Login

शुभारंभ भाग २७

in this part prajktas painting has been selected for the Govt Award

शुभारंभ भाग २७

क्रमश: भाग २६

अभिनंदन !

" सौ. प्राजक्ता ओम .... तुमचे पेंटिंग  महाराष्ट्र राज्य कला अकादमी तर्फे निवड  मंडळाकडून निवडलं गेलं आहे आणि त्या बद्दल तुम्हला या वर्षीचा महाराष्ट्र राज्य चित्रकला अकादमी चा पुरस्कार जाहीर केला आहे . तरी तुमचे हे पेंटिंग आमच्या  या  वर्षीच्या पुस्तकाच्या कव्हर पेज वर झळकेल आणि त्याचे कॉपीराइट्स सदैव तुमच्याकडेच राहतील .

हा पुरस्कार म्हणजे मानाचे सर्टिफिकेट + १००००० रुपयांचे रोख बक्षीस आपल्याला मिळेल .

वरील पुरस्कार हा माननीय मिसेस मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे .तरी आपण आपल्या कुटुंबासह हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत्या १० तारखेला हजर राहावे

कार्यक्रमची रूपरेषा आणि वेळ आणि ठिकाण खालील प्रमाणे आहे . “

ओम ने नॉन स्टॉप प्राजक्ताला आणि आईला ते लेटर वाचून दाखवले .

ओम " वॉव प्राजक्ता , ग्रेट सही .. अभिनंदन ! तुला महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळणार आहे .. "

प्राजक्ता " थँक यु.. पण ओम तू कोणते पेंटिंग पाठवले होतेस ?"

ओम" मी कुठे पाठवले ?.. मी नाही पाठवले .. मला वाटले तू पाठ्वलेस "

प्राजक्ता " छे ! मी कुठे ? आणि पाठवलच तर तुला सांगीतलंच असते ना "

ओम " मग ? कोणी ? आणि कोणत्या पेंटिंग या हा अवॉर्ड मिळालाय ? काहीच कळत नाहीये "

प्राजक्ता " ओम .. हे नक्की मलाच आहे ना .. नाहीतर चुकून आपल्याला पाठवले कि काय कोणी ?"

ओम " अरे .. असे कसे होईल .. यावर  क्लीअरली तुझे नाव आहे "

प्राजक्ता " मग कदाचित सारंगधर सरांनी पाठवले असेल "

ओम " असेल सुद्धा .. काही सांगू नाही शकत .. आता उशीर झालाय .. मी उद्या या नंबरवर फोन करून विचारतो कि कोणत्या पेंटिंग ला अवॉर्ड देत आहेत आणि कोणी तुम्हाला पाठवले ते "

प्राजक्ता " ओके .. "

दुसऱ्या दिवशी प्राजक्ता शाळेत गेली तेव्हा प्रिंसिपल मॅम नि तिचे अवॉर्ड मिळाल्या बद्दल अभिनंदन केले .

 प्राजक्ता " थँक यु मॅम .. पण तुम्हाला कसे कळले ?"

प्रिंसिपल मॅम " ते तुमचे राधा कृष्णाचे पेंटिंग डायरेक्टर सरांनी या पुरस्करा साठी पाठवले होते . पाठवायच्या आधी त्यांनी मला सांगितले होते . काल  तुम्हाला लेटर आले ना ते डायरेक्टर सरांनीच पियुन तर्फे घरी पाठवले होते कारण सरांनी शाळेचा ऍड्रेस दिला होता तर लेटर शाळेत आले . "

हे सगळे ऐकून प्रजक्ताचा मूडच गेला . काय गरज होती त्या डायरेक्टर ला माझ्या या पेंटिंगला पुरस्कारासाठी पाठवायची आणि तेही पुन्हा मला न विचारता .

प्रिंसिपल मॅम " काय ग .. तुला आनंद नाही झाला का ? अग प्रेस्टीजिअस अवॉर्ड आहे हा .. यु आर सिम्पली ग्रेट प्राजक्ता ! आय एम सो हैप्पी फॉर यु "

प्राजक्ता " थँक यु .. मॅम "

ओम ला कळले कि हा शहाणपणा सारंगधर सरांनी नाही तर डायरेक्टर सरांनी केलाय तर त्याला मुळीच आवडणार नाही याची कल्पना प्राजक्ताला आली होती . तिने कसे  बसे  तिचे लेक्चर उरकले आणि घरी जायला निघाली

प्रिंसिपल मॅम " प्राजक्ता , थोडा वेळ थांबून जा .. आता डायरेक्टर सर येतीलच .. यु शूड थँक हिम "

प्राजक्ता " हो मॅम .. मला नक्कीच आवडले असते .. पण घरी जरा प्रॉब्लेम झालाय .. माझ्या सासूबाईंची तब्बेत बिघडली आहे तर मी सरांना उद्या भेटेन .. चालेल का ?"

