A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session0ed22047967e0928a379305b4721314c8c4c39e705b8517ca2471064713c502da25c8f87): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

shubharambh bhag 11
Oct 29, 2020
स्पर्धा

शुभारंभ भाग ११

Read Later
शुभारंभ भाग ११

 

शुभारंभ भाग ११

 

क्रमश : भाग १०

 

आई " काय लाईक्स म्हणजे नक्की काय मिळालंय तिला "

 

ओम" म्हणजे ५००००/- लोकांनी तिचे चित्र पहिले आणि त्यांना ते आवडले . "

 

आई " वाह .. "

 

ओम " काय हे प्राजक्ता तुला आनंद नाही का झाला ?"

 

प्राजक्ता " हो .. झाला ना .. नक्कीच झाला .. तू मला सांगितले पण नाहीस कि तू माझे यु ट्यूब चॅनेल काढलेस ते "

 

ओम " अरे .. कालच काढले आणि नंतर आपला वेळ  कसा गेला  तुला आठवतोय का ?"

 

प्राजक्ता " बरं .. बरं .. पण घरी का आलास ?"

 

ओम " अरे .. तुम्ही लोक मोबाईल का जवळ ठेवत नाही .. शेवटी मला घरी यावे लागले "

 

प्राजक्ता " अरे सॉरी ... मी किचन मध्ये होते आवाज नाही आला "

 

ओम " अग .. आज मला त्या रेडिओ चॅनेल चा फोन आला होता . त्या RJ रश्मी चा संध्याकळी ५ वाजता शो असतो त्याचे नाव आहे " वन नाईट स्टार " त्यात त्यांनी तुझे नाव सिलेक्ट केलेय . तर आज संध्याकाळी त्या शो ची गेस्ट तू आहेस .. चल आवर लवकर आपल्याला तिकडे जायलाच दीड  तास लागणार आहे .. "

 

प्राजक्ता " बापरे .. नको .. मी काय बोलणार तिकडे ... माझी काहीच तयारी नाहीये .. नको नको .. तु सांगून टाक त्यांना आम्ही नाही येत म्हणून "

 

ओम " काय ? वेडी झालीस का ? अरे हि चांगली संधी आहे .. अक्खा शहरातले लोक रेडिओ ऐकत असतात "

 

सासूबाई " अग .. नाही कशाला म्हणतेस ? जा आवरून .. ओम मला पण रेडिओ लावून दे रे .. मी ऐकेन इकडून "

 

ओम " हो चालेल .. "

 

प्राजक्ताचे हात पाय थंडच पडले .. काहीतरी  करायचंय पण जेव्हा घरातून बाहेर पडायची वेळ आली तेव्हा घाबरली .. "

 

ओम " काय यार .. काय अशी तू .. जा  आवरायला घे ना पटकन .. "

 

प्राजक्ता " अरे .. मुलांना आणायचेय .. त्यांचा नाश्ता बनवायचाय "

 

ओम " मुलांना मी आणतो .. आज  एक दिवस मुलं पोळी भाजी खातील .. तू तयार  हो .. "

 

ओम ने लिटरली किचन मधून बाहेर काढली आणि आवरायला पाठवली . प्राजक्ताला आनंद तर झाला होता  पण त्या आनंदापेक्षा मनात तिकडे आपण काय बोलणार ? तिच्या प्रश्नांची उत्तर मला देता यातील का ? तिने सगळा  इंटरव्यूह इंग्लिश मध्ये घेतला तर .. म्हणजे आता माझा गॅप खूप आहे मला एखादा शब्द आठवला नाही तर .. उलट पोपट नको होयला .. ती आत जाऊन कोणती साडी घालू  या विचारात कपाट  ओपन करून  बसली .

 

ओम " अग .. काय बसून राहिलीस नुसती ? वेळ फार कमी आहे  स्टुडिओ  खूप लांब आहे "

 

प्राजक्ता " ओम .. हे सगळे मला जमेल का ? मला टेन्शन आलंय .. मी काही चुकीचे बोलले तर "

 

ओम " अग  तो काय पोलिटिकल इंटरव्यूह आहे का ? तुझी कला तू कुठे जोपासलीस ? तुझे गुरु कोण असे प्रश्न विचारणार ते .. "

 

प्राजक्ताने एक पैठणी काढली घालायला .. हि घालू का ? ."

 

ओम " हो चालेल .. तुला पाहिजे ती घाल .. "

 

प्राजक्ता  " तू थांबशील ना  माझ्या बरोबर तिकडे बाजूला "

 

ओम " हो .. मी  तिकडेच असेंन ना .. तू आवर ... बाकीच्या गोष्टी  आपण गाडीत  बोलू  .. मी तोपर्यंत मुलांना घेऊन येतो" आणि तो निघून गेला ..

 

ओम घरी येई पर्यंत प्राजक्ता छान पैठणी घालून  तयार झाली .. मोठे मंगळसूत्र घातले .. सोन्याच्या बांगड्या घातल्या जशी काय लग्नाला जायचंय अशी तयार झाली ..

 

ओम मुलांना घेऊन घरी आला .. तर तिला बघून वैतागलाच " अरे काय आपण लग्नाला जातोय  का ?"

 

शेवटी त्याने तिला सिंगल पदर घ्यायला  लावला .. केस मोकळे सोडायला लावले .. आणि बांगड्या काढून एका हातात घड्याळ घाल आणि एका हातात एकच बांगडी घाल असे सांगितले आणि मॅचिंग खोटे पण मोठे झुमके घालायला सांगितले आणि प्राजक्ता तयार ..

 

ओम ने पण ऑफिस चे कपडे चेंज केले आणि ते दोघे घरातून बाहेर पडले .. जाता जाता प्राजक्ता देवाच्या आणि सासूबाईंच्या पाया पडली .. मुलांना खायला वाढून  .प्रियाला  मोबाईल वर रेडिओ कसा लावायचा ते सांगितले आणि दोघे बाहेर पडले . ओम च्या चेहऱ्यावर खूप आनंद होता .. त्याने सोसायटी मधल्या ग्रुप वर मेसेज पाठवला कि आजप्राजक्ताचा लाईव्ह इंटरव्यूह रेडिओ वर ऐका "

 

प्राजक्ताची मात्र भीतीने गाळण उडाली होती .. ती नर्व्हस झाली होती ..

 

झाले तिकडे पोहचले .. प्राजक्ताला RJ  रश्मी  स्वतः भेटायला पुढे आली .. तिच्याशी आधी नॉर्मल  गप्पा झाल्या .. तिने दोघांना कॉफी ऑफर केली .. प्राजक्ताचे  पण आधी  तिच्याशी  गप्पा झाल्यामुळे थोडे टेन्शन कमी झाले..

 

थोड्याच वेळात RJ रश्मी चा लिव्ह  शो  रेडिओ वर चालू झाला ..

 

RJ रश्मी " नमस्कार .. शुभ संध्याकाळ माझ्या सर्व लिस्टनरस ला .. कसे आहेत ? एन्जॉय द शो विथ आर जे रश्मी .. आज आपल्या स्टुडिओ मध्ये माझ्या बरोबर एक स्पेशल कपल गेस्ट आहे .. Mr .अँड Mrs . ओम अँड प्राजक्ता .. हाय ओम .. हाय प्राजक्ता .. वेलकम टू  माय शो .. तर मित्रानो आणि मैत्रिणी नो मी तुम्हला प्राजक्ताची ओळख करून देते .. प्राजक्ता माझ्या समोर बसली आहे .. अतिशय मनमिळावू , साधी , सिम्पल आणि सुंदर अशी हि प्राजक्ता आर्टिस्ट आहे .. ती चे स्वतःचे प्राजक्ताज यु ट्यूब चॅनेल आहे .. आणि ती आर्टिस्टिक पेंटीग्स करते .. .. हा तर प्राजक्ता तुझ्या या पेंटिंग बद्दल तू काय सांगशील आम्हाला "

 

प्राजक्ता ला घाम फुटला होता .. तिची जीभ जड झाली .. घशाला कोरड पडली आणि तिच्या तोंडातून शब्द बाहेरच पडत नव्हते .. खूप  नर्वस झाली ..

रश्मी तिला खुणेला सांगू लागली कि बोल .. बोल .. शेवटी ..

RJ रश्मी " ऑल राईट .. आता आधी आपण ओम च्या आवडीचे गाणे ऐकणार आहोत म्हणजे ती खुश होईल मग बोलणार आहे आपल्याशी "

रश्मी " अग .. तू बोल ना बिनधास्त बोल .. घाबरतेस कशाला ? ओम तुम्ही तिला सांगा काय बोलायचे ते .. हे गाणे संपायच्या आत तिला तयार करा "

ओम " प्राजु काय हे .. लहान मुलांसारखी  करतेस .. बोल कि पटपट .. ती बघ किती सांभाळून घेतेय आपल्याला .. बोल आता .. बघ इकडे बघ .. माझ्याशी गप्पा मारते असे समजून गप्पा मार .. सांग ना .. कि तू कधी पासून पेंटिंग करतेस .. तुला कोणी शिकवले .. वगैरे "

 

प्राजक्ताच्या डोळ्यात अश्रू भरून आले होते ते तिने थांबवून ठेवले होते .. एका गृहिणी ला गेल्या दहा वर्षात एवढा मान  सन्मान कुठेच मिळाला नव्हता .. हि  वेळच  तिच्यासाठी नवीन होती .. साहजिकच ती भांभावून गेली होती.

