Login

शुभारंभ भाग ४

In this part om and prajkta go for candle light dinner

शुभारंभ भाग ४

क्रमश : भाग ३

प्राजक्ता त्याच्या घट्ट मिठीतुन कशिबशी  बाहेर पडलीच .

ओम " अग .. इट्स ओके .. "

प्राजक्ता " तू माझ्या याबद्दल काय विचार करतोयस काय माहित ? पण माझी धडपड या साठी नक्कीच नाहीये "

ओम " हो .. अग मला तू चुकीचे नको समजूस .. तुला आता मी इतका परका  वाटू लागलो कि काय ? माझी हक्काची बायको आहेस तू एखादी मिठी तर मारूच शकतो ना .. "

प्राजक्ता " प्लिज तू झोप आता .. उद्या आपण बोलू .. सॉरी .. तुला आता मी खूप त्रास देतेय .. गुड नाईट "

ओम " ऐक ना प्राजु .. मला तू कधीच त्रास देत नाहीस. नको ना असे बोलूस ..  "

आज अचानक प्राजक्ताची प्राजु झाली .. हे ओम ला पण कळले नाही .. ओम ला जर शक्य झाले तर आज जगात असलेली सगळी सुख प्राजक्ताच्या पायावर घालेल अशीच त्याची काहीशी अवस्था झाली होती . बिचाऱ्याला  खूप अपराधी पण आले होते . आपल्या  बायकोला आपण  आपल्याच  वागण्याने परकं करून  टाकले आहे हे त्याच्या लक्षात आले .

या सगळ्याचे कारण एकच .. नवरा बायको मध्ये न होत असलेला संवाद .. प्रॉपर संवाद न झाल्यामुळे समज , गैरसमज होऊ लागतात आणि आपल्या शेजारी असलेला माणूस खूप खूप लांब जातो .. इतका लांब जातो कि एक वेगळीच दरी निर्माण होते .

आधीच प्राजक्ता ला  स्वतःच अस्तित्व धुक्यात धूसर होताना दिसतंय आणि त्यातच जर आपल्याला  कोणी दुर्लक्ष केले ना कि असे वाटायला लागते कि मी असून सुद्धा मी नसल्या सारखी झाले कि काय ? मनात जर एकदा निगेटिव्ह विचारांनी शिरकाव केला तर मनाला पोखरून काढतो .

 मग तीच  व्यक्ती स्वतःला शोधू लागतो .. आपल्या अस्तित्व निर्माण करण्याकडे तिचा कल वाढत जातो .. "मी पण आहे " हे असे जोर जोरात ओरडून सांगावेसे वाटू लागते त्या व्यक्तीला . अशाच काहीश्या मनस्थितीत प्राजक्ता होती .

ओम " बरं .. ऐक तर .. आधी तू मनातून हे बाकीचे सगळे काढून टाक ?कि मी अपराधी आहे .. माझ्या पोटापुरते तरी मला कमवू दे..  पुन्हा माझं तुझं करू नकोस .. हे जे काही आहे ते आपल्या दोघांचे आहे .. नकळत म्हण , अजाणते पण म्हण माझे चुकले आहे  मी मान्य करतो .. तुझ्या भावना मी दुखावल्यात .. पण मी मुलांची शपथ घेऊन सांगतो मी मुद्दामून नाही केलंय हे माझ्या लक्षातच आले नाही .. जरी मुलं मोठी झाली तरी नवरा बायकोच्या  नात्यावर त्याचा  परिणाम होयला नको पाहिजे होता .. सॉरी .. फक्त  एकदा मला समजून घे "

प्राजक्ता " हो ..  मी तुला पुन्हा सांगतेय कि मी तुझ्यावर नाराज नाहीये .. मी मलाच शोधतेय सध्या .. माझ्यातली मी कुठेतरी हरवलीय तिला शोधण्याचा  प्रयत्न करतेय मी ."

ओम " तू एक लक्षात   ठेव मी तुझ्या बरोबर सदैव आहे .. तुझ्या शिवाय मी काहीच नाहीये .. मी कधी तोंडाने बोललो नाही पण आज मी  सांगतो कि तू माझी बायको असल्याचा मला सार्थ अभिमान आहे . "

आणि ओम तिला पुन्हा त्याच्या मिठीत सामावून घेतो .

काय आहे हि मिठी .. हा स्पर्श फक्त त्या एका कारण साठीच नसतो . या  मिठीत खूप सारे सामर्थ्य असते . जेव्हा एखाद्याला मिठीत घेतो तेव्हा त्याचे  हृदय आपल्या ह्रदयाला जोडले जाते .  मग हृदयाची स्पंदने एक होऊ लागतात जसे कि घड्याळाचे काटे सेल संपल्यामुळे चालायचे थांबलेले असतात आणि सेल टाकल्यावर घड्याळ कसे मस्त चालू लागते आणि त्यातून एक आवाज येतो "टिक टिक टिक .. अगदी तसेच हि ह्रदयाची स्पंदने दोन  मनांना  जोडायचे काम करते . यात मायेची उब असते , यात आधार असतो , यात प्रेमाची साद असते .. उगाच नाही तिला जादूची झप्पी म्हटले जातं

प्राजक्ता रडत रडतच " ठीक आहे .. थँक यु "

ओम " म आता हस बघू .. आणि मग त्याच्या हाताच्या उशीवर  डोकं ठेवून प्राजक्ता झोपून गेली .

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रुटीन चालू झाले . ओम मुलांना सोडून आला ..आणि त्याचे आवरून नेहमी प्रमाणे ऑफिस ला जायला निघाला . नेहमी प्रमाणे प्राजक्ता त्याला दारापर्यंत सोडायला गेली आणि तो नेहमी प्रमाणे तिच्या कडे न बघता तिला न बाय करता निघून गेला ..

प्राजक्ताला पण तीच सवय होती .. ती आपली किचन मध्ये आली आणि बाकीची कामं करू लागली . तेवढ्यात दाराची बेल वाजली .

प्राजक्ता दार उघडायला गेली एवढ्या  सकाळी सकाळी कोण आले हे बघायला .. दार उघडते तर धापा टाकत ओम पुन्हा  जिन्याने वरती आलेला .. तिला वाटले ह्याचे काही तरी सामान घ्यायचे राहिले म्हणून आला .

प्राजक्ता " अरे .. ओम .. किती दमलास ..?  जिन्यावरून धावत आलास कि काय ? बोल बोलता तिने त्याला प्यायला पाणी दिले .

दोन मिनिटे थांबला .. पाणी प्यायला आणि ..

ओम " बाय .. " असे म्हणून एक गोड स्माईल देऊन पटकन निघून पण गेला .

सासू बाई देव खोलीतून बाहेर येई पर्यत हा पसार झाला होता

सासूबाई " काय ग ? काय राहिले होते त्याचे "

प्राजक्ता " ते .. त्याची पाण्याची बॉटल राहिली होती म्हणून आले होते ." आणि किचन मध्ये हसत हसतच गेली . ओम च्या एका बदला  मुळे प्राजक्ताच्या लाईफ मध्ये खूप फरक पडणार होता .

प्राजक्ता ला हसता  हसता रडूच आले होते .. आज दिवसभर तिच्या डोळ्या समोर फक्त ओम चे ते गोड स्माईल होते आणि त्यामुळे मन पण खूप आनंदी होते .

स्त्री  मनाचं मला खूप आश्चर्यच वाटतं . नुसता नवऱ्याने हसून "बाय "म्हटले नाही म्हणून दुःख काय होतं आणि हसून  "बाय " म्हटल्याने एवढा फरक पडू शकतो !!!

प्राजक्ताची आई जशी म्हणते तसे प्राजक्ताला सुख दुखतंय का ? तिला नक्की का दुःख आहे ? आणि हे असले दुःख असणे हे चुकीचे आहे का बरोबर आहे याच जरासा अभ्यास करू .

