शुभारंभ भाग ९
क्रमश: भाग ८
ओम " हा कॉल मी मुद्दामून स्पीकर वर टाकला होता .. उमेश चे प्रेम तुला भारी वाटले ना .. म्हणून .. आता मला सांग .. तुला कोणाची किंव येतेय .. स्वतःची कि समीरा ची ?
प्राजक्ता अजूनच ओक्सबोक्शी रडू लागली .. " शी... काय माणूस आहे ? अरे.. रे .. देवा ..रे देवा .. बिचारी समीरा ..कसा रे तो असा .. खोटारडा .. आपल्या बायकोला फसवायला काही वाटत कसे नाही त्याला ? शी."
ओम " बघितलेस .. कशी दुनिया आहे .. मगाशी मला तू त्याचाशी कंपेअर करत होतीस ना ? दिसते तसे नसते मॅडम .. चल जाऊन येतो .. मुलांना आणतो .
प्राजक्ता ने त्याचा पुन्हा हात पकडला आणि ती त्याच्या मिठीत गेली .. ओम ने पण तिला घट्ट मिठीत घेतले .. आणि तिच्या कपाळावर किस केले ..
ओम " त्याच दिवशी विचारायचे होतेस ना ? इतके दिवस मनात विष घेऊन जगत होतीस ?" किती डंक मारलेस आज मला .. तुझ्या कोर्टात उभे केले होतेस मला ..
प्राजक्ता " तरी पण तू थोडे तरी प्रेम दाखवू तर शकतोसच ना.. तू का असा वागतोस मग .. तू का मला सांगत नाहीस कि तू अशी राहा .. तशी राहा .. "
ओम " कारण मला तू जशी आहेस तशीच natural आवडतेस .. मेकअप ,सेट अप करून समोर सारखे रहायला काय तू नटी आहेस का ? घर म्हणजे रंगमंच आहे का ? त्याला न आवडणाऱ्या बायको बरोबर प्रेमाचे नाटक करायचे असते म्हणून तो तिला सांगतो .. मला त्याची गरज नाही .. आणि हातच्या कंकणाला आरश्याची गरज असते का ? तूच सांग ? तुला मेक अप ची गरज आहे का ? नुसती साडी नेसलीस आणि या लांब केसांची वेणी घातलीस कि हजारो समीरा फिक्या पडतील .. "
आणि तिच्या बांधलेल्या केसांना त्याच्या हाताने त्याने मोकळे केलं .. " हे खरं सौदर्य आहे .. जे तुझ्याकडे आहे त्याची बरोबरी कोणचं नाही करू शकत . तू कशाला तुझी बरोबरी दुसऱ्यांशी करतेस .. तुझी करतेस ते करतेस वर माझी पण करतेस ? कोण तुला जाडी म्हणतंय याला आपल्याकडे सुडौल बांधा म्हणतात.. बावळट आहेस .. उगाच त्रागा करून घेतलेस.
कपडे कोणी कोणते आणि कसे घालावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .. तेवढा तरी त्याला स्वतःचा अधिकार असलाच पाहिजे म्ह्णून मी तुला असेही कधी सांगितले नाही .. उलट तुझा ड्रेसिंग सेन्स ,कलर चॉईस एकदम भारी असतो .. सिम्पल स्वीट . तुझ्या पर्सनॅलिटी ला शोभून दिसेल असा .
ओम " मी साधी मित्रां बरोबर पार्टी ला जाणार असतो तेव्हा मिटिंग आहे असे सांगितले तर तू मला पकडतेस तर मी काय तुला फसवणार सांग ? एवढी माझी हुशार , सुंदर बायको तिला दुखवून मी कुठे जाऊ ? तुझी मला लाज वाटेल का ? तूच सांग ? बोल बोलता तिला वाक्य गणिक एकेक किस मिळत होता.. आता मी येई पर्यंत तू एक लिस्ट बनवून ठेव तुला काय काय करायचंय ते .. तुला पार्लर ला नेतो .. तुला जीन्स घेऊन देतो .. आईला काय सांगायचंय ते सांगतो मी त्याचे टेन्शन नको घेऊस ..
तुला जीन्स आवडते तर तू आधीच घालायला पाहिजे होतीस .. थांबली का होतीस तेच मला कळत नाही .. तुला पेंटिंग थांबवं असे सुद्धा कोणी सांगतले का ? आई पण आज तुझ्या पेंटिंग ची तारीफ करत होती ? काही बदल तू तुझे करून घेतलेस आणि दोष मला लावलास .. माझ्या साठी तू खुश असणे महत्वाचे आहे .. तुला जे आवडते ते करायला तू मोकळी आहेस .. स्वतंत्र आहेस .. तुला मी कधी सांगितले का कि तू साडीच घाल ? ड्रेसच घाल ? जसे मी तुला कधी जीन्स घाल असे नाही सांगतले तसे हे पण नाही सांगतले .. हो कि नाही ?
ऑफिस च्या पार्टी च बोलशील तर मी तुला फॅमिली डे चे सांगितले नाही .. पण तुम्हाला टाकून मी गेलो होतो का ? हा तसे जर मी केले तर मग मी तुझा दोषी आहे ? या वर्षी मी मुद्दामूनच नाही गेलो कारण या वर्षी पार्टी मध्ये ड्रिंक्स अलाऊड केले होते . तुला आवडले असते का कि मुलांसमोर मी ड्रिंक्स घेत बसलो असतो तर .. तिकडचा माहोल आपल्याला पाहिजे तसा नव्हता या वर्षी म्हणून नाही गेलो .. "
उगाच काहीतरी गैर समज मनात करून घेतलास आणि मला किती मनःस्ताप दिलास मला .. रडकुंडीला आणलेस मला .. मी म्हणतोय झाले काय एवढे आकाश पाताळ एक करायला निघालीस ..
सकाळी बाय करायचं म्हणशील तर तू मला दारापर्यंत सोडायला येतेस तेव्हा मागे आई बसलेली असते आणि मी जेव्हा दाराच्या बाहेर पडतो तेव्हा शेजारच्या काकू असा अँगल लावून बसलेल्या असतात कि त्या दोघींचे लक्ष माझ्याकडे असते .. त्यामुळे मला तुझ्याकडे बघायला हि ऑकवर्ड होते ..
रात्री चे म्हणशील तर प्रथमेश गेल्या चार महिन्यांपूर्वी तिकडे झोपायला गेला .. त्याच्यामुळे मला आधी झोपायची सवय झाली होती .. ..तरी पण मला मान्य आहे मी चुकलो .. तुला गृहीत धरले असावे .
ओम " प्राजक्ता .. तुला जे काय करायचंय ते कर ?पण मनात माझ्या विषयी राग आहे म्हणून नको करूस .. तुला काहीतरी बनायचंय म्हणून कर ..तुला वाटेल ती मदत मी करेन.. पण प्लिज गैर समज नको .. एकमेकांवर विश्वास असला पाहिजे ..
ओम " हा माझे पण चुकलंय .. तुझ्या कडे दुर्लक्ष झाले माझ्याकडून.. मी आणि हे मी मान्य करतो .. मला काय वाटतं माहितेय का प्राजक्ता या सगळ्यांपेक्षा माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे दाखवायचचं राहून गेले कि काय माझ्याकडून .?.." बर ठीक आहे चल आल्यावर बोलू .. मी आलोच मुलांना घेऊन " आणि ओम बाहेर निघून गेला .
प्राजक्ताच्या मनातलं वादळ आता शांत झाले होते ...
ओम गेल्यावर स्वतःला आरशात बघू लागली .. स्वतःला बघून हसू लागली .. खरं तर प्राजक्ता तीच आहे .. त्याच कपड्यात आहे जे ती नेहमी घालते पण आज तिला आपण सुंदर आहोत असा भास होऊ लागला .. स्वतःला आरशात बघून .. आपले लांब केस बघून तिला खूप छान वाटू लागले . तसेच मोकळे केस ठेवून तिने तिच्या घरात एक फेरफटका मारला .. आज फर्निचर पुसायचे राहून गेले हे तिला कळले आणि दुसऱ्या मिनिटाला तिने तिच्या केसांचा अंबाडा बांधला आणि फर्निचर पुसू लागली .. वाळलेल्या कपड्याच्या इस्त्री केल्या सारख्या घड्या घातल्या .. धुवायच्या कपड्यांची मशीन लावली आणि मुलांना काहीतरी नाश्ता काय करायचा विचार करू लागली . तेवढ्यात ओम आलाच मुलांना घेऊन .
प्रथमेश आल्या आल्या आई ला मिठी मारू लागला " आई तू का आली नाहीस आज मला घ्यायला ?बाबा का आले ?आई तुला बरं नाहीये का ? "
प्रिया " आई तुला उद्या प्रिन्सिपॉल मॅम नि भेटायला बोलावलंय "
दोघांनी तिला गराडा घातला आणि तिच्या अवती भवती नाचू लागले .
ओम "बघितलेस .. याला म्हणतात सुख .. सगळे कसे तुझ्या अवती भवती खुश होतात .. अगदी मी सुद्धा.. फक्त मला प्रथमेश सारखे लगेच व्यक्त होता येत नाही ना .. "
प्राजक्ता डोळ्याने च खुणावते .. मुलांसमोर असे नको बोलूस .. प्रिया आता मोठी होतेय .. "
ओम " म आता मी काय करू ? आता तुझ्यावर एक कविताच करतो .. कॉलेज मध्ये असताना तुला चिठ्ठ्या लिहायचो तशी चिट्ठीच लिहतो .. "
प्राजक्ता " अशी लाजली ना .. "
ओम " बरं एक काम करू आज आपण सगळे पिझ्झा खायला जाऊ .. तुम्ही सगळे तयार व्हा .. आणि येताना आजीला पण घेऊन येऊ घरी "
प्रथमेश " नाही .. आजी पण येणार आहे पिझ्झा खायला .. ती मला म्हणालीय .. आपण आधी आजीला आणू मग पिझ्झा खायला जाऊ "
ओम " हा बघ हा खरा बाबांचा आत्मा आहे .. बघ आजीची किती काळजी आहे त्याला .. हे असे असतात नवरे .. मागे राहिलेली पत्नी सुखी आहे कि नाही हे बघायला पुन्हा मुलाच्या पोटी जन्म घेतात . आणि तुम्ही बायका फक्त नावे ठेवा त्यांना . " आणि घरात सगळे हसू लागले..
कधी कधी निगेटिव्ह एनर्जी मधून काहीतरी पॉसिटीव्ह होऊ शकते . त्याचाच हा नमुना आहे . प्राजक्ता ला जेव्हा असे (जरी त्यात फारसे तथ्य नव्हते तरी ) जाणवायला लागले कि ओम साठी मी जीव ओवाळून टाकला तरी माझी त्याला किंमत नाहीये म्हणजे आता मला माझा काहीतरी स्टॅन्ड घेतला पाहिजे . मला माझे मन रमवण्यासाठी काहीतरी नवीन शोधले पाहिजे . माझे असे काहीतरी अस्तित्व असले पाहिजे याची जाणीव तिला झाली हे केव्हाही चांगलेच झाले .
रतन टाटा जेव्हा फोर्ड कंपनीकडे कार कशी बनवायची याच्या डिसकसशन साठी गेले होते तेव्हा फोर्ड कंपनीच्या मालकाने त्यांचा अपमान केला होता . ट्रक बनवणारे म्हणून त्यांना हिणवले होते. पण रतन टाटा यांनी हार न मानता कार बनवून दाखवल्या आणि एक काळ असा आला कि फोर्ड कंपनी ला टाळं लागायची वेळ आली आणि ती त्यांनी विकायला काढली तोपर्यंत टाटा कंपनी कार बनवणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध झाली होती आणि याच कंपनी फोर्ड कंपनी ला विकत घेतली .
रतन टाटा यांनी त्यांचा झालेला अपमान एक ड्रायविंग फोर्स म्हणून वापरला आणि एक कार बनवणारी कंपनी म्हणून टाटा चे नाव बनवून दाखवले आणि कार बनवणारी मोठी कंपनी विकत घेऊन फोर्ड च्या मालकाला ते काय चीज आहेत हे दाखवून दिले तेही सन्मानाने .
प्रत्येक गृहिणी एक कलाकार असते . तिच्या मध्ये अनन्य साधारण शक्ती असते . मॅनेजमेंट स्किल्स असतात . असलेल्या रिसोर्स मध्ये कसे काम करायचे आणि करवून घ्यायचे हे सुद्धा त्यांना मॅनेजमेंट न शिकता येत असते .वेळ आली तर फ्रंट फूट वर येऊन खेळू शकतात . पण गृहिणी म्हटले कि सगळेच जण नाक मुरडतात . रोज रोज त्याच कामाचा त्यांना कंटाळा येत नाही किंवा आला तरी त्या त्याच उत्साहाने करतात. त्यातलीच एखादी हिरकणी बनते .. एखादी सावित्री बनते , एखादी जिजाऊ बनते , एखादी सीता बनते .. अशी हि अनेक रुपें या गृहिणी मध्ये असतात . तिला सन्मान दिलात तर चांगलेच आहे आणि जर सन्मान नाही दिलात तरीही ती अशी लाट आहे कि कशी सुनामी बनेल आणि त्यात तुम्ही आम्ही वाहून जाऊ कळणार नाही .
प्राजक्ताने स्वतःला एक गृहिणी मनापासून स्वीकारले होते .. पण जेव्हा तिच्या अस्तित्वावर घाला पडतोय असे तिला वाटले तेव्हा ती वेळीच सावध झाली आणि आता आपण काहीतरी करायला पाहिजे असा कौल तिच्या मनाने तिला दिला होता .
जेव्हा पण संघर्ष करायची वेळ येते तेव्हा तो घरा पासूनच करावा लागतो . त्यात जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही गेम मधली एक पहिली लेव्हल जिकंलेली असते आणि दुसऱ्या लेव्हल च्या संघर्षाची धार थोडी अजून वाढलेली असते .
नशिबाने प्राजक्ताला तिच्या वर प्रेम करणारा जोडीदार लाभला आहे त्याला पण तिला धारेवर धरावेच लागले . समोरच्याने आपल्याला कितपत गृहीत धरावे याला पण काहीतरी नेम असला पाहिजे कि नाही ? योग्य वेळी आपला आवाज बाहेर काढावाच पाहिजे . निदान आपला मुद्दा काय आहे हे समोरच्याच्या डोक्यात ते टाकावेच लागते नाहीतर आपली अवस्था हि वारा येईल तिकडे उडणाऱ्या गवताच्या पात्या सारखी होते .. आपला स्वाभिमान जागृत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे . हा स्वाभिमान आपल्याला प्रेरणा देत असतो , दिशा देत असतो आणि मनाला काय चुकतंय हे बरोबर सांगत असतो .. स्वाभिमानाने जगायला शिकले पाहिजे . प्रेमात सुद्धा लाचारी नाही पत्करायची . जर लाचारी आली तर प्रेम घातक आहे .मुलांवर असो किंवा नवऱ्यावर असो पण प्रेमा च्या बदल्यात प्रेमच मिळाले पाहिजे .. तिथे आपल्या मनाला सारखीच मुरड घालावी लागत असेल तर काहीतरी चुकतंय हे लक्षात आले पाहिजे .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा