श्वास घेण्यास कारण की... भाग 4

Story of two different souls.

अभिमान आत आला तेव्हा संध्याकाळ झाली होती. पश्चिमेला तोंड असलेली खोलीची खिडकीतून सूर्याची किरणे आत आली होती. खोलीत एक वेगळाच सुगंध पसरला होता.
त्याने इकडे तिकडे पाहिलं...सानिकाशिवाय दुसरं कोणीही नव्हतं तिथे. 
त्याने पाहिलं सानिका पुस्तक वाचण्यात रमली होती. पुस्तक वाचताना मधेच तिच्या चेहऱ्यावर दीर्घ हास्याची लकेर उमटे तर कधी आश्चर्यचकित झाल्याचे हावभाव येई...सूर्याच्या तिरप्या किरणांनी तिच्या कानामागून आलेल्या केसांवर सोनेरी रंगाची उधळण केली होती. केसांची बट तिच्या गालावर येऊन स्थिरावली होती. गोरापान गोल तिचा चेहरा एका बहुलीसारखा दिसत होता.
पुस्तक वाचताना ती आता खळाळून हसली आणि अभिमान भानावर आला.

"खूपच कॉमेडी काहीतरी वाचन चालू आहे वाटतं?" त्याने खोलीतल्या शांततेचा भंग करत विचारलं, ती दचकली. उठून बसण्याच्या प्रयत्नात हाताची नको ती हालचाल झालीच आणि ती कळवळली.

त्याने तिला हातानेच बस बस म्हणत इशारा केला तशी ती पूर्वीसारखीच उशीला टेकून बसली.

"आत्ता राऊंड आहे तुमचा?" तिने वेळ बघत विचारलं. 

"अहं, इथून जात होतो म्हंटलं डोकावून जावं,  बघू कसा आहे पेशंट तर पेशंट तर इथे पुस्तक वाचत खदखदून हसण्यात व्यग्र आहे." तो तिच्याकडे कौतुकाने बघत म्हणाला. 

"नाही, तसं नाही, हे सुहास शिरवाळकरांचं "बरसात चांदण्यांची" आणून दिलं डॅडींनी..तेच वाचतेय.. वाचण्याची आवड नाही, पण आता बोर झालं होतं, डॅडी म्हणाले वाच... वाचायला सुरुवात केली तर प्रचंड इंटरेस्टिंग." 

"बरसात चांदण्यांची म्हणजे ती टीनेज वाली लव्ह स्टोरी, राईट?" 

"वाचलंय तुम्ही?" 

त्याने होकारार्थी मान हलवली. 
"अरे वा! डॉक्टर असूनही पुस्तकं वाचता?" 
तिचा तो निरागस प्रश्न ऐकून त्याला हसायला आलं..तो खरंच फक्त डोकावून जाणार होता, पण सानिका इतक्या मनमोकळ्यापणाने बोलतेय म्हंटल्यावर त्याचा तिथून पाय निघाला नाही. इतर कोणीही असतं तर कामाशिवाय तो कोणाशी बोलायला गेलाच नसता, पण इथून जाताना त्याची पावलं हिच्या खोलीकडे कशी काय वळली याचं त्यालाच आश्चर्य वाटलं.

"डॉक्टर असूनही म्हणजे? आम्ही लोक काय आभाळातून पडलेले असतो?" 

"नाही तसं नाही, तुम्हा लोकांना अभ्यास असतो मग अवांतर वाचायला वेळ असतो नसतो, म्हणून विचारलं." 

"हं, आम्हां लोकांना अवांतर वाचायला पण आवडतं, गाणी ऐकायला आवडतात, एन्जॉय करायला आवडतं, काssssर चालवायला पण आवडते पण दुसऱ्यांच्या नवीन कारला मागून धडक द्यायला नाही बाबा आम्हांला आवडत." तो चिडवत म्हणाला आणि तिचा हसरा आ वासून गंभीर झाला. 
"तुम्हाला कसं माहीत, मी कारला मागून धडक दिली होती ते?" 
त्याने खांदे उडवले. 
"सांगा तर? तुम्ही होतात का तिथे? की तुम्हाला कोणी सांगितलं?"
"तो मीच होतो सानिका, तुमचा एक्सिडेंट झाल्यावर मीच बाकीच्या फॉर्मलिटीज कम्प्लिट केल्या आहे."
"ओह! मग झालं ना सगळं, सॉरी, मला गाडी चालवता आली नाही, पार्क करायच्या वेळेस जरा स्पीड जास्त केली तर तुमच्या गाडीला धडकले, नाही म्हणजे, मला वाटलं तगडी किंमत वसूल करणार तुम्ही म्हणून मी तिथून पळाले आणि रेस्ट इज हिस्टरी." 
"तगडी किंमत तर मी तेव्हा वसूल करणारच होतो..."
"आता नाही ना मग!" ती आनंदत म्हणाली..
"माझं वाक्य तर पूर्ण होऊ द्या! तगडी किमंत तशीही वसुलच करणार होतो, आता तर बिल च घेऊन आलोय शोरूम चं, फक्त एवढंच सांगा बिल तुम्हाला देऊ की तुमच्या डॅड ला?" 
"डॅड ला? नाही नाही नाही..मला सांगा किती द्यायचे आहेत मला?" 
एवढ्या एसी मध्ये पण तिला घाम फुटलाय बघून त्याला मजा आली. त्याने खिशातून बिल काढून तिच्यापुढे ठेवलं.
"बापरे, इतकं?" ती त्याच्या हातातून बिल काढून घेण्याचा प्रयत्न करणार तितक्यात त्याने ते बिल खिशात ठेवलं. 
"चुकीचं आहे हे! इतकं काहीच झालं नव्हतं तुमच्या गाडीला, आणि झालं असेल तर मी नव्हतं केलं ते, आणि ते ... तुम्हाला ते प्रूफ करावं लागेल." सानिका खूप हुशारीने  म्हणाली. सानिकाचं बोलणं झाल्यावर त्याने दोन्ही भुवया वरती केल्या आणि एक दोन्ही ओठ आत दुमडून फक्त "हम्म हम्म केलं" तिच्या चेहऱ्यावर परत आनंद पसरला. 
"अँड व्हॉट इफ? व्हॉट इफ आय गिव्ह यु दॅट प्रूफ?" तो अचानक म्हणाला तशी ती बावरली. 
"अं?" मी प्रूफ दिलंच तर काय करशील?" 

तेवढयात सानिकाचे वडील आत आले.
"कसलं प्रूफ मागताय डॉक्टर? ते पण वकीलाच्या मुलीला? हा हा हा हा " 
"तुम्हीच विचारा त्यांना"
"काय ग सानु? काय चाललंय?" 

"क क काही नाही डॅड, हे.. हे पुस्तक... ते  म्हणतायत वाचलंय, मी म्हणतेय नाही, कसं शक्य आहे? प्रूफ द्या.." 

"हा हा हा अच्छा अच्छा.. गप्पा चालल्या होत्या तर.. कधी मिळणार तर डिस्चार्ज डॉक्टर"

"दोन दिवसांनी परत एकदा टेस्ट करून त्या घरी जाऊ शकतात." हे म्हणताना त्याची नजर तिच्यावर खिळली होती, आणि तिने ही त्याच्याकडे नेमकं तेव्हाच बघितलं. दोघांची क्षणभर नजरानजर, तिने लगेच खाली पाहिलं. 
हे असं बरं नाही, त्यानेही स्वतःला बजावलं आणि सिस्टर ला आवाज देत निघून गेला.

तो निघून गेल्यावर डॅडीने तिच्या कपाळावरचा घाम बघत तिला विचारलं, "का इतकी घाबरली आहेस माझी सानु?" 

"काही नाही, जरा टेन्शन आलेलं, आपल्या गाडीचं, त्या मर्सिडीज वाल्या..."

"त्याचं काय? माझी चौकशी चालू आहे, तो कसा दिसतो आणि गाडीचा नंबर वैगरे तुला घाबरून नसेल कळला ना, हरकत नाही, मी पोलीस स्टेशन मध्ये complaint केली आहे, आणि हं तुझा accident ज्या हाय वे ला झाला तिथे रस्त्यावर एक दोन ठिकाणी कॅमेरे आहेत, मी आर टी ओ ऑफिस मध्ये पण संपर्क साधलाय, दोन तीन दिवसात कळेलच, कोण आहे तो हरामखोर..तू फक्त शांत बस आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस..ओके?"

"नाही डॅड, असं काही नाही.." 

"तू शांत रहा म्हंटलं न आणि अजिबात त्रास करून घेऊ नकोस. आई येतंच असेल, मी तोपर्यंत बाहेर फेरफटका मारून येतो, इथे कंटाळवाणं वाटतंय..तुला टीव्ही लावून देऊ का?" 

तिने एवढंस तोंड करत नकारार्थी मान हलवली. आता पुढे काय होणार, डॅड त्याला सोडणार नाही कारण मी खरं बोलतेय हे च त्यांना वाटणार, मी सुटतेय पण तो डॉक्टर फसतोय ना ह्याचच मला वाईट वाटतंय... 

विचार करतच तिचा डोळा लागला आणि ती निद्रिस्त झाली.

क्रमशः
©नेहा गोसावी

🎭 Series Post

View all