maslow's hierarchy of need pyramid

हा पिरॅमिड  मानसशात्रज्ञ  मास्लो यांचा आहे . प्रत्येक मनुष्याच्या  गरजांचा  हा पिरॅमिड त्यांनी बनवलाय . हा पिरॅमिड जर खालून वरती पहिला तर पहिल्या तीन गरज प्राजक्ताच्या  पूर्ण झालेल्या आहेत . खालून चौथी गरजेच्या रकान्या पर्यंत ती पोहचली आणि तिथून पुढे तिची प्रगती किंवा तिथून पुढे तिचा संघर्ष चालू होतो . मास्लो हे एक थोर सायंटिस्ट आणि मानसशात्रज्ञ   होते . त्यांनी हा सिद्धांत लिहुन ठेवलाय . म्हणजे यावरून मला हेच सिद्ध करायचेय कि मानस शास्त्रा नुसार प्राजक्ता तिच्या अस्तित्वाचा जो विचार करतेय हे मानवी स्वभाव नुसार काहीही चुकीचे नाहीये . कारण मानवी स्वभावच मुळात प्रगतिशील आहे ..त्याच्या ईच्छा आकांशा ह्या वाढतच जाणार .. असे जर होत नसेल तर तो प्रॉब्लेम  मध्ये आहे .. जो पर्यंत मनामध्ये हि  धग आहे तोपर्यंत ती  कधीच हरू शकत नाही .

आज ओम संध्याकाळी जरा लवकर घरी आला . प्राजक्ता दोघा  मुलांचा अभ्यास घेत होती . सासूबाई खाली सोसायटीच्या मंदिरात बसल्या होत्या

प्राजक्ता " अरे .. आज लवकर ?"

ओम काहीच बोलत  नाही पण नुसता हसला तिच्या कडे बघून . प्राजक्ताने प्रथमेश ला गणित समजावून सांगितले आणि उठली आणि ओम ला पाण्याचा ग्लास दिला . ओम पण फ्रेश झाला . तोपर्यंत तिने चहा टाकला .. आज किती तरी दिवसांनी ओम संध्याकाळच्या चहाला घरी होता .. ओमने प्राजक्ताचे बोलणे चांगलेच मनावर घेतलेले दिसत होते .. प्राजक्ता चहा करता करता स्वतःशीच हसत होती .

ओम " आज जेवणाचे का स्टेटस आहे ?"

प्राजक्ता " नाही अजून बनवले नाही .. आता मी लावतेय कुकर "

ओम " एक काम कर . मुलांचे आणि आई चे च बनव आपण आज बाहेर जाऊ जेवायला "

प्राजक्ता " नको रे .. उद्या सकाळचं  रुटीन बिघडेल "

ओम " मी सांगतोय ते कर .. "

प्राजक्ता " अरे .. मुलांना घरात ठेवून बाहेर जायचं मला नाही पटत .. मग पाहिजे तर सगळे जाऊ "

ओम " मग उद्याचे रुटीन बिघडेल . मुलं उठणार नाहीत . आई ला मी सांगतो काय सांगायचं ते .. तू मी तुला सांगतोय ते कर " असा निष्टुन सांगू लागला . आता मी करतोय तर हि उगाच नाही नको का बोलतेय याचा त्याला  राग येत होता .

तेवढ्यात सासूबाई घरात आल्या ..

सासूबाई " ओम .. आज लवकर कसा काय आलास?"

ओम " आज मिटिंग कॅन्सल झाली .. म्हणून लवकर येता आले "

ओम " आई . ऐक ना .. आज मी आणि प्राजक्ता जेवायला बाहेर जातोय .. माझ्या मित्राच्या बायकोचा वाढदिवस आहे तर त्याची पार्टी आहे . प्राजक्ता तुमच्या तिघांचे जेवण बनवून ठेवतेय .. तुम्ही जेवून घ्या "

सासूबाई " श्री राम जय राम जय जय राम"

तेवढ्यात प्रथमेश ने ऐकले

प्रथमेश " बाबा .. मी येऊ का ? "

प्रिया " बाबा मी पण "

ओम " आज वार कुठला आहे ? बुधवार .. उद्या तुमच्या दोघांची शाळा आहे ना म्हणून तुम्ही दोघे आज नका येऊ .. मी तुम्हा दोघांना शनिवारी पिझ्झा खायला नेणार आहे "

प्रथेमष " ए. ए... मी पिझ्झा खायला जाणार .. एकदम खुश ..  पळत जाऊन आजीला मिठी मारून " आजी तू येशील का शनिवारी माझ्या बरोबर पिझ्झा खायला "

सासूबाई " येईन हो .. येईन .. "

बघा पुरुषाने जर संसारात लक्ष घालायचे ठरवले तर एखाद्या बाई ला  लाजवेल असा संसार करून दाखवतील . बघा कशी गणित सोडवतोय .. स्टेप बाय स्टेप . प्रॉब्लेम हा असतो त्यांना जरा उशिरा कळतं .

प्राजक्ता ने मुलांचा स्वयंपाक केला आणि मस्त ठेवणीतला पार्टी वेअर पंजाबी ड्रेस घातला . छान तयार झाली . आणि दोघे बाहेर जायला निघाले . तरी पण  जाई जाई पर्यंत " आई , मी वाढून देऊ का ? " हे करून ठेवलय.. ते पण घ्या .. अश्या सूचना सांगत  होती .

प्रिया " आई .. तुम्ही लवकर या ? तू नसलीस ना कि प्रथमेश मला त्रास देतो .. भांडण करतो माझ्याशी आणि आजी त्याचीच बाजू घेते "

प्राजक्ता " हो .. लवकर येते .. आणि प्रथमेश .. ताईला त्रास दिलासा ना तर मी आल्यावर फटके देईन काय ? कळले का ?"

तर अशा पद्धतीने दोघे एक मस्त छान डिनर ला गेले . जाताना गाडीत दोघेही गप्प .. काय बोलावे हे प्राजक्ताला तर सुचतच नव्हते .. या अशा प्रकारे ती ओम बरोबर प्रिया होण्याच्या आधी गेली होती ..

एका छान हॉटेल मध्ये कॅण्डल लाईट डिनर ला बसले . ओम ने प्राजक्ताच्या आवडीचा मेनू ऑर्डर केला .

ओम " बोल कि .. नुसती गप्प का बसतेस "

प्राजक्ता " काय बोलू सुचतच नाहीये "

ओम " काल  तर काय काय बोलत  होतीस  .. म्हटले आता नक्की अजून काय काय विचार करतेस ते एकदा सगळं ऐकूनच घ्यावे म्हणून तुला घेऊन आलो "

प्राजक्ता " हो .. काल जरा तुला जास्तच बोलले मी .. सॉरी "

ओम " अरे .. या साठी नाही आलोय आपण इकडे .... चल मीच बोलतो .. हे बघ .. तुला काहीतरी करायचंय हे तर आता मला कळलंय ..आता काय करायचं  आणि कसे करायच हा मुद्दा आहे "

आता हळू हळू त्यांच्यात थाम्बलेला संवाद सुरु होऊ लागला . 

ओम " हे बघ नोकरीचे म्हणशील तर आपल्याला घरात एक मेड दिवस भरासाठी ठेवायला लागेलं .. कारण आई ला काही आता मुलांचे करायला झेपणार नाही . उगाच मुलांचे हाल होतील . पार्ट टाईम वैगरे असा ऑप्शन निघू शकतो पण त्यात तुझी दमछाक खूप होईल . शिवाय असे छोटे छोटे बिझनेस करायचे म्हटले तर त्यात मला तरी काही राम वाटत नाही . जर करायचंच झाले तर असे कर कि जे काम करताना तुला आनंद मिळेल . सध्या पैशांचा विचार करू नकोस . मोबदल्याचा विचार करशील तर मागेच राहशील . "

प्राजक्ता " हमम.. "

ओम " हे बघ .. आई जरी काहीही बोलत असली तरी तिला तुझी काळजीच असते .. तुझा पाय मागे खेचायला ती मुळीच बनत नाही ..बघ माझा आवाज वाढला कि लगेच विचारते " काय रे ओम .. " तिला अजिबात आवडत मी तुझ्यावर आवाज चढवलेला .. त्यामुळे तू तिच्या बाबतीत निश्चिन्त रहा "

प्राजक्ता " हमम.. "

ओम " बोल .. कि नुसतं हमम.. हमम.. काय करतेस "

प्राजक्ता " हो ऐकतेय .. तू काय म्हणतोस ते "

ओम " हे बघ .. मला असे वाटतं कि तू पुन्हा पेंटिंग्स तयार करायला सुरुवात कर .. तुला आठवते का .. मी तुला पहिल्यांदा कॉलेज मध्ये पहिले तेव्हा तू पेंन्टींग्स करत होतीस .. "

प्राजक्ता " एकदम लाजलीच .. एक क्षण मन पटकन भूतकाळात जाऊन भरारी घेऊन पुन्हा वर्तमानात आले "

🎭 Series Post

View all