Login

शुभारंभ भाग ३१ अंतिम भाग

In this part prajta and om motivates other couple for changing their life as wl as life of their wife.. happy ending

शुभारंभ भाग ३१ अंतिम भाग

क्रमश: भाग ३०

आज शाळेच्या आर्ट गॅलरीचे उदघाटन आहे .. आज प्राजक्ताला आर्टिस्ट म्हणून तिकडे बोलवले होते आणि शाळेतर्फे तिचा ग्रेट आर्टिस्ट म्हणून शाळा सत्कार पण होणार होता  .

गेल्या आठवड्यात डायरेक्टर ने ओम ला स्वतः कॉल करून विचारले होते कि आमच्या बहिणीचा सत्कार करायला आणि आपल्या शाळेच्या आर्ट गॅलरीच्या उदघाटन कोणाच्या हस्ते व्हावे असे तुम्हाला वाटते .

ओम " मला वाटतं , प्राजक्ता हि कलाकार आहे तर एखाद्या कलाकाराकडूनच तिचा सत्कार झाला तर तिला आवडेल . "

डायरेक्टर सर " ठीक आहे मी बघतो त्या दृष्टीने . "

ओम" मी एक सुचवू का ? म्हणजे हीच पाहिजे असे नाही बरं का ?.. जस्ट सुचवतो "

 डायरेक्टर सर "  हो सांगा ना प्लिज "

ओम " प्राजक्ता माळी या मराठी अभिनेत्री येऊ शकल्या तर पहा .. प्राजक्तची फेव्हरेट आहे .."

डायरेक्टर " अरे वाह .. ठीक आहे मी बघतो कसे मॅनेज होतंय ते .. नाहीच झाली तर मग शिक्षण क्षेत्रातील कोणाला तरी बोलावतो "

ओम " ठीक आहे .. "

डायरेक्टर " ते आर्ट गॅलरी चे कॉस्टिंग द्याल का ?"

ओम " बहुदा ती नाही घेणार सर .. ते राहू दे .. तिला शाळेसाठी काहीतरी करायची इच्छा आहे असे ती मागे म्हणाली होती "

डायरेक्टर सर " ठीक आहे .. मी बघतो माझ्या कडून "

डायरेक्टर सरांनी त्यांचे रेफेरेंन्स लावून प्राजक्ता माळी या अभिनेत्रीला आर्ट गॅलरीचे उद्घाटनाला बोलावले होते .. एक प्राजक्ता दुसरी प्राजक्ता चा  आज सत्कार करणार होती .

ओम ने प्राजक्ताला मस्त एक पैठणी घेतली होती .. प्राजक्ता छान पैठणी घालून सत्कारासाठी  तयार झाली .. मुलांना पण तर शाळेत युनिफॉर्म वरच जायचे होते आणि मुले आधीच दुपारी गेले होते .. सासूबाई पण छान साडी घालून सुनेचा कौतुक  सोहळा बघायला शाळेत येणार होत्या .

प्राजक्ता मनातून खूप खुश होती .. आज तीने केलेल्या कष्ठाचे चीज होणार होते .  आर्ट गॅलरी तर अप्रतिम दिसत होती .

तिने खूप कष्ठाने आणि मन लावून ते काम पूर्ण केले होते . त्यातली सर्व पेंटिंग्स   तिनेच ठरवली होती आणि तिनेच बनवली होती एकटीने . आज पुन्हा ती डायरेक्टर सरांच्या केबिन मध्ये स्पेशल गेस्ट म्हणून होती . सर पण काही झालेच नाही असे नॉर्मल वागत होते .ओम मुद्दामून आई जवळ बाहेर खुर्चीत बसला होता .. आता त्याला प्राजक्ताची काहीच काळजी वाटत नव्हती . डायरेक्टर असो नाहीतर कोणीही असू दे कोणाशी कसे वागावे हे प्राजक्ताला आता कळले होते . कारण आता तीन तीन क्लास ती एकटीने हॅन्डल करत होती आणि गेले एक वर्षभर ती हे काम करत होती . त्यामुळे तिला  अनुभव पण बऱ्यापैकी आला होता .

प्राजक्ता " सर .. तुम्हाला एक सांगायचे राहून गेले .. मी आतापर्यन्त माझे गुरु श्री सारंगधर सर यांच्या इथे क्लास घेत होते त्यांच्या क्लास मध्ये टीचर म्हणून काम करतेय .. पुढच्या महिन्यात मी " प्राजक्ताज पेंटिंग क्लास "सुरु करतेय .. तर त्याच्या शुभारंभ तुमच्या हस्ते करावे असे मला वाटते .. याला ना उद्घटनाला ..

डायरेक्टर " हो नक्की .. मला खूप आवडेल .. चला मग सध्या आपण इथला कार्यक्रम उरकून घेऊ. " आणि सर्वजण बाहेर आले आणि बाहेच्या खुर्च्यामध्ये बसले .

