शुभ्रा - सागर ( अधुरी प्रेम कहाणी )

Shubhra Saagar Love

सागर नाव त्याच,  खूप प्रेम करायचा शुभ्रा वर . म्हणतात ना शोधणाऱ्यांना देव ही मिळतो. तसेच सागर ने शुभ्रा ला शोधले होते.

एका लग्नात सागर ने शुभ्रा ला बघितले होते, मुंबईला पण त्या नंतर त्याने  तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण काहिही करून शुभ्रा चा कॉन्टॅक्ट च होत नव्हता, आणि एके दिवशी अचानक शुभ्रा त्याला फेसबुक वर दिसली, 1 वर्षांनी, मग त्यांचे बोलणे सुरु झाले, बऱ्याच प्रयत्नानंतर त्याने तिला मिळवलं होतं. दोघेही एकमेंकावर जीवापाड प्रेम करु लागले होते . शुभ्रा च जरा सागर पेक्षा जास्त च प्रेम होत. पण काय करणार सागर, शुभ्रा ह्या दोघांची ही भेट होणं शक्य नव्हते. कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला. फोन वर सवांद तसे दररोजचेच. पण भेट फक्त 4,6 महिन्याने होत असे. पण एक दिवस पूर्ण नूरच पलटतो. सागर ला अचानक रक्ताच्या उलट्या होतात.

 सागरला डॉक्टर कडून समजतं की त्याला कर्क रोग झाला आहे आणि त्याच्या हातात फक्त सहा महिने उरले आहेत. सागर शुभ्रा ला त्याचा रोग समजू देत नाही. कारण सहा महिन्यांनी  शुभ्रा चा वाढदिवस असतो आणि तिच्या वाढदिवशी त्याला तिला पाहायचे असते. 

तिच्या वाढदिवसाला चार दिवस बाकी असतात आणि सागर ला कळून चुकलेले असते की आपली वेळ जवळ आली आहे.आणि सागर शुभ्रा ला मुंबई ला येईला सांगतो ती हि घरी नोकरीं शोधण्यासाठी जातेय असं कारण सांगून निघते.. चार दिवस सागर - शुभ्रा ला त्याच ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी त्यांची पहिली भेट झाली होती.

शुभ्रा ला एका महत्वाच्या कामासाठी जायचे असल्यामुळे आपण वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी भेटू असे शुभ्रा ला सागर ला सांगते शुभ्रा मुंबईला येऊन एका ऑफिस मध्ये इंटरव्हिव्ह ला जाणार असते खरंतर, म्हणजे तिला इथेच नोकरीं निमित्त राहता येईल आणि सागर ला हि रोज भेटता येईल असा तिचा विचार असतो, पण हे तिला सागर ला सरप्राईझ द्यायचे असते म्हणून शुभ्रा त्या दिवशी सागर ला भेटायला नकार देते.

सागर शुभ्रा ला शेवटचं विचारतो की तुला यायचं आहे की नाही. कसला ही विचार न करता शुभ्रा नाही म्हणते.

सागर वाढदिवसाच्या दिवशी तिला फोन करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. शुभ्रा त्याला विचारते काय करतोयस आणि सागर शेवटी एवढचं म्हणायला जातो. तुझी वाट पा..... आणि जीव सोडतो सागर चे वाक्य पूर्ण झाले नव्हते.

जेव्हा शुभ्रा ला कळतं की सागर आता या जगात नाही राहिला त्या दिवसापासून ज्या ठिकाणी सागरने शुभ्रा ला भेटण्यासाठी बोलवलं असतं त्याच ठिकाणी ही प्रेमवेडी आपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट पाहत असते...फक्त ह्याच आशेने की तो कुणाच्या तरी रुपात येईल आणि तिला मिठीत घेईल...पण म्हणतात ना...एकदा गेलेला आपला माणूस काही केल्या परत येत नाही...


नमस्कार.. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे. ( देवरुख - रत्नागिरी )