Oct 27, 2020
स्पर्धा

शुभारंभ भाग ८

Read Later
शुभारंभ भाग ८

शुभारंभ भाग ८

 

क्रमश: भाग ७

ओम " कोण समीरा .. मला नाही माहित ?" ओम चे कान ती काय सांगणार आहे हे ऐकण्यासाठी तरसले

प्राजक्ता " तुझ्या ऑफिस मधल्या उमेशची बायको "

 

ओम " बरं मग ? काय झाले तिचे ?तिचा नि माझा काय संबंध ? "

 

प्राजक्ता  आपण मागे सगळे ट्रिप ला गेलो  होतो तेव्हा माझी तिची चांगली ओळख झाली होती .... मी भाजी मार्केट मधून भाजी आणायला गेले होते त्यामुळे मी फारसे छान आवरून पण गेले नव्हते .. "

 

ओम " पण झाले काय ? ती तुला काही बोलली का ?"

 

प्राजक्ता " बऱ्याच दिवसन्नी ती भेटली तर म्हणाली आपण समोरच्या हॉटेल मध्ये बसून  चहा घेऊ .. मला तिला नाही म्हणता नाही आले .. शेवटी मी गेलेच तिच्या बरोबर  .

 

ओम " मग .. काय माझ्या बद्दल बोलली का ती तुला .. "

 

प्राजक्ता " नाही .. तुझ्या बद्दल नाही काही .. ती पण साधारण माझ्याच वयाची आहे पण कशी  व्यवस्थित राहते .. एकदम जीन्स .. टी'-शर्ट घालून हाय हिल्स आणि केस पण एकदम मस्त मोकळे ठेवून होती आणि तिच्या पुढे मला माझी इतकी लाज वाटत होती .. मी  ज्या ड्रेस वर पोळ्या केल्या होत्या तोच ड्रेस घालून गेले होते .. त्यामुळे  थोडे थोडे पीठ पण पुढे लागले होते .. माझ्या केसांचा अंबाडा बांधला होता.. ती जेवढी व्यवस्थित होती .. त्याच्या विरुद्ध मी होते .. ती मस्त पार्लर ला जाऊन केसांना स्पा घेऊन आली होती आणि मी .. टोमॅटो एक किलो घेतले तर किती कमी करणार यावर हुज्जत घालून आली होती .. मला तिचा हेवा नव्हता वाटत पण मला माझी किंव येत होती ..मग गप्पा मारता मारता तिने मला सांगितले कि उमेश ला तिने व्यव्स्थीतच राहिलेलं आवडते .. दोन मुलांचा बाबा झाला तरी मी छान नाही राहिले तर भडकतो माझ्यावर .. मला नेहमी गिफ्ट्स  आणत असतो .. वेगवेगळ्या फँशन चे ड्रेस घालायला  लावतो .. मी तिला विचारले अग तू इतकी बारीक अशी काय राहिलीस ?तर मला म्हणाली मी जिम ला जाते ..

माझ्याच वयाची आहे तरी कसली मेंटेन होती ती .. नवऱ्याला जर बायको विषयी काही वाटत असेल तर बायका पण राहतात नवऱ्यासाठी टापटीप .. तुला तर मी कशीही राहो काहीच फरक पडत नाही .. तुझे सगळे वेळच्या वेळेत होतंय ना यातच तुला समाधान .. नाही का ?

 

ओम " झाले का ?अजून काही बोलली समीरा .. "

 

प्राजक्ता " हो .. ना आहे अजून .. ऐकायचंय का अजून ?"

 

ओम " हो .. ऐकायचय .."

 

प्राजक्ता " नंतर तिने मला तिचा मोबाईल दाखवला .. तिच्या मोबाइल चा स्क्रीन शॉट काय होती माहितेय .. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हात टाकलेला फोटो .. फोटोत  किती सुंदर आणि सुखी , आनंदी  दिसत होते दोघे .. आनंद चेहऱ्यावर ओसंडून वहात होता  त्यांच्या .. नंतर तेवढ्यात ला  माझ्या समोरच उमेश  चा फोन आला .. तिला विचारत होता " तुझी पार्लर ची अँपॉन्टमेंट झाली का ? जास्त उन्हात फिरू नकोस .. उन्हाची वेळ आहे "  ऑफिस मधून वेळात वेळ काढून पार्लर ची चौकशी  करत होता .. हे सगळे पाहून ऐकून माझे ना अवसानच गळाले  .. तिथेच गळा दाटून आला होता .. कसा बसा  तो चहा मी घशात टाकला आणि कधी एकदा तिकडून निघतेय असे झाले मला ..

 

तिचा फोन तिने परत मला दिला तर त्याचा व्हाट्स अँप च्या डीपी पण दोघांचा फोटो होता .. आणि त्याने तिला एक मेसेज पाठवला  होता तो मला चुकून दिसला कारण तो नोटिफिकेशन मध्ये होता .. काय होता माहितेय का ?

 

ओम " मला कसा माहित असेल ?"

 

प्राजक्ता " तेच तर ना .. तुला तर नसेलच माहित .. तो पण तुझ्याच वयाचा आहे ना रे .. त्याला पण दोन मुलं आहेत ना रे .. "

 

ओम " हो .. पण "

 

प्राजक्ता " त्याने तिला " आय लव्ह यु .. " असा मेसेज ऑफिस मधून दुपारी टाकला होता .. "

 

प्राजक्ता ला सांगता सांगता .. हुंदके  येत होते .

 

प्राजक्ता " ओम .. याचा अर्थ काय ? मला वाटतं आपले पण लव मॅरेज झाले होते ना रे .. तु कधी मल एकदा तरी जेवलिस का ? भाजी आणलीस का ? असा प्रश्न तरी विचारलेस ? काय आहे याच अर्थ .. मी असले काय आणि नसले काय तुला काहीही फरक पडत नाही .. हो  ना ? "

 

प्राजक्ता " अजून आहे माझे बोलणे झाले नाहीये .. नंतर निघता निघता .. ती मला म्हणाली कि तू ऑफिस च्या फॅमिली डे ला का आली नव्हतीस ? खूप मज्जा आली होती .. बाकी तुमचा सगळा ग्रुप  फॅमिलीला घेऊन गेले होते . तुझ्या कंपनीतला फॅमिली डे होऊन गेला हे सुद्धा तू मला बोलला नाहीस .. मी तिला सांगितले कि अंग माझी तब्बेत बिघडली होती तेव्हा म्हणून नाही आले ..   का ? ओम तू मला का सांगितले नाहीस तुझ्या ऑफिस मध्ये फॅमिली होता ते ? का तुला मला  बाहेर घेऊन जायला लाज वाटते म्हणूनच ना ? .. बाकीच्या मित्रांच्या बायको सारखी मी वेस्टर्न कपडे घालत नाही .. म्हणूनच ना ? "

 

ओम " अरे .. नाहीये तसे .. "

 

प्राजक्ता " कुणाला खोटे बोलतोस ओम .. त्यांनतर मी मुद्दामून दोन दिवस भाजीत मीठ टाकले नाही .. म्हटले निदान जेवताना शिव्या घालायच्या नावाने तरी माझी आठवण काढशील   आणि मला फोन करशील ? तरी सुद्धा तू मला फोन केला नाहीस ? तुझ्या साठी मी इतकी नगण्य झालेय कि सकाळी बाय , दुपारी कॉल ,रात्री गुड नाईट म्हणायला पण तुला वेळ नाही आणि त्या पेक्षा इंटरेस्ट पण नाही .. हे च आहे का माझे अस्तित्व आपल्या घरातले ?.. हे आहे का माझे स्थान ? काय मिळवले मी माझे अस्तित्व गमावून ? तुझ्या साठी मी असले काय आणि नसले काय काहीच फरक नाही ?  माझा आत्मा तळमतोय ? तुला नाही कळणार ?"

 

यात तुझा दोष नाहीये .. हा दोष माझा आहे .. मी इतकं संसारात स्वतःला वाहून घेतले कि मी माझ्याकडे लक्षच दिले नाही .. थँक्स दहा वर्ष माझ्या सारख्या बायकोला तू संभाळीस   .. इतके खायला प्यायला घेतलेस कि मी बारीक होते ते आता जाडी झाले .. थँक्स वन्स अगेन मिस्टर ओम "

प्राजक्ता " अरे मी काय लग्न आधी पासून अशी काकू बाई होतेका ? तुमच्या  घराण्याची आब राखण्यासाठी मी नेहमी आईंचा विचार करून त्यांना आवडेल तसेच वागत गेले . त्यांना माझ्याकडून काही तक्रार राहणार नाही हे बघत गेले .. उगाच नाही त्या माझी बाजू घेत .. आपले लव्ह मॅरेज होते याचाही त्यांना विसर पडलाय इतकी मी तुमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या .. तुझ्या कोणत्याही नातेवाईकाला पण विचार त्यांना असे कधी जाणवले सुद्धा नाही कि  मी इंटरकास्ट मॅरेज करून आलेय .. सगळे फुकट गेल्यासारखं वाटतंय ओम.. तुलाच माझ्यात इंटरेस्ट नाही राहिला ... हे काय जगणे आहे ? रोजचा व्यवहार सोडला तर आपण एकमेकांशी बोलत  नाही.

