Oct 23, 2020
स्पर्धा

शुभारंभ भाग १२

Read Later
शुभारंभ भाग १२

 

शुभारंभ भाग १२

 

क्रमश: भाग ११

 

मग तिकडेच फोटोज  काढण्यात आले आणि हे दोघे खूप आनंदात घरी निघाले  . आता प्राजक्ताला खूप छान वाटत होते .. आपण खरोखर काहीतरी छान केलय असे तिला जाणवू लागले आणि त्याची लाली  तिच्या चेहऱ्यावर दिसू लागली . ओम पण कायच्या काय खुश झाला होता .. त्याच्या प्रत्येक हालचालीकडे बघूनच  ते दिसत होते ..

 

ओम " सही यार प्राजक्ता .. तू ग्रेट आहेस .. तुला वाटत नाही पण एका रात्रीत एका पेंटिंग ला इतके लाईक्स मिळणे हि सोप्पी गोष्ट नाहीये .. तू आता जरा थोडी सिरिअस होऊन तुया या कलेकडे लक्ष दे .. खरं तर तू आधीच द्यायला पाहिजे होतेस .. इनफॅक्ट माझेच चुकले मी तुला हे आधीचीच करायला सांगायला पाहिजे होते .. युअर फ्युचर इज ब्राईट ..

 

प्राजक्ता " तुला सांगू ओम .. सारंगधर सर पण मला हेच वाक्य बोलायचे .."

 

ओम " मग .. तू का सोडले होतेस .. नुसती स्वप्न बघून उपयोग नसतो ग .. ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी परिश्रम घ्यावे  लागतात .हे असे मधेच सोडून कसे चालेल .  हळू हळू आपले प्रयत्न चालूच ठेवावे लागतात . हे काम तू आधीपण करू शकली असतीस ... आता नुसता काहीतरी करायचं असा नुसता विचार करत बसू नकोस .. काय करायचंय ? कशा प्रकारे करायचंय ? प्रोफेशनली करायचंय का नुसता विरंगुळा म्हणून करायचंय हे असे अनेक प्रश्नाची उत्तर तू शोधून काढ ओम पण आता मागे नको हटूस .. इट्स नेव्हर टू लेट  "

 

प्राजक्ता " मी या कडे कला म्हणूनच बघणार आहे .. प्रोफेशनली बघितले कि त्यातली मजा जाते निघून .. मला पैसे कमावण्यापेक्षा मी तुझी बायको आहे  हे सांगताना मला लगेच लोकांचा पुढचा प्रश्न येतो कि " तुम्ही काय करता ?" या प्रश्नाचे उत्तर मी शोधतेय .. कारण मी तुझी बायको आहे ह्यावर संभाषण कधीच थांबत नाही . आणि जेव्हा हा प्रश्न विचारणारी एक स्त्री असते तेव्हा मला कळतं कि हि सुद्धा  स्त्री आहे ती मी जे काम घरात २४ तास करते ते करून ती त्या पेक्षा काहीतरी वेगळे करते आणि मग मला माझे मन खाते कि मी जे करते ते जरी महत्वाचे असले तरी यापेक्षा मी काहीतरी नक्कीच करू शकते ज्याने  माझी समाजातली value वाढू शकते ... आणि त्या बरोबर तुलाही माझा अभिमान वाटेल "

 

ओम  हे सगळे ऐकून नुसताच हसला

 

प्राजक्ता " का रे ? का  हसलास ? "

 

ओम "तुला दम लागत नाही का ग इतके मोठे मोठे बोलताना .. आणि पुन्हा हसू लागतो .. " अरे जस्ट एन्जॉय धिस मोमेंट .. तू काय काय कसला विचार करतेस ... आणि का ?"

 

प्राजक्ता " मी पैसे कमावणार .. मग मला अभिमान येणार कि मी सुद्धा आता कमावते .. मग मी माझा प्रत्येक गोष्टीत माझा एक वेगळा विचार मांडणार आणि चक्र वाढत जाणार "

 

ओम " तू का  अशी झालीस .. अभिमान , स्वतंत्र , अस्तित्व या असल्या विचारात का फ़सतेस ?खरं  सांगू .. मी आत्ता हि सांगतो .. तू कोणतीही गोष्ट माझा अभिमान वाढवण्यासाठी करायाची गरज  नाहीये .. तू आहेस तशी माझ्या बरोबर असलीस ना कि आणि  तू माझी आहेस यातच मला अभिमान आहे .. समाजातली पत म्हणा value या गोष्टी आपल्या दोघांच्या नात्यावर काहीच बदल घडवून आणणार नाहीयेत .. कळतंय का मी काय  म्हणतोय ते ?"

 

प्राजक्ता " आता मी तुला एक उदाहरण सांगते .. आपल्या प्रिया चा शाळेत वर्गात नेहमी १ ला नंबर येतो .. आता आपल्याला आपण प्रियाचे आई बाबा आहोत कि जिचा पहिला नंबर आलाय त्यामुळे शाळेत मिटिंग ला गेल्यावर प्रिन्सिपल मॅम चा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो कि नाही . आता  त्यांच्या समोर  सगळेच विदयार्थी आहेत पण प्रिया इज स्पेशल कारण तिचा पहिला नंबर आलाय .. तसेच बाकीच्यांच्या बायका गृहिणी आहेतच  पण नोकरी करून , व्यवसाय  करून त्यांनी त्यांचे वेगळेपण सिद्ध केलय याचा त्यांच्या नवरा बायकोच्या नात्यावर थोडा तरी फरक पडेलच ना .. समजे mr ओम "

ओम " काय यार प्राजक्ता ... तुला नोकरी करायचीय का? मग म्हणजे तुझ्या जीवाला शांती मिळेल  का? . मी घरात २४ तास कामवाली बाई ठेवतो .. "

प्राजक्ता " म्हणजे ओम तू माझे काम जे  एका कामवाल्या बाईशी कंपेअर करतोस ना .. किंवा मी ते नाही केले तर त्याने तुमचे काही अडणार नाहीये .. तुम्ही लगेच वेगळे ऑप्शन काढू शकता .. हो ना .. हिच सत्यता आहे "

ओम च्या लक्षात आले आपण पटकन बोलता बोलता माती खाल्ली आहे .. " सॉरी मला असे नव्हतं म्हणायचे "

प्राजक्ता " अरे .. हेच तुला म्हणायचेय कारण हेच खरं आहे .. हेच सत्य आहे " माझी रिप्लेसमेंट एक कामवाली बाई होऊ शकते  हेच माझे अस्तित्व  कळलं का ?"

ओम ने गाडी साईड ला घेतली " यार .. प्राजक्ता .. कशाला हा विषय आता काढलास .. आज इतका छान दिवस होता .. तू नको ते विषय काढून स्वतःचा पण मूड  खराब करतेस आणि सॉरी मला तसे नव्हते म्हणायचे .. तुला कळतंय का .. मला तुला खुश बघायचंय आणि तुला माझ्याकडून जेवढी मोकळीक कशी देता येईल या दृष्टीने मी बोललो होतो .. सिरिअसली तू मला शब्दात पकडू नकोस ना .. "

 

प्राजक्ता " हमम.. ठीक आहे .. जे आहे ते आहे च ना .. तू तरी कसा बदलणार आहेस ते "

 

ओम "मी काय करावी अशी तुझी अपेक्षा आहे हेच मला कळत नाहीये .. तू ना मला कन्फ्युज करून टाकले आहेस .. "

प्राजक्ता " ठीक आहे .. आज आपण हा विषय इथेच थांबवू .. कारण घरी सगळे आनंदात असतील .. आणि सॉरी तुझा आनंद पण मी एका क्षणात एकदम घालवून टाकला .. कदाचित मी  जरा जास्त विचार करून करून थकली आहे .. त्याचा परिणाम तुझ्यावर होतो हे मला पण आवडत नाही .. मला तुला आनंद , सुख दयायचे असते आणि आणि त्याच्या  प्रत्यक्षात होते मात्र वेगळेच .. सॉरी "

