शुभारंभ भाग २१

In this part prajkta visits her painting teacher Mr Sarangdhar Sir

शुभारंभ भाग २१

क्रमश: २०

पुढील पाचच मिनिटात ओम  शाळेत पोहचला . प्राजक्ताला पण लगेच कळलेच कि ह्याचे  बिनसनलय . फार काही न बोलता ती मागे बसली आणि दोघे घरी आले . मुलं खेळायला खाली गेले होते आणि सासूबाई पण मंदिरात गेल्या होत्या .

प्राजक्ता " हा बोल ? काय म्हणणं आहे तुझं ?कशाला चिडचिड करत होतास ?"

ओम " मग काय ? तो डायरेक्टर काय म्हातारा आहे का ? त्याला उगाच कशाला सर सर म्हणता ?"

प्राजक्ता " म काय नावाने हाक मारू त्याला ?"

ओम " तुला काय मजा वाटते .. एकतर आज इतकी सुंदर दिसत होतीस आणि तो तुला बघत होता ?"

प्राजक्ता हसायला लागते .. " काय ओम .. तू जळतोयस का ? "

ओम " मी जळत नाहीये मी जाळींन त्याला जर माझ्या बायकोला बघत बसला तर "

प्राजक्ता पुन्हा हसायला लागते ..

ओम " हसतेस काय ? तू पण अगदी चांगली हसून खेळून बोलत  होतीस .. माझ्या वाट्याला तर आलीच नाहीस आज आणि .. "

प्राजक्ता " हे खरे दुःख आहे .. बघ बघ विचार कर ? तुम्ही लोक रोज ऑफिस ला जाता आणि गेले १० वर्ष मी तुझी वाट बघत असते . घड्याळात बघत असते कधी ७ वाजतील आणि मला तू दिसशील .. आता कळले का ?"

ओम " हमम.. बरं तुला पाहिजे तर थोडा वेळ अराम कर .. आई येणार नाहीये मुव्हीला तर आईसाठी खिचडी लावून ठेव आणि आपण बाहेर जेवून येऊ .. आज प्रियाला  चायनीज खायचंय "

प्राजक्ता " ठीक आहे मी फक्त १५ मिनिटे पाठ लावते .. "

ओम " ठीक आहे .. मी तुला चहा टाकतो .. "

प्राजक्ता " अरे .. वाह .." आणि त्याच्या गालावर किस करते  " आज एकदम मला मागे गेल्या सारखं वाटले .. तुला आठवतंय का मी कॉलेज मध्ये कोणाशी बोलले कि तुला कसा राग यायचा .. अगदी तसाच आज चिडलास "

ओम " मी अजूनही तोच ओम आहे ... कळलं का ? आणि तू तीच आहेस पण माझी जोखीम अजून वाढलीय "

प्राजक्ता " म्हणजे ?"

ओम " म्हणजे .. तू अजून सूंदर दिसायला लागलीस ना .. "आणि तिला मिठीत घेतो ..

प्राजक्ता " हो का ? आज काय होतंय काय ?"

ओम " तू रोज तुमच्या डायरेक्टर चं पूराण  लावायचीस ना तेव्हा असे वाटायचे कि कोण तरी म्हातारा असेल आणि आज बघितले तर हा साला तर माझ्याच वयाचा आहे .

प्राजक्ता जोर जोरात हसायला लागते ..

ओम  " बाय द वे .. काय झाले काय मिटिंग चे ?"

प्राजक्ता " हो ते आहेच रामायण मोठे मी तुला रात्री सांगेन .. "

ओम " नको आत्ताच सांग .. निदान रात्र तरी माझ्यासाठी ठेव .. काल पण काम करत बसलीस .. "

प्राजक्ता  त्याच्या कडे बघून कोपरा पासून हात जोडते आणि हसून आत गेली  आणि जरावेळ शांत पडते .. थोड्याच वेळात ओम ने दोघांसाठी चहा केला आणि  प्राजक्ताने खिचडी चा  कुकर चढवला आणि स्वतःचे आवरु लागली . तोपर्यंत मुले आणि सासूबाई पण वरती आले आणि मग मुलांना खाऊ घालून सगळे मुव्हीला गेले .

या वेळी प्राजक्ताचे ओम ने काहीही ऐकले नाही आणि तिला मॉल मधून दोन जीन्स आणि त्यावर मॅचिंग दोन छान सोबर टॉप्स घेऊन दिले . शिवाय मुलांना आणि त्याला पण कपडे घेतले. आजीला पण शाल पाहिजे होती ती शाल घेतली .

 येताना प्रियांच्या पसंतीचे चायनीज खाऊन आले.

दुसऱ्या दिवशी प्राजक्ताने ओम ला कालच्या मिटिंग बद्दल सगळे सांगितले तर एकूण लहान मोठी अशी १५ पेंटिंग्स प्राजक्ताला काढून दयायची आहेत .. आणि पेंटिंग च्या साइज वरून त्याची कॉस्ट ठरवायची असे सध्या ठरले आहे कॉस्ट किती सांगायची ते जरा आपण विचार करून सांगू .. तरी पण मला वाटते कि नाहीतरी शाळेसाठी आहे तर फक्त बनवायची कॉस्ट जी काय येईल ती घेऊ .. या मध्ये आपण काही पैशाचे विचार नको करायला. आपल्या कडून शाळेला भेट दिल्या सारखे होईल .

ओम " ठीक आहे .. तुझी मर्जी .. "

श्रीमंती हि पैसे कमावण्यात नाही पण आपल्यातला माणूस घडवण्यात आहे.

प्राजक्ता " आणि हो आज जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण त्या माझ्या ड्रॉईंग च्या सरांना जाऊन भेटू म्हणजे पुढे नक्की कोणती दिशा घ्यावी  ते कळेल . "

ओम " ठीक आहे .. आहेत का सर ?"

प्राजक्ता " अरे हो .. मी त्यांना फोन करायच्या आधी काल दुपारी मलाच सारंगधर सरांचा  फोन आला होता . मला म्हणाले कि मी आता म्हातारा झालोय कधी मरेन याचा नेम नाही .. जर तुला वेळ मिळाला तर मला येऊन भेट "

ओम " अरे वाह !.. गुरुनेच शिष्याची आठवण काढली म्हणायची .. अरे हो आता खूपच म्हातारे झाले असतील ते ... त्याच वेळी त्यांचे वय ५५ वगैरे असेल "

प्राजक्ता " हो ना .. आणि मुख्य म्हणजे त्यांची बायको पण गेली आणि मुलगा श्रीरंग बाहेरच्या देशात असतो .. तो बोलावतोय त्यांना तिकडे पण हेच जायला तयार नाहीत . "

ओम " हमम.. "

मग आज सुट्टी म्हंणून ओम प्रथमेश बरोबर खाली  क्रिकेट खेळायला गेला . प्रिया तिची  सायकल चालवत  होती.

दुपार नंतर हे दोघे सारंगधर  सरांना भेटायला गेले . प्राजक्ता गेल्या गेल्या सरांच्या पाया  पडली.. सरांचे पण प्राजक्ताला बघून डोळे भरून आले आणि तिच्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला .

सारंगधर सर " काय रे ओम .. माझ्या लेकीला सुखी ठेवतोस ना ..? "

ओम " तिलाच विचार आता तुम्ही ? " आणि हसायला लागला .

सारंगधर सर  मागच्या आठवणीत गेले .. अजूनही कॉलेज मधली प्राजक्ता माझ्या डोळ्या समोर  येते .. किती सुंदर , सात्विक चेहरा .. सिम्पल राहणीमान पण हातात मात्र जादू आहे तिच्या अशी भारी भारी पेंटिंग्स काढायची ..

ओम " हो ना .. सर  अजूनही ती जादू आहेच तिच्या हातात आणि ओम ने तिचे यु ट्यूब चॅनेल मोबाईल वर दाखवले ..

सर पण "खुश झाले .. खूप छान .. प्राजक्ता .. " 

ओम ने तिला रेडिओ वाल्यांकडून मिलाळालेला अवॉर्ड चे पण फोटो सरांना दाखवले "

प्राजक्ता " सर मग आता तुम्ही जेवणाचे कसे करता ?"

सर " अग मी डबा लावलाय आणि सकाळी कामवाली येते ती घर साफ करून देते आणि जाताना मला नाश्ता आणि चहा करून देते . "

प्राजक्ता हक्काने आत मध्ये किचन मध्ये गेली आणि तिघांना चहा करून आणला . प्राजक्ताच्या हाताच्या चहाची चव केव्हाही बाईने केलेल्या चहा पेक्षा वेगळी असणार .

सर " अहाहा .. मस्त चहा केलास पोरी .. किती  वर्षांनी असा मस्त चहा प्यायलो आज . ओम आता तुला सांगायला काही हरकत नाही .. प्राजक्ता जेव्हा माझ्या क्लास येत होती ना तेव्हा मी माझ्या बायकोला म्हणायचो " हि बघ तुझी सुनबाई .. आपल्या श्री रंगला शोभून  दिसेल .. आणि हसायला लागले

ओमच्या घशात चहा अडकला .. आणि त्याने प्राजक्ता कडे बघितले ..

सर " बरं आता ते जाऊदे सगळं .. मी तुला या साठी बोलावलंय .. कि तू माझी सून तर नाही होऊ शकलिस पण आता मला माझ्या मुली सारखीच आहेस . खरंतर आपली कला आपल्या मुलाने पुढे न्यावी असे प्रत्येक कलाकाराला वाटतं असते पण या बाबतीत मी अभागी निघालो . आणि तू माझी हि कला अजूनही जोपासत आहेस याचा मला अभिमान तर आहेच पण गर्व पण आहे . एक प्रकारे जन्माचे सार्थक झाल्या सारखे वाटतंय . "

ओम " सर , आम्ही पण तुम्हला भेटायला आलो ते याच साठी कि नक्की प्रोफशनली या पेंटिंग चा कसा वापर करावा .. किंवा आता तिला गॅलरी बनवायचे कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे  तर मग कॉस्टिंग कसे लावायचे .. आपल्या चित्राची वॅल्युएशन कसे काढायचे ते कळत नाहीये ? त्या संदर्भात थोडे मार्ग दर्शन करा "

सर " हे बघ ओम मी तुला काही नावे  सांगतो ती वेगवेगळ्या संस्थांची आहेत .. जसे कि राज्य कला मंडळ , किंवा महाराष्ट्र राज्य ललित कला ऍकेडमी वगैरे अशा भरपूर आहेत त्यांच्या पर्यंत पोहचायचे बघ .. हल्ली सगळे ई-मेल द्वारा करता येते . शिवाय दर वर्षी एखादे एक्सिबिशन भरवायचे .आणि आपल्या परीने आपली कॉस्ट आपण च ठरवावी लागते .. यात कसे आहे ओम जितके तुमचे नाव तितकी तुमच्या कलेची किंमत .. सुरुवातीला थोडी कमी घायचे असे एक दोन अवॉर्ड्स मिळाले ना कि आपोआप ती आर्टिस्ट म्हणून नावा  रुपाला येईल . सरकारच्या किंवा बाहेरच्या देशातल्या सुद्धा खूप अवॉर्ड्स असतात . तिथे नॉमिनेशन  जरी मिळाले तरी खूप असते .. त्या संगळ्यां वर लक्ष ठेवून आपले  पेंटिंग पाठवून द्यायचे .

या शिवाय ती स्वतःच्या च्या नावाने एखादे फॉउंडेशन किंवा संस्था काढू शकते . त्या अतंर्गत खूप काहि  करता येईल . जे जे आर्टस् स्कूल सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये  या टीचर काम करू शकते . कसे आहे ना .. कोणत्याही  कलेला फक्त विरंगुळा न बघता जर प्रोफेशनली बघितले तर करण्यासाठी आयुष्य कमी पडेल इतके काही आहे .. आता  आपाल्यावर आहे कि आपण कुठपर्यंत पोहचायचे . प्रयत्न करत रहायचे.

आताची तुझी मी पेंटीग्स बघितली आहेत तर माझ्या अनुसार तू एक पेंटिंग चे १२०००/- ते १५०००/- घेऊ शकतेस . आणि असे जर आर्ट गॅलरी सारखे मोठे काम मिळाले तर थोडा रेट कमी जास्त करायचा .. आणि मला माहितेय तुझ्या कामावर लोक इतके खुश होतील कि तुला त्याचा मोबदला मिळेलच .

ओम आणि प्राजक्ता एकदम सिरिअस होऊन सगळे ऐकत होते ..

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो .   आता आज किती परिश्रम घ्यायचे हा सर्वस्वी आपलाच निर्णय असतो .

मग सरांनी ओम ला खूप साऱ्या संस्थांची नवे सांगितली आणि ओम ने तो लिहून घेतली . . सरांना भेटायला आल्या सारखे  पण झाले आणि खूप छान माहिती पण  मिळाली .

सारंगधर सर " प्राजक्ता आणि ओम माझी अशी ईच्छा आहे कि हि माझी जी जागा आहे ती प्राजक्ताने तिच्या कलेसाठी उपयोग करावा . इथे ती स्वतःचे स्वतंत्र ऑफिस किंवा आर्ट गॅलरी , किंवा क्लास घेऊन शकते . मी गेल्या वर्षी पर्यंत क्लास घेत होतो पण हल्ली आता मला जमत नाही . पण क्लास बंद झाल्यामुळे मला खूप वाईट वाटतं "

ओम " मग तुम्ही क्लास सुरु करा .. प्राजक्ता येईल ना शिकवायला .. .. तुम्ही फक्त  तिला गायडन्स करा . सध्या आम्हालाही काही पैशाची अपेक्षा नाहीये . काहीतरी करायचेय हे नक्की आहे "

सारंगधर सर " काय प्राजक्ता घेशील का तू क्लास ? मी लगेच पेपर मध्ये ऍड देतो .. सध्या माझ्याच नावाने क्लास सुरु करू मग पुढच्या वेळी तुझे नाव देऊ "

प्राजक्ता " अरे पण ओम .. शाळेचे काय ?"

ओम " हे बघ क्लास संध्याकाळी एक तास असणार .. तू शाळा झाल्यावर इकडे ये .. "

प्राजक्ता " सर .. मी मला  एक दोन दिवस द्या मी थोडा नीट विचार कारेन आणि मग कळवते तुम्हाला "

सर " हो चालेल .. जी काही फीज मिळेल ती तुझी बरं का ?आधीच सांगून ठेवतो "

प्राजक्ता " बघू पैशांचे नंतर .. मला घर शाळा आणि क्लास आणि माझ्या मुलांचा अभ्यास या सगळ्या गोष्टी कशा जमतील ते मी बघते आणि ठरवते "

सर खुर्ची मधून उठले आणि आत मध्ये गेले .. आतून त्यांनी त्यांचा एक फोटो प्राजक्ताला दिला .. " हे बघ ह्या फोटोवरून माझे एक पेंटिंग "तेलचित्र " बनवून दे .  मी मेलो कि माझे पेंटिंग असावे फोटो नसावा अशी माझी ईच्छा आहे .

प्राजक्ता " सर मी पेंटिंग तर नक्कीच बनवते .. पण सारखे मरणाच्या गोष्टी करू नका .. "

🎭 Series Post

View all