शुभेच्छा पान

शुभेच्छापान

आज आमच्या एका झुंजार, बिनधास्त, मिश्किल व्यक्तीमत्वाचा प्रकटदिन.. ईरा ब्लॉगिंगच्या सर्वेसर्वा संजना इंगळे यांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम.????????????????????????

आज या दिवसाचं औचित्य साधून तुमच्या विषयी दाटून आलेल्या भावना शब्दबद्ध करण्याचा अल्पसा प्रयत्न.. पहिल्यांदाच तुमच्याबद्दल लिहण्याचं थोडसं धारिष्ट..

गेल्या काही महिन्यांपासून नुकतंच मी ईरा ब्लॉगिंग वर लिहू लागले. भावनांना शब्दांत मांडत गेले. कधी कथेतून, लेखातून सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू लागले. आणि मग ईरा आणि माझं नातं रुजत गेलं. नवीन रुजवात होती. आणि मग या रुजवातीला खतपाणी मिळत गेलं ते म्हणजे संजना मॅडमच्या सहकार्यामूळे.. तुमच्या शांत आणि मृदू स्वभावामूळे नकळत तुमच्याकडे आकर्षित झाले. तुमचं सहकार्य आमच्यासारख्या नवोदितांना मिळत गेलं आणि आमच्यात सुधारणा होत गेली. नवीन ऊर्मी मिळत गेली. 

संजना मॅडम, खरंतर तुम्हाला अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली ती म्हणजे ईराच्या ई दिवाळी अंकाच्या निमित्तानं. कामाच्या निमित्तानं बोलत होतो. नव्याने ओळख होत होती. गैरसमजाची जळमटं दूर होत होती. एक प्रोफेशनल नातं बहरत गेलं. आणि तुमच्यातल्या संवेदनशील लेखिकेला जाणून घेण्याची संधी मिळाली. 

संजना मॅडम, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडून ईराच्या कामाचा व्याप सांभाळणं सोप्प नव्हतंच मुळी. पण तुम्ही ते शिवधनुष्य उत्तम रीतीने पेललंत.. पेलत आहात मनापासून धन्यवाद मॅडम.. तुमच्या रूपाने एकदम कणखर, सडेतोड उत्तर देणारी, आपल्या शब्दांच्या प्रभावी अस्त्रांनी खोट्या मुखवट्याआड लपलेला खरा चेहरा समोर आणून त्यांना वठणीवर आणणारी एक प्रगल्भ लेखिका वारंवार भेटत गेली.  

ईराच्या सर्व लेखकांच्या प्रश्नांना न  कंटाळता शांतपणे उत्तरं देणारी, त्यांच्या शंकेचं निरसन करणारी, मनात पूर्वग्रह न ठेवता नातं जपणारी, शब्दांना मान देणारी सर्वांची आवडती लेखिका म्हणजे आपल्या संजना मॅडम. 

स्वतःची निराळी लेखनशैली जपत, जनमनावर विशिष्ट छाप टाकत सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची तुमची कला खरंच वाखाणण्याजोगी. तुमच्याकडून शिकण्यासारखी..

संजना मॅडम, खरं सांगू!! मैत्री या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. त्या संकल्पनेला कधीच सुरुंग लावला गेलाय. म्हणूनच तुम्हाला मैत्रीच्या नात्यात न गुंफता मनापासून एक  गोष्ट सांगावीशी वाटतेय.. संजना मॅडम, आपल्यातल्या नात्याला मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. कारण काही नाती असतातच अशी प्रेमाची..मायेची.. अगदी मुक्तपणे संचार करणारी.. विशिष्ट नात्याच्या नावात न गुंतलेली.. उगीच अलंकारिक शब्द वापरून कौतुक करतेय असं मुळीच नाही. मनात जे येतं ते बोलून टाकते.. आणि आज हे लिहतानाही आभाळ भरून आलंय.. बरसून जाईल कधीही. ???????? आणि तोच सच्चेपणा मला तुमच्यात जाणवला. म्हणून तुमच्याशी जोडले गेले आणि नात्याची वीण घट्ट होत गेली. 

संजना मॅडम पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..   प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो. तुमची साथ, तुमचे आशीर्वाद कायम सोबत राहोत.. असेच आनंदोत्सव कायम साजरी होवोत. तुमची लेखणी तुमच्या  मनासारखी बहरत राहो.  ईश्वर तुम्हाला  उदंड आयुष्य सुख समृद्धी देवो. हीच मनापासून शुभकामना.  ????????????????????????????????????????

आपली 
निशा थोरे..