 

ओम ने रागाने गाडीच्या स्टेअरिंग वर हात आपटला .. " मान्य आहे मी चुकलो , काल पासून मी कितीदा तुला सॉरी बोललो .. आणि मी माझ्यात बदल करतोच आहे ना .. तू का मग तेच तेच घेऊन बसली आहेस .. मी पण माणूसच आहे ना .. चुका होऊ शकतात .. "

 

प्राजक्ता " ठीक आहे .. माझे पण चुकलेच .. कोणता विषय कधी काढायचा हे सुद्धा मला कळायला पाहिजे होते .. हि वेळ हा विषय काढायची नक्कीच नव्हती .. आणि ती दोन्ही कान  धरते आणि त्याच्या कडे बघून सॉरी बोलते "

 

ओम ने पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि दोघे घरी पोहचले  .

 

प्रथमेश आणि प्रिया .. लगेच उड्या  मारत   आईला मिठी मारू लागले .. प्राजक्ता पण मुलांना कवटाळून त्यांना किशी देत होती .. प्रथमेश ने लगेच गिफ्ट हॅम्पर खोलले आणि त्यातली चॉकलेट फस्त करू लागला ..

 

सासूबाई पण " प्राजक्ता .. अभिनंदन .. ओम मग आज  प्राजक्ताचा अभिमान वाटला  कि नाही तुला .. आम्ही नाही रे असा अभिमान वाटण्यासारखे काही करू शकलो .. हा आनंद मी तुझ्या बाबांना नाही देऊ शकले .. अशी बायको मिळायला भाग्य लागते रे बाबा ... "

 हे वाक्य ऐकून ओम ने डोक्याला हात मारला ... म्हणजे हि सल जी प्राजक्ताच्या डोक्यात आहे ती आपल्या आईच्या पण डोक्यात आहे .. बाबा मरून  गेले तरी आतासुद्धा आई च्या तोंडून हे वाक्य निघून गेले . हे वाक्य ओम ला कोणीतरी बाण फेकून मारावा आणि छातीत तो खोलवर रुतावा असे टोचले . त्याने कपडे चेंज केले आणि हातपाय धुवून तो बेड वर शांतपणे विचार करत आडवा पडला .

 

प्राजक्ता ने लगेचच पायावर पाणी घेतलं आणि मस्त गरम गरम आल्याचा चहा केला आणि सगळ्यांना दिला आणि स्वतःचा आणि ओम चा चहा घेऊन बेडरूम मध्ये गेली .

 

ओम " वाह ! मस्त चहा केला आहेस .. एकदम फ्रेश झालो "

 

प्राजक्ता " ओम .. सॉरी हा मगाशी तुला उगाचच वैताग दिला .. सॉरी .. आज खरं तर हा दिवसच माझ्या आयुष्यात तुझ्या मुळे  आलाय . तू ते यु ट्यूब वर चॅनेल काढलेस त्यात माझे पेंटिंग टाकलेस  त्यामुळेच तर माझा असा सत्कार केला.. आणि मी तुला थँक्स  तर नाही म्हणाले उलट काही बाही बोलले .. "

 

ओम " अग तू मुख्य मुद्दा विसरत आहेस .. असे हजारो लोकांचे यु ट्यूब चॅनेल्स असतील पण एक दिवसात एवढे लाईक्स सगळ्यांना नाही मिळत .. म्हणजे ते पेंटिंग एकदम भारी आहे म्हणून तर हा सत्कार झाला "

 

प्राजक्ता " हो पण ते असेच घरत पडून राहिले असते तर कोण कुत्रा विचारणार आहे त्याला "

 

ओम " हमम.. भांडण करायला किंवा वकिली मुद्दा मांडायला माझी बायको एकदम हुशार आहे हे हल्ली हल्ली च मला कळतंय " आणि हसू लागला

 

प्राजक्ता " हो का .. "

 

ओम " मग काय .. आता बघ कशी माझे सगळे मुद्दे खोडून काढतेस "

 

प्राजक्ता " हो का .. हल्ली मी तुला खूप अपोझ करते का ? सॉरी .. "

 

ओम " उगाचच कशाला सॉरी बोलतेस .. मी असेच म्हणालो .. "

 

प्राजक्ता " ठीक आहे .. मग आज काय मेनू करू जेवायला .. "

 

ओम " आज आता तू पण दमली असशील नुसता खिचडी भात  कर.

 

प्राजक्ता " ठीक आहे "

 

प्राजक्ताने लगेच मुलांना अभ्यासाला बसवले .. खिचडीचा कूकर चढवला . मुलांचे जेवण उद्याची तयारी करून बेडरूम मध्ये आली तर ओम मुद्दामून जागा राहिला होता .. झोपेने भरलेले डोळे होते तरी पण मी आधी झोपलेलं हिला आवडत नाही म्हणून बिचारा  डोळे ताणून तिची वाट बघत बसला होता ..

 

प्राजक्ता " अरे .. तू झोपला नाहीस ? किती झोप आलीय तुला कशाला उगाच ताटकळत बसलास .. "

 

ओम " अग ए दोन्ही कडून बोलू नकोस .. एकदा काय ते ठरव .. मी आधी झोपलो तर चालेल ना नाही ते .. उगाच त्या गोष्टी वरून वाद नको "

 

प्राजक्ता ला जाम हसू येऊ लागले ..

 

ओम " अरे हसतेस काय ?"

 

प्राजक्ता " तू पण ना .. झोप आता .. उद्या बोलू आपण "

 

ओम " नको .. मी जागा आहे तर काही बोलायचे असले तर बोल आता .. "

 

प्राजक्ताने लाईट्स ऑफ केले आणि झोप आता .. काही नाही बोलायचं मला .. झोप .. गुड नाईट "

 

तेवढ्यात ओमने  तिला एक कागद दिला.

 

प्राजक्ता " काय आहे हे "

 

ओम " तूच बघ .. मी झोपतो आता .. "

 

प्राजक्ताने लाईट लावला आणि कागद उघडला तर त्यात एक कविता होती

 

 

कधी झिडकारशी मजला

कधी घेशी बाहुपाशा

मला समजत नाही तुझी

हि जगा वेगळी भाषा

 

कधी बोलते गोड  मधाळ

कधी कडुलिंबाचे बोल

मला समजत नाही तुझे

हे सारे गौडबंगाल

 

कधी मिठीत माझ्या रडणे

कधी मिठीत घुसून हसणे

मला समजत नाही तुझे

हे जगावेगळे बहाणे

 

मला मनापासूनी आवडी

तुझ्या या नाना  खोडी

मला समजत नाही तुझी

का लागे मजला ओढी

 

(हि कविता माझी नाही .. मी एका दिवाळी अंकातून घेतली आहे .. फक्त शेवटचे कडवे मी ऍड केले आहे "

 

प्राजक्ता वर लिहलेली हि कविता हा सगळ्यात मोठा सत्कार होता .. आज पुनः एका डोळयांत आनंदाचे अश्रू होते आणि  एका डोळ्यात लज्जामत्क हसू होते .. या वेळेला कसे रिऍक्ट करू हे तिला कळतच नव्हते .. एकदम मोजक्या शब्दात ओम ने तिला सर्व काही सांगितले होते ..

 

ती आनंदाने पटकन ओम शी बोलयाला गेली तर हा मस्त घोरत होता ..मग तिने पण त्याला डिस्टरब  न करता त्याच्या कुशीत हसत हसत शिरली आणि झोपून गेली .  .