 

गाणे संपल्यावर प्राजक्ता बोलू लागली " नमस्कार .. माझे नाव प्राजक्ता आहे .. मी इथे राहते .. मी एक गृहिणी आहे.. मला पेंटीग्स बनवायची आवड आहे .. मी शाळा कॉलेज मधे असल्या पासून ड्रॉईंग आणि पेंटिंग्स मध्ये खूप बक्षीस मिळवले आहे .. हल्ली आता आता मी पुन्हा पेंटिंग्स बनवायला सुरुवात केली .. तर माझ्या मिस्टरांनी म्हणजे ओम ने माझे यु ट्यूब चॅनेल काढले .. "

 

रश्मी तिला हाताने सांगत होती " थम्प्स अप .. बरोबर आहे बोल तू "

 

प्राजक्ता " मी कॉलेज ला असताना श्री सारंगधर सरांकडे क्लास ला जायचे .. त्यांनी मला खूप छान रंगांना कसे वापरायचे ते शिकवले .. "

 

रश्मी " ऑल राईट .. आत आपण प्राजक्ताच्या आवडीचे एक गाणे ऐकणार आहोंत .. "

 

रश्मी " खूप छान जमतंय बोलायला .. न थांबता बोल .. तुला कशी पेंटिंग सुचतात .. ? कि तू बघून काढतेस ?

 

प्राजक्ताने मान हलवली

 

गाण्या नंतर 

रश्मी " मग प्राजक्ता .. तुला पेंटिंग्स कशी सुचतात त्या मागचा तुझा काही राज आहे का ? आमच्या सर्व रेडिओ च्या लिस्टनर ला सांग बघू "

 

प्राजक्ता " राज असे काही नाही .. मी हातात ब्रश घेतला कि माझ्या डोळ्या समोर आधी पेंटिंग तयार होते आणि मग मी ते कागदावर उतरवले .. मला आपोआप  सुचत जाते आणि कल्पना सत्यात उतरत जाते "

 

रश्मी " अरे वाह .. तू खरी कलाकार आहेस .. असे न बघता पेंटिंग बनवणे सोपे नाही .. तर मित्रांनो प्राजक्ताशी आणि ओम शी आपल्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत .. ह्या गण्या नंतर .. स्टे ट्यून विथ मी "

 

मधल्या ब्रेक मध्ये

 

रश्मी " ओम तुमच्या लग्ना बद्दल काही सांगाल का तुम्ही ?"

 

ओम " हो .. नक्कीच मी सांगेन .. ओम एकदम तयार .. बायको ची तारीफ करायला रेडी झाला .

 

रश्मी " वेलकम बॅक टू अवर शो " वन नाईट स्टार "  आज आपल्या   समोर एक लवली कपल आहे .. ओम तुम्ही एवढी सुदर आणि आर्टिस्ट बायको कशी  मिळवलित .. हे सांगाल का आणि हसू लागली .. "

 

ओम " थँक यु .. आम्हाला इथे बोलावल्या बद्दल ..खूप छान प्रश्न विचारला आहेस तू .. आम्ही कॉलेज ला असताना तीने  अशीच एकदा पेंटिंग च्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि मी तिला २ वर्ष सिनिअर आहे म्हणून मी अरेंजर मध्ये होतो .. बरिच  मुलं मुली पेंटिंग करत होते  तेव्हा..  पण मी हिला पाठमोरी  बघितले हि इतकी मग्न होऊन ते पेंटिंग करत होती आणि तिचे हे लांब केस मला पुढे जाऊ देई नात.. हि तिच्या पेंटींग मध्ये हरवली होती आणि मी हिच्या मध्ये हरवलो होतो .

रश्मी " उफ .. स्टुडिओ मध्ये आज एकदम रोमँटिक वातावरण ओम ने तयार केलय आणि आपली वन नाईट स्टार आता इथे माझ्या समोर लाजून लाजून चूर झालेली आहे तर आपण पुनः भेटू या रोमॅंटिक गाण्या नंतर .."

 

प्राजक्ता  खरंच  तिथे लाजून पाणी पाणी होत होती .. आणि ओम तिथे जास्तच जरा शायनींग मारत  होता.. मधेच तिच्या केसांना मागे घे .. वगैरे असे उदयोग करत होता .. आणि ती डोळ्यांनीच त्याच्याशी बोलत होती .

 

ब्रेक मध्ये

रश्मी  प्राजक्तला " आता मी त्या यु ट्यूब च्या पेंटिंग विषयी बोलणार आहे ..  ते पेंटिंग तुला कसे सुचले त्या बद्दल बोल "

 

रश्मी " वेलकम बॅक टू शो "वन नाईट स्टार ".. आता आपण आपली वन नाईट स्टार प्राजक्ताला विचारू " हे जे पेंटिंग ज्याला ५०००० लाईक्स मिळालेत ते तुला कधी आणि कसे सुचले त्या बद्दल  काही सांगशील का ?"

 

प्राजक्ता आता थोडी धीट झाली होती  बोलायला " मी त्या दिवशी अशीच बाहेर गॅलरी मध्ये एकटीच बसले होते .. तुला तर मी  बोललेच कि मी गृहिणी आहे .. मग कधी कधी मनाला पण थकवा येतो .. अशा काहीशा विचारात असताना हे पेंटिंग मला सुचले .. "

 

रश्मी " ओह .. खरं सांगू हे पेंटिंग बघून आणि तुला भेटून मला असेच वाटतंय कि हि तूच आहेस .. इतकं रिअल पेंटिंग आहे हे .. आणि कल्पना इतकी सुंदर आहे कि एका डोळ्यात हसू आणि एका  डोळ्यात अश्रू .. अर्ध्या चेहरा पहिला कि खरोखर असे वाटतंय कि तू मनमुराद हसतेय आणि खूप खुश आहे . तिला कसलीही चिंता नाही .. मुक्त आहे आणि अर्धा चेहरा ती दुखी आहे .. वाह .. प्राजक्ता .. यु आर अमेझिंग आर्टिस्ट ..!! हॅट्स ऑफ टू यु "

प्राजक्ता " थँक यु .. मला अजून एक सांगावेसे वाटतंय .. घरी माझी दोन मुले आहेत प्रिया आणि प्रथमेश आणि माझ्या सासूबाई .. ओम तर आहेच माझ्या बरोबर नेहमी पण माझ्या सासूबाई  पण मझ्या मागे खंबीर उभ्या असतात ..आमची कधी जर वादावादी झाली तर त्या अजूनही ओम ला ओरडतात .. "

 

रश्मी " सो स्वीट ऑफ हर  ..  तुमच्या मुलांना आणि तुमच्या सासूबाईंना आमच्या तर्फे नमस्कार .. स्टे ट्यून .. भेटू या गण्या नंतर "

 

ब्रेक मध्ये रश्मी " एवढे रोमँटिक कपल मध्ये पण वादावादी होते?? .. आणि हसू लागली

 

ओम " अरे .. वादावादी नाही झाली तर ते कपल कसले .. आम्ही रोज भांडतो .. कारण भांडणाने प्रेम वाढतं ना .. " ओम आज सुटला होता ..

 

प्राजक्ता " शु..  काही पण काय  बोलतोस " आणि स्टुडिओ मध्ये छान गप्पा कॉफी चालू होती

 

ब्रेक के बाद

 

रश्मी " तर मित्रांनो .. आज पण एका आर्टिस्ट गृहिणी चा सत्कार करणार आहोत . आमच्या स्टुडिओ तर्फे आपल्या या स्टार ला एक ट्रॉफी , सर्टिफिकेट आणि ५००० रुपिझ चे गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे .. खरं तर नॉर्मली हा सत्कार आम्ही आमच्या MD सरांकडून करतो पण आज प्राजक्ताचा सत्कार करण्या साठी मला इथे आलरेडी एक जण भेटलाय .. त्याच्या हस्ते झालेला तिचा सत्कार नक्कीच प्राजक्ताला पण आवडेल .. आणि तो म्हणजे तिच्यावर प्रेम करणारा तिचा नवरा MR. ओम .. "

 

ओम च्या हस्ते प्राजक्ताचा सत्कार करण्यात आला .. तिला ट्रॉफी दिली , सर्टिफिकेट दिले आणि हॅम्पर MD सरांनी दिले .

 

रश्मी " तर मित्रांनो .. कसा वाटला  आजचा भाग आम्हाला जरूर कळवा या नंबर वर ०००००० आणि आपण असेच उद्या भेटणार आहोत एका नवीन वन नाईट स्टार ला घेऊन .. तोपर्यंत तुम्ही हे गाणे जे कि ओम आणि प्राजक्ताच्या आवडीचे आहे ते ऐकत रहा .. मी RJ रश्मी आपणा सर्वांना सायोनारा .. टाटा बाय करते ..  "