A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session93ee91e3fdd85eed691b8ef903c5638099d81a19ca33f1abd5c5321be2973209d311f307): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

shubharambh 18
Oct 20, 2020
स्पर्धा

शुभारंभ भाग १८

Read Later
शुभारंभ भाग १८

शुभारंभ भाग १८

 

क्रमश: भाग १७

 

प्राजक्ता " अरे .. मला आधी ट्राय तर करू दे .. आधीच मी हरले असे गृहीत धरू नकोस .. कदाचित तुलाच मला जे हवे ते दयावे लागेल .. "

 

ओम " ओके .. थिंक .. थिंक.. बाय .. ठेवतो आता "

 

प्राजक्ता " अरे .. काहीतरी क्ल्युलू तरी दे "

ओम " अरे .. मग काय उपयोग ? बरं ठीक आहे .. आपल्या दोघांशी निगडित  आहे .. "

 

प्राजक्ता " बरं .. जाऊ दे मी हरले .. तू सांगूनच टाक .. मला खूप अस्वस्थ होयला लागलंय "

 

ओम " नाही ..तूला तो कळला पाहिजे मी न सांगता .. खरं सांगतो यात मी हरलो तर मला जास्त आनंद होईल "

 

प्राजक्ता " तेच तर ना .. उगाच माझ्या बावळट पणामुळे मी चुकले तर तुला वाईट वाटेल .. त्याचेच मला जाम टेन्शन आलंय "

 

ओम " हमम.. वाईट तर वाटेलच .. पण ठीक आहे मी नाही रागावणार कारण मी त्या बदल्यात मला पाहिजे ते घेणारच आहे ना .. आणि हसायला लागतो "

 

प्राजक्ता " बघ .. हा नक्की .. कारण माझे डोके तिथपर्यंत जाईल कि नाही याची मला गॅरेंटी नाहीये .. जर मला नाही ओळखता आले तरी चिडायचे किंवा नाराज होयचे नाही .. प्रॉमिस .."

 

ओम " येस .. प्रॉमिस .."

 

प्राजक्ता विचार करू लागली .. काय बरं  असेल पासवर्ड . ? आमच्या दोघांशी निगडित म्हणजे ओम ने काय ठेवला असेल ..त्याचे नाव तर मुळीच ठेवणार नाही .. लॅपटॉप घेतला तेव्हा प्रिया झाली होती .. म्हणजे प्रिया चे नाव असेल का ? काय असेल ? पण त्याने सांगितले कि आमच्या दोघांशी निगडित  आहे म्हणजे .. मला आणि ओम ला माहित असलेली गोष्ट आहे .. आणि ती अशी गोष्ट आहे कि ज्यावेळी झाली त्यावेळी ती गोष्ट आम्ही दोघांनी लक्षात ठेवावी अशीच असणार ..

 

बरच वेळ विचार करत बसली .. भूतकाळात जाऊन परत वर्तमानात येत होती .. तिला सर्व आठवत होते .. ओम ने तिला प्रोपोज केलेला दिवस .. मग घरी एकटाच येऊन तिच्या वडिलांना सांगून गेला होता कि मी तुमच्या मुलीशी लग्न करणार आहे .. तुम्ही तिच्या लग्नाची चिंता करु नका ? मग तिच्या वडिलांनी त्याला चांगली झापली  होती. ती तेव्हा क्लास ला गेली होती आणि इकडे लव्ह मॅरेज म्हणून ओमच्या वडिलांनी  त्याला सांगितले होते कि तू दुसऱ्या जातीची मुलगी घरात आणशील तर तुला हे घर सोडावे लागेल . हे सगळे आठवून  प्राजक्ताला आता खूप हसायला येत होते पण त्यावेळी दोघेही खूप टेन्शन होते त्यांना .

एक दिवस प्राजक्ताला तिच्या बाबांनी घरात कोंडून ठेवले मुद्दामून कॉलेज ला पाठवले नाही . आणि हा तिला भेटायला इतका आतुर झाला होता .. तिची वाट बघून बघून त्याचे डोळे तरसले होते मग ओम तो ओम .. गप बसतो काय ? मुळात प्राजक्ता च्या बाबतीत इतका हळवा  आणि पझेसिव्ह होता कि स्वतःच्या आई वडिलांचा  आणि तिच्या वडिलांचा दोघांचा विरोध पत्करुन बसला होता .. हा रागाने मित्राची स्कूटर घेऊन प्राजक्ताच्या घराखाली आला आणि खालून मोठं मोठ्याने तिला हाका  मारू लागला .. प्राजक्ता खिडकीतूनच खुणवुन त्याला सांगत होती " तू जा .. आज बाबा घरात आहेत .. मी नाही येऊ शकत " पण तेव्हा कबीर सिंग सिनेमा नव्हता आला पण ओम प्रेमाच्या बाबतीत कबीर सिंग सारखाच होता .. कॉलेज मध्ये  असतानाचा  रुबाब जरा वेगळाच असतो नाही का ?

 

मागचे सगळे आठवत प्राजक्ता ने सासूबाईंना जेवण वाढले .. स्वतः जेवायला बसली ..

 

हा पठ्ठया बिनधास्त त्यांच्या घरात घुसला .. आणि तिच्या बाबांसमोर तिला घेऊन बाहेर निघाला

 

प्राजक्ता ची बिचारीची गोची झाली .. इकडे बाबा आणि तिकडे ओम .. ती त्याला समजावून सांगत होती " अरे थांब .. काय असा वेड्या सारखा करतोस .. आज नाही येत आहे मी .. बाबा नको म्हणतायत ना .. ओम .. सोड माझा हात .. ओम प्लिज सोड ..

 

प्राजक्ताने हात सोडायला सांगितल्यावर त्याने लगेच तिचा हात सोडला आणि तिच्या डोळ्यात रागाने बघून तिला सांगू लागला " मी आता तुला कायमची घेऊन जाऊ शकतो .. पण जोपर्यंत तू तयार नाहीस तोपर्यंत मी हे करणार नाही .. सांगून ठेव तुझ्या बाबांना .. मला उगाच अक्रास्थळ पणा करायला भाग पडू नका .

 

प्राजक्ताचे बाबा " अरे नालायका .. तुझी हि हिम्मत .. माझ्या समोर तिचा हात पकडतोस "

 

ओम " मी तुम्हाला केव्हा पासून सांगतोय कि आमचे एकमेकांवर प्रेम आहे तुम्ही ते मान्य करा .. तर तुम्ही मला समजूनच घेत नाहीये .. मग मी काय करू ?"आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले .

 

प्राजक्ता " बाबा .. अहो खरच  ओम  खूप चांगला मुलगा आहे .. माझ्यावर जीव ओवाळून टाकतो .. "

 

प्राजक्ताचे बाबा इतके भडकले होते कि त्यांनी तिला कानाखाली मारायला हात उगारला " नालायक कार्टी .. तेवढ्यात ओम ने त्यांचा हात धरला "खबरदार .. माझ्या प्राजु ला माराल  तर .."

 

काय ड्रामा चालू होता .. घरात

 

तोच उलटा हात प्राजक्ताच्या वडिलांनी ओम ला लगावला ..

 

प्राजक्ता " बाबा .. काय केले तुम्ही हे .. तुम्हला मी सांगते ना .. माझे प्रेम आहे त्याच्यावर .. तुम्ही का मारलेत त्याला .. आणि त्याला म्हणाली " चल ओम .. आपण आजच जाऊन लग्न करू .. मी  येते तुझ्या बरोबर .. ह्या लोकांना आपले प्रेम कळणार नाही आणि आहे त्या ड्रेस वर प्राजक्ता त्याच्या बरोबर घरातून बाहेर पडायला तयार  झाली "

 

आठवता आठवता प्राजक्ताच्या अंगावर  शहारा  आला .. हि एवढी ताकद तिच्यात कुठून आली  होती काय माहित ?.. एरवी बाबांच्या पुढे तोंडातून एक शब्द न काढणारी प्राजक्ता बाबांच्या समोर ओम चा हात पकडून घरा  बाहेर निघायला तयार झाली .

 

ओम " हे बघा  सासरेबुवा.. मी आता घेऊन जाऊ शकतो ..  "

 

प्राजक्ताचे बाबा " जा मग .. कार्टीला घेऊन जा .. माझी मुलगी मला मेली असे समजेन मी "

 

ओम " काय प्रॉब्लेम आहे तुमचा ? तुम्हाला कळत नाहीये का ? तुमची मुलगी आपल्या दोघांवर प्रेम करते ते .. तिला बाबा पण पाहिजेत आणि  मी पण पाहिजे मला कितीतरी वेळा म्हणालीय ती ? तुम्ही का आम्हाला समजून घेत नाहीये .. मला जर तुमच्या मुलगीला नुसतंच गाव भर फिरवायची असती तर मी घरी येऊन  मागणी घातली असती का ?  सांगा तुम्हीच .. "

 

प्राजक्ताचे बाबा चा राग जरा  शांत झाला होता आणि ते शांतपणे खुर्चीत बसले ..

 

प्राजक्ताची आई " अहो .. दोघांचे खरंच  प्रेम आहे हो .. मी बघितलंय  ओम  च्या डोळ्यात .. तो तिला कधीच दुखी नाही ठेवणार .. आणि हे तुम्हाला पण  माहितेय . आपण या दोघांचे रीतसर लग्न लावून देऊ .. "

 

प्राजक्ताचे बाबा  उठले आणि प्राजक्ताच्या डोक्यावर हात फिरवून म्हणाले " हे बघ .. प्रेम करणं सोपे असते पण ते निभावणे फार कठीण असते .. लग्न केल्यानंतर तर खरी परीक्षा असते .. उद्या जर आमचं  जमत नाही म्हणून दारात यायचंच नाही आणि शेवटचा पर्याय म्हणून आलीस तर मी घरात घेणार नाही आधीच सांगून ठेवतो .. काय ओम कळले का ? "

 

ओम " अहो सासरे बुवा .. आय मिन बाबा अशी वेळच येणार नाही .. "

 

प्राजक्ताचे बाबा " ठीक आहे .. आज तारीख काय आहे १८ सप्टेंबर .. तू उद्या जाऊन कोर्ट मॅरेज ला अप्लिकेशन  देऊन ये त्यांची तारीख आली कि त्या तारखेला लग्न आधी हॉल वर करू मग कोर्टात पण करू .. कोर्टात यासाठी जर माझ्या मुलीला तू त्रास दिलास तर तुला कोर्टात खेचिन मी .. कळले का तुला  ?"

 

ओम डोळ्यातून अश्रू आणि हसत बोलला .." कोर्टात काय तुमची अजून एक कानाखाली मला जागेवर आणेल .आज पासून मी तुमचा जावई आहे  हे लक्षात ठेवा .. "

 

प्राजक्ता मात्र आई च्या मागे लपून लाजत होती . अखेर ओम ने प्राजक्ताच्या बाबांना पटवलेच होते . पण एवढ्यावर गप्प बसेल तर ओम कुठला

 

ओम " बाबा . मग आज मी तिला मंदिरात नेऊन आणू का ? म्हणजे तुमची परवानगी असली तर ?"

 

प्राजक्ता आत मध्ये पळाली

 

प्राजक्ताचे बाबा " काय रे शहाण्या ?

 

ओम " प्लिज.. प्लिज .. बाबा .. पाठवा ना .. प्लिज .. आज पाठवा ... ना आणि त्यांची गयावया करू लागला .. "

 

शेवटी प्राजक्ताचे बाबा तयार झाले आणि म्हणाले " अर्ध्या तासात परत ये "

 

ओम प्राजक्ताच्या बाबांची परवानगी घेऊन प्राजक्ताला  मित्राच्या स्कूटर वर बसवून चक्क फिरायला घेऊन गेला . त्या दिवशी दोघे खूप खुश होते .. प्राजक्ताने छान सिम्पल ब्युटीफुल पंजाबी ड्रेस घातला होता .. आणि त्यावर तिची  लांब केसांची वेणी आणि छोटीशी टिकली .. इतकी सुंदर दिसत होती ना ..

 

प्राजक्ता " ओम , आपण कुठल्या मंदिरात जातोय "

 

ओम " माझ्या घरी "

 

प्राजक्ता " काय ? अरे .. मला भीती वाटते य .. मी या ड्रेसवर .. त्यांना मी नाही आवडले तर ? "

 

ओम " आजचा दिवस चांगला आहे .. तुझ्या बाबांनी होकार दिलाय .. आता माझ्या बाबांचा पण होकार मिळवू म्हणजे आपण मोकळे .. "

 

ओम  प्राजक्ताला घरात घेऊन आला .. तिला एका खुर्ची वर बसवली आणि तिला प्यायला पाणी दिले .

 

ओम " बाबा .. आई .. जरा बाहेर या "

 

ओम चे बाबा आणि आई बाहेर आले

 

ओम " हि तुमची सुनबाई .. पुढील दोन महिन्यात हि तुमची सुनबाई होणार आहे .. तुम्हाला मी बोललोच होतो .. ना ती हीच .. "

 

ओम चे बाबा " काय फालतू पणा   आहे .. मी तुला सांगितलंय कि आपल्या घरात पर जातीतील मुलगी सून म्हणून येणार नाही .. "

 

ओम " ठीक आहे , मी तुम्हला सांगायला आलो होतो आम्हला आशीर्वाद द्या .. नाही दिलात तर मी हे घर सोडायला पण तयार आहे "

 हे सगळं पाहून ओम ची आई  तर रडायलाच लागली .. आणि प्राजक्ता ची पण घाबरून गाळणच उडाली होती .. एक कानाखाली खाल्ली होती आता त्याचे बाबा पण ओम ला वाजवतात  कि काय अशी तिला भीती वाटली . "

 

ओम चे बाबा नि प्राजक्ताला बघितले खरं तर प्राजक्ताचे रूप च इतके सात्विक होते कि तिला नकार द्यायला काहीच कारण नव्हते

 

ओम चे बाबा " काय ग पोरी ? या भयताडा शिवाय कोण भेटला नाही का तुला ? तू किती छान आहेस आणि हा उपटसुम्भ्या .. याच्या प्रेमात कशी पडलीस "

 

प्राजक्ताने मान खाली घातली आणि लाजली आणि म्हणाली " मला आवडतो तो .. प्लिज बाबा मला तुमची सून करून घ्या ना ."

 

ओम चे आई आणि बाबा दोघे एकमेकांकडे बघून बोलले " ठीक आहे .. तुझ्या आई बाबांना घेऊन या मला भेटायला .. किंवा आम्ही येतो बोलणी करायला "

 

ओम ने आणि प्राजक्ताने आनंदाने आई बाबांचा आशीर्वाद घेतला .. ओम च्या आई ने तिला  कुंकू लावले आणि साखर भरवली .. आणि तिच्या हातावर १०० रुपये ठेवले .. याचे काहीतरी घे तुला .. ती पैसे घेतच नव्हती .. पण " घे ग .. माझा आशीर्वाद आहे असे समज आणि घे "

 

ओम "  हिला सोडून येतो घरी .. " आणि दोघे तिकडून बाहेर पडले .. आज ओम म्हणाला तसा दिवस खूपच छान होता .. लगेच तिकडच्याच  एका देवळात गेले .. देवाला मनापासून नमस्कार केला .. आणि देवळातून बाहेर पडले .. "

 

ओम " मग आता कसे वाटतंय ?"

 

प्राजक्ता काहीच बोलत नव्हती .. पण मनातून खुश आहे हे चेहरा तर लगेच सांगत होता ..

 

ओम ने गाडी एका गार्डन मध्ये आणली . दोघे एका बाकावर बसले ..दोघे मनातून खूप खुश होते ..आता आपले लग्न होणार हे नक्की ..

 

ओम " मला पाहिजे ते देशील का ?" आज मी एक कानाखाली खाल्ली त्या बदल्यात मला एक देशील का ?"

 

प्राजक्ता " काय ? "

 

ओम " मला जे पाहिजे ते देशील का ? म्हणजे आता तुझा माझ्यावर विश्वास असला तरच दे .. नाहीतर मी अजून थांबेन "

 

प्राजक्ता "नको .. मला भीती वाटते .. चल जाऊ घरी .. बाबा वाट पाहत असतील "

 

ओम " म्हणजे अजूनही माझ्यावर विश्वास नाहीये ना "

 

प्राजक्ता " आता इतका थांबलाच आहेस तर लग्न होई पर्यंत थांब ना "

 

ओम " ठीक आहे .. चल जाऊ घरी .. नाहीतर सासरेबुवा भडकायचे "

 

प्राजक्ता " तुला माहितेय ना .. माझा  तुझ्यावर किती विश्वास आहे ते .. "

 

ओम " हो " आणि ओम ने तिला पहिल्यांदा  त्याच्या  मिठीत घेतले .. प्राजक्ताचा जीव नुसता घाबरला होता .. तिने घट्ट डोळे मिटले होते .

ओम " किती घाबरतेस .." आणि ओम ने तिला किस केले " आजची तारीख आणि आजचा हा पहिला किस लक्षात ठेव . जेव्हापण तुला माझा राग येईल तेव्हा हा दिवस , हा क्षण आठव तुझा राग लगेच जाईल "

 

सासूबाई " प्राजक्ता .. कसला  विचार करतेस .. काय ग .. लक्ष कुठेय तुझे "

 

प्राजक्ता " अ .. अ .. काही नाही .. आणि उठून किचन मध्ये गेली "

 

एक पासवर्ड शोधायच्या नावाखाली ओम ने तिला भूतकाळात पाठवले होते .

 

प्राजक्ताला पासवर्ड जवळ जवळ कळलाच होता .. ती पटकन लॅपटॉप च्या इथे गेली आणि तिने पासवर्ड टाकला "१८९२००५" आणि एकदम करेक्ट .. लॅपटॉप ने पासवर्ड ऍक्सेप्ट केला होता .. काय तो आनंद .. त्या भावना शब्दात सांगणे कठीणच आहे .. इतकी वेव्हलेन्थ मॅच झाली पाहिजे .. प्राजक्ताची झाली होती त्यामुळे तिला आज जग जिंकल्याचा अनुभव येत होता .

 

प्राजक्ताने ओम ने सांगितल्या प्रमाणे त्या पेंटिंगचा फोटो काढून तो यु ट्यूब चॅनेल ला अपलोड केला .. ओमने त्याचे इमेल आयडी दिल्यामुळे त्याला लगेच मेल गेला आणि त्याला कळले कि हिला पासवर्ड कळलाय .. त्याला पण खूप आनंद झाला होता .. त्याला आत्ता च्या आता तिला एक किस करावा असे वाटतं  होते .

 

ओम ने तिला मेसेज टाकला " मग माझ्याकडून काय हवे आहे ते सांग .. येताना घेऊन येतो .. आणि पुढे किस चा स्माईली "

 

प्राजक्ता " नंतर विचार करून सांगेन "

 

ओम " ठीक आहे .. "

प्रेमाची ताकद माणसांना मनातून आनंदायी बनवते , शरीरात  वेगळेच हार्मोन्स वाहू लागतात ..आणि मग  माणसाची कल्पकता पण वाढू लागते किंवा जे काम तो करतोय/तेय त्यामध्ये तो शंभर टक्के स्वतःला झोकून देतो कारण एका पॉसिटीव्हिटीचे वलय त्याच्या भोवती फिरत असते . “खूप छान होणार” आहे असे त्याला त्याचे मन सांगू लागते .

 

प्राजक्ताचा भूतकाळ आठवून एक प्रकारे ती खूप रिलॅक्स झाली होती .. स्वतःवर , स्वतःच्या प्रेमावर , ओम वर चा विश्वास आज अजून वाढला होता .. जेव्हा लग्नाला उभी राहिली तेव्हा ओम ला जॉब सुद्धा नव्हता पण आज ओम ने त्याचा संसार किती छान सांभाळला होता .. प्राजक्ताची आई म्हणाली तसे प्राजक्ताला दुखी तो पाहूच शकत नव्हता . विश्वास वाढल्यामुळे प्राजक्ता आता अविश्वसनीय गोष्टी करायला तयार होत होती .

 

स्वतःच्या पंखांवर विश्वास असणाऱ्या पक्षांना आकाशाच्या उंचीची भीती नसते.