Login

शुभारंभ भाग २९

in this part prajkta and her father pach up their relation

शुभारंभ भाग २९

क्रमश: भाग २८

फायनली ओम ने प्राजक्ताला अवॉर्ड घेण्यासाठी तयार केले .

सकाळी प्राजक्ता किचन मध्ये आवरत होती आज तिचे लेक्चर नव्हते म्हणून आरामात होती आणि ओम मुलांना सोडून आला होता .

ओम " अरे तू तयार नाहीस .. वॉक ला जायचंय ना .. आटप मला उशीर होतो मग "

प्राजक्ता " ओम आज माझी सुट्टी आहे .. अगदी वॉक ला सुद्धा .. मला कंटाळा आलाय .. आज नको जाऊया का ?"

ओम " ठीक आहे "

तितक्यात प्राजक्ताला तिच्या आईच्या मोबाईल वरून कॉल येतो .

प्राजक्ता ओम चा डबा भरता भरता आईशी बोलत होती .. सांगत होती मी तुला अर्ध्या तासाने कॉल करते .. जरा आत्ता ऑफिस ची गडबड आहे .

तेवढ्यात प्राजक्ता बोलता बोलता फोन वर हमसून हमसून रडायला लागते .. ती रडते का म्हणून ओम तिला खुणेने विचारू लागला .. " काय झाले "

शेवटी त्याने तिच्या हातातून फोन घेतला

ओम " हॅलो .. कोण बोलतय .. समोरून काहीच आवाज नाही .. "

ओम " हॅलो .. कोण आहे .. प्राजक्ता .. अग काय झालंय ? कोणाशी बोलत  होतीस .. हा नंबर पण सेव नाहीये "

समोरून प्राजक्ताचे बाबा " नालायका ओम.. माझ्या पोरीशी आता मला बोलायला तुझी परवानगी घ्यायला  लागेल का ?"

ओम" अहो  .. सासरे बुवा .. आज इकडे कुठे ? आज फोन कसा काय केलात ? आणि तुम्ही माझ्या बायकोला का रडवलेत ?"

प्राजक्ताचे बाबा " तुझी बायको नंतर आधी माझी मुलगी आहे ती .. "

ओम " काय बाबा ? किती वर्ष असा राग धरून बसणार आहात .. मी तुम्हाला सांगितले ना अजूनहि गणित तेच आहे प्राजक्ताचे माझ्यावर प्रेम जास्त आहे "

बाबा भडकलेत .. ओम प्राजक्ता कडे बघून...  ते ओरडत आहेत म्हणून फोन कानापासून लांब धरत होता

प्राजक्ता " गप रे .. कशाला चिडवतोस त्यांना ? आज किती तरी दिवसांनी त्यांनी मला फोन केलाय "

ओम " बघा आत मी काय सांगतो ते .. प्राजक्ताला महाराष्ट राज्य कला अकादमी चा पुरस्कार मिळणार  आहे तर तिचे अभिनंदन करायला तुम्ही दोघे आज रात्री जेवायला या .. आणि प्राजक्ताच्या हातचे जेवण जेवून बघा आता चांगली सुगरण झालीय ती "

बाबा " ती आधी पासूनच सुगरण आहे आणि ती आधी पासूनच हुशार आहे .."

ओम " आता तुमचा इगो विसरा  आणि लेकीला भेटायला या .. नाहीतर मी संध्याकाळी तुम्हाला घ्यायला येतो "

बाबा " नको .. आम्हाला त्याची गरज नाही .. आम्ही रिक्षेने येऊ "

ओम " ठीक आहे मग या संध्याकाळी .. "

आणि फोन ठेवून देतो

ओम " रडतेस काय ? मी किती घाबरलो ? काय झाले ते कळेना मला .. बरं  ऐक  बाबांच्या आवडीचा मेनू बनव सगळा पण त्यांना असे वाटले नाही पाहिजे कि तुझं जास्त प्रेम त्यांच्यावर आहे . काय कळलं का ?"

प्राजक्ता " काय .. ओम तू पण ना लहान मुलांसारखा त्यांना डिवचत असतोस "

ओम " असेच ग मज्जा .. पण असे बोलल्यामुळे यायला तयार झाले कि नाही बघ .. किती वर्षांनी ते आपल्या  घरी येणार आहेत "

प्राजक्ता " हो ना .. माझे तर माहेरचं त्यांनी बंद केले .. मला म्हणाले जर तुझे ओम वर खरं प्रेम असले तर ह्या घराचा जिना चढु  नकोस .. रागात काहीपण बोलतात पण मला काही तो जिना चढला गेला नाही परत "

ओम " मी तुला म्हटले होते कि असे काही नसते .. तुला जायचे तर जा .. मला तर माहितीच आहे ना तुझे माझ्यावर प्रेम आहे ते .. "

प्राजक्ता " हो .. रे पण मलाच मनाला पटत नव्हते ते "

ओम " ठीक आहे .. आज छान जेवण बनव काय ?आणि प्लिज मला ती अळूची पातळ भाजी वाढू नकोस .. माझ्या साठी पालक पनीर बनव "

प्राजक्ता " अरे नाही रे .. किती पदार्थ बनावत बसू असे .. "

ओम " अग .. कर ना आजच्या दिवस .. सासरे बुवांसमोर मला मान खाली घालायला लावू नकोस .. "

प्राजक्ता " काय ओम .. तू पण काही  कमी नाहीस .. एकदा त्यांच्या समाधानासाठी बोल ना कि माझे तुझ्यापेक्षा त्यांच्यावर जास्त प्रेम आहे ते .. आता म्हातारे झालेत ते "

ओम " अरे आता इतकी वर्ष झाले मला कधी जावयाचा मान सुद्धा दिला नाही .. बोलताना म्हणतात " नालायका .. अशीच हाक मारतात "

प्राजक्ता " हो मग तू त्यांच्या एकुलत्या एक मुलीला त्यांच्या पासून लांब केलेस त्याचा राग आहे त्यांच्या तुझ्यावर "

ओम " हो का .. आज बाबा येणार आहेत तर लगेच त्यांची बाजू का ?" आणि हसायला लागला ..

प्राजक्ता " माझ्या साठी तुम्ही दोघे हि महत्वाचे आहेत आणि तुम्ही दोघे भांडता माझ्यावरून .. आज काय ते भांडण मिटवा म्हणजे मला माहेरी जायचा मार्ग मोकळा होईल "

ओम " बरं चल , मी निघतो ऑफिस ला .. मी काही आणायचे असले तर अर्धा तास आधी फोन करून कळव .. आणि आई बाबांच्या आवडीचा स्वयंपाक बनव "

प्राजक्ताच्या  नशिबात  आ राम नाही .. आता बऱ्याच वर्षांनी आई बाबा येणार आहेत म्हटल्यावर तिची गडबड वाढली . लगेच बाजारात जाऊन , सामान घेऊन आली .

दुपारीच थोडे आवरून ठेवले आणि मुलांना घेऊन आल्यावर लगेच संध्याकाळच्या जेवणाला लागली .. आई बाबा येणार म्हणून छान तयार झाली .. छान साडी , मोठे मंगळसूत्र , हातात बांगड्या घालून तयार झाली . प्रियाच्या पण मस्त दोन घट्ट वेण्या घालून तुला पण छान ड्रेस घालायला लावला . प्रथमेश ला पण पसारा करू नको , घरात मोठ्यांना उलटं बोलू नकोस . आजी आबा आल्यावर त्यांचा समोर आरडाओरड करू नकोस अशा  सुचना देऊन त्याला पण तयार करून बसली . पाच वाजताच तिचे आई आणि बाबा रिक्षेने घरी आले .

 बाबा आणि आई घरी आल्याचा  आनंद तर खूप होत होता पण सगळेच रडत होते .. प्रथमेश मात्र कॉन्फ़्युज झाला " नक्की हे आजी आबा आईला पाहिजेत का नकोत .. आता आले तर रडते कशाला ?"

प्राजक्ताने दोघांना पाणी दिले चहा केला आणि ओम यायच्या  आधीच त्यांना नमस्कार करून घेतला .. म्हणजे समजा ओम ला  त्यांना नमस्कार करायचा नसला तर तिने केला म्हणून त्याला जबरदस्ती करायला नको ..

किती छोट्या छोट्या गोष्टी बायकांना सांभाळाव्या लागतात ना !

थोड्याच वेळात ओम आला .. त्याने पण सासर्यांना कडकडून मिठी मारली .. दोघांच्याही डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या .

ओम मग काय बोलायचं म्हणून " प्राजक्ताचे पेंटिंग्स दाखवत होता . यु ट्यूब चॅनेल दाखवत होता  ..

प्राजक्ता " चला आधी तुम्हा दोघांना वाढते आणि मुलांना वाढते आणि मग आम्ही बायका तिघि मागून बसू.. चालेल का बाबा ?"

बाबा " हो चालेल ..

प्राजक्ताने दोघांच्या आवडीचं मेनू बनवले होते आणि आता तिच्या डोक्यात एक प्लॅन होता

प्राजक्ताने ताट वाढायला सुरुवात केली

बाबांच्या ताटात .खीर, पुरी, अळूची पातळ भाजी , आणि कांदाभजी वाढली

ओम च्या ताटात पोळी , पालक पनीर आणि गोड शिरा वाढला ..

ओम मुद्दामून " अग .. बाबांना किती कमी कमी वाढलेस .. वाढ अजून .. खीर तरी वाढ अजून "

प्राजक्ता " मी बरोबर वाढलेय .. त्यांना लागले कि ते मागून घेतील अजून “

ओम " नाही कसे .. मी सांगतोय ना .. म्हणून तू त्यांना अजून वाढ " आणि त्याने तिला जबरदस्तीने पानात जास्तीचे वाढायला लावलेच त्याने

आता दोघे जेवायला सुरुवात करणारच होते तर

प्राजक्ताने " थांबा .. मला एक मिनिट  बोलायचंय  .आणि तिने बाबांचे ताट ओम ला दिले आणि ओम चे ताट बाबांना दिले .. "ज्याचे माझ्यावर जास्त प्रेम आहे त्याने हे जेवण जेवा.. माझी  जबरदस्ती नाही . नको असेल तर मी दुसरी ताट वाढते .. हि ताट  मुलांना देते

ओम " नाही यार प्राजक्ता .. तुला माहिते हे मी नाही जेवू शकत .. "

प्राजक्ताने ओम ला खुणावले तिकडे बघ . ओम ने साईडला बघितले तर बाबा निमूटपणे जेवत होते .

ओम " काय यार प्राजक्ता .. तुम्ही बाप लेक दोघेही सारखेच हट्टी आहेत आणि मला मधल्या मध्ये नाचवता ..

बाबांनी ताट व्यवस्थित जेवले . आणि ओम चा जास्तीचा शहाणपणा " वाढ .. अजून त्यांना .. असे केल्यामुळे ते जास्तीचे जेवण त्याला संपता संपत नव्हते .

मग .. बायकांनी त्यांची जेवणे उरकली .. तोपर्यंत ओम आणि सासरेबुवा खाली गार्डन मध्ये राउंड मारून आले

आई बाबांनी प्राजक्ताला मस्त चिंतामणी कलर ची पैठणी आणली होती .. ओम ला छान शेरवानी .. मुलांना  खाऊ कपडे आणि सासूबाईंना पण साडी आणली होती .

झाली जेवणं झाली .. खूप साऱ्या गप्पा झाल्या .. प्राजक्ताने सांगितल्या प्रमाणे ओम ला एक विषय क्लीअर करायचा होता

ओम " बाबा .. तुमच्या शपथा , शब्द वगैरे काय आहे ते मागे घ्या .. म्हणजे प्राजक्ताला पण कधी कधी माहेरी यायला मिळेल .

बाबा " नको .. तिचं माझ्यावर प्रेम असते तर माझ्या साठी मला भेटायला आली असती .. पण एकदाही ती तो जिना चढली नाही यावरून हेच सिद्ध होते कि तिचं तुझ्यावर प्रेम जास्त आहे'

ओम " बाबा .. मी तुम्हला पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा पासून मी तुम्हाला हेच सांगतोय कि आपण दोघेही तिला महत्वाचे आहोत .. तुम्ही तिला दोंघांपैकी एक का सिलेक्ट करायला भाग पाडताय .. आणि आता झाली आमच्या लग्नाला पण १० वर्ष झाली आता तरी राग विसरा आणि मला जावई म्हणून चांगल्या मनाने स्वीकारा .. "

बाबा " स्वीकारलं नसते तर लग्नच नसते लावले तुमचे मी "

ओम " हो  माहितेय तुम्ही आमचे लग्न लावून दिलेत पण  एका गैरसमजात किती वर्ष आमच्या पासून लांब राहिलात  प्राजक्ता तुमच्या पेक्षा माझ्यावर प्रेम जास्त करते .. अहो बाबा नवरा आणि बाबा यातले कोणी एक नाव घेऊन ती कसे सांगेल .. याचा विचार करा ना जरा .. "

प्राजक्ताच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या  होत्या

प्राजक्ता " हो ना बाबा .. प्लिज विसरा  ना राग.. आणि मला घरी घेऊन चला .. मला एक रात्र तरी माहेरी राहू द्या .. " आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते .

बाबा " बरं बरं .. आता मी कबूल  केलय कि तुझे ओम वर जास्त प्रेम आहे तरीही तू येऊ शकतेस माहेरी .. "

ओम "अहो पुन्हा तेच .. नाहीये असे .. आता हा तराजू कुठून आणायचा .. कि तिचे झुकते माप कुठे आहे ? आणि हसायला लागतो .

बाबा " प्राजक्ताच्या डोक्यावरून  हात फिरवतात आणि तिला म्हणतात .. " प्राजु .. तुला एक सांगू का .. तुझी चॉईस खूप चांगली आहे .. ओम सारखा जावई मला शोधून सापडला नसता .. "

ओम " ते तर आहेच .. " आणि दोघांनी एकमेकांची पुह्ना एकदा गळाभेट घेतली .

शेवटी जाता जाता  आनंदाने बाबा " प्राजु पण तरीही तुझे माझ्यापेक्षा ओम वरच जास्त प्रेम आहे ..

ओम " आता काय ?

बाबा " हो म्हणजे तिने माझ्या ताटात कमी वाढले होते सुरुवातीला कारण तुला खाताना जास्त त्रास होऊ नये म्हणून .. हो कि नाही .. "

प्राजक्ताची चोरी बाबांनी बरोबर पकडली होती .. ती पण अशी लाजून आता पळाली ना ..

आई " मग आता दोन दिवस राहायला ये .. काय ? जावई बापू .. तुम्ही पण या "

अशा पद्धतीने प्राजक्ताचे चे भावनिक बंध जे तिला मोकळं होऊ देत नव्हते ते सुद्धा आज मोकळे झाले होते .

ओम आई बाबांना स्वतः त्याच्या गाडीने त्यांना घरी सोडायला गेला  . प्राजक्ता किचन आवरून मुलांना झोपवून बेडरूम मध्ये आली ..

प्राजक्ता आई ने दिलेली पैठणी खांद्यावर टाकून बघत होती तोच ओम आला

ओम " अरे वाह .. छान आहे साडी .. आता हि  साडी तू पुरस्कार घेताना नेस "

प्राजक्ता " नाही नको .. तू घेणार आहेस ना मला एक पैठणी पुरस्करांसाठी .. हि मी नंतर नसेन कधीतरी .. कारण तू आधी बोलला होतास कि तू मला पुरस्कारासाठी पैठणी घेणार आहेस म्हणून .. "

ओम " अरे .. मीच सांगतोय ना .. मी तुला पुढल्या सत्काराच्या वेळी घेईन .. ह्या पुरस्कराला हीच नेस आई  वडिलांचा आशीर्वाद म्हणून "

प्राजक्ता " नक्की का ? नाहीतर आता बाबांचा राग गेलाय तर तू रुसून बसशील "

ओम " मी रागावणार नाही .. कारण मला माहितेय तुझे माझ्यावर जास्त प्रेम आहे ते .. आणि हसू लागला ..

प्राजक्ता त्याला कोपरा पासून हात जोडते .. आणि हसायला लागते .

🎭 Series Post

View all