Oct 20, 2020
स्पर्धा

शुभारंभ भाग २०

Read Later
शुभारंभ भाग २०

 

शुभारंभ भाग २०

 

क्रमश: भाग १९

 

प्राजक्ता ला प्रिंसिपल मॅम नी सांगितले कि असेम्ब्ली हॉल मध्ये आपण आर्ट गॅलरी बनवायची आहे .. तर त्यात किती पेंटिंग्स आपण काढू शकतो . साधारण मला कॉस्टिंग दे .. तुझ्यातली क्रिएटिव्हिटी दाखवण्याची हि एक चांगली संधी आहे .

 

प्राजक्ता ला खरं तर त्या काय बोलत आहेत हे कळलेच नाही

 

प्राजक्ता " मॅम .. सॉरी पण मला तुम्ही काय म्हणताय ते कळत नाहीये .. नक्की माझ्याकडून तुम्हला काय हवंय ?"

 

मॅम "अग इकडे असेम्ब्ली हॉल मध्ये तू काढलेली वेगवेगळी पेंटिंग्स आपण इकडे लावू .. त्यामुळे हॉल खूप छान दिसेल . तर तू ला हे मी कॉन्ट्रॅक्ट दिल्या सारखे समज . तुझ्या प्रत्येक पेंटिंग ची काही कॉस्ट असेल ती शाळा देईल .. किंवा आपण सगळी एक कॉस्ट ठरवू .. म्हणजे एका पेंटिंग चे ५०००/- रुपये ठरले तर समजा तू १० पेन्टींग काढलीस तर ५०००*१० म्हणजे  तुला ५००००/- रुपये शाळा देईल . म्हणून तर मी तुला डायरेक्टर सरांना भेटवले . "

 

प्राजक्ता " ओके .. आणि माझं  टिचिंग चे काम नाही का मग आता ?"

 

मॅम " अरे ते तर तसेच आहे .. त्यात काही बदल नाही .. त्या व्यतिरिक्त हे काम तुला द्यायची मी ठरवले आहे "

 

प्राजक्ता एकदम खुश झाली .. वाह .. मिळाले तर एकदम ५००००/- मिळणार यातच ती खुश झाली होती .

 

 

याशिवाय टिचिंग चे पैसे मिळतील ते वेगळेच . तिला असे झाले होते कि कधी एकदा घरी जातेय आणि हि गोष्ट ओम ला सांगते .

 

त्या दिवशी रात्री ओम ला तिने सांगितले

 

ओम " अरे वाह .. चांगलीच  ऑफर येतेय मग .. ग्रेट .. सही .. मग प्राजक्ता मॅडम तुम्ही आता स्टार झाल्यात"

 

प्राजक्ता " अरे पण मी कोणती पेंटिंग्स काढू आणि त्याचे कॉस्टिंग आपण किती सांगायचे . हे मला काहीच कळत नाहीये . "

 

ओम " अरे हो ना .. मला पण त्यातल काही माहित नाहीये .. आपण असे करू तुझ्या सरांना जाऊन भेटू म्हणजे आपल्याला नक्की एका पेंटिंग चे किती कॉस्टिंग सांगायचे ते कळेल . .. किंवा मग तुझ्यासाठी एक मला एक पी ए अपॉईंट करावा लागेल .. आणि हसायला लागला .

 

प्राजक्ता " काय रे .. चिडवू नकोस ना .. मुळात आधी हे सगळे करावे का नाही ..  ते डायरेक्टर सर पण मला जरा खडूस वाटले . तसे काही बोलले नाहीत त्यांनी माझ्याकडे बघुतले सुद्धा नाही  .. "

 

ओम " अग .. ती मोठी लोकं .. त्यांना वेळ नसतो बोलायला .. ते जाऊ दे .. तू तुझ्या सरांना भेटण्यासाठी त्यांना कॉल कर "

 

प्राजक्ता "ठीक आहे "

 

इकडे रात्री तिच्या डायरेक्टर सरांना जेव्हा वेळ मिळाला तेव्हा त्यांनी प्राजक्ताचा यु ट्यूब चॅनेल पहिला . आणि ते प्राजक्ताच्या पेंटिंग्स वर खूप भारावून गेले . तिने काढलेली सर्वच पेंटिंग्स अप्रतिम होते . प्रिंसिपल मॅम नक्की काय म्हणत होत्या ते त्यांना आत्ता कळले होते .

 

डायऱेक्टर सर प्राजक्तावर खूप इम्प्रेस झाले . त्यांना कधी एकदा शाळेत जातो आणि प्राजक्ताला भेटून सांगावे कि तुमची पेंटिंग्स छान आहेत असे झाले होते .. जेव्हा प्रिंसिपल मॅम नि ओळख करून दिली तेव्हा त्यांनी मान वर करून सुद्धा तिच्याकडे पहिले नव्हते .

 

दुसऱ्या दिवशी ते न सांगताच शाळेत आहे . साधारण सर आठवड्यातून एकदाच शाळेत यायचे तेही येणार आहेत याची कल्पना प्रिंसिपल मॅम  असायची .

 

डायरेक्टर सर " गुड मॉर्निंग मॅम .. मला त्या आपल्या शाळेतल्या ड्रॉईंग शिकवणाऱ्या स्टाफ ला भेटायचे आहे "

 

प्रिंसिपल मॅम " सॉरी सर त्या आज नाही येत त्यांना एक दिवसा आड बोलावलंय मी "

 

डायरेक्टर सर " तुम्ही एक काम करा .. त्यांना पर्मनंट करून टाका .. "

 

प्रिंसिपल मॅम " त्याची काहीच गरज नाहीये सर .. पर्मनंट झाल्यावर सगळ्याच फॅसिलिटी द्याव्या लागतील . आता तत्यांना  फॅसिलिटी पण द्याव्या  लागत नाहीत आणि मी लेक्चर्स  असे लावलेत कि सर्वांना आठवड्यात एक लेक्चर  मिळेल "

 

डायरेक्टर सर " पण तसाही आपला आधी स्टाफ होताच ना ..मग आता पॆसे का वाचवताय ?"

 

प्रिंसिपल मॅम " त्याचे असे आहे कि तिला टिचिंग एक्सपीरिअन्स नाहीये ना .. म्हणून टेम्पररी अँपॉईंट केले आहे "

 

डायरेक्टर सर " मी त्यांची काल पेंटिंग्स पहिली आहेत आणि तुम्ही म्हणाल्या तश्या त्यांची कला पैशात मोजण्यासारखी नक्कीच नहिये . उलट त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे .

 

प्रिंसिपल मॅम "ते तर आहेच .. मी त्यांना विचारते त्या फुल टाईम काम करायला तयार आहेत का ?"

 

डायरेक्टर सर आज खरं तर खास प्राजक्ताला भेटायला आले होते .. त्यांच्या समोर एक पेंटिंग जे प्राजक्ताने खास ओम साठी बनवले होते त्या पेंटिंग ने त्यांची झोप उडवली होती . ते पेंटिंग त्यांना प्रचंड आवडले होते .

 

प्रिंसिपल मॅम नि प्राजक्ताला फोन केला आणि सांगितले कि  "तूम्ही  शाळेत जर पर्मनंट केली तर फुल टाईम नोकरी करु  शकतेस का ?"

 

प्राजक्ताला काय करावे कळतच नव्हते . अजून पहिल्या महिन्याचे पेमेंट मिळाले नाही तर लगेच फुल्ल टाईम जमेल का ? घरात कसे मॅनेज करू? सासू बाई घरात एकट्या राहू शकतील का ? मला घरातले  आणि  बाहेरचे जमेल का ? हे असे सगळे प्रश्न उभं राहिले ?" तूर्तास तिने सांगितले या महिन्यात तर नाही पण मी पुढील महिन्यात कळवते .. मला थोडा वेळ हवा आहे विचार करायला . "

 

प्राजक्ताचे करिअर आता बूम वर येणार होते .. काहीतरी नक्कीच मोठे मोठे बदल होणार आहेत याची चिन्ह दिसायला लागली होती .

 

रोज रात्री ओम आणि तिची जोरदार डिसकसशन चालायची ..

 

ओम " मला वाटतंय हे आहे ते बरे आहे ? कशाला फुल टाईम . तुला बाकीचे उदयोग करायला दिवस मोकळा राहतो ना .. "

 

प्राजक्ता " हो .. ना .. पण मी जर नाही म्हटले तर त्या लगेच  दुसरा ऑप्शन काढणार आणि मग आहे ते पण हातातून जाईल कि काय असे वाटते मला ?"

 

ओम " हमम.. ते पण  आहेच.. "

 

प्राजक्ता " मला वाटतं  कि मी थोडे दिवस करून बघू का ? आणि आपल्याला  वाटलेच कि नाही जमत आहे तर द्यायचे सोडून .. आपण काय मुळात पैशांसाठी करतच नाहीये ना ?"

 

ओम " हमम.. मग आई चे काय ? ती एकटी नाही राहू शकणार इतका वेळ ? शिवाय मुलांना शाळा सुटल्यावर तुझे टाईम संपे पर्यंत शाळेतच थांबावे लागेल . किंवा त्यांना सोडून मग तू परत जावे लागेल "

 

प्राजक्ता " मग एका मुलीला घरात कामाला ठेवू .. म्हणजे आईंना सोबत होईल आणि थोडीफार घरकाम पण करेल ती . मी आले घरी कि जाईल "

 

ओम " ठीक आहे .. आई शी बोलतो मी या विषयावर तू तशी चांगली मुलगी मिळते का बघ .. किंवा मग रेखालाच( कामवाली ) विचार ..  "

 

प्राजक्ता " अरे हो.. हि छान  आयडिया दिलीस .. रेखाची मुलगी ९ वि १० वि ला आहे .. तीने काही काम नाही केले तरी चालेल आईंना सोबत मिळाली तरी बरे पडेल .

 

ओम " ठीक आहे.. मग प्राजक्ता मॅडम .. एकदम जोरात आहे .. तुझ्या पेंटिंग ला खूपच डिमांड आहे . "

 

 प्राजक्ता " काय ना ओम मला पण कळत नाही हे सगळे माझ्या सोबत  होतंय ते स्वप्न तर नाही ना .. मला हे झेपेल ना .. "

 

ओम " खरं सांगू झेपायला काय झेपेल ते ? पण मी सुद्धा थोडा विचार करतोय यातून नक्की पण काय करू शकतो . सध्या असे ट्रायल घेण्याशिवाय आपल्या समोर पर्याय नाहीत . फक्त एकच लक्षात ठेव कि घाईत कोणताही निर्णय घेऊ नकोस . आपल्या साधे पणाचा फायदा कोणी घेतला नाही पाहिजे .. तू तशी साधी आहेस .. अजून बाहेर कधि काम केले नाहीस .. आता हे शाळेत आहे म्हणून मी पण तसा बिनधास्त आहे . तरी पण तू थोडी अलर्ट रहा "

 

प्राजक्ता " हो.. नक्कीच .. माझ्या मनात मुख्य विचार हाच असतो कि मुलांकडे दुर्लक्ष नको होयला .."

 

ओम " हमम "

 

मग ठरल्या प्रमाणे प्राजक्ता शाळेत पर्मनंट टीचर म्हणून रुजू झाली आता तिचा शाळेचा टाईम वाढला होता . सकाळी दिवस भराचे  जेवण आणि मुलांचा वरचा खाऊ करून जात असे . काम वाली रेखा स्वतः किंवा तिची मुलगी कोणीतरी एक सासूबाईं बरोबर प्राजक्ता येई पर्यंत थांबायची . त्यांना जेवण वाढणे , कपड्याची मशीन लावणे  , वाळलेले कपडे घड्या घालून ठेवणे , फर्निचर पुसणे हि असली कामे तिच्याकडे गेली .

 

प्राजक्ता मुलांची शाळा सुटल्यावर दोघे मुले लायब्ररीत बसायची आणि प्राजक्ताची  सुट्टी झाल्यावर मुलांना घेऊन ती घरी यायची . असे रुटीन सुरु झाले . प्राजक्ता रोज शाळेत काय काय होते ते सर्व रोज ओम ला सांगत असे .. आज डायरेक्टर सर असे म्हणाले .. त्यांना आर्ट गॅलरी माझ्या कडूनच बनवून पाहिजे .. ओम ते आणि प्रिंसिपल मॅम माझ्या कामावर खूप खुश आहेत .. वगैरे वगैरे

 

एक दिवस शनिवारी ओम ला सुट्टी होती आणि प्राजक्ताची डायरेक्टर सर आणि प्रिंसिपल मॅम सोबत मिटिंग होती तर ओम तिला म्हणाला मी घरी आहे तर मी शाळा  सुटल्यावर मुलांना घ्यायला येईन तू तुझी मिटिंग संपली कि मागून तुला घ्यायला येईन  "

 

प्राजक्ता " ठीक आहे .. "

 

आज तिची महत्वाची मिटिंग होती त्यामुळे तिने रात्री जागून काही ड्रॉईग चे स्केचेस तयार केले होते .. कोणते पेंटिंग कुठे लावायचे .. एंट्रन्स  ला कोणते पेंटिंग असेल ते किती  मोठे असेल ते आतमध्ये कुठे कुठे कोणते कोणते पेंटिंग लावायचे हा असा सगळा  अभ्यास तिने करून ठेवला होता .

 

दुसऱ्या दिवशी छान तयार होऊन शाळेत निघाली

 

ओम " काय यार .. आज मला सुट्टी आहे तर तुम्ही कोणच घरी नाही .. मी काय करू घरी एकटा ?"

 

प्राजक्ता " हो ना .. सॉरी .. मी  लवकर मिटिंग संपवून येईन . आणि आज तुझ्या आवडीचे पालक पनीर करून ठेवलय. तू आहेस म्हणून रेखा येणार नहिये .. चालेल ना "

 

ओम " हो ..ठीक आहे .. प्राजक्ता.. हल्ली जरा जास्तच सूंदर दिसायला लागली आहेस .. आणि एकदम कॉन्फिडन्ट पण "

 

प्राजक्ता " असे काही नाही .. पण मला काम करतेय तर मज्जा येतेय इतके नक्की . अशी मिटिंग वगैरे मला खुप  भारी वाटतंय .. आता आज बघ  आज तुम्हला वेळ आहे का असे मला डायरेक्टर सरांनी विचारून मिटिंग ठेवली .. हेच मला भारी वाटतंय "

 बोलता बोलता तिचे केसांची वेणी घालणे टिकली लावणे असे  आरश्यासमोर आवरणे चालू होते .. ओम ने तिला मागून मिठीत घेतले आणि आरशात बघून तिच्याशी बोलता होता .. "मग आम्हाला तुमची अपॉइंटमेंट मिळणार आहे का प्राजक्ता मॅडम "

 

प्राजक्ता " तुमच्यासाठी तर केव्हाही आणि केव्हा पासून अव्हेलेबल आहे .. कॅन्सल करू का आजचे .. माझी तब्बेत बारी नाहीये असे कळवते "

 

ओम " अरे .. एवढा  काल रात्री तू जागुन स्केचेस तयार केलेस आणि आता कशाला कॅन्सल करतेस .तू घरी आल्यावर आज आपण मॉल ला जाऊ  सर्वजण . पिक्चर चे टिकेट्स काढून ठेवू का ?"

 

प्राजक्ता " चालेल .. मग डिनर पण बाहेर करू "

 

ओम " ओके .. डन "

 

(प्राजक्ताला लिहताना माझ्या डोळ्यासमोर मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी येतेय. इंडो वेस्टर्न ब्युटी , नजाकत , हास्य , आणि टॅलेंट )

 

तर अशी हि आत्म विश्वासाने भरलेली आणि सुंदरतेत सात्विकता असलेली प्राजक्ता आज शाळेत गेली . ओम तिला आज सोडायला गेला आणि कारण two व्हिलर त्याला पाहिजे होती .

झाली शाळा सुटली ओम मुलांना घ्यायला आला आणि गेट बाहेर मुलांची वाट बघत उभा होता तर त्याला दिसले  असेम्ब्ली हॉल च्या बाहेर प्राजक्ता , प्रिंसिपल मॅम आणि हाताची घडी घातलेले डायरेक्टर सर जे प्राजक्ताला कडे पाहत होते आणि प्राजक्ता तिच्या मनमोहक अदा पेश करत होती . प्राजक्ता खूप डेडिकेटली खूप मनापासून त्यांना सांगत होती .. मध्ये मध्ये तिच्या चेहऱ्यावर तिच्या केसांची बट येत होती आणि ती अजाणता ती हळूच मागे घेत होती .. तिचे बोलके डोळे तिच्या शब्दापेक्षा सुंदर दिसत होते .. आज बायको ला बघून बायकोवर प्रेम येत होते आणि अभिमान पण वाटत होता .

 

 हा माणूस कोण आहे जो तिच्याकडे एकटक बघतोय त्याचा त्याला राग येत होता . त्याने प्राजक्ताला बाहेरून हात केला पण समोर डायरेक्टर सर असल्यामुळे तिने जस्ट डोळ्याने बघितले  पण न बघितल्या सारखे दाखवले . आपला कबीर सिंग गप बसणार आहे का ? त्याने तिला मोबाईल वर कॉल केला . तर चक्क प्राजक्ताने कट केला . झाले याचे टाळकं फिरले . तेवढ्यात प्रथमेश चा वर्ग सुटला तो धावत धावत जाऊन प्राजक्ताला बिलगला .. प्राजक्ताने डायरेक्टर सरांशी बोलायच्या नादात त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला तिथल्याच एका बाकावर बसवले .

 

मधेच प्रिंसिपल मॅम काहीतरी बोलायच्या मग प्राजक्ता एकदम गोड हसायची .. आणि डायरेक्टर सर पण थोडीशी त्याची बत्तीशी बाहेर काढत होता .

 

हे समोर असलेले चित्र काही ओम रावांना आवडले नाही . त्याला वाटले कि हीचा  डायरेक्टर सर म्हणजे कोणीतरी ५०शी ६०ठी तला म्हातारा असेल . हा तर त्याच्याच वयाचा माणूस दिसत होता .

 

थोड्याच वेळात प्रिया पण तिथे आली आणि तिने " आई " अशी हाक मारली ..

 

प्राजक्ताने दोघं मुलांची डायरेक्टर सरांना ओळख करून दिली . तसे ते काहीतरी दोघांकडे बघून बोलले आणि प्राजक्ता पुन्हा गोड हसली .. मग प्राजक्ताने सांगितले कि बाहेर माझे मिस्टर पण आलेत त्यांनी सांगितले " बोलवा त्यांना आपण एकत्र चहा घेऊ "

 

मग प्राजक्ताने ओम ला फोन केला .. आतमध्ये येतोस का ? डायरेक्टर सरांना भेटवते तुला ?"

 

ओम " नको .. मला नाही भेटायचे त्याला "

 

प्राजक्ता " अरे .. का ? आता ये प्लिज त्यांनी तुला बोलावलंय चहा साठी "

 

ओम " एवढा कोण मोठा लागून गेला तो .. "

 

प्राजक्ता " काय रे ? तुझा मूड का ऑफ आहे ?.. येना दोन मिनिट ये फक्त "

ओम "अग , आज नको .. आपल्याला मुव्ही ला जायचंय विसरलीस का ? मी टिकेट्स काढली आहेत ?"

 

प्राजक्ता "बरं .. ठीक आहे .. "

 

प्राजक्ता "सॉरी सर .. माझ्या मिस्टरांना आता जमत नाहीये .. त्याची एक अपॉइंटमेंट आहे .. सॉरी "

 

ओम ला ला त्या डायरेक्टर चा खूप राग येत होता .. खाऊ का गिळू असे झाले होते .. मानत म्हणत होता "कसा बघतोय माझ्या बायको कडे .. प्राजु ह्याला काय सारखी सर सर करते .. त्याची लायकी आहे का सर म्हणवून घ्यायची .

 

आणि ओम मुलांना घेऊन घरी आला ..

 

जेलस .. बायकोला कोणीतरी दुसरा बघतोय हे त्याला सहन होत नव्हते . ओम ला बेचैनी आली .. "मनातल्या मनात डायरेक्टर ला शिव्या घालत होता .. "

 

थोड्याच वेळात प्राजक्ताचा फोन आला "हॅलो .. ओम तू येणार आहेस का  मला घ्यायला ? नाहीतर डायरेक्टर सर त्यांची गाडी पाठवत आहेत मला सोडायला .. काय करू ?"

 

ओम "गप ए.. त्याला म्हण  जास्तीचा शहाणपणा करू नकोस काय ?  मी आलो ना तिथे तर वाजविन  त्याच्या "

 

प्राजक्ता "काय होतंय चिडायला .. ओम अजिबात प्रथमेश ला ओरडायचे नाही .. तुला ना अजिबात पेशन्स नाहीत .. आत काय केले त्याने ?"

 

ओम "प्रथमेश चे काही नाही ग .. मला त्या डायरेक्टर चा राग येतोय "

 

प्राजक्ता "बरं .. नाही येत आहे त्यांच्या  गाडीने ..  आणि तू पण नको येऊस मी चालत येते ..ते काय लांब नाहीये "

 

ओम "अग .. येतोय तुला तरी आहेत का पेशन्स .. हे काय खाली उतरलो "

 

नुसती चिडचिड ... जळफळाट ... प्रेम हो प्रेम .. बायको वरचे प्रेम .. मेन  विल बी मेन..