श्वास घेण्यास कारण की - भाग 1

Story About Two Different Souls

त्याच्या नव्या कोऱ्या काळ्या रंगाच्या चकाकदार मर्सिडीजला ठोकल्याचा आवाज आला आणि गाडी किंचित जागेवर हलली, तेव्हा तो गाडीतच होता. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या शॉप मध्ये काम असल्याने त्याने गाडी पार्किंगला व्यवस्थित लावली होती पण तो गाडीतून खाली उतरणार इतक्यात त्याला फोन आला, पण आत्तापर्यंत बाहेर त्याच्या गाडीला जबरदस्त डॅश दुसऱ्या एका गाडीने मारली होती.

"ओssss तेरी!!!! सानिका, गेलीस कामातून तू आता! याच्या गाडीचं नुकसान भरून देण्यासाठी मला डॅडींची ही टिनपाट इंडिका विकावी लागेल, ते पण त्यांना न सांगता...भागो!" स्वतःशीच चिडत तिने घाईत गिअर रिव्हर्स वर आणला आणि ऍक्सेलेटर दाबलं, गाडी वेगाने मागे गेली आणि मागच्या झाडाला आदळली.
"शीट यार! हम्म, रिलॅक्स सानिका! जाऊ दे आधी इथुन सुटायला हवं!" तिने मोठा श्वास घेतला आणि गाडी रस्त्यावर आणली.

एव्हाना मर्सिडीज चं दार उघडून तो रागारागाने बाहेर आला.
"ऐ ऐ ऐ वेट!!!" तो मोठयाने ओरडला पण सानिका तिची गाडी घेऊन पळून गेली होती.
त्याने रागातच दात खालच्या ओठाशी दाबला आणि धावत गाडीत जाऊन बसला व गाडी चालू केली.
___
इकडे सानिकाच्या घरी एकच गदारोळ माजला होता.
"मी सानिकाला कधीपासून फोन लावतोय पण ती उचलत नाहीये. काय गरज होती मला न विचारता गाडी घेऊन जाण्याची. त्या सिक्युरिटीने सुद्धा तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यालाच हुलकावणी देऊन निघून गेली ती."
सानिकाचे वडील जाम चिडले होते. एरवी सानिका त्यांना फोर व्हीलर चालवण्यासाठी आग्रह करायची तर ते भीतीपोटी तिला नेहमी नकार द्यायचे आणि तिचा हिरमोड व्हायचा. आज तिने जबरदस्ती कोणालाही न सांगता गाडी उचलली.
"तुम्ही का इतके घाबरताय पण तिला गाडी चालवायला? टू व्हीलर नाही, फोर व्हीलर तर नाहीच नाही म्हणता. तरुण रक्त आहे ती, त्यात तुमची मुलगी , गाडी चालवायची खुमखुमी तर असणारच ना.." सानिकाची आई समजावणीच्या सुरात म्हणाली.
"ती प्रॉपर शिकली नाहीये गाडी चालवायला अजून, तिचा ड्रायव्हिंग क्लासवाला म्हणाला, घाई करते म्हणून."
"हो पण आता त्रागा करून काही होणार आहे का?"
"तुला कल्पना आहे ना किती नाजूक तब्येत आहे तिची ते? लहानपणापासून तळहातावरच्या फोडासारखं वाढवयलंय, आणि तिचा तो आजार...म्हणून भीती वाटेतय ग, बाकी काही नाही."
तसं बघायला गेलं तर सानिकाच्या वडिलांची काळजी रास्तच होती, पण सानिकाला फुटलेले पंखांना आता आकाश खुणावत होते. म्हणूनच हिम्मत करून तिच्या डॅडला चकवा देऊन ती घराच्या बाहेर पडली..
---
इकडे थोडे अंतर आल्यावर तिने तिच्या गाडीचा स्पीड जरा कमी केला. आता ती हायवे च्या मोकळ्या रस्त्यावरून गाडी चालवत होती.
"हुश्श! कोणी दिसत तर नाहीये मागे.." तिने एकवार विंग मिरर वर नजर टाकली आणि दुसऱ्याच मिनिटाला तिला ती पाचशे मीटर अंतरावरची मघाशीची काळी गाडी सुसाट वेगाने येताना दिसली.
"ओह नो" तिसऱ्या गियर वरून तत्परतेने तिने चौथ्या गियर वर गाडी आणली, मग पाचवा.. साठ किलोमीटर प्रतिवेगावरून आधी शंभर मग एकशेवीस वर कशी आली तिला कळलंच नाही.
एकीकडे तिच्या डॅडी चा फोन येत होता, ते चिडतील म्हणून, दुसरीकडे तो मर्सिडीज वाला अगदी तिला चेस करत होता म्हणून चांगलीच बिथरली होती.
एव्हाना तिला चेस करणारी गाडी तिच्या समांतर रेषेत आली.
तिने गाडी स्लो केली की तो ही स्लो व्हायचा, तिने वाढवली की तो ही वाढवायचा. तिने आता शेवटचं परत एकदा त्याच्या पुढे निघून जाण्याचं ठरवलं. एक्सेलेटर वर जोरात पाय दाबत तिच्या गाडीने 140, 150 चा स्पीड पकडला आणि ती पुढे निघून गेली खरी परंतू त्याने परत चेस केलं. आता यावेळेस तिचा स्पीड आऊट ऑफ कंट्रोल होत चाललाय हे तिलाही कळलं. पण काहीच समजायच्या आतच समोर रस्त्याचं उड्डाण पुला चं काम अर्धवट चालू असलेलं तिला दिसलं. आतून मजबूत घाबरल्यामुळे
स्पीड कमी करावा, ब्रेक दबावा की क्लच हे न कळल्यामुळे तिची जबरदस्त धडक त्या अर्धवट बांधकामाला बसली आणि मर्सिडीजवाला सराईतपणे बाजूने निघून गेला.

क्रमशः
©Neha Nikhil Gosavi

🎭 Series Post

View all