Login

वर्धापन दिन शुभेच्छा

Shubhechha
2-4 वर्षांपूर्वी मी fb वर काहिबाही लिहीत होतो. ईरावर लिहायला कोणीतरी सुचवले. पण अँपवर लिहायची सवय नव्हती. तांत्रिक बाबींची माहितीही नव्हती. तरी एक कथा लिहिली ब्लू लेडी नावाची. छान रिस्पॉन्स मिळाला. मग अधूनमधून लिहू लागलो. ईरावरच्या इतर लेखकांच्या कथाही वाचू लागलो आणी आपण बरेच मागे आहोत हे कळाले पण तरीही लिहीतच गेलो. ईराचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही लिहिलेले तसेच्या तसे प्रसिद्ध होते. चांगले वाईट हा निर्णय वाचकवर्ग करतो. खूप काही शिकायला मिळाले आणि काही ओळखीही झाल्या. ईराचे काही लेखक लेखिका इतके विविध अंगाने आणि इतके अद्भुत कसे लिहू शकतात ह्याच कायम मला कोडं पडलेले असते. असो.
ईराच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
विवेक वैद्य.