प्रिंसिपल मॅम " हो .. ठीक आहे .. "

प्राजक्ता तिकडून घरी आली .. पण तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते .. नको होता हा अवॉर्ड तिला .. नको हो होता त्या डायरेक्टर सरांच्या मदतीने मिळालेला अवॉर्ड . उपकार करायचे आणि लोकांना आपल्या कडे नमते करायचे हि अशी खेळी खेळली काय त्यांनी माझ्या बरोबर असेच तिला वाटत होते . त्यांच्या मुळे अवॉर्ड मिळाला म्हणजे मग मी आपोआपच त्यांची ऋणी होईन .. असे नको नको ते विचार तिच्या मनात येऊ लागले होते ..

ओम ने ठरवल्या प्रमाणे त्या लेटर वर च्या नंबर वर कॉल केला आणि विचारून घेतले कि खरच अवॉर्ड मिळालाय का ? कोणत्या पेंटिंग ला मिळालाय ?त्याला  इतकेच कळले कि राधा कृष्णाचे जे पेंटिंग ओम साठी प्राजक्ताने काढले होते त्या पेंटिंग ला हा अवॉर्ड मिळालाय .

ओम ने प्राजक्ताला फोन करून सांगितले " अग , त्या राधा कृष्णाच्या पेंटिंग ला अवॉर्ड मिळालाय हे कन्फर्म आहे पण हे पेंटिंग त्यांना कोणी पाठवले याचे काही डिटेल्स नाहीयेत त्यांच्याकडे "

प्राजक्ता " मरूदे दे तो अवॉर्ड .. मला नकोय तो .. "

ओम" काय झाले आता ? तू नुसती चिडचिड करतेस ? एवढा चांगला प्रेस्टीजिअस अवॉर्ड तुला मिळालाय तरी तुला आनंद होत नाही म्हणजे काय म्हणायचे ?"

प्राजक्ता " कारण मला कळलय हे पेंटिंग कोणी तिकडे पाठवलंय ते "

ओम " मला डाऊट आलाच होता .. जाड्या ने ना .. कारण हा अति शहाणपणा तोच करू शकतो "

प्राजक्ता " हो ना .. काय गरज काय आहे त्यांना ..त्यांचे धंधे नाहीयेत का त्यांना ? स्वतःच्या बायकोला मिळवून द्यायचं होता ना .. शी ओम मला जाम राग येतोय .. आपण त्या ऑफिस ला फोन करून सांगून टाकू कि हा अवॉर्ड मला नकोय म्हणून "

ओम " वेडी आहेस का ? अग .. काही पण असो त्याने काम चांगले केले .. मला माहित असते तर मीच पाठवले असते . हा अवॉर्ड मिळवायला खूप लोकं तळमळतायत . तुला तुझ्या कलेमुळे मिळाला आहे .. त्यात त्याचा काही वशिला नाहीये .. त्याने फक्त नामांकनाला पाठवले .. आपण त्याला जाऊन भेटून त्याचे आभार मानून येऊ "

प्राजक्ता " हेच तर स्वतःची किम्मत वाढवण्यासाठी असे आपल्यावर उपकार केलेत त्यांनी . मी काही येणार नाही त्याला भेटायला .. "

ओम " ठीक आहे .. मी जाऊन त्याला एकटाच भेटून येईन .. नक्की त्याचे काय म्हणणे आहे ते तर बघून येतो .. "

प्राजक्ता " काही नको ओम .. मी हि शाळाच सोडून देते .. आणि हा अवॉर्ड पण परत करू आपण . पुढल्या वर्षीच्या अवॉर्ड ला तू पाठव पेंटिंग आणि मग मिळाला तर मिळाला . मला काही हौस नाहीये अवॉर्ड मिळवण्याची "

