शुभारंभ ३०
क्रमश: भाग २९
आज प्राजक्ताचा कमालीची खूश होती . आनंद चेहऱयावर दिसत होता . आता मी मला पाहिजे तेव्हा माझ्या माहेरी जाऊ शकते हि गोष्ट किती आनंदायी आहे याची कल्पना आपण करूच शकतो .
ती पण दमली होती .. आणि लगेचच बेडवर आडवी पडली .. पडल्या पडल्या लिटरली तिला मेल्या सारखी झोप लागली . दोन एक तास झोपली असेल तर तिला मधेच जाग आली ती आली पहाटे ३ वाजता जशी काय तिची झोप पूर्णच झाली होती .
आता इतक्या लवकर उठुन करायचे काय ?झोपायचा प्रयत्न तिने केला पण झोप येई ना .. ती सरळ उठली आणि गॅलरी मध्ये आली आणि अर्थातच तिने हातात ब्रश घेतले .. आज आता तिच्या डोक्यात एक पेंटिंग तिला दिसले होते आणि ते पेंटिंग तिला कागदावर उमटवयाचे होते .
कॅनवास वर पेन्सिल ने आधी थोडे स्केच तयार करून घेतले आणि रंगाच्या रेघोट्या त्या कॅनवास वर उतरू लागल्या .. प्राजक्ता एकदम मग्न होऊन पेंटिंग करत होती . रात्री झोपता ना तिने तिचे केस मोकळे सोडले होते . पहाटेचा मंद वारा अंगावर थंडीचा एखादा शहारा आणत होता . असे म्हणतात
सकाळचे ३ ते ५ हा ब्राम्ह मुहूर्त असतो . प्राजक्ताला आज ब्रह्म मुहूर्त मध्ये एक पवित्र ,अद्भुत , पेंटिंग सुचले होते . अर्थात तिच्या आवडीचे राधा कृष्ण असणारच .
आज प्राजक्ता जे पेंटिंग काढत होती त्यात राधा बासुरी वाजवतोय आणि कृष्ण तिच्या कडे कौतुकाने बघतोय .. एकदा मी हिच्या हातात बासरी दिली काय ती तर सेम माझ्यासारखीच बासरी वाजवायला लागलीय . राधा पण मोठ्या कौतुकाने कृष्णकडे बघत ती बासुरी वाजवून दाखवत आहे . आज राधेचे तेज श्रीकृष्णच्या चेहऱ्यावर पडलेय . राधा ने वाजवलेली बासरी हि सर्व पशु पक्षी आणि प्राण्यांना पण खूप आवडली आहे आणि ते त्या बासुरीमधून निघणाऱ्या सुरांमुळे मंत्रमुग्ध झालेत . श्रीकृष्णची बासरी आवडणाऱ्या गायी आज इतक्या मंत्रमुग्ध झाल्यात कि खुद्द श्रीकृष्णाच्या मांडीवर डोके ठेवून शांत डोळे मिटून ऐकत आहेत . शेजारीच मोर पण त्याचे अस्तित्व विसरून मान खाली घालून ते बासुरीचे सूर ऐकत आहेत . राधाच्या बासरीचा परिणाम मागेच असलेल्या राजहंसाच्या जोडी मध्ये पण प्रेम भरत आहे . यमुना नदीच्या काठावर प्रेमाच्या तेजाचा अद्भुत नजारा आज प्राजक्ता कॉंवास वर उतरवत होती . या पेंटिंग ची एक खास बात अशी होती कि नेहमी राधा हि श्रीकृष्णावर भाळलेली असते पण या पेंटींग मध्ये खुद्द श्रीकुष्ण राधावर प्रेम पूर्वक कटाक्ष टाकत आहेत . ते तिच्यावर भाळलेले दिसत आहेत . अप्रतिम प्रेमाचा अविष्काराचे हे प्रतीक म्हणजे हे पेंटिंग होते ..
पेंटिंग पूर्ण झाले प्राजक्ता स्वतःवर खुपु खुश झाली .. खूपच सुंदर पेंटिंग दिसत होते . पेंटिंग पूर्ण होई पर्यंत बाहेर उजाडले होते .. प्राजक्ता तिचे आवरायला गेली .. अंधोळ करून किचन मध्ये तिचे काम करू लागली ..
मुलांचे आवरले ओम मुलांना शाळेत सोडून आला . हे दोघे चालून आले .. आणि मग दोघे आवरून ऑफिस ला जायला निघाले .
नाश्ता झाल्यावर
प्राजक्ता " ओम .. थोडा वेळ आहे का ?"
ओम " थोडाच आहे .. १५ मिनिटे "
प्राजक्ता ते काढलेले पेंटिंग आत मध्ये घेऊन आली ..
प्राजक्ता " हे मी खास तुझ्यासाठी काढलय .. हे जे भिंतीवर आहे ते तू काढून टाक.
ओम शर्ट चे बटन लावता लावता त्या पेंटिंग कडे बघत पण नव्हता . दोन बटन लावून झाले आणि त्याने बघितले .. आणि त्या पेंटिंग कडे बघतच बसला .. अवाक ! त्या पेंटिंग कडे बघून भावनिक ओम च्या डोळ्यातून लिटरली पाणी आले .
ओम " प्राजु ... काय आहे हे .. आऊट ऑफ द वर्ल्ड .. अग हे सगळे कसे सुचतं तुला ?बापरे ! या पेंटिंग च्या विषयी बोलायला माझ्याकडे शब्दच नाहीयेत. हा प्रेमाचा अद्भुत नजारा आहे "
आणि वेड्यासारखे तिच्या हाताला किस करू लागला .. अखंड प्रेमात बुडाला तो .. या जगाच्या बाहेरच गेला तो .. प्राजक्ताला घट्ट मिठीत घेऊन बसला .. “खरं सांगतो प्राजु तुझा नवरा होण्याची माझी लायकी नाहीये तू एक देवदूत आहेस .. तुझ्याकडे अद्भुत शक्ती आहे .. तू नॉर्मल नाहीयेस .. तू कशी काय या धरतीवर आलीस .. मला तर वाटते कि ह्या युगातली राधा आहेस तू आय लव यु प्राजु .. "
प्राजक्ता " अरे .. बास .. बास .. किती कौतुक करशील . जेव्हा पण तुझ्यासाठी पेंटिंग बनवायला जाते ना तेव्हा ते असे बनते त्यामुळे माझी खरी प्रेरणा तू आहेस ..शक्ती आहेस "
ओम "अग काय हे ह्याच्या बदल्यात मी काय देणार तुला .. मी तर काहीच देऊ शकत नाही "
प्राजक्ता " अरे .. हे मी तुला तू मला जे दिल आहेस ना त्या बदल्यात देत आहे .. या बदल्यात मला काहीही नकोय "
ओम " मी काय दिलय तुला ?"
प्राजक्ता " तूझे प्रेम , तुझा विश्वास , आणि आत माझे अस्तित्व तू मला दिलेस . मला पुन्हा घडवलेस .. तुझ्या शिवाय मी इथपर्यंत पोहचूच शकले नसते .. एका सध्या गृहिणीला तू तिची ताकद दाखवून दिलीस .. मला दिशा दिलीस .. मला ओळख दिलीस .. माझ्या सुखात तर असतोसच पण माझ्या दुःखात मला समजून घेतलेस आणि मला त्यातून बाहेर काढलेस आणि तुझ्या प्रेमाची फुंकर घालत घालत माझ्या जखमा कधी भरून गेल्या आणि त्याचे व्रण पण नाहीसे झालेत . आणि तू मला विचारतोस कि मी काय दिलय तुला ? "
ओम " मी काही वेगळे केलेलं नाहीये .. जे मी नवरा म्हणून करायला करायला पाहिजे तेच मी केले ग बाई .. तू काय एवढे मोठे मोठे शब्द वापरतेस .. "
ओम फार महत्वाचे वाक्य बोलला . तो जसे एका नवऱ्याने वागावे तसेच तो वागला होता . नवरे असे वागतात का ? आणि नसले तर का नाही ?
बायकोला असे समजून घ्यायचा प्रयत्न प्रत्येक नवऱ्याने करायला पाहिजे नाही का ?
प्राजक्ता " असो .. तुला आवडले ना हे गिफ्ट .. मग मी खुश आहे .. "
ओम" पण कधी काढलेस ते कळले पण नाही "
प्राजक्ता " अरे .. सकाळी ३ वाजता जाग आली आणि पुन्हा झोप येतच नव्हती .. आणि मग हे पेंटिंग बनवले .."
ओम " ग्रेट . .. आता एक सांगतो तुला पटलं तर च करतो .. हे पेंटिंग जे भिंतीवर आहे ते डायरेक्टर ला आपल्याकडून गिफ्ट देऊन टाकु .. नाहीतरी त्याला ते आवडलेच होते ना .. काय वाटते तुला ?"
प्राजक्ता " ठीक आहे .. तुला ओके वाटतंय ना .. मग मला काही नाही वाटत .. आणि दुसरे म्हणजे हे पेंटिंग तू यु ट्यूब ला सुद्धा नको टाकूस .. हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी .. "
ओम " ओके .. आणि तिच्या कपाळावर किस केले
ओम ने ऑफिस ला फोन करून कळवले कि थोडा उशिरा येतोय आणि ते पेंटिंग भिंतीवरून काढले .. आणि म्हणाला
ओम " चल .. तू ला शाळेत सोडतो आणि हे लगेच त्या डायरेक्टर ला देऊ " आणि हे आत्ताचे आहे त्याला फ्रेम बनवायला टाकतो "
प्राजक्ता " ठीक आहे .. पण मी आता डायरेक्टर ला भेटायला नाही येऊ शकत .. गेल्या गेल्या माझा एक लेक्चर आहे "
ओम " ठीक आहे .. आवर मग "
प्राजक्ता तयार झाली आणि दोघे शाळेत गेले .. ओम डायरेक्टर च्या केबिन मध्ये गेला.
डायरेक्टर " गुड मॉर्निंग मिस्टर ओम "
ओम " गुड मॉर्निंग .. हे तुम्हाला आवडलेल्या पेंटिंग चे ओरिजिनल पेंटिंग .. खास तुमच्या साठी .. तुमच्या बहिणीने दिलय "
डायरेक्टर " अरे .. वाह .. ओरिजिनल तर अमेझिंग दिसत आहे .. सॉरी पण हे तुमचे पण फेव्हरेट होते ना मग हेच का दिलेत मला "
ओम " त्याचे असे झाले कि प्राजक्ताने माझ्यासाठी खास एक पेंटिंग आज सकाळी ३ वाजता उठून बनवलय .. ते मी कोणालाच दाखवणार नाहीये .. फक्त माझ्यासाठी "
डायरेक्टर " तुम्ही चुकताय ओम .. तुमची बायको तुमच्यावर किती प्रेम करते हे त्यांच्या डोळ्यातच दिसते .. तुमचं नाव जरी घेतले ना तरी त्यांच्या डोळ्यात एक चमक येते .. त्या जेव्हा तुमच्यासाठी पेंटिंग बनवतात ना तेव्हा तेव्हा ते अद्भुतच असणार कारण अखंड प्रेमात बुडून त्या ते पेंटिंग बनवतात .याचा उपयोग तुम्ही त्यांच्या कडून दरवर्षी एक पेंटिंग तुमच्यासाठी बनवून घ्या आणि वेगवेगळ्या पुरस्काराच्या नॉमिनेशल ला पाठवा . प्रत्येक अवॉर्ड त्यांना मिळेल .मी शैक्षणिक क्षेत्रात काम करतो .. मी तुम्हाला सांगत जाईन इकडे इकडे पाठवा ..बघा पटतंय का ?"
ओम " गप्पच बसला .. प्राजक्ताची आर्ट हि स्वतःच्या घराच्या चार भिंती च्या आत लावून ठेवण्यासाठी नव्हतीच मुळी हे त्याला पण पटलेच होते .. "
पुढे मग प्राजक्ताचा मिसेस मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार झाला . प्राजक्ताने आई बाबांनी दिलेली पैठणी नेसली होती आणि त्यात ती अति सुदर दिसत होती . ओम तिच्या बरोबर गेलाच होता .. दुसऱ्या दिवशी च्या न्यूज पेपर मध्ये , बातम्यां मध्ये प्राजक्ताचे नाव झळकले . ओम आणि प्राजक्तावर चौ बाजूकडून अभिनानंदनाचा वर्षाव होत होता . ओमच्या CEO आणि डायरेक्टर ने पण खास त्याच्या मोबाईल वर फोन करून त्याचे अभिनंदन केले होते .
प्राजक्ताच्या क्लास च्या स्टुडंट्स ने पण प्राजक्ताचे अभिनंदन केले मित्र मैत्रिणी , नातेवाईक , सर्वच जण कौतुक करत होते .
पुरस्कार मिळाल्यामुळे एका गृहिणी चे रूपांतर एका आर्टिस्ट मध्ये झाले होते पण याचा अर्थ ती गृहिणी नाही असे नव्हते बरं का ? हे गृहिणी चे गणित असे आहे कि वन्स अ गृहिणी ऑल्वेज अ गृहिणी .
कारण तिच्या जवाबदाऱ्या ती कधीच झटकू शकत नाही .. बरोबर ना .. ज्या नोकरी करणाऱ्या आहेत त्या सुद्धा गृहिणी च असतात
तसे म्हटले तर या सिद्धांतामुळे ज्या नोकरी करतात त्या पण गृहिणी मग ज्या नोकरी करत नाहीत त्या कोण आहेत ?
तर त्या फक्त गृहिणी आहेत .. आणि जर फक्त गृहिणी ह्या मध्ये जर ती गृहिणी आनंदित असेल , समाधानी असेल तर प्रश्नच नाही पण जर मनाला समाधान मिळत नसेल तर या " फक्त गृहिणींनी ..काहीतरी करून .. काहीतरी आवडीचे करून, काहीतरी स्वतः साठी करून , काहीतरी असे करून कि ज्यातून तिला मान , सन्मान मिळेल असे करून आपल्या मागे लागलेलं फक्त गृहिणी चे लेबल बदलवण्याचा प्रयत्न नक्की करावा .
फार कष्ट नाहीयेत हो .. आपल्याला “फक्त” हा शब्द काढून टाकायचा आहे .. तर चला मग एकदा स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहू कि मी माझ्या मागचे फक्त गृहिणी हे लेबल कसे बदलू शकते ..
सुरुवातिला संघर्ष करावाच लागतो " आयता वडा तोंडात पडा " असे कधीच होऊ शकत नाही गृहिणीला तर नक्कीच नाही .. चला उठा आणि कामाला लागूया .. मी पण तुमच्यातलीच एक आहे .. बरं का !