Dec 03, 2020
स्पर्धा

शुभारंभ भाग २६

Read Later
शुभारंभ भाग २६

 

शुभारंभ भाग २६

 

क्रमश: भाग २५

 

 

प्राजक्ता " ओम .. मी नाही आले तर नाही चालणार का ? मी अशा पार्टीत सूट होणार नाही आणि अश्या ड्रेस मध्ये तर नाहीच नाही .. उगाच तुझा पचका माझ्यामुळे नको होयला . "

 

ओम "चल ना .. प्राजु .. खूप छान दिसेल तू घालून तर बघ . किती शोधून ड्रेस आणलाय . नेक ,बॅक , आणि कुठेही ट्रान्सपरंट नाहीये सगळ्या गोष्टी चेक करून आणलाय .. आधीच नायरे लावतेस यार "

 

प्राजक्ता " अरे चिडतोस काय ? मी कधी  घातलेत का असे ड्रेस ?"

 

ओम " मग घाल ना ..तू घालून तर बघ ..  तिकडेच मॉल मध्ये जाऊन यावर मॅच सॅन्डल घेशील . सॅन्डल मात्र असे घे कि त्यात तुला ४ तास उभे रहायला लागले तरी त्रास होणार नाही . तसाही ड्रेस लॉन्ग आहे त्यामुळे हिल्स वगैरे नसल्या तरी चालतील पण एकदम साधी नको घेऊस .. पार्टी वेअर  घे "

 

प्राजक्ता " ठीक आहे "

 

ओम ने मुद्दामून त्याचा सत्कार आहे हे तिला सांगितले नाही . स्वतःला पण नवीन ब्लेझर घेऊन आला होता .

 

दुसऱ्या दिवशी प्राजक्ता त्या लाल ड्रेस मध्ये लाल परी होऊन पार्लर च्या बाहेर पडली .. त्या पार्लर वालीने ने ऑफिस पार्टी च्या हिशोबाने तिला मस्त एलिगंट तयार केली होती . त्यावर एक गोल्डन cluch घेऊन प्राजक्ता लाजत लाजतच बाहेर आली

elegant long sleeve modest fashion ladies women bridesmaid 2016 girls winter dress with sleeve dresses party gowns B2826|dress africa|dresses indiadress top - AliExpress

 

इकडेओम एकदम खटाखट  ब्लेझर टाय मस्त तयार होऊन रेडी  होऊन पार्लर च्या बाहेर तिची वाट बघत उभा होता . दोघेही एकमेकांना बघून एकमेकांत हरवून गेले . दोघे एकमेकांकडे बघून हसायला लागले .

जोडास जोड असे मस्त दिसत होते . ओम ने कार चे डोअर ओपन करून प्राजक्ताला बसवले आणि मग तो बसला

प्राजक्ता " ओम .. कसला भारी दिसतोयस तू ..  "

ओम " मग तुझ्या पुढे मी कमी नको दिसायला .. च्यायला लग्नात पण असा तयार नव्हतो झालो .. प्राजु .. कसली मस्त दिसतेस तू .. आज काही खरं नाही बाबा .. ऑफिस मध्ये सगळे तुझ्याकडेच बघणार आहेत .. तुझ्या एक लक्षात आले का ? रोज एक्सझरसाईज करून तू किती बारीक झालीस ते .. या ड्रेस मध्ये तर अजून लग्न झाले कि नाही अशी दिस्तेयस . "

 प्राजक्ता हो का .. खरच .. तुझ्यामुळे ओम . तू रोज माझ्यासाठी माझ्या बरोबर आलास आणि त्यामुळे मला एक्सझरसाईज करायची छान सवय लावलीस .  खरोखर त्याचा परिणाम मला दिसतोय ...

