शुभारंभ भाग २४
क्रमश: भाग २३
ह्याला म्हणतात प्रोफेशलिझम . प्राजक्ताचा खरं तर मूड अजिबातच नव्हता पण तरीही पण तिने काम घेतले म्हणून तिने ते केले हे सर्वत महत्वाचे आहे .
वर्क इज वरशीप
सर्वात जास्त महत्व हे काम ला दिले पाहिजे नाकी आपल्या मूड ला ..हे प्राजक्ताला कोणी सांगायला लागले नाही ह्यावरून हेच सिद्ध होते कि ती किती डेडिकेट काम करणारी होती .
प्राजक्ताचे नुकतेच पेंटिंग झाले होते . तिचे दोन्ही हात रंगांनी भरलेले होते आणि आज ती खरोखर खूप थकली होती. एवढे मोठे पेंटिंग कि त्याला ती सलग ५ तास उभी राहून तिने पूर्ण केले होते . आता ती तिचे पसरलेले सामान आवरत होती .. ती किती दमलीय ते तिच्या चेहऱ्याकडे बघूनच कळत होते .
तेवढ्यात डायरेक्टर सर आर्ट गॅलरीत आले .
प्राजक्ता ने त्यांना पहिले पण नेहमी सारखी त्यांच्याकडे बघून हसली नाही .. कितीही नाही म्हटले तरी आपण याच्याशी बोललेले आपल्या नवऱ्याला आवडत नाही हे एकदा कोणत्याही स्त्रीला कळले कि त्या व्यक्ती बरोबर बोलायची ईच्छा च मरून जाते नाही का ..
डायरेक्टर सर " प्राजक्ता मॅम .. आज तुम्ही खूप दमल्या सारख्या दिसत आहात "
प्राजक्ता " हमम.. "
डायरेक्टर सर " हे पेंटिंग पण खूपच छान आहे .. तुमच्या पेंटिंग मध्ये खूप सात्विकता जाणवते .. याचे कारण तुम्ही स्वतः सात्विक आहेत "
प्राजक्ता "असेल कदाचित .. पण माझ्या सात्त्विकतेचा फायदा मला होत नाही .. बऱ्याचदा दुसरेच त्याचा गैर फायदा घेतात असे माझे मिस्टर म्हणतात "
डायरेक्टर सर " तुम्ही रागवल्यात का माझ्यावर ?"
प्राजक्ता " नाही मी आता घरी जातेय आज मी खूप थकलीय .. आज चे पेंटिंग खुप मोठे होते .. "
डायरेक्टर सर " ठीक आहे .. पाहिजे तर मुलांना घरी सोडायला मी गाडी पाठवू शकतो .. तुम्ही घरी लगेच गेलात तरी चालेल"
प्राजक्ता ला मनातून खूप राग आला होता हे वाक्य ऐकून .. ओम म्हणतो तसा हा माणूस आता अति शहाणा बनत चाललाय कि काय असे वाटू लागले होते तिला .
तेवढ्यात तिकडेच चहा आला .. डायरेक्टर सरांनी स्पेशल चहा प्राजक्ता साठी मागवला होता . प्राजक्ताला आता या चहाची खूप गरज होती पण तरीही ती नको नकोच म्हणत होती . आणि डायरेक्टर घ्या .. घ्या .. म्हणून मागे लागला होता .. जे काही तिथे चाललंय ते प्राजक्ताला अजिबात आवडत नव्हतं . एकतर हा माणूस एकटा इथे का आला माझ्याशी बोलायला .. ह्याला एवढे पण मॅनर्स नाहीयेत कि एकटी बाई असताना प्रिंसिपल मॅम ला बोलावून त्यांच्या बरोबर यायचे ते .
आता हि गोष्ट ओम ला सांगितली तर त्याचे म्हणजे एक घाव दोन तुकडे .. नाही सांगावे तर लपवलं म्हणून हीचा आत्मा तळमळत राहणार
शेवटी तसेच रंगाचे मटेरियल तिकडेच ठेवून प्राजक्ता हॉल च्या बाहेर आली आणि चहाचा कप घेऊन स्टाफ रुम मध्ये घेऊन बसली .
प्राजक्ता च्या काय मनात आले तर तो तडक प्रिंसिपल मॅम च्या केबिन मध्ये गेली आणि त्यांना म्हणाली " जी मोठी मोठी पेंटिंग्स काढायची होती ती मी इथे काढली आहेत .. बाकीची पेंटिंग्स मी उद्या पासून घरीच काढेन .. आणि सकाळी माझे लेक्चर्स झाले कि मी घरी जाऊन तिकडेच काम करेन . पेंटिंग बनवून झाल्यावर त्याचे फोटोज मी तुमच्या मोबाईल वर पाठवीन किंवा शाळेत आणून द्यायची जवाबदारी माझी . प्लिज मला हि सवलत द्या .. मी केलेल्या लेक्चर्स चेच पैसे मला मिळाले तरी चालतील मला फुल टाईम काम जमेलस वाटतं नाही .
प्राजक्त चा रडवेला चेहरा बघून त्या काही जास्त काही बोलली नाहीत
मॅम " ठीक आहे .. as you wish "
प्राजक्ता थोडा वेळ स्टाफ रूम मध्ये थाम्बली आणि मुलांची शाळा सुटल्यावर मुलांना घेऊन घरी आली . उभे राहून तिचे पाय आणि ब्रश फिरवून हात आज इतके दुखायला लागले होते कि आज काही काम करण्याची ताकद राहिली नाही .. प्रथमेश घरात आल्यावर इतका दंगा घालायचा आणि त्याची तिला सवय पण होती पण आज जरा डोकंच सणकलेले तिने त्याला आज लिटरली एक दणका दिला .. " आवाज हळू .. उगाच ओरडत असतोस नुसता आणि बेड वर जाऊन झोपली "
प्रथमेश ला आईचा मार हि गोष्टच नवीन होती . म्हणून त्याला बिचार्याला खूप वाईट वाटले तर प्रिया " अरे .. आज आई दमलीय .. मग तू कशाला ओरडत होतास मोठ्याने “असे सांगून त्याला गप्प बसवत होती ..
थोड्या वेळाने प्रथमेश शांत झाला आणि आत येऊन प्राजक्ताच्या कुशीत झोपून गेला .. दोघे मायलेक चांगले अर्धा एक तास झोपले . तोपर्यंत प्रियाने घरात काय झाले ते ओम ला फोन करून सांगितले होते ..
ओम जरा नेहमी पेक्षा लवकरच घरी निघाला . येताना प्रथमेश ला आणि प्रियाला चॉकलेट्स घेऊन निघाला आणि जवळच्या रेटोरेन्ट मधून रात्री साठी जेवण पण ऑर्डर करावी असा विचार करून घरात आला .
प्राजक्ता " अरे .. बरं झालं आज लवकर आलास .. तू आज मुलांना घेऊन बाहेर जा जेवायला .. मी आणि आई खिचडी नाहीतर पिठलं भात खाऊ .. आज मी खूप दमलेय "
तो फ्रेश होते पर्यंत तिने त्याच्या साठी चहा टाकला ..
ओम " ठीक आहे .. किंवा मग सगळ्यांनाचं पार्सल आणतो ना .. "
प्राजक्ता " बघ .. आईंना विचारते त्या खाणार असतील बाहेरचं तर ठीक नाहीतर तुम्ही तिघे जावा "
ओम " ठीक आहे .. चहा प्यायला बसला .."
तेवढ्यात प्रथमेश झोपलेला तो उठला आणि बाबांना आलेलं बघून त्याच्या कडे जाऊन " बाबा मला आई ने मारलं आज लगेच सांगू लागला "
ओम ने त्याला बॅगेतून काढून त्याच्या आवडीचे चॉकलेट्स खायला दिले तसा तो खुश झाला ..
ओम "काय झालं ?म्हणजे काही टेन्शन आहे का ? म्हणजे नॉर्मली एवढे पेशन्स जात नाहीत तुझे म्हणून विचारलं "
प्राजक्ता " नाही .. आज खूप वेळ पेंटिंग करत होते .. जवळ जवळ ५ तास सलग उभी होते .. पेंटिंग काढताना मला जाणवत नाही पण नंतर माझे हात आणि पाय गळून गेलेत आता "
ओम " ठीक आहे आता उद्या शाळेत पण जाऊ नकोस .. आराम कर .."
ओम " तू त्या पेंटिंग चे टेन्शन तर नाही घेतलेस ना .. जाऊदे नाही तर नाही दिले त्याने .. त्याचे काही टेन्शन घेऊ नकोस .. कितीही झाले तरी ओरिजिनल तर आपल्याकडेच आहे ना .. उद्या तुला ह्याच पेंटिंगच्या समजा खूप ऑर्डर्स मिळाल्या तर .. अग कदाचित ते तू माझ्या साठी काढलेस म्हणूनच ते इतके खास पेंटिंग बनलंय . पेंटिंग तर आहे त्यामुळे त्या डायरेक्टर ने नाही परत दिले तर नाही दिले .. त्याचे काही टेन्शन नको घेऊस . मीच जरा ओव्हर रिऍक्ट झालो बहुदा .. माझ्या मनात आधीच त्याच्या विषयी जरा राग होता आणि त्यात न सांगता आपले पेंटिंग त्याने तिकडे लावले त्यामुळे तेव्हा मला खूप राग आला होता "
प्राजक्ता " हमम.. "
ओम " हमम.. काय ?
प्राजक्ता " जाऊदे .. ते पेंटिंग .. आत मी तुझ्या साठी नवीन पेंटिंग बनवणार आहे .. ते पेंटिंग आपण कोणाला दाखवायचे सुद्धा नाही .. आपल्या बेडरूम मध्ये लावू .. "
ओम " ओके .. चालेल .. त्या डायरेक्टर ला सांगून टाक "आमच्या कडून तुला हे पेंटिंग गिफ्ट "
प्राजक्ता " गिफ्ट कशाला ? तो कोण लागतो आपला ?"
ओम " का काही बोलला ला तुला ? तू फक्त सांग मला .. तुला जर काही बोलला असला ना तर त्याला खरोखऱ
मी जाऊन वाजविन”
प्राजक्ता लगेच बेडरूम मध्ये आली आणि रडायला लागली . ओम तिच्या मागे मागे .. " अग रडतेस कशाला ? काही बोलला का तुला तो ?"
प्राजक्ता " मला काही कळत नाही .. तो तर नॉर्मलच बोलत होता माझ्याशी. माझ्या साठी स्पेशल चहा मागवला त्याने .. आणि मला म्हणाला तुम्ही रागावलात का माझ्यावर ? नंतर म्हणाला तुम्ही दमला आहेत तर घरी गेलात तरी चालेल मी मुलांना घरी पोहचवायची सोय करतो.. तो का असे बोलतो माझ्याशी ? असा बाकीच्या स्टाफ ला पण मदत करत असेल का ? नाही ना .. मग मला का स्पेशल ट्रीटमेंट देतो .. मला काहीच कळत नाही .. जेव्हा पण मी माझ्या कामाचा विचार करत असते तर नको त्या गोष्टी घडतात .. आत काय तोंड पड क्यात बांधून जाऊ का ? "
ओम " अरे .. एवढी काय फ्रस्टेड होतेस .. आता तर सुरुवात आहे ? तुला काय वाटलं ? बाहेर काम करणे सोपे आहे का ? जगात अनेक प्रकारची माणसे असतात .. कोणी कोणाकडे कशा पद्धतीने बघावं हा ज्याचा त्याचा प्रश्न .. आपण त्या गोष्टी कशा हॅन्डल करतो हे महत्वाचे .. किती तरी मुलींना हे असल्या प्रॉब्लेम्स ला फेस करावे लागते .. म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे ते वेगळेच पण आपलं स्त्रीत्व पण त्यांना जपावे लागते . नावे ठेवणारी लोक पण भरपूर असतात . एखादी तुझ्या सारखी सुंदर असेल तर तिचे सौदर्य तिच्या करिअर मधले सर्वात मोठे अडथळा बनू शकते . हे सगळे जर वेळेत कळले तर बरं कारण जगात अश्या प्रवृत्तीची माणसे आहेत कि पोरींना च काय लग्न झालेल्या बायकांना खोट्या प्रॉमोशन ची अमिश दाखवून किंवा प्रेमाचे नाटक करून त्यांचा गैर फायदा घेतात . "
प्राजक्ता " शी .. का पण ? का होत हे सगळे ?.. एका स्त्री ला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा साधा अधिकार आहे कि नाही ? ती काही तुमचा कोणता अधिकार किंवा तुम्हला कमी दाखवण्यासाठी करत नसते .. "
ओम " तुला घाबरवण्यासाठी मी हे सर्व नाही बोलत आहे " व्यक्ती तितक्या प्रवृत्ती " असे म्हणायचे आणि सोडून दयायचे .
प्राजक्ता " मी हे शाळेचे आर्ट गॅलरीचे काम झाले कि फक्त टेम्पररी टीचर म्हणून काम करणार आहे . आपला लेक्चर झाला कि माझा आणि शाळेचा काही संबंध नाही "
ओम " झाले घेतलीस माघार लगेच .. मला असे वाटते कि तू मोठ्या धीराने या गोष्टींना फेस करावेस .. ना कि पळपुटेपणा करून .. "
प्राजक्ता " कशाला ? त्या पेक्षा हे आर्ट गॅलरी चे काम झाले कि मी सारंगधर सरांचे क्लास सुरु करते . एकदा का मला क्लास मध्ये नक्की काय आणि कसे शिकवायचे कळले कि आपण आपले प्रायव्हेट क्लास काढू "
ओम " ठीक आहे .. तुझं नक्की झालंय का मग ? "
प्राजक्ता " हो .. मला तुझ्या शिवाय माझी कोणी तारीफ केलेली पण आवडत नाही आणि शाळेत सारखे सगळेच म्हणत असतात " यु आर ब्युटीफुल .. यु आर अमेझिंग आर्टिस्ट .. मला नाही आवडत ते "
ओम " आता काय करू मला तरी कुठे आवडते .. पण म्हणून काय तुला घरात बसून तर नाही ना ठेवू शकत .. आणि हसायला लागतो .. आणि तिला मिठीत घेतो आणि म्हणतो " माझो ब्युटीफुल बायको .. आपण कॉलेज मध्ये असल्या पासून मी हेच ऐकतोय " ओम यु आर लकी .. युअर वाइफ इज ब्युटीफुल .. माझ्याकडे बिचाऱ्याकडे कोण बघतच नाही .. आणि तू म्हणतेस मला तुझी लाज वाटते ? मला तर वाटते कि तुला माझी लाज वाटेल कि काय ?"
प्राजक्ता " गप रे .. मी बोलले ले सगळे लक्षात ठेवून बरोबर सारखं मलाच ऐकवतोस .. "
तेवेढ्यात त्याचे लक्ष प्राजक्ताच्या पायांकडे गेले ..
ओम " प्राजु .. आग पाय सुजलेत तुझे .. "
प्राजक्ता " हो ना .. पायावर खूपच लोड आलाय .. शाळेत उभे राहून शिकवायचे , घरात उभे राहून जेवण करायचे आणि पुन्हा असे मोठी मोठी पेंटिंग्स साठी ५ तास उभे राहायचे .. त्यामुळेच तर आज प्रथमेश ने मार खाल्ला .
ओम " मारत नको जाऊस ग .. ओरड पाहिजे तर किती पण .. मारलं कि मुलांना खूप दुःख होते .. आता पूर्वी सारखा काळ नाही राहिला .. मी नाही का ? कॉलेज ला गेलो तरी तुझ्या बाबांचा मार खाल्ला होता .. "
प्राजक्ता " हो ना .. चुकलेच माझे .. म्हणून तर म्हटले तू दोघं मुलांना बाहेर घेऊन जा म्हणजे तो विसरून जाईल "
ओम " नको मी घरातच ऑर्डर देतो दोघांना पिझ्झा ऑर्डर करतो. मला पण खिचडी चालेल . "
प्राजक्ता " ठीक आहे "
पुढील १५ दिवसात प्राजक्ताने शाळेचे आर्ट गॅलरी चे काम पूर्ण केले .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा