शुभारंभ भाग २५
क्रमश: भाग २४
प्राजक्ताने ठरवल्या प्रमाणे ती फक्त रोज एक किंवा २ लेक्चर करून घरी येत होती . संध्याकाळी सारंगधर सरांकडे जाऊन पेंटिंग चे क्लास घेऊन लागली . सारंगंधर सर तिला खूप छान गायडन्स करत होते आणि क्लास ला मुलं पण वाढत जात होती . मुलांना शिकवता शिकवता प्राजक्ताला पण खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यावर तिचा हात बसू लागला .. एक दोन नवीन ट्रिक्स सरांनी तिला शिकवल्या . सारंगधर सर आता त्यांचा खरा वारसदार प्राजक्ता आहे असे समजून तिला सर्व समजवून सांगत होते .
प्राजक्ताने सारंगधर सरांचा हुबेहूब तेलचित्र बनवले .. सर खूपच खुश झाले .. " स्वतःचे तेलचित्र पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले .. त्यांनी प्राजक्ताला मनापासून आशीर्वाद दिला .
प्राजक्ता सकाळी शाळा आणि मुलं घरी आली कि ती क्लास घ्यायला जायची ते ७ वाजता यायची तीन तीन बॅच होत्या .. स्पेशल क्लास असल्यामुळे फीज पण बऱ्यापैकी मिळायची .. एक मोठा पगार मिळावा इतका इन्कम प्राजक्ता ला मिळू लागला .
प्राजक्ता आता जीन्स मध्ये आरामात वावरू लागली , कॉन्फिडन्स पण खूप वाढला होता . तिच्यामध्ये खूप सारा बदल झाला होता .. बाहेर कोणाशी कसे वागावे हे तिला कळू लागले होते . कोण आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेणार नाही असे वागू लागली होती .
आता प्राजक्ता कोण कोणत्या शाळेत खास पेंटिंग च्या स्पर्धेची जज म्हणून तिला बोलवत असत. आणि ती तिचे काम चोख पार पाडत असे .
असे हे रुटीन छान ८ महिने चालू होते . शाळा आणि तिचे क्लास .
एक दिवस प्राजक्ता मुलांना घरी घेऊन आली आणि त्यांचे खाणे उरकून ती क्लास ला गेली तर सारंगधर सर दारच उघडत नव्हते . बराच वेळ दार वाजवल्यावर आणि क्लास ची मुले आणि ती बाहेरून सरांना हाक मारू लागली आणि ती कॉल पण करत होती पण आतून काही रिप्लाय येत नव्हता . शेवटी तिने ओम ला फोन करून सांगितले कि असे असे झालेय .
ओम म्हणाला मी पोहचतो तोपर्यंत आजूबाजूला कोणाची मदत घेऊन कडी तोडता येतंय का ते पहा .
प्राजक्तने क्लास च्या मुलांची मदत घेऊन दरवाजा उघडला .. तर सारंगधर सर खुर्चीत निपचित पडले होते .. त्यांचा खुर्चीत बसल्या बसल्या प्राण गेला होता .
प्राजक्ता घामाघूम झाली .. काय करावे ते तिला कळेच ना .. आजू बाजूची माणसे आणि खालून डबा देणारी माणसे पण वरती आली .. प्राजक्ताने आतून चादर आणून त्यांच्या अंगावर टाकली . बहुदा झोपेतच त्यांचे प्राण गेले होते . तेवढ्यात ओम तिकडेच पोहचला . त्यांचे स्वतःचे असे जवळ कोणीच नव्हते . ओम नेच पुढाकार घेऊन मुलासारखे हातात सूत्र घेतली . त्याने त्यांच्या मोबाईल मधून त्यांच्या मुलाला श्रीरंग ला कॉल केला .
श्रीरंग येई पर्यंत कमीत कमी २४ तास लागणार होते . ओम ने हॉस्पिटल ची गाडी बोलावून बॉडीला शवगृहात ठेवण्याची व्यवस्था केली .
प्राजक्ता मात्र खुप रडत होती . गेले आठ महिने ती सरांच्या रोज कॉन्टॅक्ट मध्ये होती . तिने मुली सारखी त्यांची सेवा केली होती . कधी चहा कर , कधी गरम भाकरी करून वाढायची .. घरात काही गोडधोड झाले कि पहिला सरांचा डबा भरायची . खरतर ते तिला शिकवत होते पण खरा त्यांना म्हातारपणात प्राजक्ताचा आधार मिळाला होता .
२४ तासांनी श्रीरंग आणि त्याची फॅमिली आली आणि सारंगधर सरांचे सर्व विधी त्याने एक मुलगा म्हणून त्याने पार पाडले . ओम तर होताच त्याच्या बरोबर.
श्रीरंग सारखा ओम च्या पुढे हात जोडत असे आणि डोळ्यातून अश्रू गाळत असे . तुमची खूपच मदत झाली . हल्ली बाबा खुश असायचे नेहमी प्राजक्ता वहिनींचे नाव घ्यायचे . तुमच्या मुळे माझ्या बाबांचा शेवट्चा काळ आनंदात गेला .मी तुमचे हे उपकार कधीच विसरू शकणार नाही . मी त्यांना तिकडे चला म्हणून थकलो पण ते यायला तयारच नव्हते आणि मला तिकडचा जॉब सोडून इकडे येणे शक्य नव्हते .. गेले त्या दिवशी माझ्याशी ते खूप बोलले त्यांनी त्यांची अंतिम ईच्छा पण मला सांगितली .. मी त्यांना म्हणालो जसे तुम्हाला पाहिजे तसेच होईल .. कारण त्यांची ईच्छा होती कि मी त्यांची कला शिकावी ते सुद्धा मी कधी केले नाही .. पण प्राजक्ता वहिनी हे करतेय त्याचा त्यांना खूप आनंद होता .
श्रीरंग त्याचे मन ओम पुढे मोकळे करत होता .. एव्हाना त्यांच्यात एक जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते .
पुढे त्यांचे १२ दिवसाचे विधी करून श्रीरंग ची जाण्याची तयारी झाली . जायच्या आधी त्याने ओम ला आणि प्राजक्ताला भेटायला बोलावले .
श्रीरंग ने ओम च्या हातात काही कागद ठेवले .
ओम" हे काय आहे ?"
श्रीरंग " हि बाबांची शेवटची ईच्छा होती ती मी पूर्ण करत आहे "
ओम ने ते कागद उघडून पहिले तर त्यांचे इथले राहते घर आणि आणि पुढे क्लास ची जागा हि सगळी त्याने प्राजक्ताच्या नावावर केली होती .
ओम " अरे काय वेडा झालास काय ? हि तुमच्या पूर्वजांची जागा आहे .. यात आम्हला काहीही इंटरेस्ट नाहीये .. आणि कागद फाडू लागला .
श्रीरंग " बाबांनी तुला किती ओळखले होते याचा अंदाज तुला पण नाहीये ओम .. " त्यांनी मला सांगताना तसेच सांगितले होते .. ओम ने हे कागद पहिले कि तो फाडून टाकेल म्हणून मी तुला झेरॉक्स कॉपी दिली होती . "
ओम त्याच्या स्वभावानुसार त्याच काहीही न ऐकून घेता प्राजक्ताला घेऊन घरातून निघू लागला .
श्रीरंग " थांब ओम .. प्लिज असे नको करुस .. " त्याच्या डोळ्यात अश्रू होते ..
ओम " ते शक्यच नाही .. मी काही या जन्मात असे होऊ देणार नाही .. जरी तुला तुझे बाबा असे बोलले असले तरी तू ते विसरून जा .. कारण म्हाताऱ्या माणसांना मरताना जे जवळ असतात त्यांचीच गोडी लागते . हि जागा त्यांच्या मरणोत्तर तुझी आणि तुझीच आहे .. हा माझा निर्णय अंतिम आहे .. हा विषय सोडून अजून काही बोलायचे असेल तर मी थांबतो "
श्रीरंग ने त्याला एक चिट्टी दाखवली .. " ओम हि चिट्टी बाबांनी मला ३ महिने आधीच पाठवली होती . फक्त गेले त्या दिवशी त्यांनी मला आठवण करून दिली होती . त्यांची हि इच्छा जर पूर्ण नाही झाली तर त्यांचा आत्मा तळमळत राहील .
ओम ने ती चिट्ठी वाचली त्यात सारंगधर सरांनी श्रीरंग ला सांगितले होते कि जर त्यांनी पूर्ण जागा नाही घेतली तर अर्धी जागा जी क्लास ची आहे ती तरी प्राजक्ताला दे.. ते दोघेही निर्मोही आहेत हि जागा ते घेणारच नाहीत पण प्राजक्ता माझी मानस कन्या आहे तरी तिच्या क्लास ची सोय इथेच झाली तर मला खूप आनंद होईल आणि या वास्तूत च क्लास चालू रहावे अशी ईच्छा आहे .
ओम ने चिट्ठी प्राजक्ताकडे दिली .. प्राजक्ता ने पण चिट्ठी भरल्या डोळ्यांनी वाचली.. काय करावे .. कसे करावे .. काही सुचेना .. चौघेही शांत बसले .
श्रीरंग " मला असे वाटते कि प्राजक्ता वाहिनीचे जे क्लास चालू आहेत ते इथेच राहू देत .. आता लगेच केले तर बरोबर वाटणार नाही मी पुढल्या वर्षी वर्ष श्राद्ध करायला येईन तेव्हा मी हे घर पाडून इथे दोन हॉल बांधेन. खालचा हॉल बाबांच्या नावाने ठेवेन आणि वरचा हॉल प्राजक्ता वाहिनीच्या नावाने रजिस्ट्रेशन करून देईन . म्हणजे ती परमनंट ती तिचे क्लास , आर्ट गॅलरी चालू ठेवू शकते . खालचा हॉल कोणा कोणाला कार्यक्रमाला रेंट वर देता येईल आणि मी कधी आलो तर इथे राहू पण शकतो अशा मागे दोन रूम काढेन . पण या सगळ्याला एक वर्ष जाईल . "
ओम आता काहीच बोलत नव्हता . प्राजक्ता पण शांत होती .
ओम " मला असे वाटतंय.. हा प्लॅन चांगला आहे तरी पण तू प्राजक्ताच्या नावावर केले नाहीस तरी चालेल . नवीन हॉल आम्ही तुझ्याकडून रेंट वर घेऊन आणि प्राजक्ता इथेच क्लास चालू ठेवेल म्हणजे सरांची इच्छा जी कि याच जागेत क्लास चालू राहावे ती पूर्ण होऊ शकते . "
श्रीरंग " ओम .. प्लिज मला समजून घे .. मी ते जिवंत असताना त्यांचे कधीच ऐकले नाही .. आता मरणोत्तर त्यांची ईच्छा जर मी पूर्ण केली नाही तर मी जगू नाही शकणार .. यातून मला मुक्तता तुम्ही हि जागा घेतल्यानेच आहे .. प्राजक्ता ला मी जरी वाहिनी म्हणालो असलो तरी बाबांची मानस कन्या म्हणजे ती माझी बहीणच झाली आणि बहिणीला अर्धा वाटा देण्याचा मला हक्क आहे .. माझी पण तीच ईच्छा आहे .. " आणि त्याच्या पुढे हात जोडू लागला .
ओम " काय सरांनी असे का बरं केले .. असे नको होते त्यांनी करायला .. मोठ्या पेचात टाकले त्यांनी मला आणि प्राजक्ताला .. ठीक आहे .. आता मी काय बोलणार यावर .. "
श्रीरंग ने घराच्या चाव्या ओम कडे दिल्या .. बाबांची खोली मी लॉक केली आहे .. त्याची चावी मी एक माझ्याकडे घेतलीय आणि दुसरी या चाव्यांमध्ये आहे
ओम आणि प्राजक्ता फायनली सारंगधर सरांच्या घराच्या चाव्या घेऊन घरी आले.
प्राजक्ताने या महिन्यात क्लास च्या मुलांना सुट्टी देऊन टाकली . तसेही या सर्व विधी मध्ये १५ दिवस तर गेलेच होते . त्यामुळे आपण क्लास पुढल्या महिन्यात घेऊ असे कालवून टाकले .
सारंगधर सर मरून गेले पण प्राजक्ताला त्यांचा खरा वारसदार घोषित करून गेले . ह्यात त्यांचा स्वार्थ होताच कारण त्यांची कला ती अमर करणार होती एक प्रकारे तिला त्यांनी कलेचा वारसा तर दिलाच होता पण जागा देऊन तिच्या क्लास ची सोय करून गेले होते . प्राजक्ता आता खरी सेल्फ डिपेन्डन्ट झाली होती . उद्या जर क्लास घ्यायचे म्हटले तर २५००० तर सहज भाडे भरावे लागणार .तेवढे स्टुडंट्स जर आले नाही तर आपोआप ती क्लास बंद करेल आणि हे नको होयला या विचारानेच सारंगधर सरांनी प्राजक्ताला भविष्यात अशी अडचण नको यायला म्हणून एक प्रकारे मदत च केली होती .
एक महिन्यांनी पुन्हा प्राजक्ताचे क्लास चालू झाले . रोज प्राजक्ता क्लास ला गेल्यावर सरांचा फोटो जो तिने काढला होता त्याला हार घालायची त्याला सर्व स्टुडंट्स ला पण नमस्कार करायला लावायची आणि मग क्लास घ्यायची . असे रुटीन चालू झाले .
लग्न झाल्यानंतर ओम जो ह्या कंपनीत लागला तो लागलाच त्याला ह्या कंपनीत १० वर्ष पूर्ण झाली होती . त्यामुळे लॉन्ग सर्विस अवॉर्ड साठी ओम चे आणि त्याच्या बरोबरचे काही कलिगचे सिलेक्शन झाले याचा इमेल त्याला आज मिळाले होते . तर ओम चा सत्कार दोन दिवसांनी कंपनीचे CEO च्या हस्ते होणार होता आणि त्याचे आमंत्रण ओम ला आले होते . आमंत्रणात पार्टी चा ड्रेस कोड आणि वाईफ ला घेऊन यायचे असे सगळे लिहले होते .
ओम ने प्राजक्ताला मस्त रेड कलर चा वन पीस घेतला आणि घरी आला .
ओम " प्राजक्ता , उद्या आपल्याला संध्याकाळी माझ्या ऑफिस च्या पार्टी ला जायचंय तर उद्या क्लास ला सुट्टी दे किंवा मग आधी घेता आले तर घेशील "
प्राजक्ता " सगळे जायचंय का ?"
ओम " नाही फक्त आपण दोघेच ..मी हा ड्रेस आणलाय तुझ्यासाठी .. तू संध्याकाळी ज्या पार्लर ला तुझे स्पा चे बुकींग केलीय ना तिच्याकडे जा .. ती या ड्रेस वर शोभेल असा मेक अप आणि हेअर स्टाईल करेल . मी तुला तिकडूनच पीक करेन संध्याकाळी "
प्राजक्ताने ड्रेस ओपन करून बघितला .. " वॉव .. ओम हा ड्रेस खूपच छान आहे पण मी यात कशी दिसेल .. त्यापेक्षा मी साडी घालू का ?माझ्याकडे रेड कलरच्या खूप साड्या आहेत .. "
ओम"सांगतोय ते कर .. पार्टी ला ड्रेस कोड आहे .. "
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा