A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session0ed22047967e0928a379305b4721314cf69e46deda35f23b3739c73caa1cde1c31dabb8a): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

shubharambh bhag 2
Oct 29, 2020
स्पर्धा

शुभारंभ भाग २

Read Later
शुभारंभ भाग २

 

 

शुभारंभ भाग २

आज प्राजक्ता ची किटी  पार्टी होती . तर प्राजक्ताने मुलांचा नाश्ता तयार करून ठेवला आणि मुलांना घरी सोडून खालच्या खाली  ती किटी पार्टी ला गेली . दोघे मुलं घरी आले आणि मग सासूबाईंनी त्यांना खायला दिले आणि त्यांच्या  त्या झोपायाला  गेल्या .

 

मैत्रीणीमंध्ये  पण हेच डिस्कस होयचे  कि "आपण काही तरी करायला पाहिजे .. मग कोण म्हणायचे आपण केक शिकायाला जाऊ ? कोण म्हणायचे आपण काहीतरी बिसिनेस करू ?कोण म्हणायचे आपण क्लास ला जाऊ ? पण नक्की करायचं काय हे कोणालाही कळत नव्हते.

 

तेवढ्यात नीलिमा नावाची एक मैत्रीण एक बिझ नेस प्लॅन घेऊन आली . सुरवातीला फक्त ५०००/- रुपये भरायचे आणि त्या बदल्यात आपल्याला खूप सारे प्रॉडक्ट्स पण मिळतील ..  मग आपल्या  ओळखीच्या लोकांना प्रॉडक्ट्स  विकू शकतो किंवा त्यांच्याकडून ५०००/-  घेऊन आपल्या खाली जॉईन करता येईल .  बिझनेस  ला लागणारी सगळी मदत ती आणि तिची टीम लीडर स्वतः करेल . म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही .

 

प्राजक्ता ला त्या कंपनीचे प्रॉडक्ट्स खूप आवडायचे . तिला वाटले नाहीतर मी हिच्या कडून दर महिन्याला प्रॉडक्ट्स घेतेच ना त्यापेक्षा मी एकदाच ५०००/- भरले तर मला पाहिजे ते प्रॉडक्ट्स ते हि स्वस्तात मला मिळतील .  जमलं तर बिझनेस पण होईल .. म्हणजे माझे असे स्वतःचे स्थान निर्माण होईल .

 

प्राजक्ताला मनापासून ते पटले होते . तिने नीलिमा ला सांगितले कि मी माझ्या घरी डिस्कस करते आणि मग तुला कळवते

 

नीलिमा " हो  चालेल ..पण लवकर सांग .. या महिन्यात जर जॉईन झालीस तरच हे प्रॉडक्ट्स फ्री मिळतील . पुढल्या  महिन्यात ह्या ५०००/- रुपयात काहीही मिळणार नाही . या महिन्यातली हि खास ऑफर आहे म्हणूनच मी तुला सांगितले आणि हो ..उद्या जर तू फ्री असशील तर मी माझ्या टीम लीडर ची आणि तुझी भेट घालून देईन ती तुला माझ्या पेक्षा छान माहिती सांगेल ..अग ती खुप  चांगली आहे आणि मदत पण करते .. माझंच बघ ना .. मला तर धड बोलत आपण येत नव्हते तिनेच मला ट्रेन पण केले”

 

प्राजक्ता "हो चालेल .. मी या मंथ एन्ड च्या आधी सांगेन "

 

त्याच विचारात प्राजक्ता घरी आली . पटापट तिने ओम च्या आवडीचा स्वयंपाक केला . जेवला कि झोपायच्या आधी त्याच्याशी या विषयावर तिला बोलायचे होते .

घरात तिच्याजवळच पैसे असायचे  पण तिने कधी असा पुढच्या पुढे एवढ्या पैशांचा निर्णय घेतला नाही . जे काही करेल ते ओम ला विचारूनच करायची .

नेहमीच्या वेळेत ओम आला . प्राजक्ताने गरम  तवा ठेवला आणि पोळ्या करू लागली . पोळी करता  करता  लगेच ताट घेतली .. जशा पोळ्या होतील तशी एकेकाचे ताट वाढून दिले . हळू हळू सगळे जेवायला बसले .. आज किचन आवरायचे तसेच ठेवले आणि आधी बेडरूम मध्ये गेली . ओम झोपायच्या आधी तिला त्याच्याशी बोलायचे होते .

 

तिला लवकर बेडरूम मध्ये आलेली बघितल्यावरच

 

ओम " आज झाले पण काम "

 

प्राजक्ता " नाही .. आज कंटाळा आलाय .. तर मी नंतर करेन किंवा उदया  सकाळी आवारेन .. रोज रोज तेच तेच करून मला कंटाळा येतो "

 

ओम " ठीक आहे .. तुला पाहिजे तेव्हा कर "

 

प्राजक्ता "  ऐक ना ओम .. मला थोडे बोलायचंय "

 

ओम " नोकरी हा विषय सोडून काहीही बोल . नोकरी वर आपण खूपदा बोललोय .. सध्या तरी  जमणार नाही "

 

प्राजक्ता " नोकरी चे नाही रे .. मला माहितेय सध्या आपल्याला ते मॅनेज होणार नाहीये "

 

ओम " बोल मग "

 

प्राजक्ता " मी काय म्हणतेय .. नोकरी नाही तर मी छोटासा कोणता तरी बिझनेस चालू करू का ?.. आज आमची  कीटी  पार्टी होती ना तिकडे ती माझी मैत्रीण नीलिमा मला भेटली होती .. ती पण करतेय तो बिझनेस "

 

ओम " माहितेय मला .. ते प्रॉडक्ट्स त्या कंपनीचे घ्यायचे आणि विकायचे आणि आपल्या खाली मेंबर्स वाढवायचे .. तेच ना "

 

प्राजक्ता" हो .. तुला माहितेय हे बरेच झाले "

 

ओम "नको .. तसले काही नको "

प्राजक्ता चा स्वर बदलला " अरे .. का ? मला करायचंय ते ? मी घरात बसून कंटाळले आहे .. मला  काहीतरी करायचेय "

 

ओम " अग .. काहीही फायदा नसतो त्यात ..आणि आपले सगळे फॅमिली रिलेशन आणि फ्रेंड्स रिलेशन खराब होतात "

 

प्राजक्ता " खराब कसे होतील? काही पण बोलतोस ? तुला ना मला काहीच करून द्यायचं नाहीये  "

 

ओम " उगाच काही पण आरोप करू नकोस . मी सांगतो ते एकदम बरोबर आहे ..उगाच काहीतरी कारण काढून भांडण उकरून नको काढूस "

 

प्राजक्ता " मला काही माहित नाहीये मी उद्या त्यात पैसे गुंतवणार आहे .. बिझनेस नाही केला तर मला प्रॉडक्ट्स लागतातच . नुसतेच प्रॉडक्ट्स घ्यायचे  ते मी  तिला जॉईन होईन.. बाकी कुणाला सांगणार पण नाही .. स्पेशली तुझ्या नातेवाईकांना तर मुळीच  सांगणार नाही "

 

ओम " झाले आलीस लगेच तुझ्या माझ्यावर ?"

 

प्राजक्ता " हो मग तुला तीच भीती आहे ना ... तुझ्या लोकांना मी सांगेन आणि मग तुझे नाक खाली येईल "

 

ओम " प्राजक्ता .. तुला कळत नाहीये का मी काय बोलतोय ? उगाच काही पण बोलत सुटलीस ?"

 

सासूबाई " ओम .. काय रे .. काय झालय ?"

 

ओम " काही नाही ग .. तू झोप "

 

प्राजक्ता रागा रागाने च बेड वर जाऊन झोपली आणि लाईट्स ऑफ केले .

ओम ने लाईट लावली आणि कपाटातले ५०००/- रुपये काढले आणि तिच्या हातात दिले ..

ओम " हे घे .. कपाटाची चावी तर तुझ्याकडेच असते ना .. जर तुझा निर्णय झालाच आहे तर मला विचारायची तसदी तरी कशाला घेतेस  .. मला काय हे पटलेले नाहीये पण तुला पाहिजे तर तू कर .. या पुढे मी काही बोलत नाही "

 

प्राजक्ता ने पण पैसे घेतले आणि बेड च्या शेजारी असलेल्या साईड टेबल च्या ड्रॉवर मध्ये ठेवले .

 

ओम ने लाईट ऑफ केली आणि झोपून गेला .

 

पुन्हा सकाळी उठल्यावर प्राजक्ताचे रुटीन असे  सुरू झाले जसे कि कला काहीच झाले नाही .. उलट रात्री  सगळे काम तसेच ठेवल्यामुळे अर्धा तास तिला लवकर उठावे लागले  .

 

झाले मुले शाळेत गेली . रेखा काम करून गेली आणि आता ओम कामावर निघालाच होता .

 

ओम ने रात्रीचा राग वैगरे डोक्यात ठेवून असे काही नाही . आता दहा वर्षांचा संसार झालाय म्हटल्यावर एवढ्या तेवढ्या वादावादीची थोडीफार सवय झालेलीच असते . नुसते गोड गोड  काय . थोडासा  भांडणाचा तडका लागला कि चव वाढते नाही का ?

 

ओम गेल्या गेल्या तिने नीलिमा ला फोन केला

 

प्राजक्ता " हाय .. नीलिमा .. मी माझे घरातले आवरून थोड्याच वेळात फ्री होईन . तू आणि तुझी ती टीम लीडर मला भेटू शकता का ? मला थोडा डिटेल मध्ये बिझनेस प्लॅन ऐकायला आवडेल .. तुला पहिजे तर अजून कोणा कोणाला बोलवायचे असेल तर आपण कुठे तरी भेटू .. माझी मुले घरी येई पर्यंत मी फ्री च आहे "

 

नीलिमा " ठीक आहे , मग अर्ध्या तासात आपण भेटू .. तू माझ्या घरी ये "

सासूबाईंनी हा कॉल ऐकला

सासूबाई " काय ग ? काय गडबड चाललीय तुझी ?  रात्री पण तुमचे काहीतरी चालू होत?"

 

प्राजक्ता " नाही .. काहीच नाही .. जरा मैत्रिणींकडे जाऊन येते "

सासूबाई " नसेल सांगायचं तर नको सांगुस . पण एक सांगून ठेवते .. जे चालू आहे त्यात काही बदल करू नकोस ? आपल्याला काही तुझ्या कमवलेल्या पैशांची गरज नाहीये  ? आमच्या घरात कोणी आतापर्यंत सुनांनी नोकरी केलेली नाही . "

 

प्राजक्ता " हो .. नोकरी नाही पण मला माझ्यासाठी काही तरी करायचंय ? तुम्ही घेऊ नका माझे पैसे .. मी माझे माझे खर्च करेन?"

सासूबाई " तू ला आता माझा राग येत  असेल  पण थोडा शांत डोक्याने ओम काय म्हणणं  त्यावर विचार कर .. उगाच त्याच्या  मना  विरुद्ध जाऊन काही बाही करू नकोस आणि घराची शांती घालवू नकोस . "

 

प्राजक्ता " तुमच्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी  होतील हे मी नक्की बघेन "

 

सासूबाई " श्री राम जय राम जय जय राम " आणि माळ ओढू लागल्या .

 

आज काही हिच्या जवळ बोलण्यात अर्थच नाही हे त्यांच्या लक्षात आले . तिने लगेच दुपारचे जेवण बनवले आणि मुलांसाठी त्यांच्या आवडीचा खाऊ बनवून ठेवला आणि पटपट आवरून नीलिमा कडे जायला निघाली .

 

तेवढ्यात तिला तिच्या एका जुन्या मैत्रिणीचा फोन आला .. हि मैत्रीण इतकी जुनी  होती  तरीपण काहीच कॉन्टॅक्ट मध्ये नव्हती . आज जवळ जवळ ६ वर्षांनी तिचा कॉल अचानक आला होता

तिकडून तिची मैत्रीण राजू

राजू " हाय .. प्राजक्ता? कशी आहेस ?"

प्राजक्ता " ए हाय ? किती वर्षांनी ? तू कशी आहेस ? हल्ली कुणीकडे असतेस ?"

राजू " अग , मी अमुक अमुक एका ठिकाणी काम करते .. तुझी आई काय म्हणतेय ? आणि मुलगी आता मोठी झाली असेल ना ?"

प्राजक्ता " हो ग आता  ती सातवीत आहे .. आणि मुलगा ३रीत आहे "

राजू " ऐक ना .. मला तुला एका बिझनेस बद्दल सांगायचे होते .. तुला वेळ आहे का ?"

प्राजक्ताला बिझनेस चा विषय ऐकल्यावर तिचा मूडच गेला . तिला वाटले कि हिने माझी चौकशी करायला फोन केला पण हिला माझ्याकडे काहीतरी काम आहे म्हणून हिने खास शोधून मला कॅल केलाय .

प्राजक्ता " तू एक काम कर सगळे डिटेल्स मला व्हाट्स अँप  ला पाठव मी जरा सावकाश वाचून काढेन आणि मग तुला सांगते "

 

राजू " ठीक आहे .. मी लगेच डिटेल्स तुला पाठवते .. तरी पण मला एकदा भेट मी अजून जास्त समजावू शकेन .. फक्त एकदा ऐकून घे .. नाही आवडले तर नको करुस "

 

प्राजक्ता " हो .. सध्या मला बाहेर जायचंय .. तू आता मला पाठवून ठेव .. मी आरामात वाचून काढेन "

राजू " ठीक आहे "

 

हा फोन  ठेवल्यावर प्राजक्ता तयार झाली . साईड टेबल मधले पैसे ती पर्स मध्ये भरणारच होती आणि निघणारच होती .. तर तिला अचानक  रडायलाच येऊ लागले .  तिच्या लक्षात आले  कि काल ओम काय म्हणत होता .. आज जसे राजू ने कॉल केला तसाच मी पण सर्वांना शोधून शोधून कॉल करणार आणि माझा बिझनेस प्लॅन सांगणार आणि मग मला कसा राजूचा राग आला तसाच लोक माझा पण राग राग करणार .. त्यांना वाटणार हिला काम होते म्हणूनच हिने कॉल केला .. आणि आहे ते रिलेशन पण खराब होणार .. त्यापेक्षा हे सगळे न केलेलेच बरे .. आणि बाहेर जायला छान तयार  होऊनही ती बेड वर आडवी पडून राहिली .

थोड्या वेळात नीलिमा ला तिने सांगून टाकले " माझ्या घरी अचानक पाहुणे आलेत तर मी येत नाहीये "