शुभारंभ भाग २८
क्रमश: भाग २७
ओम " ठीक आहे मग मी पण निघतो मला ऑफिस ला जायचेय ."
डायरेक्टर " हो चालेल .. अजून एक विषय बोलायचा होता ... आपल्या शाळेच्या आर्ट गॅलरीचे ऑफिशिअल उदघाटन करायचं आहे . तर हि आर्ट गॅलरी तर प्राजक्ता मॅम नेच बनवली आहे तर आर्टिस्ट म्हणून त्यांचा सत्कार जे कोणी गेस्ट येतील त्यांच्या कडून करायचा असा विचार प्रिंसिपल मॅम ने सुचवला आहे . आणि आता तर त्या डिझर्व करतात सत्कार करण्यासाठी . साधारण या महिन्याच्या २५ तारखेला आपण ह्या आर्ट गॅलरी चे उदघाटन करणार आहोत त्या दिवशी त्यांचा सत्कार पण आपण करू . "
ओम " ठीक आहे .. मी तिला कल्पना देऊन ठेवतो .. तिला ना अजून याची सवय नाहीये ..कसे आहे ना लग्न झाल्यनंन्तर १० वर्ष ती घरातच होती आणि आता अचानक काम करायचा निर्णय तिने घेतला . तिच्यातल्या कलाकाराला अजून अशा सत्काराची , पुरस्काराची सवय झाली नाही .. त्यामुळे ती तयार होईल कि नाही मी सांगू शकत नाही "
डायरेक्टर " तेच तर मी तुम्हाला सांगतोय .. मी सांगितले तर त्यांना वाटेल कि मी हे मुद्दामून करतोय .. त्यांना कसे समजावयाचे ते तुम्हीच बघा आता "
ओम " ठीक आहे .. मी बघतो .. "
डायरेक्टर सर " आर्ट गॅलरी च्या कामाचा मोबदला पण त्यांनी अजून घेतला नाहीये . त्यांनी अजूनही मला कॉस्ट सांगितली नाहीये "
ओम " हमम.. कदाचित त्याचे पैसे पण ती घेणार नाही कारण हे काम तिने शाळे साठी केलय "
डायरेक्टर सर "ओम हा व्यवहार आहे त्यांनी या कामासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि हे मी स्वतः डोळ्यांनी पहिले आहे . त्याचा मोबदला त्यांनी घ्यायला पाहिजे "
ओम " ठीक आहे मी बोलतो हे सर्व विषय तिच्याशी आणि तुम्हला कळवतो "
डायरेक्टर " अजून एक .. हि मागे फ्रेम ची जागा रिकामी आहे ती भरायची आहे मला .. एखादे पेंटिंग जर मला विकत द्यावेसे वाटले तर बघा .. आणि हसायला लागले "
ओम मनात "साल्या !(बायकोचा भाऊ या नात्याने ) हे पहिल्या वेळीच बोलला असतास ना तर प्राजक्ताने तुझ्यासाठी खास एक पेंटिंग तयार करून दिले असते "
ओम " तुम्ही साईट वर बघा तुम्हला कोणते हवे आहे ते त्यातले ओरिजिनल मी आणून देतो "
डायरेक्टर " आमच्या बहिणीला च्या मनात असे तरच द्या .. नाहीतर नको "
ओम नुसताच हसतो आणि निघून जातो
डायरेक्टर ने सगळे राहिलेले विषय आज ओम शी बोलून क्लीअर केले होते . त्यामुळे ओम पण जरा रिलॅक्स झाला होता . आता त्याला प्राजक्ताला हळू हळू समजावून सांगावे लागणार होते .
संध्याकाळी घरी आल्यावर झोपण्यापूर्वी
ओम " प्राजक्ता उद्या आपण बाजारात जाऊ आणि तुझ्यासाठी छान पैठणी घेऊन येऊ .. तुझ्या पुरस्काराच्या दिवशी ती तू घाल . "
प्राजक्ता " मी जाणार नाहीये त्या पुरस्कराला .. मला नकोच आहे तो पुरस्कार "
ओम " ऐक ना .. प्राजु मी त्याच्याशी आज नीट आणि डिटेल मध्ये बोललोय .. तसा माणूस म्हणून तो चांगला आहे .. त्याने त्याच्या चुका पण मान्य केल्यात . त्याला तू नाही तुझ्यातला कलाकार आवडतो "
प्राजक्ता " पण तो कलाकार माझ्यातच आहे ना "
ओम " अरे तो म्हणाला मला तू त्याला बहिणी सारखी आहेस म्हणून "
प्राजक्ता " पण मला तो भावासारखा नाही वाटत ना "
ओम " मी कसा वाटतो ?"
प्राजक्ता " तो डायरेक्टर आहे तर त्याने डायरेक्टर सारखेच वागावे ना "
ओम " हो पण त्याला तुझ्यात बहीण दिसली तर तो तरी काय करेल?
हे बघ कसे आहे ना प्राजक्ता त्याचाशी आज मी खपु मन मोकळे पणाने मुद्दामून बोललो . मला तरी वाटत नाही कि त्याच्या मनात तुझ्या विषयी आदर व्यतिरिक्त काही आहे . तो तुझ्या कलेवर भारावून गेला असे त्याने क्लीअरली मान्य केले . आणि असे होते कधी कधी . त्यात मी त्याचा इगो दुखावला .. आज तो करोडोमधे खेळत असेल तर मी त्याला फ्रेम चे पैसे देतो असे म्हटल्यामुळे त्याला राग आला . आणि ते पेंटिंग ती नोकरी सोडतेस हे समजल्यावर तो घरी पाठवणार होता तेवढ्यात त्याला हि कल्पना सुचली . आणि शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे अशा गोष्टींची माहिती त्यांना लवकर मिळते . "
प्राजक्ता " तरीपण पुरस्कराला माझे पेंटिंग पाठवताना माझी परवानगी त्याने घयायला पाहिजे होती ना .. असे आपल्या अपरोक्ष फ्रेम बनवणे , किंवा पुरस्काराला पाठवणे रास्त आहे का ? आणि माझा हा प्रश्न आहे कि इथे मी नसते दुसरी कोणीतरी असती तर हि अशी मदत तिला केली असती का त्याने ? नाही ना .. मग मला का ?"
ओम " बरोबर आहे तुझे .. मी त्याला बोललो पण काही गोष्टी तुमच्या कडून चुकल्यात .. त्यावर तो म्हणाला मला त्या बहिणी सारख्या आहेत म्हणून केले ."
प्राजक्ता " पण मला असा भाऊ नकोय .. मला मान्य नाही "
ओम " हे बघ .. माणूस म्हणून तो माणूस नक्कीच चांगला आहे .. आपले कर्म चांगले असले ना कि देव पण कोणा कोणाच्या रूपाने येऊन मदत करत असतो फक्त आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा आपण करावा लागतो . अथक प्रयत्न करावे लागतात . तसेच हा हि एक देवांनी पाठवलेली मदत आहे असं समजायचे . कसे आहे त्याने वशिला लावून तुला हा पुरस्कार मिळवून दिलेला नाहीये .त्याने फक्त तिकडे नामांकनासाठी पाठवले होते . त्यामुळे मुळात हा अवॉर्ड तुला त्याच्या मुळे मिळालाय हे आधी डोक्यातून काढून टाक . हा अवॉर्ड तुला तुझ्या अद्भुत कलेमुळे मिळालाय . त्याने मदत तर नक्कीच केलीय .कारण योग्य वेळी , योग्य ठिकाणी ते पोहचणे गरजेचे होते . जसे तू मला म्हणालीस कि घरात पेंटिंग राहिले असते तर कोण कुत्रा विचारणार आहे तसेच आहे हे पण.
हे बघ जसे मी यु ट्यूब चॅनल काढले आणि रेडिओ चा अवॉर्ड मिळाला तसेच ह्याने तिकडे पाठवले म्हणून हा अवॉर्ड मिळाला . आणि तुला सांगतो इथून पुढे तुला असे अनेक अवॉर्ड्स घ्यायचे आहेत .. "
प्राजक्ता " पण आपल्याला न सांगता का पाठवले त्याने ?"
ओम " हे तू त्याला विचार .. मला म्हणाला कि त्याला प्रूव्ह करायचे होते कि हे पेंटिंग जे त्याला खूप आवडले होते ते खूपच अद्भुत आहे आणि ते नुसते तुमच्या बेडरूम मध्ये ठेवण्यासाठी नाहीये .. यासाठी त्याने हे आपल्याला न विचारता पाठवले . कदाचित त्याने आपल्याला विचारल्यावर आपण नका पाठवू हे आमचे पर्सनल पेंटिंग आहे असे सुद्धा बोललो असतो "
प्राजक्ता " हो मग तसेच आहे ना .. हे मी फक्त तुझ्यासाठीच काढले होते ना "
ओम " तेच तर तो सांगतोय कि हे जरी तू माझ्यासाठी काढलेस तरी एक अप्रतिम कलाकृती ला घरात ठेवण्याचा आपला निर्णय चुकीचा आहे असा त्याचा मुद्दा आहे . "
प्राजक्ता " मला काही कळत नाहीये .. मी काय करु ?"
ओम " काही करू नको .. तो आता तुला बहीण म्हणतोय ना मैत्रीण तर नाही म्हणत आहे ना " आणि हसायला लागतो
प्राजक्ता ओम वर चिडून उशी फेकून मारते .. " जा मी तुझ्याशी बोलणारच नाही "
ओम " सॉरी .. सॉरी .. अग मुद्दाम बोललो .. आता तू एक थोडी विचारांनी पण लिबरल बनावेस म्हणून म्हटले "
प्राजक्ता " काय करू लिबरल बनून .. माझे अंतिम ध्येय स्वतःच्या पायावर उभे राहणे हे आहे .. ना कि असे अवॉर्ड्स मिळवणे .. हे मिळवून प्रसिद्ध होण्याची हौस मला नाहीये तुला कळतंय का ? जे मला नकोय ते मला देण्याचा अधिकार कोणी दिला "
ओम " हा ..आता हा मुद्दा तुझा बरोबर आहे .. पण मला सांग हे अवॉर्ड्स कशा साठी असतात . तर तुमच्या कलेला दाद देण्यासाठी असतात . त्याला एक रेकग्निशन मिळावी म्हणून असतात . सिम्पल सांगतो कि मी सलग १०वर्षे एकाच कंपनीत काम केले म्हणजे कंपनीवर उपकार केला का ? तर नाही ? पण एकाच कंपनीत ते हि प्राइवेट कंपनीत सहसा लोकं इतके वर्ष टिकत नाही.. आणि मी टिकलो हे माझे काहीतरी वेगळेपण मी सिद्ध केले म्हणून कंपनीने माझा सत्कार केला .. यातून काय झाले तर मला अजून चांगले काम आणि अजून नव्या उमेदीने काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली . तसेच आहे हे अवॉर्ड्स देण्याचे काम जेवढे जास्त पुरस्कार मिळतात तेवढा तुमचं रेकग्निशन as a आर्टिस्ट होणार .. आणि तेवढीच च छान कला तुम्ही सादर करणार . its या पार्ट ऑफ लाईफ . मुलांचे शाळेत कोणत्याही स्पर्धेत नंबर का काढतात ? तर तुमच्या कामाचा दर्जा किती आहे यांचे ते मूल्यांकन असते . नंबर आला नाही याचा अर्थ अजून खूप मेहनत करावी लागणार आहे आणि पहिला नंबर आला म्हणजे अजून जवाबदारी वाढली कि हि कला अजून कशी चांगल्या पद्धतीने जोपासायची किंवा अजून जिल्हा स्थरा वरून राज्यस्थर , राज्यस्थरावरून नॅशनल लेव्हल वर न्यायची . आणि त्यानंतर सुद्धा थांबत नाही इंटरनॅशनल लेव्हल वर सुद्धा पोहचू शकतेस तू .. अभि तो शुरुवात है मेरी जान "
प्राजक्ता " बापरे ओम मला नाही हे करायचंय सगळे "
ओम " मग काय सगळी पेंटिंग काढून तू म्हणालीस तसे घरात प्रदर्शन मांडायचेय ?" आता आपल्याला एक दिशा मिळालीय . साइड बाय साइड तुझे क्लास चालू ठेव . बघ सारंगधर सरांचा आशीर्वाद त्यांनी मरणोत्तर सुद्धा तुला क्लास ला जागा देऊन गेले . सगळे प्रश्न आपोआप सुटू लागलेत . आता डायरेक्टर सरांना तू माफ करून टाक आणि मिळालेल्या यशाचा स्वीकार कर . आता अजून असे बरेच सत्कार समारंभांना जायचे आहे तुला ..हाच खरा तुझ्या करिअर चा शुभारंभ आहे "
बोलता बोलता प्राजक्ता ओम च्या कुशीत शिरली.
ओम “तुला ते गाणं माहितेय का ? तू अशी जवळी रहा .. “आणि त्याची मिठी त्याने अजून घट्ट केली आणि मोबाइल वर हे गाणे लावले
(जमलं तर गाणे वाचण्यापेक्षा एकदा आता ऐका म्हणजे माझ्या लिह्तानाच्या भावना पूर्ण पोहचतील .)
शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा
तू अशी जवळी रहा
मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला?
मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला?
तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला
तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला
अंतरीचा गंध माझा
अंतरीचा गंध माझा आज तू पवना वहा
तू असा जवळी रहा
तू असा जवळी रहा
लाजर्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा
लाजर्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा
तू अशी जवळी रहा
शोधिले स्वप्नांत मी ते एकरी जागेपणी
शोधिले…
अरुण दाते यांच् हे अजरामर गाणे ऐकताना दोघे एकमेकांत विरघळून गेले.
प्राजक्ताच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते .. आनंद , प्रेम , नवीन प्रवासाचा शुभारंभ होण्याच्या भीती चा काहूर तिच्या मनात होता आणि ओम तिला स्पर्शातून जणू सांगत होता " घाबरू नकोस .. मी आहे तुझ्या आणि तुझ्याच बरोबर .. " एका गृहिणी च्या वाटा जेव्हा बदलतात तेव्हा तिची मनस्थिती अजून काय वेगळी असणार !!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा