.

🎭 Series Post

View all