ऑफिस ला तर सगळेच जातात ना .. पण तुझ्या सारखे ओझे घेऊन नाही येत घरात ? फॅमिली लाईफ काही असते कि नाही ?तुला काय वाटत .. “

जाऊदे .. चल मी जरा बाहेर जाऊन येते .. तुला पण ऑफिस ला जायचंय ना .. बस झाला हा विषय .. मला वाढवायचा नव्हता .. पण आज तुला निक्षून सांगते ... मी जॉब ला तर आधीच गेले  असते .. तरी पण तुमच्या सगळ्यांच्या मनाचं  विचार करत बसले आणि तू काय केलेस ? दोन मुलांचा बाप झालास म्हणजे तुझे प्रेम आटले का ?

 

काय समजावू मी माझ्या मनाला सांग ? हल्ली हल्ली तर मला विचार करून डिप्रेशन आलेय असे वाटतंय ?

 

नॉन स्टॉप मनातली सगळी गरळ आज प्राजक्ता बाहेर काढत होती आणि एक तास भर नॉन स्टॉप बोलण्याने तिला एक क्षण चक्कर आल्या सारखे झाले . रात्रीचे जागरण , प्रॉपर जेवण नाही , अश्रू , आक्रोश , दुःख .. सगळेच विचित्र होता तो क्षण .. ओम ला तर आज तिने फैलावर धरले होते ..

 

ओम ने तिला पाणी प्यायला दिले .." बस आता .. कळाला विषय मला .. तू  थोडा  आराम कर .. आपण बोलू  थोड्या वेळाने "आणि काळजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला ..

 

तिला झोपवून तो किचन मध्ये आला आणि तिच्या साठी त्याने लिंबू सरबत केले आणि तिला ग्लास ने प्यायला लावले .. "प्लिज रडू नकोस .. सॉरी मी  तुला खूपच दुखवलंय .. काही गोष्टींचे क्लेरिफिकेशन मी देणार आहे पण आता नाही .. आज  तू  आराम कर.. नाहीतर तुझी तब्बेत बिघडेल ..

 

प्राजक्ता ने त्याचा हात पकडला " सॉरी ..मी खूप बोलले ना .. तू जरी कसाही वागलास तरी माझे प्रेम मी विसरले नाहीये .. म्हणून तुला सॉरी बोलतेय .. तुला हे सगळं बोलताना सुद्धा मला असंख्य यातना होत होत्या . "

 

ओम " ते राहू दे .. आपण बोलू नंतर .. माझे पण चुकलेच ना .. तुला एवढा त्रास दिलाय कि आता आज मला बोलायचीच ताकद नाहीये .. आणि तो पण तिच्या बाजूला बेड वर पडून राहिला ..

 

दोघेही शांत .. पंख्याकडे बघत बसले होते ..

 

दहा एक मिनिटांनी ओम उठला " चल .. दोघांना घेऊन येतो .. त्यांची  शाळा सुटायची  वेळ झाली ना "

 

प्राजक्ता " नको .. मी जाते .. तू थांब .. "

 

ओम " आता मी जातोय ना .. आज घरी आहे तर जातो .. नाहीतर रोज जातेसच ना .. "

 

जाता जाता त्याने ऑफिस मध्ये एक फोन लावला आणि कॉल स्पीकर वर ठेवला

 

ओम " हाय उमेश ?कुठे आहेस ?"

 

उमेश " अरे .. काय रे आज सुट्टी का ? काय झाले ? कालची जास्त झाली का ?"

 

ओम " हो ना .. साल्या तुझ्यामुळे तू पैज लावली होतीस ना .. .. आहेस कुठे ?"

 

उमेश " असणार कुठे ? आता चहाची वेळ झाली आमची .. कॅन्टीन ला ?"

 

ओम " एकटाच आलास आज ?"

 

उमेश " मी आणि एकटा ? "

 

ओम " हमम.. चालू द्या .. तुमचे .. बरे मॅनेज करतोस रे ? घरात एक बाहेर एक ?"

 

उमेश " ए .. हळू बोल शहाण्या ? कोणी तरी ऐकेल .. अशा गोष्टी बोलायच्या नसतात .. तू बरं मॅनेज करतोस गेल्या दहा वर्षा पासून घरात पण तीच आणि बाहेर पण तीच . घरात फक्त स्वीट डिश खायची असते रे .. जाऊ दे तुला नाही कळणार ? बरं बोल .. कॉल कशाला केला होतास "

 

ओम " तेच जर माझ्यासाठी काही अर्जेंट मेल आले तर सांग मी आज सुट्टीवर आहे उद्या रिव्हर्ट करेन .. किंवा अर्जेंट असेल तर मला सांगशील "

 

उमेश " ओके .. बाय "

 

ओम " बाय "

हा कॉल मुद्दामून त्याने प्राजक्ताला ऐकवला होता