Oct 25, 2020
स्पर्धा

शुभारंभ  भाग ७

Read Later
शुभारंभ  भाग ७

 

शुभारंभ  भाग ७

 

क्रमश" भाग ६

 

ओम झोपून गेला पण प्राजक्ता मात्र अस्वस्थ होती. थोडा वेळ तशीच पडून राहिली पण तिला झोप येई ना .. शेवटी उठली आणि बाहेर हॉल मध्ये जाऊन बसली . कधी कधी जागा बदल्यावर पण झोप येते .. तसे काही गणित जमतंय का ते ती बघू लागली . छे ! पण आज विचारांनी झोपेची पाठवणी केली होती .

 

तशीच उठली आणि बाहेर गॅलरी मध्ये फ्रेश एअर घ्यायला तिथल्या एका चेअर वर बसली . तिकडेच एक साईडला तिचे सर्व पेंटींग चे सामान होते .. तिला एक कल्पना सुचली आणि हातात ब्रश घेतला आणि कॅनवास वर रंग उतरवायला सुरुवात केली . जे चित्र काढायचे ते तिच्या फक्त कल्पनेत होते ते ती सत्यात उतरवायचा प्रयत्न करू लागली .

 

रात्री १२ च्या पुढं हिने जो कुंचला हातात घेतला तो सकाळी ४ वाजेपर्यंत न थांबता ती ते पेंटिंग तयार करत होती  . खूप छान असे एक पेंटिंग ज्यामध्ये एक साडी नेसलेली आणि तिचे लांब मोकळे केस तिने एका साईडला पुढे घेतलेत अशी हि  ललना एका इझी चेअर मध्ये बसलीय आणि तिच्या एका डोळ्यात हसू आणि एक डोळ्यात आसू असे एक अप्रतिम पेंटिंग प्राजक्ताने त्या रात्री काढले .

 

एक पेंटिंग म्हणून अप्रतिम कलाकृती मधून तिने तिच्या मनाची स्थिती त्या मध्ये मांडली होती .

 

पहाटे पहाटे जरा सोफ्यावरच झोपली आणि  लगेच २ तासात उठली आणि तिच्या सकाळच्या रुटीनला लागली . रात्री ओम उशीर आल्यामुळे आज काही तो मुलांना सोडायला जाणार नव्हता त्यामुळे ती तशा तयारीत होती . दोघांचे आवरून दोघांना टू व्हिलर ने मुलांना सोडून घरी आली आणि मग ओम च्या डब्याचे पाहू लागली . एव्हाना तो उठायला पाहिजे होता . पण आज अजून त्याला जागच आली नव्हती .

 

ती पण त्याला उठवायला गेली नाही . शेवटी जेव्हा रेखा आली तिला बेडरूम ची फरशी पुसायची होती म्हणून मग त्याला उठवायला गेली .

 

प्राजक्ता " ओम .. आज सुट्टी आहे का ? तुझी ?"

 

ओम " नाही .. पण उठवतच नाहीये .. माझे डोक दुखतंय .. जरा कोरा चहा देतेस का ?"

 

प्राजक्ता " उठ .. रेखाला बेडरूम पुसायला यायचय "

 

ओम " नको .. आज राहू दे . .. . मी झोपणार आहे थोडा वेळ .. मी हाफ डे जाईन .. माझा मोबाईल दे .. मी ऑफिस मध्ये कळवतो "

 

प्राजक्ता " ठीक आहे "

 

ओम ला आता जायचे नाही म्हटल्यावर ती पण जरा रिलॅक्स झाली .  चहा घ्यायला आरामात बसली .. स्वतःचा चहा प्यायल्यावर ओम ला कोरा चहा करून दिला आणि ती पण जर झोपून गेली .. तशी रात्रभर जागीच होती ना ..

 

सासूबाईंना असा राग आला कि सकाळी झाली बाहेर उन्ह आली तरीही ती दोघेही अजून झोपलेत .. पण काही बोलल्या नाहीत .

 

बाहेर येऊन त्यांनी प्राजक्ताने काढलेले नवीन पेंटिंग मात्र बघितले आणि तिच्या वर खुश झाल्या .. कलेतले काही कळत नसले तरी समोर असलेलं चित्र छान आहे हे कोणालाही कळते . खरच  प्राजक्ता हाडाची कलाकार मात्र होती हे नक्कीच .

 

थोड्या वेळाने ओम उठला आणि त्याचे आवरू लागला .. पण आज त्याला काही बर वाटे ना .. काल जरा जास्तच झाली होती त्याला . शेवटी त्याने नॉट फिलिंग वेल असा मेसेज टाकून रजा घेऊन टाकली . प्राजक्ता झोपली होती तर तिला न उठवता त्याने स्वतःच्या हाताने वाढून घेतले आणि खाऊ लागला .

 

आई " काय रे ओम .. रात्री खूप उशीर केलास का यायला ? "

 

ओम " नाही ..  १२ वाजता आलो .. "

 

आई " मग .. प्राजक्ता जागी का होती ?"

 

ओम " मला काय माहित ?म्हणजे मला माहित नाही .. मी तर आलो आणि लगेच झोपलो "

 

आई " हो .. का .. नाही म्हटले प्राजक्ताने बाहेर गॅलरीत की चित्र  काढलेले दिसतंय .. चित्र म्हणून छान आहे हो .. तिला एकदा विचार नक्की काय मनात आहे तिच्या .. शेवटी मनातलया भावना कोणत्या तरी मार्गाने बाहेर पडतात .."

 

ओम " बघू .. काही नाही .. घरात बसून कंटाळा आलाय तिला .. तिला नोकरी करायचीय .. करू दे का ? तुला काय वाटतं ?

 

आई " बघा बाबा तुमचे तुम्ही .. मला जे जमेल ती मदत मी करेनच .. पण अचानक काय झाल तिला ? मधेच नोकरी करावी असे का वाटली? ते तरी विचार ?"

 

ओम " काहीच नीट बोलत नाही .. नुसती  चीड चीड करते "

 

आई " छे .. नाही रे .. अजिबात नाही ..  काल तर खूप खुश होती .. तिचे चित्र मी खाली सोसायटी मध्ये दाखवले सर्वांना आवडले .. आज पण बघ गॅलरीत किती छान चित्र काढले आहे तिने ..  "

 

ओम " बघतो .. "

 

आई " मी .. एक काम करते मी जरा सुमन मावशी कडे जातेय .. मला यायला संध्याकाळ होईल .. आज माझे पारायण आहे .. ती उठली कि तू सांग तिला .. आज मी तिकडेच जेवणार आहे "

 

ओम " कशाला ? आल्यावर घरी जेव ? "

 

आई " अरे .. प्रसादाचे जेवण आहे ते .. नाही म्हणायचे नसते ..."

 

ओम " ठीक आहे तू तयार हो .. मी सोडायला येतो तुला .. "

 

आई " नाही नको , त्यांचा मुलगा मला घ्यायला येणार आहे .. एरवी तू कुठे आता घरी असतोस .. म्हणून आमचा प्लॅन आधीच ठरलेला होता . "

 

असे म्हणून ओम ची आई या दोघांना थोडा एकांत मिळावा या हेतूने मुद्दामून घरातून बाहेर पडली आणि सुमन मावशी कडे रिक्षे ने गेल्या ..

 

आई गेल्यावर ओम ने प्राजक्ताने काढलेले पेंटिंग पहिले .. पेंटिंग तर अमेझींगच होते .. पण ओम ला ते त्रास दायक होते .. त्याला प्राजक्ता अशीच काल रात्रभर एकटी या खुर्ची वर बसलेली दिसली .काय करावे आणि कसे हॅन्डल करावे हे आता त्याला पण सुचे ना .. ती इतका वेळ झोपलीय तरी तो तिला उठवेना .. नकोच ... उठली कि पुन्हा चर्चा , वादावादी , त्यापेक्षा झोपलीय  ती बरी आहे असा विचार करून तो पण बाहेर लॅपटॉप ओपन करून बसला .

 

लॅपटॉप वर बसल्या बसल्या त्याने virtual आर्ट गॅलरी कशी तयार करावी याची माहिती काढु लागला . प्राजक्ता च्या नावाचे एखादे यु ट्यूब चॅनेल सुरु करावे असेही त्याच्या डोक्यात आले आणि तो लगेच त्याने तिच्या नावाचे एक यु ट्यूब चॅनेल प्राजक्ताज आर्ट गॅलरी मधून काढून मोकळा झाला . त्यात त्याने तिचे हे कालचे काढलेले पेंटिंग टाकून ते सुरु पण केले .

 

मॅडम थोड्या वेळाने खाडकन उठल्या तोंडावर पाणी मारून बाहेर आली .. बघते तर ओम बाहेर सोफ्यावर बसून काम करत होता आणि आई घरात नाहीयेत

 

ओम " मी आलेच फ्रेश होऊन ..तुला जेवण वाढून देते .. मला झोपच लागली .. कळलेच नाही .. आई कुणीकडे आहेत? "

 

ओम " काहीच बोलेना .. "

 

प्राजक्ता आवरून आली आणि जेवण वाढायची तयारी करू लागली

 

ओम " मी जेवलोय .. आई सुमन मावशींकडे गेलीय पारायणाला .. ती तिकडेच जेवणार आहे "

 

प्राजक्ता " हो .. का .. मला म्हणाल्या होत्या मला बोलावलंय पण मी जाणार नाहीये म्हणून .. मग अचानक का गेल्या ?"

 

ओम " काय माहित? "

 

प्राजक्ता ने पुन्हा सगळी ताट आत नेऊन ठेवली .

 

ओम " तू जेवून घे .. मग आपण बोलू "

 

प्राजक्ता  " नाही.. मला भूक नाहीये .. मी मुलं आल्यावर त्यांच्या बरोबर खाईन "

 

ओम " ठीक आहे .. आता आपण बोलू शकतो का ? "

 

प्राजक्ता " बोलायला पण परमिशन घ्यावी लागते का तुला आता ?"

 

ओम " हो .. मग मॅडम च्या मनात काय काय चालू असते याच थांग पत्ता मला तर नसतोच .. उगाच घर बसल्या नको ते विचार करून घराची शांती घालवायची चांगलीच  लक्षणे आहेत तुझी "

 

प्राजक्ता उठून आत गेली ..

 

ओम " आता मी बोलतोय तर आत कशाला जातेस .. इथे बसता येत नाहीये का तुला ?"

 

प्राजक्ता " तू बोलायच्या नाही भांडणाच्या मुड मध्ये असशील तर मला अजिबात इंटरेस्ट नाहीये "

 

ओम " अरे .. पण अचानक झालय काय ? मधेच काय हे नवीन .. सगळं छान चाललेलं तुला पाहवत नव्हतं का ?"

 

ओम" बोलतेस का ? नक्की काय चुकलंय माझे ? एवढा का त्रास देतेस ? काही कळत नाही बाबा ?"

 

प्राजक्ता "  म्हणजे आपले काही तरी  चुकले हे मान्य आहे म्हणायचे तर ?"

 

ओम " ते मी ऐकल्यावर ठरवेन ?"

 

प्राजक्ता " मी काय बोलतेय हे ऐकायला तरी वेळ कुठे आहे तुझ्याकडे .. बघावे तेव्हा हा लॅपटॉप असतोच पुढे .. मी नक्की लॅपटॉप शी  बोलते का तुझ्याशी हाच प्रश्न आहे "

 

ओम " सगळ्याच गोष्टी खटकतात हल्ली .. आणि रागाने लॅपटॉप खाली ठेऊन " हा बोल आता "

 

प्राजक्ता "मी जेव्हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न  उठवला तर तुझा इगो कशाला मध्ये आणतोस ? या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत "

 

ओम " नुसते आरोप करा .. बाकी काही नाही .. मी चांगले काही करतच नाही ना "

 

प्राजक्ता "का उगाच माझ्यावर चिडतोयस .. एवढं काय मी तुला बोलले ?"

 

ओम " घ्या सगळे बोलायचे आणि नंतर म्हणायचे कि एवढे काय मी बोलले ?"

 

प्राजक्ता " चल .. आज काही बोलणे होणार नाही ..उगाच तुझा  आराम पण होणार नाही .. त्या पेक्षा मी दोघा मुलांना शाळेतूनच पीक करते आणि आईकडे जाते .. म्हणजे तुला थोडा आराम तरी मिळेल .

 

ओम " जा .. मला सोडूनच जायचेय तुला .. तू वाटच बघते आहेस कि हि संधी तुला कधी आणि कशी मिळेल ती "

 

प्राजक्ता हा संताप अनावर झाला ..

 

प्राजक्ता " मला सोडून जायचंय का तुला ? तुझा आराम व्हावा   म्हणून मी हा ऑप्शन काढला तर तू मला दोष लावतोस ..उगाच नाही म्हणत तुला माझी  लाज तर वाटतेच आणि आता किंमत पण  नाही  राहिली . माझे सगळे  आयुष्य  फुकट गेले .. आणि बेडवर  पडून रडू लागली .. "

 

ओम " आता रडल्याने प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे का ? काय तुझ्या ड़ोक्यात गेलेय .. मला  काही कळत नाही   मला कशाला तुझी लाज वाटेल ? पर्वा पण तेच म्हणालीस ?कसले कसले आरोप मला ऐकून घ्यायला लागणार आहेत काय माहीत ? "

 

प्राजक्ता काहीच बोलत  नाही ..

ओम " अरे .. यार प्राजक्ता .. बोल ना आता .. थोड्या वेळात मुलं येतील .. मग पुन्हा बोलायला जमणार नाही .. उठ ना .. बोल .. काय खटकलंय ? "

 

प्राजक्ता काहीच बोलत नाही

 

ओम " बरं .. बाई ... मी सॉरी बोलतो .. माझे चुकले .. आता परत असे नाही होणार .. आणि काल  साठी पण सॉरी .. आता तुला हात पण नाही लावणार ? ठीक आहे "

 

प्राजक्ता तरीही काहीच बोलत नाही

 

ओम " आता काय पाया पडू का तुझ्या ? बोलशील कि नाही ? मला फक्त काय असे  झाले कि तू डिस्टर्ब झालीस ते सांग ना .. म्हणजे मला कळेल ना कि मी कुठे चुकलोय ?"

 

प्राजक्ता  जी हमसून रडत होती ते शब्दच बाहेर पडत नव्हते  तिचे .. झालेल्या जखमेवर पुन्हा पुन्हा घाव वर्मी लागावा आणि असह्य वेदना व्हाव्या अशीच तिची अवस्था ..

 

ओम " हॅलो .. उठतेस का ? " आत तो जाणून बुजून तिला हातच लावत नाहीये .. लांबूनच तिच्याशी बोलतोय .."

 

प्राजक्ता " मी आई  कडे जाते थोडे दिवस .. तुला माझ्या पासून थोडा आणि मला तुझ्या पासून ब्रेक मिळेल .."

 

ओम  वैतागला " अरे यार .. तू उठ आधी .. आणि तिला हाताने धरून उठवू लागला .. आतून जेवणाचे ताट वाढून आणलेन आणि पाण्याचा ग्लास घेऊन आला .

 

" हे घे जेवून घे .. मग आपण बोलू "

 

प्राजक्ता " नाही ... नकोय मला .. मी जेवेन  नंतर "

 

ओम ने पोळीचा एक घास तयार केला आणि तिला भरवायला गेला .. "प्राजक्ता .. प्लिज अशी नकोस ना वागूस .. मला काहीच कळत नाहीये यार .. मी कसे वागावे ? थोडा माझा विचार कर ना .. खा लवकर .. "

 

शेवटी प्राजक्ताला त्याने घास भारवलाच.. अर्धी एक पोळी पोटात गेली .. मग तीने  तिच्या हाताने जेवण संपवले . 

 

ओम " आता बोलशील का ? काय धुसमुसतय मनातं ?.. असे का वाटतंय तुला कि मला तुझी लाज वाटते म्हणून .. "

 

प्राजक्ता " हो .. हेच सत्य आहे .. मला माहितेय .. " आणि पुन्हा अश्रू च्या धारा गालावरून खाली बरसू लागल्या .. "

 

ओम " अरे .. असे नाहीये काही .. तू उगाच मनात काहीतरी घेऊन बसलीस ? बरं असे कशा वरून वाटतंय तुला ? काहीतरी मी केलंच असेल ना त्यामुळे तुला वाटले असेल ना तसे ?"

 

प्राजक्ता " मग मी काय वेडी आहे का ? असे म्हणायला ?"

 

ओम " तू नाही .. मी वेडा आहे .. आणि आता मला कारण नाही कळले तर नक्कीच  ठार  वेडा होईन .. बोल ना प्राजु .. "

 

प्राजक्ता " मला ती समीरा भेटली होती गेल्या आठवड्यात .. "