Oct 21, 2020
स्पर्धा

शुभारंभ भाग ३

Read Later
शुभारंभ भाग ३

 

शुभारंभ भाग ३

 

क्रमश : भाग २

थोड्यच वेळात मुलांना शाळेतून घरी घेऊन आली . सासूबाईंना कळले होतेच कि हि कुठेतरी जाणार होती पण आता तिने जाण्याचा बेत कॅन्सल केलाय म्हणून त्या पण खुश होत्या .

 

नेहमी प्रमाणे ओम संध्याकाळी घरी आला .. सगळ्यांची जेवणे झाली . प्राजक्ता किचन मधले सर्व काम उरकून मुलांना झोपवून बेडरूम  मध्ये आली तर ओम लॅपटॉप वर काम करत होता . ती काहीही न बोलता झोपून गेली . तर

 

ओम " ए हॅलो .. मग काय बिझनेस वूमन .. झाली का जॉईन ?काही दाखवशील कि नाही ? तुझे प्रॉडक्ट्स वगैरे "

 

प्राजक्ता "उठली आणि ड्रॉवर मधले पैसे काढले आणि  ओम ला द्यायला गेली "

 

ओम " अरे वाह .. एका दिवसात पैसे डबल कि काय ?"

 

प्राजक्ता " चिडव .. अजून चिडव .. तुला खूप मजा येत असेल ना "

 

ओम " मजा काय ? का जॉईन नाही झालीस ? आई काही बोलली का ?"

 

प्राजक्ता " नाही .. मलाच नव्हते होयचे "

 

ओम " का? काल तर भांडत होतीस .. मी करणार म्हणजे करणार ? मग झाले काय ते तरी सांगशील का नाही ?"

 

प्राजक्ता " काही सांगण्या सारखे नहिये .. मला  आता करायचे नाही हे मात्र नक्की "

 

ओम " चला बरे झाले माझे ५००० रुपये वाचले .. आणि माझे नाक पण खाली नाही गेले .. हो ना ?आता एक काम कर .. हे पैसे  तुझ्याकडेच ठेव .. तुला जे काही करायचंय ते कर याचे "

 

प्राजक्ता " गप रे ..आधीच मला काय करायचे समजत नाहीये .. मला काहीतरी करायचंय .. माझ्यासाठी करायचंय ?  "

 

ओम " हो .. हा विचार खूप चांगला आहे ? तू खरंच काहीतरी कर .. ज्यात तुला आनंद वाटेल ते कर .. "

 

प्राजक्ता " तेच तर ना .. काय करू ते कळत नाही ना ?" मग हे असे होते "

 

ओम " काही करायची गरज नाहीये ? मला सांग तुला काय कमी कामं असतात का ? बाहेर जाणाऱ्या ला वाटतं कि हे घरात आरामात असतात पण घरातली गृहिणीला दिवसभराचे काम असते याची मला चांगलीच  जाणीव आहे  "

 

प्राजक्ता " पण मला खूप अपराध्या सारखे वाटतं ? असे वाटतं कि मी तुझ्यावर अन्न पाण्यासाठी सुद्धा डिपेंड आहे .. निदान माझ्या माझ्या पोटा  पुरते तरी मी कमवले पाहिजेत "

 

ओम चा स्वरच बदलला " काय बोलतेस तू ?.. असे वाटूच कसे शकते तुला ?  हे जे आहे ते सगळे आपल्या सगळ्यांचे आहे ना ?मग असा विचार येतोच कसा तुझ्या डोक्यात ?"

 

प्राजक्ता " अरे .. म्हणजे तू राग नको मानुस .. मला कोणताही निर्णय घेताना खूप विचित्र वाटते असे वाटते कि .. हे पैसे खर्च करायचा  मला अधिकार नाही ? कारण  मला माहित नाही "

 

ओम " मूर्खच आहेस ? तरी बरं कपाटाच्या  आणि घराच्या चाव्या तुझ्याकडे असतात .. उलट मला लागले तर मी तुझ्याकडून पैसे मागून घेतो ? हो कि नाही ?"

 

प्राजक्ता " हो पण ते पैसे तुझेच असतात .. तू केव्हाही आणि कसेही खर्च करायचा तुला अधिकार आहेच ना  ?"

 

ओम " अग .. मग तुला नाहीये असे तुला कोण म्हणाले ? " हे काय नवीन खूळ  तुझ्या डोक्यात शिरलंय .. मला काही कळत नाही "

 

प्राजक्ता " जाऊदे .. तू दमला असशील आपण उद्या  बोलू?"

 

ओम " हे बघ प्राजक्ता ? तुला मी फक्त नोकरी करू नकोस असे म्हटलंय ? बाकी तुझ्यावर कोणता कधीही अधिकार गाजवलंय का ? तुच सांग ?"

प्राजक्ता " हो .. रे .. तुझ्या बद्दल मला काहीच तक्रार नाहीये .. मला प्रश्न माझ्या अस्तित्वाचा वाटतोय ? या सगळ्यात मी कुठे तरी हरवतेय कि काय असे मला वाटतंय ? मला रात्र रात्र झोप येत नाही .. माझा  श्वास  गुदमरायला लागतो .. मी काय करू "

ओम " अग .. काय बोलतेस तू ? तू तर आपल्या घराचा कणा आहेस ? तू आहेस म्हणून आमच्या सर्वांचे अस्तित्व आहे . आणि तू काय असा विचार करतेस ?"

प्राजक्ता " हो ते सगळे मान्य आहे मला . पण माणूस म्हणून मी वेगळी आहेच ना ?तुला कळतंय का मी काय म्हणतेय ओम तू प्लिज गैर समज नको करुस ? मला कोणी विचारले कि तुम्ही काय करता तर मला मी एक गृहिणी आहे हे सांगायला लाज वाटते ?" फक्त एक गृहिणी हीच एवढीच माझी ओळख राहिली आहे आता.. मला माझं असे स्वतःच वेगळे अस्तित्व असावे असे वाटतं . जसा तुझी बायको म्हणून मी मिरवते तेव्हा मला आनंद होतो ना तसाच  मी गृहिणी  म्हणून मिरवायला मला आनंद नाही होत .. उलट असे वाटते कि तुला माझी लाज वाटेल का ? बाकीच्यांच्या बायका जश्या नोकऱ्या करतात .. स्वतःला अपडेट ठेवतात .. तशी मी नाही होऊ शकत .. थोड्या दिवसन्नी तर आपल्या मुलांना पण माझी  लाज वाटेल कि काय असे मला वाटते .. आणि प्राजक्ता च्या डोळ्यातून बोलता बोलता तिचे अश्रू बाहेर पडू लागले "

 

ओम "अग .. प्राजक्ता .. काय बोलतेस काय ? तुझ्या मनात हे असले सगळे विचार आहेत याची मला जरा सुद्धा कल्पना पण नाही .. काय हे .. मला तुझी का लाज वाटेल ? उलट मला तुझा गर्व आहे "

 

प्राजक्ता " नाही .. तुला असे वाटतं .. पण प्रत्यक्षात ते तसे नाहीये .. तुझ्या डोळ्यात मला तसा कधी वाटलेच नाही ?"

 

ओम " प्राजक्ता .. तुझी काहीतरी खूप मोठी गफलत झालीय .. तू आता फारच निगेटिव्ह विचार करत आहेस "

 

प्राजक्ता " नाही .. ओम तू  ला नाही कळणार माझ्या भावना .. जाऊ दे तू झोप"

 

ओम " झोप .. अग .. तू मला एक धक्का दिला आहेस .. तू काय काय विचार करतेस. माझ्या बद्दल पण मनात काय काय आहे  हे ऐकून मी शॉकच झालोय "

 

प्राजक्ता " अरे .. तू म्हणतोस मला तुझा गर्व आहे .. अरे साधे ऑफिस ला जाताना तुला माझ्याकडे बघून बाय म्हणावेसे वाटत नाही .. तुझ्या आवडीचे काही केले तरी ते तुझ्या लक्षात पण येत नाही .. मी किचन मधले काम उरकून बेडरूम मध्ये येई पर्यंत मला निदान गुड नाईट म्हणे पर्यंत सुद्धा तू थांबत नाहीस .. खुशाल झोपून जातोस आणि मला म्हणतोस कि मला तुझा गर्व आहे ? कशाला खोटं बोलतोस ? निदान माझ्याशी तरी बोलू नकोस ?"

ओम च्या ध्यानी मनी पण नाही कि प्राजक्ता या त्रासात असेल . दहा वर्ष लग्नाला झाल्यामुळे .. किंवा दोन मुलांचा बाबा झाल्यामुळे म्हणा प्राजक्ताला लागणाऱ्या सगळ्या सुख वस्तू दिल्यामुळे तिच्या नाजूक मनाला नक्की काय हवंय हे मात्र त्याला कळले नाही किंवा  जाणवले नाही .. किंवा आपण काही चुकतोय असेहि  त्याच्या गावी नाही ..

आजचे प्राजक्ताचे बोलणे ऐकून त्याच्या पाया  खालची जमीन सरकली होती .. आत्ता या क्षणी प्राजक्ताचे सांत्वन करण्याची ताकद पण त्याच्यात राहिली नव्हती .

त्याने त्याचा  लॅपटॉप बंद केला आणि लाईट बंद करून बेड वर पडला .. पण आज त्याला झोप येईना .. पंख्याच्या बारीक आवाजाची करकर पण त्याला आज त्रासदायक वाटू लागली .. आपल्या शेजारी रोज झोपणारी प्राजक्ता आज त्याला अपरिचित वाटू लागली .. किंबहुना स्वतः एक अपराधी असल्या सारखे वाटू लागले ..

साधारण वयाच्या चाळीशीत आल्यावर पुरुषांना पण वेगळी टेन्शन असतात . घराचे हप्ते असतात , मुलांच्या शिक्षणाचे प्लॅनींग करायचे असते .. रिटायरमेंट ची सोय करायची असते .. ऑफिस मध्ये पण एखादी मोठी जवाबदारी आलेली असते .. आणि या सगळ्यात त्यांच्या मागे त्यांची बायको जर खंबीर उभी राहून घर सांभाळत असली ..कि त्यांना पण त्यांच्या मुलांची ,त्यांच्या संसाराची चिंता नसते तसाच काहीसा ओम घराच्या बाबतीत रिलॅक्स होता .

 

प्राजक्ता अतिशय उत्तम रित्या त्याचे घर सांभाळत होती .. त्याला काहीच बघावे लागत नव्हते .. मुलांच्या अभ्यास , शाळेतल्या मिटींग्स , आईचे औषध पाणी , भाजी पाला , वाणी सामान यातील कोणत्याच कामाकडे तो बघत नव्हता .. आज तो स्वतः प्राजक्तावर किती अवलंबून होता हे त्यालाच माहित होते .. सकाळी  उठल्यावर अंगात कोणते कपडे घालायचे हे  सुद्धा तो बघत नव्हता .. काही पण लागले कि " प्राजक्ता .. रुमाल कुठाय म्हटले कि दुसऱ्या मिनिटाला रुमाल हातात हजर मिळतोय .

 

आणि आज तीच प्राजक्ता मनातून किती अस्वस्थ आहे ? तिला हे आपले घर स्वतःचे वाटत नाही ? तिला हे सगळे परकं वाटावे ?

 

रात्री झोपताना श्वास गुदमरतो म्हणजे काय होते ते आज त्याला कळले होते ..

 

ओम उठला पाणी पियुन आला आणि त्याने लाईट्स लावले

 

प्राजक्ता तरी कुठे झोपली होती फक्त आज तिच्या तोंडातून तिच्या मनातले निखारे जिभेवर आले होते .. आणि आता त्याचे परिणाम भयंकर होण्याची शक्यता होती .. काही वेळेला सत्य पचवण्याची ताकद पुरुषांमध्ये नसते .. ओम ने  प्राजक्ताला उठवले .. " उठ मला तुझ्याशी बोलायचंय "

 

प्राजक्ता " नाही .. नको .. सॉरी तुला मी त्रास दिलाय आज .. पण आज चुकून गेलेच माझ्या तोंडून .. तू झोप .. तुला आधीच ऑफिस च्या कामाचं  टेन्शन असेल आणि मी माझे आपले काहीतरीच .. तरी आई मला नेहमी म्हणायची .. तुला सुख दुखतंय का ?उगाच नको नको तो विचार  करत बसतेस .. तू हा असला  विषय ओम बरोबर बोलू सुद्धा नकोस .."

 

ओम " अरे .. बोलू कसे नकोस .. हे उलट तू आधीच बोलयाला  पाहिजे होतस .. तुझ्या मनात हे असले द्वंद्वं चालू आहे याची खरच  मला जरा सुद्धा कल्पना नव्हती .. सॉरी जरा माझेच चुकलेच  .. मी तुला बहुदा जास्तच गृहीत धरले "

 

प्राजक्ता " नाही रे .. तू प्लिज चुकीचा अर्थ नको काढूस .. मला तुझ्या बद्दल काहीच तक्रार नाहीये .. मला माझ्या बद्दल तक्रार आहे .. मी स्वतः वर खुश नाहीये .. तू तुला बोल नको लावूस ..उलट तू एकटा  किती करतोयस आमच्या साठी  "

 

ओम " ठीक आहे .. आता आपण तुझ्या साठी विचार करू ? तू टेन्शन नको घेऊस .. तू मला थोडा वेळ देशील का ? माझ्या लक्षात येतंय हळू हळू .. मला थोडा वेळ दे .. मी सगळे ठीक करतो .. "

 

प्राजक्ता " मी कोण वेळ देणार .. मी तर २४ तास रिकामटेकडीच बसलेली असते .. माझ्या कडे कसली वेळ मागतोयस ?"

 

ओम " अरे .. तू असे का बोलतेस .. मला खूप त्रास होतोय तुझ्या या अशा बोलण्याचा ?"

 

प्राजक्ता " पण हे आहे  ते सत्यच आहे ना आणि ते मी आता स्वीकारलं  आहे "

 

ओम ने तिला एक घट्ट मिठी मारली " सॉरी .. यार चुकले माझे .. या सगळ्या गडबडीत तुझ्याकडे माझे दुर्लक्ष झाले "

प्राजक्ता  ला त्याच्या ह्या मिठी ची पण सवय राहिली नव्हती .. ती त्याच्या मिठी तुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली .