Login

शुभारंभ भाग २३

in this part prajkta is not happy still she is doing her job perfectly

शुभारंभ भाग २३

क्रमश : भाग २२

ओम ने पेंटिंग बघितले आणि चमकालाच आणि प्राजक्ता कडे बघू लागला . प्राजक्ताने पण त्याला डोळ्यानेच सांगितले " मला माहित नाही हे इकडे कसे आले ?"

मग फॉर्मल गप्पा " तुम्ही कोणत्या कंपनीत आहे ? तुम्ही काय करता वगैरे झाल्या . तेवढयात चहा आला .. चौघांनी  चहा घेतला .

ओम चे लक्ष राहून राहून त्या पेंटिंग कडे जात होते .. ते ह्या माणसाच्या केबिन मध्ये कसे आले याचा त्याला विचार पडला .

डायरेक्टर सर " हे पेंटिंग मी तुमच्या यु ट्यूब चॅनेल वरून घेतले आणि त्याची फ्रेम बनवून घेतली .. खरं सांगतो ओम .. तुमच्या मिसेस ने बनवलेलं पेंटिंग ने माझी झोप उडवली  आणि ते हसू लागले ..

ओम च्या मनात .. ‘’हसतोस काय जाड्या .. एक वाजवू का कानाखाली  असे ओनर ला न  विचारता असे पेंटिंग घेऊच कसा शकतोस तू ?"

ओम " येस .. खूपच सुंदर पेंटिंग आहे ते ... हे पेंटिंग प्राजक्ताने खास माझ्या साठी काढले होते .. इथे कसे आले याचेच मला आश्यर्य वाटतंय "

डायरेक्टर " मी हे पेंटिंग तुमच्या कडून परचेस करणार आहे .. तुम्ही सांगाल ती कॉस्ट मी द्यायला तयार आहे .. प्राजक्ता ..

डायरेक्टर " प्राजक्ता मॅडम आपल्या शाळेची आर्ट गॅलरी चे काम करतच  आहेत ना तेव्हा मी त्यांना त्या कॉस्ट बरोबर याची पण कॉस्ट देईन "

ओम " सॉरी मिस्टर .. धिस पेंटिंग इज  नॉट फॉर सेल .. आय  रिकवेस्ट यु काइंडली रिमूव्ह धिस एमिडिएटली "

डायरेक्टर " प्लिज mr . ओम आय सिम्पली लव धिस  पेंटिंग .. आय वॉन्ट धिस "

ओम तिथून उठला आणि निघू लागला .. " सॉरी बट माय डिसिजन इज फायनल . तुमचा फ्रेम चा जो काही खर्च आला असेल तो मला कळवा मी उद्या चेक देतो . आज कोणाला तरी सांगून हे पेंटिंग आमच्या घरी पोचवा . आणि तावातावाने बाहेर पडला .

प्राजक्ताच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले .. ती प्रिंसिपल मॅम आणि डायरेक्टर सरांकडे बघत " ओम .. ओम अशी हाक मारत केबिन च्या बाहेर जाई  पर्यंत ओम मुलांना घेऊन घरी निघून गेला होता ..

ओम प्राजक्ताला एकटीला शाळेत मागे ठेवून निघून गेला .. प्राजक्ता च्या डोळयातून गंगा जमुना वाहू लागल्या .. ती तिथेच बाहेरच्या चेअर वर बसली . तेवढ्यात प्रिंसिपल मॅम बाहेर आल्या

प्रिन्सिपल मॅम " प्राजक्ता ! काय झाले ? Mr . ओम असे तडका फडकी निघून गेले .

प्राजक्ता " हो ना .. त्या पेंटिंग बद्दल आमच्या खूप इमोशन्स आहेत .. सरांनी असे नको होते करायला .. बनवून घ्यायच्या आधी विचारायचे होते ना . "

प्रिंसिपल मॅम " हो पण तुम्ही इंटरनेट वर का टाकले मग ? एकदा का ते पब्लिक ली पब्लिश केले म्हणजे ते कोणीही घेऊ शकते . तुम्हला कळणार पण नाही कि कोणी कोणी अश्या पद्धतीने घेतलय ते "

प्राजक्ता " मला त्यातले काही कळत नाही .. आता हा प्रश्न आधी सोडवला पाहिजे .. हे पेंटिंग खरंच आम्हाला विकायचे नाहीये .मॅम तुम्ही सरांना सांगा प्लिज ते पेंटिंग काढून टाका तिकडून आणि त्यांचे जे काही नुकसान झालेय ते आम्ही भरायला तयार आहोत . "

प्रिंसिपल मॅम " ठीक आहे .. मी उद्या आरामात बोलते सरांशी .. तुम्ही आता घरी जा .. "

आणि प्रिंसिपल मॅम घरी निघाल्या .. " मी सोडू का प्राजक्ता तुम्हाला घरी ?"

प्राजक्ता " नाही नको .. हे येतीलच मला घ्यायला "

आणि प्रिंसिपल मॅम घरी गेल्या

थोड्या वेळाने डायरेक्टर सर पण घरी निघाले " प्राजक्ता मॅडम .. मी कुणीकडे सोडू का तुम्हाला ?"

प्राजक्ता " नाही नको सर .. सर प्लिज ते पेंटिंग आमच्या घरी पाठवा .. लवकरात लवकर .. माझ्या सुखी संसाराला  दृष्ट नका लावू ".

डायरेक्टर  सर काहीही न बोलता निघून गेले . त्यांना पण ओम चा राग आला होता .. त्यांच्याच केबिन मध्ये त्याचा अपमान झाला असे त्याला वाटत होते .

प्राजक्ता ब रा च वेळ गेट वर ओम ची वाट बघत उभी होती पण तिने त्याला फोन केला नाही .. त्याचा राग  शांत झाला कि तो येईल हे तिला माहित होते .

अर्धा तास झाला  ओम आलाच नाही ती बिचारी एकटी शाळेत बसून राहिली डोळ्यात गंगा जमूना  वाहत होत्या त्या वेगळ्याच ..

तेवढ्यात ओम आला " तू घरी का आली नाहीस ?"

प्राजक्ता " तू मला टाकून का गेलास ?"

ओम" जवळ तर आहे यायचं होतस कि ? तुझ्या त्या डायरेक्टर ने गाडी नाही का पाठवली ?"

प्राजक्ता " ओम ... "  त्याच्या अंगावर ओरडलीच .. आणि रडायला लागली ..

ओम अजून बोल त्याचाशी .. सर .. सर .. "

प्राजक्ता " शी .. काही पण बोलतोस .. तोंडावर कंट्रोल ठेव .. आणि कोणाशी काय बोलतोयस याचे पण भान ठेव "

ओम " यार .. मला जाम राग येतोय .. काय करू असे झालेय .. आणि तिकडेच एक दगड होता त्याच्यावर पाय आपटला त्याने ..

प्राजक्ता " अरे .. काय मुर्खासारखे करतोस .. लागेल ना पायाला .. "

ओम " चल घरी जाऊ .. "

प्राजक्ता " नको तुझा राग इथंच काढ  .. घरी मुलांसमोर राडा घालशील नाहीतर .. तुझा राग मला माहित नाही काय ?"

ओम "आतच जातो आणि त्याच्या  केबीन मधून ते पेंटिंग काढून आणतो "

प्राजक्ता " थांब .. अरे थांब .. लॉक आहे .. उगाच काहीतरी करू नकोस ..

प्राजक्ता " आता काय करायचे  त्याचा   विचार कर ? त्याने ते यु ट्यूब चॅनेल वरून घेतले आपल्याला कळले पण नाही ."

ओम " तुला मी म्हटले ना हा जाड्या मला खटकतोय ? "

प्राजक्ता "" तुला वाटतंय तसे काही नाहीये ."

ओम" तू मला भडकवू नकोस .. आजही त्याची बाजू कशाला घेतेस ?"

प्राजक्ता " मी त्याची बाजू घेत नाहीये .. प्रिंसिपल मॅम म्हणत होत्या कि तुम्ही ते यु ट्यूब ला पब्लिश केलेत कशाला ? अशी कोणी कोणी कॉपी केले असेल हे कोणीही सांगू शकत नाही ."

ओम" हमम.. ते हि आहेच .. पण याचे जरा अतीच झाले ना .. कोणी काढलय ते त्याला माहितेय तरीही त्याने तुला एका शब्दाने विचारले नाही "

प्राजक्ता " हो ना ..पण आता हे शांत डोक्यानेच सोडवावे लागेल असे भडकून आणि आदळ आपट करून कसे चालेल "

ओम " ठीक आहे ."

दोघे घरी आले .. पण ओम च्या आत आग लागली  होती .. वरून शांत दाखवत होता पण मी हेल्पलेस आहे कि काय असे  वाटू लागले होते .. त्यात ते पेंटिंग प्राजक्ताने खास ओम साठी काढले होते त्यामुळे त्याला जास्त त्रास होत होता . त्याला वाटे शांत बिंत काय नाही कॉलेज मध्ये असल्या सारखे दोन कानाखाली वाजवल्या कि लगेच प्रॉब्लेम सॉल्व होईल . पण प्राजक्ता मुळे शांत होता ..

प्राजक्ताचा पण मूड नाही म्हटले तर गेलाच होता ..

कसे बसे जेवण केले काम उरकली .

रात्री ओम लॅपटॉप वर सेटिंग बघत होता कि पेंटिंग चे कॉपी करता कसे येणार नाही याकरता काही सेटिंग आहे का ते पाहू लागला .. "

प्राजक्ता काही न बोलता उद्याची तयारी करून ठेवली आणि झोपली ..ती पण खूप डिस्टर्ब च होती .. या कुशीवरून त्या कुशी वर तिला पण झोप येई ना . आणि डोळ्यातून पाणी वाहू लागले .. काम  राहिले बाजूला नको ते झंगट मागे लागले कि कामाचा  पण मूड जातो .. आणि आता तिला हे आर्ट गॅलरी चे काम मन लावून करायचे होते .तस बघितल तर तिचा तो पहिला प्रोजेक्ट होता ..  रिलेशन पण खराब करून चालणार नाहीत .. मुलं पण त्याच शाळेत आहेत तिची नोकरी  पण तिथेच आहे ..रोज उठून तीच तोंड पाहायची आहेत .. ओम ने पण लगेच तडकाफडकी निघून आला ते बरोबर केलं का नाही ? तिला काहीच कळत नव्हते

ओम ने बराच वेळ लॅपटॉप वर सेटिंग बघितली आणि शेवटी लॅपटॉप बंद करून झोपायला आला .. लाईट्स ऑफ करायला गेला तर तर प्राजक्ताच्या डोळ्यातून अश्रू पडताना त्याला दिसले ..

ओम " काय झाले ?"

प्राजक्ता " माझे काम सुरु नाही झाले तर नको तेच घडतंय ? मी किती आनंदात होते "

ओम " त्याचे काय घेऊन  बसलीस .. अजून खूप काम करायचेय तुला .. ह्याच कामावर काही अडलं आहे का ?"

प्राजक्ता " म्हणजे ? हे सोडून देऊ का ? असेच म्हणायचंय ना तुला ? मला माहितेय तू हेच सांगणार ? तुला माझ्या कामा पेक्षा तो डायरेक्टर नाही आवडलाय .. मला माहितेय "

ओम  काहीच बोलत  नाही .. कदाचित त्याच्या मनातलेच प्राजक्ता बोलली होती .. त्याला तिला तेच सांगायचे होते हे तिला न सांगताच कळले होते .इतक्या वर्षांचा संसार झाला कि बऱ्याच  गोष्टी न सांगताच कळतात .

ओम " जाऊ दे .. झोप आता .. टेन्शन घेऊ नको .. एवढा  पण काही मोठा प्रॉब्लेम झालेला नाहीये .. होईल सगळे सुरळीत .. आणि तिला कुशीत घेऊन झोपला .

दुसऱ्या दिवशी  प्राजक्ताला शाळेत जायला पण पाय निघेना . मनात काय करू ? जाऊ कि नको ? गेले कि सर भेटतीलच ? त्यांना काय बोलू ? ते मला काही बोलतील का ?

ओम " तुला बरे नसेल वाटत तर आज सुट्टी घे "

प्राजक्ता " थोडा वेळ जाऊन येते .. नाहीच बरे वाटले तर येईन घरी "

प्राजक्ता शाळेत गेली .. पहिले तिचा लेक्चर्स संपवले .. आणि मग आर्ट गॅलरी मध्ये गेली ..

आज तिला भारत माता काढायची होती . हे पेंटिंग पण खूप मोठे होते . आज तसाही तिचा मूड नव्हता पण जसे जसे तिने काम सुरु केले . ती सर्व दुःख , टेन्शन विसरून गेली .

तर आजचे पेंटिंग असे होते कि भारत देशाचा नकाशा आणि नकाशा मध्ये सिंहावर आरूढ भारत माता जिच्या हातात भारताचा झेंडा आहे . असे हे पेंटिंग प्राजक्ता आज काढत होती . डोळ्यांमध्ये सुंदर भाव , देवी सारखे दाग  दागिने घातलेली भारत माता आणि तितकीच शक्तिशाली कि सिंहाला तिने आपले वाहन बनवले आहे . याशिवाय भारताचा झेंडा भारताच्या नकाशा मध्ये पण दिसतोय आणि तिच्या हातात पण झेंडा घेऊन मोठ्या दिमाखात ती उभी आहे असे हे अकल्पित पेंटिंग जे कि प्रतेय्क शाळेत असलेच पाहिजे असे प्राजक्ताने आज काढले .

लेखक किरण चन्द्रबनर्जी

आज डायरेक्टर सर आले होते पण ते मुद्दामूनच पेंटिंग बघायला आले नाहीत . त्यांचा आणि ओम चा दोघांचा मेल इगो दोघांनी एकमेकांनचा दुखावला होता आणि त्याचा परिणाम प्राजक्ताच्या कामावर होणार होता .

प्रिंसिपल मॅडम नि आजचे पण प्राजक्ताचे पेंटिंग बाघितले आणि त्यांनी डायरेक्टर सरांना कळवले " सर , आपली आर्ट गॅलरी खूप छान तयार होतेय . तुम्ही वेळ काढून ते आजचे पेंटिंग बघून घ्या .

🎭 Series Post

View all