ओम" थांब ग .. काय उगाच टोकाची भूमिका घेतेस .. तुझा वेल विशर आहे तो "आणि हसायला लागला

प्राजक्ता " ओम .. या विषयावर तू जोक मारलास ना .. तर .. तुझी काय खैर नाही आधीच सांगून ठेवते "

ओम" ठीक आहे .. सॉरी .. पण मी भेटणार आहे त्याला . "

दुसऱ्या दिवशी ओम ऑफिसला उशिरा जाणार होता म्हणून सकाळीच डायरेक्टर ला भेटायला आला. डायरेक्टर च्या केबिन मध्ये त्याच्या चेअर च्या मागे जे पेंटिंग लावले होते ती जागा आता रिकामी होती .

हे ओम च्या लगेच लक्षात आले. ओम आता मुद्दामून त्याच्या विषयी मनात कोणतेही किल्मिष न घेता गेला होता .

ओम  डायरेक्ट त्यांच्या केबिन मध्ये गेला त्यांना शेकहॅण्ड करून " थँक यु .. फॉर एव्हरीथिंग .... "

डायरेक्टर " मिस्टर ओम , काँग्रॅच्युलेशन्स !तुम्हला आणि प्राजक्ता मॅम ला .”

ओम "थँक यु... हे तुमच्या मुळेच झालेय पण .. "

डायरेक्टर " तुमच्या फेव्हरेट पेंटिंगला असे नामांकनाला  पाठवले तुमच्या अपरोक्ष तुम्ही मागच्या वेळी सारखे चिडला नाहीत "

ओम " हसायला लागला .. मला वाटतंय तुम्हीच आमच्यावर चिडलेले दिसत आहेत .. खरं सांगायचे तर तुम्ही माझ्याच वयाचे आहात आज जरा मोकळ्या गप्पा मारतो . प्राजक्ताने हे पेंटिंग मला गिफ्ट म्हणून काढले होते आणि आमचे असे ठरले होते कि हे आम्ही आमच्या बेडरूम मध्ये तिच्या आणि  माझ्या प्रेमाचे प्रतीक म्हणून लावायचे . आणि नेमके हेच पेंटिंग तुम्हाला खूप आवडले आणि तेव्हा तुम्ही ते न सांगता फ्रेम करून घेतलेत .. त्यामुळे आम्ही दोघेही डिस्टर्ब् झालो होतो "

डायरेक्टर "  दुसऱ्या आठवड्यात जेव्हा मला कळले कि प्राजक्ता मॅडम आता घरातूनच आर्ट गॅलरीचे काम करत आहेत तेव्हा मी हे पेंटिंग घरी पाठवणार होतो पण मला तुम्ही फ्रेम च्या  खर्चाचा चेक देतो असे म्हणाल्या ने  खूप राग आला होता ... मग मी ते आर्ट गॅलरी मध्ये शिफ्ट करायचा विचार केला .. नंतर असे वाटले कि शाळेच्या आर्ट गॅलरीत हे पेंटिंग शोभणार नाही .. तेवढ्यात मला हि कल्पना सुचली आणि मुद्दामून मी  हे  आवडीचे पेंटिंग तिकडे पाठवले .. म्हटले बघू तर माझी झोप उडवणारे हे अद्वितीय पेंटिंग  ला पुरस्कार मिळतोय का आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे . "

प्राजक्ता मॅम ला  आणि तुम्हांला माझ्या विषयी काही गैरसमज नसावा .. मी त्यांच्यातल्या आर्टिस्ट वर खूप भारावून गेलो होतो .. बाकी काही नाही .. त्यांचे वागणे खरोखरच सात्विक आहे हे मी त्यांना बोललो त्या नंतर त्यांनी नोकरी सोडायचा निर्णय घेतला म्हणून विचारले "

ओम" हो .. का .. सॉरी यातलं मला काहीच माहित नाही .. मला ती म्हणाली तिला  स्वतःचे क्लास सुरु करायचेत म्हणून ती सोडतेय म्हणून .. आणि तशीही अजूनही सकाळी टेम्पररी टीचर म्हणून रोज येतच कि .. तिला जे आवडते  मी तिला करून देतो "

डायरेक्टर " आणि एक .. मला त्या माझ्या बहिणी सारख्या आहेत .. त्यांच्या सारख्या सात्विक बाईकडे बघून कोणालाच कधी वाईट विचार येणार नाहीत .. हा विश्वास तुम्हाला असला पाहिजे .. तेव्हा त्यांना येईल .. असो मला आज हा विषय माझ्याकडून क्लिअर करायचा होता .. म्हणून मी स्पष्टच बोललो .. "

ओम " मला विश्वास नसता तर मी तिला बाहेर पाठवलेच   नसते . स्वतःपेक्षा जास्त माझा तिच्यावर विश्वास आहे .. काही गोष्टी तुमच्या कडून पण चुकल्या " एक म्हणजे स्टाफ म्हणजे स्टाफ असतो .. त्यात बहीण किंवा इतर कोणतेही नाते नसावे .. आज माझ्या टीम मध्ये ६ लेडीज आहेत . ४ मॅरीड आहेत आणि २ अनमॅरिड आहेत . मी त्यांना कमी लेखून एक्सट्रा मदत पण करत नाही कारण त्यांना ते फेवर करतोय असे वाटते किंवा लेडीज आहेत म्हणून कामात कमी , किंवा थोडी काळजीने पण बोलत  नाही.. त्यांना ते आवडतच नाही .. तुम्ही प्राजक्ता ला  इतर स्टाफ पेक्षा  वेगळी ट्रीटमेंट देता हेच तिला आवडले नव्हते .. कारण तुम्ही मनातून तिला बहीण म्हणत असाल हो.. हे तुम्ही आता मला सांगितलेत .. आज कोणी अजून दुसऱ्याने पहिले तर ते काय म्हणतील याचा विचार केलात का ? प्राजक्ता ला तिला नक्की काय हवंय हे तिला पक्के माहित होते .. ज्यांना माहित नाही त्या पायवाटेवरून घसरू पण शकतात . असो आजचा दिवस खूप चांगला आहे .. तुमच्या मुळे माझ्या बायकोला हा अवॉर्ड मिळाला आहे तर हा क्लिष्ट विषय आता पण थांबवू या .. तुम्ही भावा  प्रमाणे तिच्या चांगल्याच च विचार केला हे तिला नक्की सांगा तुम्ही सांगा .. आणि बघा ती काय म्हणते ते.. "

तेवढ्यात प्राजक्ता तिथे जरा टेन्शन मधेच आली तिला वाटले कि आता ओम ची आणि डायरेक्टर ची पुन्हा वादावादी होते कि काय ?

ओम " अरे वाह प्राजक्ता .. तू इथे आलीस ..  सर  मला विचारत होते कि तू त्यांच्यावर रागावलीस का ?"

प्राजक्ता " ओम .. मी फक्त बघायला आलेय कि तुम्ही भांडत तर नाही ना .. कारण मी तुला चांगलीच ओळखते आणि आता बहुदा सरांना पण "

डायरेक्टर " प्राजक्ता मॅम , अहो आम्ही आता फ्रेंड्स आहोत "

ओम" नाही ग .. फ्रेंड्स नाही हे माझे साला बनलेत .. आणि जोर जोरात हसायला लागला .. "

डायरेक्टर एकदम हडबडला  आणि प्राजक्ताला असे वाटले कि हा मुद्दामून चान्स घेतोय कि काय ?"

डायरेक्टर ने प्राजक्ताला आत मध्ये बसायला बोलावले आणि सांगितले

डायरेक्टर " ,मॅम .. बहुदा माझे वागणे तुम्हाला खटकले असे वाटते .. पण मी तुमच्याशी जे वागलो ते फक्त तुमच्यातल्या कलाकाराला मान देण्यासाठी .. तुमची कला काय लेव्हल ची किंवा एखादे अप्रतिम पेंटिंग हे चार भिंतीत लावून ठेवण्या साठी नक्कीच नाहीये हेच मला प्रूव्ह करायचे होते त्यामुळेच मी हे पेंटिंग पुरस्कारलाच्या नॉमिनेशन ला पाठवले आणि बघा तुम्हला एवढा मोठा अवॉर्ड मिळाला .. त्यांबद्दल तुमचे अभिनंदन ! .. बाकी मला तुम्ही माझ्या बहिणी सारख्या आहेत मनात काही गैरसमज नसावा "

प्राजक्ता तरीही काहीच बोलली नाही .. आणि निघून गेली

ओम " सर तुम्हला माहित नाही .. हे कलाकार लोक फार मुडी पण असतात "  आणि हसू लागला ..

🎭 Series Post

View all