 

ओम " हो यार .. मी पण तो ऑफिस मधला एकाला कमी वयात अटॅक आली नंतर जरा घाबरलोच होतो . त्यामुळे मी सुरु केले होते . ..बाकी  आज एकदम परी दिसतेस . .. तुला सांगतो अजून ५ वर्षांनी प्रिया सेम  तुझ्या सारखीच  दिसेल . "

 

प्राजक्ता " हो ना .. आताच तिची उंची माझ्या खांद्या  पर्यंत आलीय . "

 

ओम " मग लोकांना प्रश्न पडेल ह्या दोघी बहिणी आहेत का मायलेकी ? आणि मला विचारतील तुम्हाला दोन मुली आणि एक मुलगा आहे का ? तुमच्या मिसेस कुठे गेल्या ? आणि हसायला लागला .

 

प्राजक्ता " काही पण काय ..  पण तरीही .. तू खूप छान आणि परफेक्ट ड्रेस आणला आहेस .. मला अजिबात ऑकवर्ड होईल असा नाहीये .. आणि तिने मेक अप पण खूप लाईट केलाय ना त्यामुळे मी खुश आहे .. “

बोल बोलता दोघे ऑफिस ला आले .. तिकडे एका मोठ्या हॉल मध्ये सगळ्या लेडीज रेड मध्ये आणि त्यांचे हजबंड क्रीम कलर च्या कॉम्बिनेशन मध्ये होते .. ओम आणि प्राजक्ताच्या नावाने टेबल बुक होते . तिकडे जाऊन दोघे बसले .

 

ओम चे बरेचसे फ्रेंड्स आजूबाजूला होते . ओम त्याच्या खास मित्रांशी प्राजक्ताची ओळख करून देत होता . त्यातच एक कपल उमेश आणि समीरा होते .

 समीरा " हाय प्राजक्ता .. यु आर लुकिंग ब्युटीफुल .. किती मस्त ड्रेस आहे ग ..परीच दिसतेस "

समीरा ने एकदम शॉर्ट वेस्टर्न ड्रेस घातला आणि ती हॉट दिसत होती . पण तिच्या हॉटनेस पुढे प्राजक्ताचे सात्विक रूप जास्त उजळून दिसत होते . बऱ्याच जणींनी शॉर्ट  ड्रेस घातले होते आणि हातात वाईन चे ग्लास घेऊन आपल्या नवऱ्या बरोबर फिरत होत्या . हे दोघे मात्र जे एका टेबल वर बसले ते बसलेच होते . ओम एक मिनिट तिला सोडून जात नव्हता . कारण मॅडम ला अशा पार्टीज ची सवय  कुठे होती .

तिथल्याच वेटर ने ओम ला ड्रिंक्स आणून दिले .. ओम ने आपले टेबल वर ठेवून घेतले दोन ग्लास कोण आले बोलायला कि तिला म्हणायचा ग्लास हातात घेऊन  बस म्हणजे कोणी घे घे असे बोलणार नाही ..

तेवढ्यात ओम चे डायरेक्टर . CEO अशी मोठी मंडळी आली आणि प्रोग्रॅम सुरु झाला . डायरेक्टर सरांनी भाषण करायला सुरुवात केली .  मग एकेकाचे नाव घेऊन स्टेज वर बोलवू लागले ..अचानक ओम चे नाव घेतले.

प्राजक्ता तर आनंदित तर झालीच पण आश्चर्य चकित झाली होती .ओम स्टेज वर गेला .. प्राजक्ता खूप खुश होती .. आणि टाळ्या वाजवत होती . ओम सारखेच १० जण होते त्यांना हा लॉन्ग सेर्विस आवर्ड देऊन त्यांचा सत्कार होणार होता .. सर्व १० जण पुढे उभे होते आणि आता CEO एकेकाला .. ट्रॉफी, सर्टीफिकेट देणार होता . तेवढ्यात ओम ने डायरेक्टर च्या कानात काहीतरी सांगितले ..

 डायरेक्टर ला ओम चे म्हणणे पटले असे दिसत होते .

डायरेक्टर ने लगेच अनाऊन्स केले कि " आज इथे पण आपल्या एम्प्लॉयीज चा सत्कार करणार आहोत तर त्यांच्या पार्टनर च्या सपोर्ट मुळेच हे त्यांना शक्य झाले म्हणून मी या सर्व एम्प्लॉईज च्या पार्टनर्स ला स्टेज वर आमंत्रित करतो .  टाळ्यांच्या कडकडाट मध्ये  प्राजक्ता मोठ्या दिमाखात  ओम च्या शेजारी येऊन उभी राहिली..प्राजक्ताच्या डोळ्यात ओम साठी आनंदाश्रू होते .. ती प्रेमाने ओथंबून वाहत असलेल्या डोळ्यांनी ओम कडे पाहत होती आणि त्याचा कालिजा खलास करत होती ..

 

ओम ने प्राजक्ताची डायरेक्टर  आणि CEO शी ओळख करून दिली आणि त्याला सांगितले कि " शी इज  माय वाईफ "

 

CEO " वेलकम मिसेस ओम . .. मिस्टर ओम यु आर लकी शी इज ब्युटीफुल "

 

ओम आणि प्राजक्ता दोघे एकमेकांकडे बघून हसले

डायरेक्टर " व्हॉट डॉ यु डू ?" प्राजक्ता कडे बघून बोलल्या मुळे  प्राजक्ताला आता बोलावेच लागणार होते

 

प्राजक्ता " सर , ऍक्टच्युअली आय एम अ  हाऊस वाईफ "

 

ओम " सर . एस शी इझ माय हाऊस मेकर .. बट आय  मस्ट सें शी इस आर्टिस्ट .. शी draw आर्टिस्टिक पेंटिंग्स .. शी अल्सो कंन्डक्ट क्लासेस .

 

ह्यावेळी प्राजक्तची  फक्त गृहिणी अशी जी ओळख होती त्यात एक आर्टिस्ट म्हणून मानाचा तुरा खोचला गेला होता  ती बोलायच्या आधी  तोच  तिची ओळख हौशीने करून देत  होता .

 CEO & डायरेक्टर " ग्रेट .. “

 

मग काय सत्कार झाला .. मग पार्टी .. नाचों , खाओ , पियो .. मस्त एन्जॉय चालू होता . दोघांचे एकमेकांवर प्रेम असले ना कि एकमेकांची  कंपनी एकमेकांना खूप होते .. बाकीचे कोणी आपल्या बरोबर असो किंवा नसो तसे ओम आणि  प्राजक्ताने खूप छान एकत्र वेळ घालवला .

 

समीरा समोर आली कि ओम मुद्दामून प्राजक्ताचा कोपरा पासून हात हातात घ्यायचा . बिचारी समीरा उमेश मधेच तिला एकटीला टाकून त्याच्या मैत्रिणी बरोबर जायचा आणि ती त्याला शोधत असायची ..

प्राजक्ताला पण कुठेतरी समीरा साठी खूप वाईट वाटत होते आणि तितकेच ओम वर प्रेम वाढत होते . बरयाचदा माणसाला आपल्या ताटात वाढलेले दिसत नाही . नेहमी दुसऱ्या च्या ताटातला मेनूच चांगला असे वाटते . तर इकडे तिकडे न बघता आपल्या ताटात जे आहे ते बघून जेवलेले चांगले असते . भले थोडेसे मीठ कमी असेल पण ते आपल्या ताटात आहे म्हणजे शंभर टक्के आपले आहे हे लक्षात आले पाहिजे . मीठ नसले तर वरतून टाकून त्याची चव वाढवता येऊ शकते .

तर अशा पद्धतीने ओम ने प्राजक्ताला त्याला जशी त्याला संधी मिळाली तशी मोठया दिमाखात ऑफिस च्या पार्टीत घेऊन गेला आणि प्राजक्ताला जे गेल्या वर्षी प्रश्न पडला होता कि माझी याला लाज वाटते कि काय तो मुद्दा पण सपशेल खोडून काढला होता . उलट अभिमानाने त्याने तिची ओळख सर्वांना  करून दिली होती आणि तिला त्याच्या बरोबर स्टेज वर पण घेऊन गेला होता ...

आज ओम ला कुठेतरी खरोखर प्राजक्ता जे काही म्हणत होती ते त्याला पटले होते . हि माझी बायको यावर प्रश्न संपत नाही . " तुम्ही काय करता हा उप प्रश्न लगेच समोर उभाच असतो आणि तो फेस करताना आज प्राजक्ता ला मी गृहिणी आहे हे सांगताना लाज वाटली नव्हती कारण तिला स्वतः पुरते महित झाले होते कि ती एक फक्त गृहिणी नाहीये .. आता ती काय करतेय हे जगाला सांगायची तिला गरजच वाटली नव्हती . तेवढ्यावर ती खुश होती . पण आज ओम ला ती गृहिणी तर आहेच पण अजून काहीतरी करतेय हे सांगताना थोडा जास्तीचा अभिमान तर नक्कीच वाटला होता .

शेवटी स्वतः स्वतःवर खुश असणे जास्त महत्वाचे आहे . आणि हि ख़ुशी आपल्याला कर्तृत्वातूनच मिळते . जेव्हा आपण आपल्या कुवतीचा उपयोग पुरेपूर करतो तेव्हाच हि मनाला शांती मिळते . नाहीतर आपलेच मन आपल्याला खात राहते कि मी वेळ असून काही करत नाही .. फुकट घालवतेय का आयुष्याचे मोलाचे क्षण ?असे वाटत राहते . प्राजक्ताने जेव्हा तिला स्वतःच्या आवडीच्या कामात स्वतःला झोकून दिले तेव्हा तिला समाधान वाटतंय

 

वपु काळ्याचे एक वाक्य खूप छान आहे

 

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही .. पण गगनभरारीचे वेड रक्तातच असावे लागते .. कारण आकाशा ची ओढ दत्तक घेता येत नाही ..

 प्राजक्ताच्या आतमध्ये ती ओढ होती आणि प्रत्येकात ती असते .. काहीजण कुठेतरी खोल अंतर्मनात सुप्त मनात लपवून ठेवतात तर काहीजण मोठ्या तोंडाने जगाला ओरडून सांगतात . पण आपली आंतरिक ओढ आपल्याला सारखी खुणावत असते .. तिला दाबून न ठेवता निदान स्वतःच्या आंतरिक  समाधानाकरिता पूर्ण केले पाहिजे . पूर्ण नाही करता आले तरी त्याचे प्रयत्न तर नक्कीच करावे.

ओम आणि प्राजक्ता छान पार्टी संपवून घरी आले . आज दोघेही खूप खुश होते . ओम ला अवॉर्ड मिळाला त्याचा सत्कार झाला आणि त्या सत्कारात त्याची बायको त्याच्या सोबत होती .. दोघे घरी आले .. ओम ने आईला ट्रॉफी दाखवली .. आईला वाकून नमस्कार केला.

 

आई " शाब्बास रे पोरा .. अशीच तुझी प्रगती दिवसेन दिवस होऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना "

 

आई " प्राजक्ता .. किती सुंदर दिसतेस या अशा कपड्यांमध्ये पण .. जरा अशीच राहत जा .. उगाच आमच्या सारखे कशाला राहतेस .. ओम तुला पण कळत नाही गाढवा .. तू अजिबात तिच्याकडे लक्ष देत नाहीस .. बघ किती सुंदर दिसतेय या ड्रेस यामध्ये .."

 

ओम " अरे .. मला काय बोलतेस मीच आणलाय तो ड्रेस .. ती घालत होती का विचार तिला .. मी घालायला लावलाय जबरदस्तीने "

 

प्राजक्ता " हो आई ते म्हणतायत ते खरं आहे .. पण ह्यांनी सांगितल्यावर घातला ना .. मग झाले “

आई " ओम तुम्ही बाहेर पडून गेल्यावर एकजण आला  होता आणि हे देऊन गेला "

बोल बोलता आईने एक इन्व्हलप  आणून ओम च्या हातात आणून दिला . प्राजक्ताच्या नावावर कुरिअर होते

ओम ने ओपन करून पहिले तर त्यात एक आनंदाची बातमी होती.