शुभारंभ भाग १९

In this part prinipal mam introduce prajkta to owner /director of school

शुभारंभ भाग १९

क्रमश: भाग १८

प्राजक्ता चे घरातील काम झाले होते आता मुलांना आणायला जायला पण थोडा वेळ होता . मग तिने ते पेंटिंग घेतले आणि त्याची फ्रेम करायला टाकायला गेली आणि तसेच येतांना मुलांना घ्यायला गेली . आता गम्मत अशी झाली तिच्या नेहमीच्या सवयी प्रमाणे ती केसांचा अंबाडा आणि घरातल्याच ड्रेसवर मुलांना आणायला जायची कारण शाळा जवळ होती पटकन two व्हिलर ने जायचे आणि  घेऊन यायचे .. आता  असे झाले कि शाळेतली मुले आता तिला ओळखू लागली होती . शाळा सुटल्यावर मूल तिला " हॅलो मॅम " असे म्हणून लागली . किंवा कोणी कोणी त्यांच्या पालकांना  सांगायचे कि या आमच्या नवीन ड्रॉईंग च्या टीचर आहेत . मग प्राजक्ताला स्वतःच्या गबाळे पणा चा राग आला . कसे आहे ना मेक अप च पाहिजे असे नाही पण गबाळे पणा नसला  पहिजे . जे आहे ते व्यवस्तीत आवरून जायला काय हरकत आहे .  आज तिने ठरवून टाकले थोडा वेळा स्वतःला तयार करायला घेईन पण व्यवस्थितच घरा  बाहेर पडेन .

मुलांना घरी घेऊन आली . मुलांचे खाणे पिणे झाल्यावर तिने चक्क लॅपटॉप घेतला आणि त्यावर काही बाही पाहू लागली .

 प्रिया " आई तुला जमतेय का लॅपटॉप वापरायला ?”आणि हसतच “नाहीतर काहीतरी बाबांचे बिघडवून ठेवशील "

प्राजक्ता " हो .. ना .. पण तुला माहितेय का बाबांनी हा लॅपटॉप आता मला देऊन टाकलाय .. मी माझ्या पेंटिंग्स च्या कामासाठी वापरणार आहे . "

प्रिया चे तोंड पडले .. तिला आतापर्यंत आई म्हणजे तिला काही येत नाही ..असेच डोक्यात बसत चालले होते आणि प्राजक्ता तिचे एकेक मुद्दे खोडून काढत होती . माझा सांगायचं मुद्दा हा आहे कि प्रिया काही कुचकी नाहीये .. पण मुलांना आपण जे दाखवतो ते च त्यांना दिसते आणि त्याचा अर्थ ते त्यांच्या परीने लावतात . प्राजक्ताने स्वतःला कोणत्याही बाबतीत अपग्रेड केले नाही . न दिसण्यात , न वागण्यात , न टेकनॉलॉजि . प्रिया बाकीच्या मुलांच्या आयांकडे पण नक्कीच पाहत असणार . त्या कशा इंग्लिश इझिली बोलतात . अर्थात इंग्लिश आले म्हणजे त्या हुशार किंवा  पुढारलेल्या आहेत असे नाही पण हल्ली इंग्लिश भाषा भारतात सुद्धा अनिवार्य होऊ लागली आहे . महिलांना इंग्लिश खरं तर खूप चांगले येत असते पण त्या भाषेत  न बोलण्यामुळे तिचा विसर पडत जातो आणि शब्द आठवत नाहीत आणि आपल्याला येत नाही असा समज येऊ लागतो . भाषा ती भाषाच आहे तिचा वापर केल्यामुळे ,प्रॅक्टिस  केल्यामुळे ती बोलताना सहजता येऊ लागते . तर बोला म्हणजे येईल हे इतकं सोपं गणित आहे .

प्राजक्ता मुद्दामून मग प्रिया समोर तिचे यु ट्यूब चॅनेल ओपन करून बसली . तिला दाखवू लागली हे बघ किती लाईक्स आलेत ..

प्रिया " वाह .. आई .. ग्रेट .. आई मला पण शिकव ना तुझ्या सारखे पेंटिंग काढायला . "

प्राजक्ता " ठीक आहे .. आता तू पण रोज एक पेंटिंग काढत जा .. मी तुला छोटे छोटे पेंटिंग  काढून देत जाईन "

प्रथमेश " मला पण .. मला पण .. पण मी त्या मोठ्या ब्रश ने काढणार "

प्राजक्ता " हो .. चालेल .. "

संध्याकाळी घरी निघायचंय आधी ओम ने तिला पुन्हा मेसेज टाकला " काय आणूं ?"

प्राजक्ता " अजून काही ठरलं नाही ? "

तरी पण ओम ने तिला आणि प्रियाला स्पोर्ट्स शूज घेऊन आला . प्रथमेश ला काय  एक कॅडबरी मिळाली तरी खुश होतो . ओम घरी येताच सगळे जेवले .. आवरून झोपायला गेले .

प्राजक्ता पण उद्याची तयारी करून झोपायला आली .. शिवाय उद्या  तिला  शाळेत पण जायचे होते म्हणून उद्या नेसायची साडी वगैरे सगळी तयारी चालू होती .

ओम " आज यु ट्यूब चॅनेल वर अपलोडींग छान केलेस . जमले कि तुला ? उगाच आधी नाही नाही ची नाटकं करतेस ." आणि तिला मागून मिठीत पकडले.

प्राजक्ता "ओम आज मज्जा आली  ना .. मी बघ कसा पहिलाच पासवर्ड टाकला तो बरोबर निघाला .. "

ओम ने तिचा हात हातात घेऊन हाताला किस केले .. "मग .. मला माहित होते कि तू तिथपर्यंत पोहचणार .. आणि पोहचावीस अशी माझी ईच्छा होती . "

प्राजक्ता " ओम .. पासवर्ड आठवताना पुन्हा सगळे आठवले रे .. कसला भारी दिवस होता तो आपली आयुष्यातला .. "

ओम ने तिच्या मानेवर किस केले .. " हो.. ना .. तुझे गिफ्ट काय ते सांगितले नाहीस ?"

प्राजक्ता "तू हा पासवर्ड ठेवला आहेस हे मला माहित नव्हते .. पण आता माहित झाले आणि त्यामुळे आता मी खुश आहे सो मला काही वेगळे गिफ्ट नकोय . "

ओम " अरे .. पण आपले तसे ठरले होते ना .. "आणि तिला उचलून त्याने बेड वर ठेवली आणि तो पण तिच्या बाजूला झोपला ..

प्राजक्ता "  नॉर्मली मी तू सांगतोस ते ऐकतेच पण पुढे जर अशी वेळ आली कि  तू जे मला म्हणतोयस ते मला पटलं नाही तरी  ते मी तू सांगत आहेस म्हणून नाराज  न होता करेन.  “

ओम " काय काय ? उगाच शब्दात फसवू नको मला .. आज मी त्या मूड  मध्ये नाहीये आणि तिला स्वतःकडे ओढू लागला  ..

प्राजक्ता " थांब ना .. मला बोलायचंय "

ओम" नको आज नको बोलूस .. आपण उद्या बोलू .

प्राजक्ता " ऐक ना ओम .. मला तुला सॉरी बोलायचंय"

ओम " अरे .. काय आता .. कशाबद्दल सॉरी . तू उद्या साठी ठेव ना प्लिज .. सिचवेशन कि डिमांड को समजो यार "

प्राजक्ता " हो .. कळतंय मला .. पण तरीही तू फक्त ऐक .. मी बोलते .. "

ओम " मी नाही म्हणून तू थाम्बणार आहेस थोडीच .. उगाच काहीतरी फंडे पाजळवू नकोस पटकन  सांग"

प्राजक्ता " मला तुला सॉरी याच्या साठी बोलायचं कि गेले कित्येक दिवस मला तू हिंट्स देत होतास याच सिचवेशन ची पण मी मुद्दामून तुला अव्हॉइड करायचे ."

ओम " माहितेय मला .. "

प्राजक्ता " पण का विचारले नाहीस ..?"

ओम " मी ओळखतो तुला .. तू अजूनही माझ्यावर रागावलेलीस होतीस .. कुठे तरी खोल मनात माझ्या विषयी राग होताच ना ..आणि तो राग घालवायचा म्हणून मी हे सगळे करतोय असे मुळीच नाही आधीच सांगतो .. नाहीतर तुला वाटेल ...

प्राजक्ताने त्याच्या ओठावर हात ठेवला .. " मला  माहितेय हे सगळे तू त्याचसाठी नाही केलंस ते .. मला तुला एवढंच सांगायचंय कि " आय लव यु " आणि तिने स्वतःला त्याचा स्वाधीन केले ..

अशा पद्धतीने ओम आणि प्राजक्ता मध्ये आलेला दुरावा आणि परकेपणा संपून  त्यांच्या लाईफ ची  सेकंड इनिंग चा  शुभारंभ झाला 

प्राजक्ताचा थांबलेला संसार हळू हळू पुन्हा रुळावर आला आणि तोही मनात कोणतेही किल्मिष न राहता .. आता तिच्या समोर कितीही समीरा  येऊ दे तिला काही हि फरक पडणार नव्हता  कारण तीच स्वतः स्वतःच्या संसारावर खुश होती . स्वतःच अस्तित्व निर्माण करायला तर  आरंभ झालाच होता .

पुढे मग एक दिवस चालणे, एक दिवस स्वामिंग , एक दिवस जिम असे दोघांचा सकाळी रोज व्यायाम होयचा . तिची एक दिवस आड शाळा होयची . शाळेत पण तिचा चांगला जम बसू लागला . याशिवाय तिच पेंटिंग्स काढणे पण चालू होतेच . कधी सनसेट , कधी सनराईज , कधी समुद्र , कधी घर , कधी प्राणी , कधी शेत , कधी नदी , कधी आई आणि मुलगा यांचे नाते , कधी बहीण भावाचे नाते , असे आणि अनेक विषयावर  प्राजक्ता रोज एक पेंटिंग बनवत असे . आणि तिच्या बरोबर घरात दोघं मुलांना पण थोडे थोडे शिकवत होती .. संसार आणि करिअर जे आत्ताच सुरु झाले ते अगदी नीट सुरु झाले होते . समाजात तिला आता ड्रॉईंग ची टीचर म्हणून ओळख मिळू लागली होती .

प्रेम, विश्वास , व्यायाम , मनासारखे काम या सगळ्याने प्राजक्ताचे तेज वाढत जात होते .. सुंदरतेत  भर पडत होती . आता हळू हळू घरात बाहेर पण छान राहायची . टापटीप राहू लागली . जिम मधली ट्रेड मिल कशी वापरायची , इलेक्ट्रिकल सायकल कशी चालवायची हे तिला जमू लागले . कधी ओम ला यायला नाही जमले तर तिची ती एकटी पण व्यायामाला जायचीच . असे म्हणतात आपल्या चांगल्या  सवयी कधीहि सोडू नये .

शाळेत मुलांशी इंग्लिश बोलत असल्याने घरात पण इंग्लिश चा वापर जास्त होऊ लागला आणि मग रोजच्या वापरात  पण इंग्लिश शब्द सहजतेने वापरले जाऊ लागले . लॅपटॉप तर आता ओम कमी तीच जास्त वापरत होती . त्याला लागला तर मागून घ्यावा लागत होता .. आणि मुख्य म्हणजे हे सगळे घरातले काम करून ती करत होती .

दोन एक दिवसात ते पेंटिंग तिने जे फ्रेम करायला टाकले होते ते घेऊन घरात आली आणि लगेच ओम कडून खिळा ठोकून त्यांच्या बेडरूम मध्ये लावून टाकले . फ्रेम मध्ये तर ते पेंटिंग खूपच अद्भुत दिसत होते . बेडरुम मध्ये आल्या आल्या ते पेंटिंग त्या रूम चे वातावरणचं बदलवून टाकायचे . शेवटी ते प्रेमाचे प्रतीक होते ना !

ज्या माणसाने त्या पेंटिंग चे फ्रेम बनवली त्या माणसाने प्राजक्ताला सांगितले कि मी तुम्हाला या असल्या पेंटिंग्स च्या ऑर्डर्स मिळवून देऊ शकतो .. . थोडक्यात काय  प्राजक्ताच्या पेंटिंग्स ला खूप डिमांड होती पण नक्की त्याचा योग्य उपयोग कसा करावा हे काही अजून क्लीक होत नव्हते . किंवा प्रोफेशनली ते कसे वापरू शकतो हे कळत  नव्हते .

एक दिवस शाळेचे डायरेक्टर कम ओनर आले .. त्यांना शाळेत सगळा स्टाफ डायरेक्टर सर म्हणूनच बोलायचे .. प्रिंसिपल मॅम ने प्राजक्ताची आणि डायरेक्टर सरांची ओळख करून दिली .

प्राजक्ताने तिचा यु ट्यूब चॅनेल आहे हे सरांना सांगितले ..  प्रिंसिपल मॅम नि सरांना सांगितले कि ह्यांना रेडिओ चॅनेल कडून "वन नाईट स्टार " हा अवॉर्ड पण मिळालाय .

डायरेक्टर सरांना काही एवढा वेळ पण नव्हता आणि इंटरेस्ट पण नव्हता . मुलांना साधी साधी ड्रॉईंग काढायला शिकवा म्हणजे झाले असे ते मनात म्हणत होते . मग प्राजक्ता उठून गेली स्टाफ रुम मध्ये .

प्रिंसिपल मॅम नि मुद्दामून सरांना वेळ काढून प्राजक्ताचा चॅनेल बघायला सांगितला

प्रिंसिपल मॅम " सर प्राजक्ता खरं तर इंटरनॅशनल लेव्हल ची आर्टिस्ट आहे .. याचा फायदा आपण आपल्या शाळेसाठी करून घेतला पाहिजे "

डायरेक्टर " तो कसा  करणार ?"

मॅम " सर .. आपल्याला आपल्या शाळेचा असेम्ब्ली हॉल आहे ना त्या मध्ये प्राजक्ता काढूनच १०/१२ पेंटिंग्स काढून घेता येतील . नाही म्हणजे थोडे फार पैसे आपण देऊ तिला . कारण तिला स्वतःला अजून माहित नाहीये कि ती कोणत्या लेव्हल ची पेंटिंग्स बनवते .. ती एक  अमेझिंग आर्टिस्ट . तिच्या एक लेक्चर चे मी तिला १००० रुपये देईन असे सांगितले तरी ती तयार  झाली यावरूनच मला कळले . नाहीतर तिच्या सारख्या आर्टिस्ट ला सिम्बॉयसिस सारख्या ठिकाणी लाखाचे  पँकेज मिळेल . आणि आज ना उद्या ती तिथं पर्यंत पोहचेलच पण आता सध्या आपल्या कडे आहे ना तर आपण पण त्याच फायदा न  म्हणता उपयोग करून घेऊ "

डायरेक्टर " ठीक आहे .. तुम्हला जे योग्य वाटेल ते करा .. मी जरा वेगळ्या गडबडीत आहे .. आपल्याला शाळा अजून थोडी वरती वाढवायची आहे तर त्याच्या परमिशन च्या मागे लागलोय मी "

प्रिंसिपल मॅम " पण तरी एकदा तुम्ही तिची पेंटिंग्स बघून घ्या " आणि त्या त्यांच्या केबीन  मध्ये गेल्या .

प्रिंसिपल मॅम  ने  असली हिरे  को पहचाना था |

🎭 Series Post

View all