A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session6018e8d5182071d6e899c97f37907defb0155dca46d4aa5e9d79414e4d0532e35d0713f4): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

shubharambh 22
Oct 27, 2020
स्पर्धा

शुभारंभ भाग २२

Read Later
शुभारंभ भाग २२

शुभारंभ भाग २२

 

क्रमश: भाग २१

 

सरांना  भेटून दोघे घरी आले . आता ओम च्या डोक्यात खूप साऱ्या कल्पना आणि खूप सारे काम होते . सरांनी दिलेल्या संस्थांना कॉन्टॅक्ट करायाचा होता . प्राजक्तची पेंन्टींग्स तिथपर्यंत पोहचवायची होती .

इकडे प्राजक्ता ला पण खूप काम दिसत होते . आता शाळेतून आर्ट गॅलरी चे काम मिळाले होते . शिवाय शाळा आणि पुढल्या महिन्या पासून सारंगधर सरांचे क्लास ला पण शिकवायला जायचे . या सगळ्यात फॅमिली टाईम आणि घरातल्या जवाबदाऱ्या मागे पडून द्यायच्या नव्हत्या तिला . त्या दृष्टीने ती कसे काम करू शकेल याचा  विचार करू लागली

 

आज घरी आल्यावर दोघेही मनात खूप खोल विचारात गेले . ओम ला आता प्राजक्ताच्या स्वप्नांना पूर्ण करायचे  होते. आणि तो त्या दृष्टीने मनात विचार करत होता . घरी आल्यावर प्राजक्ताने सगळ्यांचे जेवण केले . मुलांचा अभ्यास  झालाय ना ते चेक केले आणि मग त्यांना झोपवून .. उद्याची तयारी करून ती पण झोपायला आली .

 

ओम" झालं का काम ?"

 

प्राजक्ता " हो.. "

 

ओम" बघ करायचे म्हटले तर किती आहे ना .. आपण एवढा विचार पण केला नव्हता कधी "

 

प्राजक्ता " हो ना .. पण मी काय म्हणतेय आपण एवढ्या खोलवर जाण्याची गरज नाहीये . सध्या  जे चालू आहे त्यात मी समाधानी आहे . काही दिवसांपूर्वी  आपण मी नोकरी करूच शकत नाही या निर्णयावर ठाम होतो पण आपल्याला कळलेपण नाही कि मी आता शाळेवर नोकरी करायला सुरुवात  केली . आणि आता हे चक्र खूप छान मॅनेज पण होतंय . त्यामुळे मला माझी फॅमिली लाईफ डिस्टर्ब करून मोठा स्टार वगैरे होण्याची तर मुळीच हौस नाहीये . त्यामुळे आता यापुढे जास्त कशाचाच मागे नको लागायला . हे जे आहे त्यात मी समाधानी आहे . मला व्याप अजून वाढवायचा नाहीये "

 

ओम" हे बघ .. टिपिकल बोलायला लागलीस .. आता तर आपण माहिती काढून आलो कि नक्की काय काय करता येईल ते आणि आता तू हे हा कसला विचार करतेयस ? "

 

प्राजक्ता " ओम मी बरोबर विचार करतेय .. ह्या पेक्षा जास्तीच्या जवाबदारी घेतल्या तर त्याचा परिणाम आपल्या फॅमिली लाईफ वर पडेल ते तर मला मुळीच  नको आहे."

 

ओम " बरं ठीक आहे झोप आता शांत .. जास्त स्ट्रेस  नको घेऊस. बघू आपण काय करायचे ते आरामात ठरवू .. आपल्याला काही घाई नाहीये ."

 

प्राजक्ता " हमम.. "

 

ओम " आयला प्राजु , बघितलेस का ? सर काय म्हणाले कि तुला त्यांना सून करून घ्यायची होती . च्यायला सगळ्यांना माझ्या बायकोतच इंटरेस्ट आहे "

 

प्राजक्ता " गप रे .. पण मला तुझ्यात इंटरेस्ट आहे हे महत्वाचे आहे कि नाही ?"

 

ओम " नाहीतर प्राजक्ता आता तू फॉरेन मध्ये  असतीस त्या श्रीरंग बरोबर .. "आणि हसायला लागला.

 

प्राजक्ता " गप ना ..ओम ... मी तो श्रीरंग काळा का गोरा ते सुद्धा बघितले नाही ..  बस झाला हा विषय .." आणि त्याच्या हाताच्या उशीवर डोके ठेवून झोपली .

 

दुसऱ्या दिवशी प्राजक्ता शाळेत गेली आणि प्रिंसिपल मॅम ला भेटली

 

प्राजक्ता " मॅम , मी काय म्हणत होते तसेही मी फक्त ड्रॉईंग शिकवते .. तुम्ही मला पर्मनंट न ठेवता जसे पहिले गेस्ट लेक्चरर म्हणून ठेवले होते तसेच ठेवा .. आणि एकदिवस आड पेक्षा रोज एक तास ठेवा म्हणजे सगळे वर्ग कव्हर होतील "

 

मॅम " का ? मला कळले नाही ?"

प्राजक्ता " म्हणजे बघा आता मला आर्ट गॅलरी वर  पण काम करायचे  आहे . मग त्या साठी  सेपरेट वेळ काढायला मला जमणार नाही आणि शाळेच्या वेळेत  आर्ट गॅलरीचे काम मी कसे करू ?"

 

मॅम " तू काम तर सुरु कर ? तुझे लेक्चर  नसतील तेव्हा तू गॅलरीचे काम करू शकतेस ?"

प्राजक्ता " हो ते तसे बरोबर आहे पण कसे आहे ना एकदा एखादे  पेंटिंग बनवायला घेतले ना कि ते अर्धवट ठेवून मी दुसरे काम सहसा नाही करत मग त्यातली मजा निघून जाते आणि एक पेंटिंग ला कमीत कमी ३ तास सलग काम करावे लागते .त्यापेक्षा मी हे लेक्चर झाले कि मग मी लगेच फ्री होईन आणि मुलांची शाळा  सुटे पर्यंत मला पेंटिंग करायला वेळ मिळेल "

 

मॅम " गॅलरी चे काम झाल्यावर काय ? कारण  फार तर हे काम ३ महिन्यात पूर्ण होईल मग त्यांनंतर काय ?"

 

प्राजक्ता "  त्या नंतर हे लेक्चर तर असतीलच ना .. मॅम कसे आहे अगदीच काहीच न करता बसण्या पेक्षा मी काहीतरी करतेय यातच मला समाधान आहे"

 

मॅम " ठीक आहे तू काम सुरु कर आणि तु सकाळी तुझे लेक्चर केलेस कि गॅलरीचे काम शाळेच्या वेळेत  केलेस तरी चालेल . पण तू आमच्या शाळेची स्टाफ आहेस याचा गर्व आहे आणि तू पर्मनंट च राहावीस असा  माझी आणि डायरेक्टर सरांचा विचार आहे . सध्या फार विचार  न करता तू  लेक्चर झाल्यावर गॅलरी चे काम सुरु कर .. "

 

मॅम प्राजक्ता ला सोडायला तयार नाहीत . प्राजक्ताला हे फुल टाईम शाळा यात तीचा  खूप वेळ जात होता . जर सारंगधर सरांचे क्लास करायचे असतील तर शाळा फुल टाईम करून ते खूप स्ट्रेसफुल होणार होते

 

प्राजक्ताने सध्या सारंगधर सरांना सांगून टाकले कि माझे हे आर्ट गॅलरी चे काम झाल्यावरच मग ती क्लास साठी फ्री असेल . तर तेव्हा तुम्ही पेपर मध्ये ऍड  द्या .

 

आणि मग प्राजक्ताने आर्ट गॅलरीचे काम मनावर घेतले आणि शाळेला पाहिजे होती तशी तितक्या मोठ्या साईज ची पेंटिंग्स प्राजक्ता रोज आर्ट गॅलरी मध्ये थांबून करत असे .

 

आज प्राजक्ता  अशीच तिचे लेक्चर्स झाले आणि मग गॅलरी चे काम करत होती ..  तिला शाळेत साडी नेसून जावेच लागायचे आणि तिच्या नेहमीच्या स्टाईल प्रमाणे ती पेंटिंग मध्ये मग्न झाली होती .  आज ती आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहीत असतानाचे पेंटिंग बनवत होती . रंगांची उधळण कॅनवास  होत होती आणि चैतन्य ज्ञानेश्वर महाराज त्या कॅनवासवर तयार  होत होते . प्राजक्ताची डोळे काढण्याची पद्धत इतकी सुंदर होती कि त्या डोळ्यात एक प्रकारचा  सजीव पणा यायचा . आणि कुठूनही बघितले तर  ज्ञानेश्वर महाराज आपल्याकडेच बघत आहेत असे वाटायचे .

 

बराच वेळ झाला कदाचित 3 तास झाले प्राजक्ताला ना  वेळेचे भान होते ना  शाळेचे ती त्या पेंटिंग मध्ये पूर्णपणे रमली होती .. आता पेंटिंग अल्मोस्ट तयार झालेच होते . तर तिने जरा ब्रेक घेतला कारण इतका वेळ उभी राहिल्याने तिचे पाय दुखायला लागले होते कारण हे पेंटिंग ची साईज पण खूप मोठी होती त्यामुळे काम पण खूप होते .

 

बसायला म्हणून ती मागे वळली तर मागे शाळेचा अर्ध्या पेक्षा जास्तीचा स्टाफ आणि प्रिंसिपल मॅम आणि स्वतः डायरेक्टर सर शांतपणे उभे होते .

 

तिने मागे वळून पाहताच सर्वांनी खूप जोरात टाळ्या वाजवल्या .. तिच्या पेंटिंग वर सर्वच खुश झाले होते .

 

https://hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/wp-content/uploads/sites/4/2015/01/1324612167_dnyaneshwar.jpg

 

अचानक सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मुळे प्राजक्ता एकदम तिला कसे रिऍक्ट होऊ ते कळे ना .. एक प्रकारचा ऑकवर्ड नेस तिच्या चेहऱ्यावर दिसत होता .. आनंद तर होताच .. पण असे आपल्याला केव्हापासून कोण कोण पाहतय आणि आपल्याला याचे भान पण नाहीये यामुळे तिला ऑकवर्ड नेस आला होता . त्यात डायरेक्टर तिच्या या कलेवर खूप भाळला होता .. म्हणजे तो आता प्राजक्ता नावाच्या मूर्तीकडे आकर्षित होऊ लागला होता . हे आकर्षण शारीरिक किंवा वासनिक आकर्षण नाही .. जसे कि एखाद्या कलाकाराला भेटल्यावर आपल्याला वेगळ्याच भावना निर्माण होतात तसे आहे .

उदाहरण दयायचे झाले तर आपल्या समोर अचानक अमिताभ बच्चन आले आणि त्यांच्या मुखातून आपण एखादी हरिवंशराय बच्चन यांची  कविता ऐकली तर आपण हरवून जाऊ आणि वेळ आली तर अमिताभ यांच्या पायावर डोके पण ठेवू शकतो .. त्यावेळी आपण आपली डिग्री , आपली पोस्ट , आपले पद याचे भान राहत नाही तशीच काहीशी अवस्था डायरेक्टर ची झाली होती .

तो नुसता तिच्याकडे टक लावून पाहत होता .. आता ह्या प्राजक्ता नावाच्या मूर्तीच्या पाया पडू का बघत बसू असे झालेले .

 

त्यात ते राधा कृष्णाचे पेंटिंग ऑलरेडी त्यांना  खूप आवडले होते . त्यांनी यु ट्यूब वरून ते पेंटिंग कॉपी करून त्याची फ्रेम करून घेतली आणि त्यांच्या केबिन मध्ये लावून टाकली होती . तेही प्राजक्ताला न विचारता किंवा न सांगता . त्यांनी ठरवले होते किती जेव्हा शाळेच्या आर्ट गॅलरीचे काम पूर्ण होईल तेव्हा या पेंटिंग ची कॉस्ट  ते तिला देतील .

प्राजक्ताने रात्री घरी आल्यावर ओम ला सांगितले कि असे असे झाले.. सर्वच जण न आवाज करता मी पेंटिंग काढत असताना मागून बघत होते .. आणि  नं तर सर्वांनी टाळ्या वाजवल्या ..

ओम " अरे वाह मग मी उद्या थोडा ऑफिस मधून लवकर येईन .आधी मी शाळेत येईन ते ज्ञानेश्वर महाराजांचे पेंटिंग बघायला .. आणि मग त्याचा छान फोटो पण काढून घेतो म्हणजे आपल्या यु ट्यूब चॅनेल ला टाकता येईल "

प्राजक्ता " ओक .. ठीक आहे .. आणि जर डायरेक्टर सर असले तर त्यांना पण भेट .. त्या दिवशी त्यांनी तुला चहा साठी बोलावले होते "

ओम " ठीक आहे .. असला तो तर त्याला पण भेटेन "

ठरल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी ओम ऑफिस मधून लवकर आला आणि शाळेत आला .

प्राजक्ताने प्रिंसिपल मॅम ला भेटवले आणि सांगितले कि हे आज ते कालचे पेंटिंग बघायला आलेत .. ते त्याचा फोटो काढून घेणार आहेत .आणि जर डायरेक्टर सर असतील तर त्यांना  पण भेटतील . त्या दिवशी जरा वेळ नव्हता .

प्रिंसिपल मॅम ओम ला बघून "  Mr . ओम .. यु ह्याव गॉट ब्युटीफुल अँड टॅलेंटेड वाईफ "

ओम " येस .. शी इज . अँड व्हॉट अबाऊट माय किड्स ? आर दे स्टँडिंग वेल "

प्रिंसिपल "येस .. प्रिया इज अल्वेज गेटिंग गुड मार्क्स अँड प्रथमेश इस लाईक प्राजक्ता .. आय थिंक हि इज गोइंग टू बी  अँन  आर्टिस्ट. "

ओम " ओह ओके "

मग प्राजक्ता त्याला असेम्ब्ली हॉल मध्ये घेऊन गेली . तो पण हे पेंटिंग बघून भारावून गेला

ओम " सही यार प्राजक्ता .. एक नंबर .. पेंटिंग काढले आहेस .. "

आणि त्याने पटपट त्या पेंटिंग चे दोन चार फोटो काढून घेतले . मग ते दोघे पुन्हा प्रिंसिपल मॅम च्या केबिन मध्ये आले .

नॉर्मली मिटिंग असली कि डायरेक्टर सर च प्रिंसिपल मॅम च्या केबिन मध्ये यायचे . तेवढ्यात प्रिंसिपल मॅम ला डायरेक्टर सरांनी सांगितले कि तुम्हीच सगळे इकडे या .. आपण इकडेच चहा घेऊ  "

मग प्रिन्सिपल मॅम ओम ला ,प्राजक्ताला घेऊन डायरेक्टर सरांच्या केबिन मध्ये गेल्या .

प्राजक्ता पण अजून एकदापण त्या केबिन मध्ये गेली नव्हती . तशी कधी गरज पडली नाही .

डायरेक्टर सरानी स्वतः चेअर वरून उठून ओम ला ग्रीट केले आणि बसायला संगितले . तसाच शेकहॅण्ड ते प्राजक्ता कडे बघून करणार त्या आधीच तिने लांबूनच नमस्कार करून बसली .

आत मध्ये गेल्यावर डायरेक्टर च्या चेअर च्या मागे  जे पेंटिंग प्राजक्ताने खास ओम साठी बनवले होते ते पेंटिंग  फ्रेम मध्ये ते लावलेलं होते . प्राजक्ता आणि ओम दोघेही ते पेंटिंग बघून एकदम हैराण झाले .. हे पेंटिंग इकडे कसे काय?