शुभारंभ भाग ६

In this part parjkta make one beutiful painting

शुभारंभ भाग ६

क्रमश: भाग ५

आज काय मग प्राजक्ताची स्वारी खुश होती . संध्याकाळचा चहा झाला तेव्हा तिने तिच्या सासु बाईंना तिने काढलेले चित्र दाखवले . तर सासूबाई इतक्या खुश झाल्या त्यांनी तिला त्यांच्या बटव्या मधून काढून ५०० रुपये बक्षीस म्हणून दिले . जुन्या लोकांकडून ५०० रुपयांचं बक्षीस मिळवणे सोपे नाही बरं का ? तिने पण लगेच त्यांना पाया  पडली  आणि ते पैसे देवाजवळ ठेवले .

आपण केलेल्या कामाचे असे कोड कौतुक झाले कि पण माणसाला अजून काम करण्याची प्रेरणा मिळते .

प्रथमेश आणि प्रिया पण आई आम्हाला  पण शिकव ना असे म्हणत प्रथमेश ने एका पेपर वर त्याची कलाकारी दाखवलीच .

सासूबाई संध्यकाळी ते पेंटींग त्यांच्या मैत्रिणींना दाखवायला खाली घेऊन गेल्या   . झाले अख्या सोसायटी मध्ये सर्वांना प्राजक्ता मधले हे हिडन टॅलेंट माहित झाले . .

आज प्राजक्ता आधीच जेवण तयार करून बसली .. ओम आल्यावर त्याला पेंटिंग दाखवायचे होते ना तिला .

दोघे मुले खालून खेळून आली ..  ती काम करता करता अभ्यास घेऊ लागली .. आज तिचे डोळे ओम च्या वाटेकडे  लागले होते .

तेवढ्यात ओम चा फोन आला

ओम " ऐक ना.. आज माझी एक ऑफिस मध्ये  सरांबरोबर मीटिंग आहे तर मी जेवायला येणार नाही .. आणि यायला पण उशीर होईल तुम्ही लोक जेवून घ्या . झोपलात तरी चालेल .. लॅच च्या कीज माझ्याकडे आहेत .. आतली कडी लावू नकोस .. तू झोपलीस तरी चालेल ."

प्राजक्ता "  काय रे ? आज मी तुझी वाट बघत  होते ना "

ओम " ओह .. मी मीटिंग कॅन्सल करू का ?"

प्राजक्ता " नाही नको .. "

ओम " अग .. हि मीटिंग कालच होणार होती .. मी पोस्टपोन केली होती .. त्यामुळे कॅन्सल नाही करता नाही येणार . . "

प्राजक्ता " ठीक आहे ... ड्रिंक्स पार्टी आहे ना  ?"

ओम " हसायला लागला .. अग मी मीटिंग आहे असे म्हटले "

प्राजक्ता " ओम .. मला फसवू नकोस .. मला माहितेय तुमची लेट नाईट मीटिंग म्हणजे काय ते "

ओम " हमम.. मग ते पण असतेच ना मीटिंग बरोबर.. "

प्राजक्ता " ठीक आहे .. सावकाश ये काय ?"

ओम " होय .. बाय .. आज तू पेंटिंग केलेस का ?"

प्राजक्ता " हो.. म्हणून तर तुझी वाट बघत होते"

ओम " अरे मग मला फोटो टाक  ना "

प्राजक्ता " नको .. तू आल्यावर बघ "

ओम " बरं ठीक आहे .. मी आल्यावर बघतो .. बाय .. "

प्राजक्ता " बाय "

मुलांचा अभ्यास झाल्यावर लगेचच सर्वांना जेवायला वाढले . किचन आवरून प्राजक्ताने उद्याची तयारी करून ठेवली .. मुलांना झोपवले .आणि मग पुस्तक वाचत बसली . ओम आल्याशिवाय तिला काही झोप येणारच नव्हती . आणि रात्री टीव्ही बघत बसली कि प्रथमेश लगेच उठतो .. म्हणून मग वाचत बसली  खरी पण वाचनात तिचे लक्ष लागे ना ..

आज ती राहुन राहून मनात तोच विचार करत होती कि  या माझ्या पेंटीग्स चे मी काय काय करू शकते . तिने  ठरवले कि ती ज्या सरांकडे शिकायला जात होती त्यांना एकदा भेटून येऊ का ? ते नक्कीच मार्गदर्शन करतील . त्यातून  काहीतरी ब्रेक मिळू शकतो .. किंवा नक्की आपल्या चित्रांचा कसा उपयोग करू शकतो हे तरी कळेल . कारण जेव्हा ती क्लास जा जात होती तेव्हा सर नेहमी तिला म्हणायचे  कि" यु ह्याव ब्राईट फ्युचर ".

आज तिला असेच वाटत होते कि अजून चार पाच पेंटीग्स बनवते आणि सरांना जाऊन भेटून येईन .

विचार करता करता पुस्तक हातात घेऊनच झोप लागली . पुढे बऱ्याच वेळाने ओम घरी आला .. मुलांना आणि आईला अजिबात डिस्टर्ब होणार नाही असे बघून डायरेक्ट बेडरूम मध्ये आला .

ओम च्या येण्याची चाहूल लागताच प्राजक्ता उठली ..

प्राजक्ता " आलास का ?"

ओम " येस .. आज जरा जास्तच उशीर झाला .. गप्पांच्या नादात किती वाजले कळलेच नाही "

प्राजक्ता " ड्रिंक्स पण भरपूर झालेले दिसतात .. गाडी कोणी चालवली ? "

ओम " मी नाही , तो माझा एक मित्र आहे त्याने चालवली .. आज माझी गाडी तो घेऊन गेलाय .. सकाळी मला पिक अप पण करेल तो .."

प्राजक्ता " ठीक आहे .. तुला काही हवंय का ?"

ओम " नाही नकोय .. ते तुझे पेंटिंग दाखव कि "

प्राजक्ता " उद्या सकाळी  बघ आता .. उशीर झालाय "

ओम " नाही .. दाखव .. दाखव .. मी बघूनच झोपणार आहे "

प्राजक्ता पेंन्टिंग बाहेरून घेऊन आली .. तोपर्यंत ओम फ्रेश होऊन झोपायची तयारी करत होता . प्राजक्ता बेडरूम मध्ये येताच .. चित्र राहिले बाजूला  .. ओम ने प्राजक्ताला त्याच्या जवळ ओढले .. प्राजक्ताला  त्याची हि ऍक्शन सध्यातरी अपेक्षित  नव्हती ..

प्राजक्ता " ओम .. तू झोप आता ... आपण उद्या बोलू "

ओम " ऐक ना .. तू अशी लांब का जातेस माझ्या पासून ?"

प्राजक्ता " नाही .. तसे काही नाहि रे ?"

ओम " हो .. तसेच आहे .. आता पण बघ कशी लांब जातेस ?"

प्राजक्ता " अरे .. मग आता काय करू ? तू झोप आता ..कशाला एवढी जास्त घेतोस काय माहित ?"

ओम " अरे .. मी अजून शुद्धीत आहे .. तुला काय वाटतं .. मी हे शुद्धीत नाहीये म्हणून वागतोय का ?"

प्राजक्ता " हो .. तसेच आहे ?गूड नाईट झोप आता "

ओम " अरे .. तुला मी परका  झालोय का ? मला असे का वाटते ? तुला मी कमावलेले पैसे पण नकोत असे का वाटते ते मला सांग ?"

प्राजक्ता " नाही .. तसे नाही ?

ओम " तूच तर म्हणालीस परवा .. ते तुझे पैसे आहेत .. मला खर्च करावेसे वाटत नाहीत.. तुला मी परका झालो , हे घर परकं झाले .. असे का झाले यावर मी विचार करतोय  ?"

प्राजक्ता " मी तुला म्हटले ना कि तू चुकीचा अर्थ काढू नकोस ? मी स्वतःच्या शोधात आहे .. बाकी काही नाही .. मला  त्या दिवशी जरा स्ट्रेस होता .. कदाचित मी काहीतरी चुकीचे बोलून गेले असेल .. तुला हर्ट झालं असेल तर सॉरी .. प्लिज तू एवढे मनावर घेऊ नकोस "

ओम " मग तू माझा स्पर्श तुला कसा होणार नाही असे का बघतेस ?"

प्राजक्ता " अरे.. असे नाहीये .. तू झोप आता .. "

ओम लिटरली तिला स्वतःकडे ओढू लागला .. प्राजक्ता आता तरी या मनस्थितीत अजिबात नव्हती .. तिला आता काय करावे आणि कसे रिऍक्ट करावे ते कळेच ना ..

ओम तिला त्याच्या मिठीत घेऊन तिला त्या अर्थाने जवळ घेऊ लागला .. " सॉरी .. मी तुला दुखावले .. सॉरी माझे  चुकले .. सॉरी... सॉरी तुला मी वाट बघायला लावली  .. असे बरळू लागला "

प्राजक्ता ने सांगितलेलं सत्य पचवणे सोपे नव्हतेच .. ओम ने ते ऐकले तेव्हा त्याला तो शॉक च होता .. त्याचे परिणाम आता प्राजक्ताला जाणवू आणि दिसू लागले होते.

प्राजक्ता " अरे .. नाही रे.. काय मला दुर्बुद्धी सुचली होती काय माहित मी का तुला बोलले काय माहित ? गेलेच त्या दिवशी चुकून माझ्या तोंडून ..आई म्हणत होती तेच बरोबर होते. "

ओम ला आता ती काय बोलतेय हे हि ऐकू येतंय का नाही काय माहित पण त्याला असे वाटतंय कि आपल्यात वेगळा परके पण आलाय . आणि तो त्याच्या दृष्टीने परकेपणा संपवायला बघतोय .. कारण प्राजक्ता ला त्याचा स्पर्श  नकोसा  वाटत होता हे त्याला जाणवले होते ..

प्राजक्ताच्या दृष्टीने प्रथमेश झाल्यापासून त्यांच्यात असा सम्बद्ध आलेलाच नाही.. तर आता अचानक का ? आणि कसे बसे तिने ओम ला झोपवले .. ओम तर नशेत होता म्हणून झोपून गेला पण हिची झोप उडवून झोपला .

प्राजक्ताला आजच कुठे पंख फुटू लागत होते .. काहितरी करावेसे वाटत होते आणि ओम च्या अशा वागण्याने तिचा सगळा  मूडच गेला .. हे काय होऊन बसले ? आता हा डोक्यात काय घेऊन बसलाय ?वर वर दाखवतो मी ठीक आहे पण आता जेव्हा नशेत होता तेव्हा त्याच्या तोंडून सत्य बाहेर आलेच होते .. आता प्राजक्ताला पुन्हा विचार पडला .. नक्क्की काय करू ? अजून तर सुरुवात  नाही केली ? आज नुसते एक पेंटिंग तयार केले तर मला आकाश ठेंगणे झाले होते . शेवटी किती झालं  तरी संसार जास्त महत्वाचा  आहे तिच्या दृष्टीने म्हणून तर घरात आहे ती .. ओम ला नाराज  करून काय मिळवणार आहे ती? सासू बाई म्हणतात तश्या घरची शांती घालवणार बाकी काय ? आणि उगाच गैरसमजाचे जाळे विणत बसायचे .

मधेच तिला हसायला पण येऊ लागले .. ओम काही पण विचार करतो .. हे काय आता हि वेळ आहे का ? झाले आता सगळे संसार मध्यावर आलाय आणि हि असली थेरं काय सुचतात ह्याला काय माहित .. काही पण वेडाच आहे . आज नशेत होता म्हणून बर नाही तर आज काही खरं नव्हतं . आणि मनातल्या मनात हसू लागली. काय रे देवा झोपलेल्या माशीला उठवली कि काय मी ?त्याला काय सांगू आणि कसे सांगू ?

आयुष्यातल्या एका वेगळ्या वळणावर मी आहे. आणि हा घाट पार करण्यासाठी मला त्याची सर्वात जास्त गरज आहे .. मला त्याचा खंबीर आधार हवाय .. असे नाहीये कि तो मला  परका आहे ..कसे समजावू त्याला ?

ओम च्या बाजूने विचार केला तर जेव्हा त्याची  पत्नी त्याच्या पैशाला आणि त्याला जुमानत नाही याचा अर्थ तिच्या लेखी आता माझी काही किंमत राहिली आहे  कि नाही ? त्याच्या पुरुषार्थाला मोठा धक्का बसला होता . अजून पर्यंत कुठे तरी मी माझ्या कुटुंबाला सांभाळतो .. त्यांना काय हवे नको ते बघतो .. ह्या गोष्टीचा कुठेतरी इगो असणारच .. आणि अचानक बायको म्हणते मला तुझे पैसे नकोत .. माझे माझे मला  कमवू दे.. मला पैशांसाठी तुझ्यावर अवलंबून रहायला आवडत नाही हे पचवणे कोणत्याही पुरुषाला शक्यच नाही .. 

ओम सुद्धा  या पेक्षा काही वेगळा नाही . त्याला तिचा मुद्दा तर कळलाय .. तिला काहीतरी बनायचंय हे कळलंय . पण का ? आणि आता का ? आता अचानक असे काय झाले कि तिला तिच्या अस्तित्वाचा विचार पडला ?.. याचा  अर्थ मी कुठे तरी कमी पडलो कि काय ? किंवा ती आता मला जुमानत नाही कि काय ? किंवा तिचा आता माझ्यावर विश्वास राहिला नाही कि काय ? किंवा तिला  आता माझ्या बरोबर सेफ वाटत नाही कि काय ? अशा अनेक  प्रश्नांनी तो गोंधळून गेलाय . तो  तिला आजमावून बघतोय .. ती अजूनही त्याच्याकडे स्वतःला सोपवते कि नाही ? याची तो शहानिशा करतोय .

वर करणी दिसणारी अत्यंत साधी  गोष्ट जर नीट विचार केला तर किती खोल असू शकते .

संघर्ष हा असाच असतो कधी कधी हाता  तोंडाची मारामारी किंवा कधी कधी विचारांची मारामारी .. वैचारिक मारामारी चा क्षीण संपता संपत नाही . घरातल्या गृहिणीला जी एक लक्ष्मण रेषा आहे ती पार करणे इतके सोपे नाहीये . हा आता जर आधी पासूनच हि लक्ष्मण रेषा आपल्या सोयीची असेल तर ठीक आहे पण एकदा का लक्ष्मण रेषेच्या आत आल्यानंतर त्याचा परीघ वाढवणे म्हणजे संघर्ष तर करावा लागणारच . आणि त्यासाठी न थकता आपली बाजू ठामपणे मांडणे आणि त्या बाजूवर उभे राहणे जमले पाहिजे .

🎭 Series Post

View all