थोड्याच वेळात सुंदरी प्राजक्ता माळी हिचे आगमन झाले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला . मग आर्ट गॅलरी चे उदघाटन प्राजक्ता माळी च्या हस्ते करण्यात आले .  आर्टिस्ट म्हणून प्राजक्ताची प्राजक्ता माळी ला  डायरेक्टर खास ओळख सरांनी करून दिली .

प्राजक्ता माळी ने एकेक पेंटिंग नीट पहिले . प्रत्येक पेंटिंग ची तारीफ करता ना ती थकत नव्हती . बरीच पेंटिंग बरोबर तिने सेल्फी काढून घेतले .

पालकांसाठी आणि कार्यक्रम पाहण्यासाठी  जमलेल्या लोकांसाठी तिथे एक अद्भुत नजारा होता .. दोन दोन प्राजक्ता त्यांना देवाने सुंदरता बहाल केली होती आणि त्यांच्या मधुर स्मित हास्याने तिथला माहोल मंत्रमुग्ध झाला होता

ओम आणि सासूबाई प्रेक्षांच्यात  पहिल्या रांगेत बसले होते . मुले पण खाली रांगेत बसले होते .  प्राजक्ता मात्र आज पाहुण्यां सोबत मिरवत होती .. आज खऱ्या अर्थाने एका गृहिणीचा सत्कार होता . जिने मेहनत , कष्ट आणि आपल्या कडे असणाऱ्य कलेला ओळखून तिने तिच्या नवीन आयुष्या चा शुभारंभ केला होता .. आज ओम तिकडे प्राजक्ता मॅम चा नवरा म्हणून आला होता .. नेहमी प्राजक्ता "फक्त ओम ची बायको म्हणून त्याच्या बरोबर जात होती आज पारडे सामान झाले होते .. आज सासुबाईंना , आज मुलांना , आज नवऱ्याला त्याच्या बायकोचा अभिमान वाटत होता ..  मुख्य म्हणजे प्राजक्ताला तिच्या अस्तित्वाचा अभिमान वाटत होता ..

टाळ्यांच्या कडकडाट प्राजक्ता माळीचे  भाषण झाले .. ती तर सुंदरतेची  मूर्ती आहेच तिच्या सौदर्याकडे , खळखळून हास्याचे साक्षिदार तिथे असलेले सगळेच जण होते . मग तिच्या हस्ते प्राजक्त चा सत्कार करण्यात आला आणि प्राजक्ताला दोन शब्द बोलायला सांगितले .

ओम ला थोडी भीती वाटली होती कि हि आता स्टेज वर बोलायला तयार आहे कि नाही ?

प्राजक्ता " नमस्कार मी प्राजक्ता ओम ... .. तर मंडळी मी कोणी आर्टिस्ट नाही .. मी एक गृहिणी आहे .. हि खरी माझी ओळख आहे .. पण काय आहे ना गृहिणी हे काम खरतर माझे आवडीचे काम आहे . माझा नवरा ओम , माझी मुले , माझ्या सासूबाई आणि माझं घर या सगळ्यांपुढे मला काहीच कधीच नको होते . मी लग्ना नंतर १० वर्ष माझ्या आवडीचे काम मन लावून केले . अगदी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता . कारण एक स्त्री असल्यामुळे मी जे केले किंवा करते ते माझे कर्तव्य च आहे .. आणि मला ते मान्य आहे . पण मंडळी झाले असे गृहिणी च्या कामाला सगळेच नावाजतात असे नाही . तिच्या कामाला तिला जो मोबदला हवा असतो तो आपल्या समाजाकडून मिळतोच असा नाही . काळ बदलाय .. काळानुसार आपण पण बदललो पाहिजे हे मला खुणावू लागले .. नाहीतर मी खूप मागे राहीन कि काय ?आणि माझे अस्तित्व हरवून जाईल कि काय ? अशी मला भीती वाटायला  लागली. असे वाटू लागले कि मी असले काय किंवा मी नसले काय कुणाला काही फरक पडतो कि नाही ? माझ्या मतांचा कोणी विचार करतो कि नाही ?.. माझी कोणाला लाज तर तर वाटत नाही ना .. हे असे प्रश्न मला भेडसावू लागले आणि मी ठरवले कि मी  काहीतरी करणार .. स्वाभिमानाने , ताठ मानेने जगण्यासाठी फक्त गृहिणी हे लेबल पुरेसे नाहीये आणि आज मी इथपर्यंत पोहचले .. या सगळ्यांत मला माझ्या गुरूंची  माझ्या मुलांची , सासूबाईंची , आणि माझा हक्काचा माणूस म्हणजे माझा नवऱ्याची मला खूप साथ मिळाली .. मला समजून  घेऊन मला माझ्या पायावर उभी करण्यासाठी त्याने खूप मेहनत तर घेतलीच पण माझ्या मागे खंबीर पणे उभा राहिला . माझे निर्णय मला घेण्याचे स्वातंत्र त्याने मला दिले .

असे म्हणतात " प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते .. पण मी एक अशी स्त्री आहे कि माझ्या या थोड्या बहोत मिळालेल्या यशामागे एक पुरुष आहे .. आणि ओम कडे बघून प्राजक्ता म्हणाली " थँक्स ओम " आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळला . खाली ओम चे डोळे भरले होते आणि तो दोन्ही हाताने टाळ्या वाजवत होता .. आज त्याचा उर खरोखर अभिमानाने भरून आला होता पण आपली बायको चार चौघीं पेक्षा दिसायला सुदर आहे म्हणून नाही बरं का .. तर आपली बायको एक ग्रेट आर्टिस्ट आहे आणि एक कर्तृवान स्त्री आहे  म्हणून त्याला अभिमान वाटत होता .. प्रिया आणि प्रथमेश पण टाळ्या वाजवून थकत नव्हते . सासूबाई मनातल्या मनात तिची दृष्ट काढत होत्या मनात म्हणत होत्या माझ्या सुनेने माझ्या आमच्या घराण्याचे नाव रोशन केले .. आणि मनोमन तिला आशिर्वाद देत होत्या .

“तसेच शाळेच्या प्रिंसिपल मॅम , शाळेचे डायरेक्टर सर यांनी पण वेळोवेळो गायडन्स केला . त्या बद्दल मी त्यांची आभारी आहे .. माझ्यातल्या कलाकाराला ओळखून शाळेने मला हि शाळेची आर्ट गॅलरी बनवण्याची संधी दिली त्याबद्दल मी शाळेची आभारी आहे . “

तेवढ्यात प्राजक्ता माळी म्हणाली " प्राजक्ता मला आज अभिमान आहे कि एका गृहिणी तल्या कलाकाराचा सत्कार करतेय . मी स्वतः एक कलाकार आहे आणि कलाकाराचे आयुष्य आणि प्रवास किती कठीण असतो हे माझ्याशिवाय कोण समजणार .. प्राजक्ता आज मला तू जाताना तुझी ऑटोग्राफ देऊन जा प्लिज आणि एक तुझ्या बरोबर सेल्फी पण देशील . अजून एक मला इथे बोलावसे वाटतंय .. ज्या पुरुषाने एका गृहिणीला तिचा सन्मान मिळवून दिला . तिचा गेलेला आत्मविश्वास मिळवून दिला त्या पुरुषाचा पण सत्कार इथे नक्की झाला पाहिजे तर प्राजक्ता बोलव तुझ्या नवऱ्याला स्टेज वर त्याच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवू सगळे ..

ओम ला काही ला काही कळायच्या आता प्रिया आणि प्रथमेश ने त्याला ओढत स्टेज वर नेले आणि टाळ्यांचा  कडकडाट इतका प्रचंड होत होता कि तिथे बसलेल्या सर्व नवऱ्यांना आपल्या घरातल्या गृहिणी साठी काहीतरी करावे असे वाटू लागले होते .. प्राजक्ता आणि ओम यांनी समाजापुढे एक नवे उदाहरण उभे केले होते . आज तिथे बसलेल्या हजारो गृहिणीच्या मनात आपण पण एक शुभारंभ करूया असा विचार आला होता .. आणि त्यांच्या गृहिणीच्या मागे उभे राहायला त्यांचे नवरे  या दोघांकडे बघून त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन मनाने खंबीर झाले होते .

प्राजक्ताने शून्यातून तिची प्रगती करायला सुरुवात करून आज एका मोठ्या पुरस्काराची मानकरी झाली . प्रेरणा हि आपल्या आत असते . काहीतरी बनायची आणि करायची उर्मी प्रत्येका मध्ये असते .तिला योग्य वेळी साद देणे गरजेचे आहे .. जर त्या हाकेला साद आपण नाही देऊ शकलो तर ती ज्योत विझून जाते जशी कि फटाक्याची वात  काहीवेळेला पेटवली कि विझते आणि मग तो फटाका फुकट  जातो . हि वात नीट पेटवली किंवा पुन्हा पेटवली तर त्याचा एवढा मोठा धमाका होऊ शकतो कि तुम्ही कानावर हात ठेवल्याशिवाय राहू नाही शकत . तर आपल्यातल्या फटाक्याच्या वातीला प्रज्वलित करायचे का नुसता फुसका बार होयचे हे आपल्या हातात आहे .

जाताना हे  एक  प्रेरणादायी गाणे खास तुमच्या साठी

रुक जाना नहीं तू कहीं हारके

कांटो पे चलके मिलेंगे साये बहारके

ओ राही ओ राही ...

हर प्रयत्न में सफलता  शायद मिल पाए लेकिन हर सफलता का कारण प्रयत्न ही होता है !

तर वाचकहो .. कशी वाटली हि कथा जी कि प्राजक्ताच्या जीवनाची प्रेरणादायी कथा . वाचा आणि मला नक्की कळवा तुम्हाला आवडली का ? आणि आवडली तर त्यातले काय आवडले ..

ईराचे आणि सर्व वाचकांचे आभार!!!

समाप्त !!!

🎭 Series Post

View all