शुभारंभ भाग १७

IN THIS PART OM ASK PRAJKTA TO GUESS THE POSSWORD OF HIS LAPTOP

शुभारंभ भाग १७

क्रमश: भाग १६

दुसऱ्या दिवशी  मुले शाळेत गेली . म्हणजे ओम च नेहमी प्रमाणे मुलांनां सोडायला गेला आणि जाता जाता प्राजक्ताला खुणवुन गेला कि तू ट्रॅक पॅन्ट घालून रेडी रहा .. मी आलो कि आपण  जाऊ .

प्राजक्ताने त्याला  खुणेनेच तू आधी आईंना सांग मगच जाऊ . त्याने पण ठीक आहे मी आल्यावर  बोलतो तू तयार रहा .

ओम मुलांना  सोडून आला  तर बघतो तर प्राजक्ता बेडरूम मध्ये जाऊन झोपली होती

ओम " प्राजक्ता , कुणीकडे आहेस ग ? आई .. अग मी आणि प्राजक्ता जरा चालून यतो ग .. म्हंटले थोडा थोडा व्यायाम सुरु करतो "

आई " हो चालेल कि .. खरं तर ओम हे आधीच सुरु करायला पाहिजे होते तुम्ही "

ओम " पण हि गेली कुठे "

आई " ती बहुतेक आज येणार नाही वाटतं  तुझ्या  बरोबर .. अचानक पोटात दुखायला लागले तिच्या असे म्हणत होती "

ओम " काही नाही ग नाटकं सगळी .. तिला मी ते  ट्रॅक पॅन्ट  आणली ना घालायला ती घालायची नाहीये म्हणून म्हणून नाटकं करतेय .. आता तर बरी होती  "

आणि ओम बेडरूम मध्ये गेला तर ती बेड वर चादर अंगावर घेऊन झोपून राहिली होती . तिने ट्रॅक पॅन्ट तर घातली होती पण तिला इतकी लाज वाटत होती कि ती ओम समोर पण यायला तयार  नाही.

ओम " प्राजक्ता .. चल उठ आपण दवाखान्यात जाऊ . काय ग .. अचानक कसे काय पोटात दुखू  लागले "

प्राजक्ता " नाही नको .. दवाखान्यात .. मी जरा झोपले तर बरं वाटेल "

ओम " ठीक आहे .. मग मी एकटाच जातो .. मला वाटले तू येशील माझ्याबरोबर .. आता मला एकट्यालाच जावे लागतंय "

प्राजक्ता " सॉरी अरे .. अचानक पोटात दुखायला लागले नाहीतर मी येणारच होते .. " बोलता बोलता या कुशीवरून त्या कुशीवर वळली त्यातच ओम ला तिने ट्रॅक पॅन्ट घातली आहे ते दिसले .

ओम " प्राजक्ता ... मला दिसलेय तू ट्रक पॅन्ट घातली आहेस ते .. चल उठ .. आपण जाऊ .. मी फक्त १ तास उशिरा जाणार आहे .. जास्त वेळ नको घालवूस ग"

आणि चादर ओढू लागला ..

प्राजक्ता " नको ना ओम .. "

ओम " पाहू तरी कसे दिसतंय "

प्राजक्ता " ओम फार काही छान नाही दिसत आहे .. मी तुला म्हटले ना .. मला नको वाटतंय हे सगळे "

ओम " ते मी ठरवतो .. तू मला दाखव तर .. चल यार प्राजक्ता .. यातच वेळ जातोय " आणि जोर लावून त्याने चादर काढलीच .

प्राजक्ता पटकन उठली आणि  बाथरूम मध्दे पळू लागली . तेवढ्यात ओम ने तिला पकडले

ओम " काय लाजते .. जरा मला बघू तर दे .. "

प्राजक्ता  इतकी  लाजत होती ..

ओम " अरे .. किती छान दिसतंय  काय तू टेन्शन घेतेस .. ऐक ना माझ्यावर विश्वास ठेव तुला हे छान दिसतंय .. चल जाऊ .. येतेस का ? नाहीतर मी आपला जातो ऑफिस ला . उगाच टाईम  पास करू नकोस ना "

प्राजक्ता " जा .. मग जा .. ऑफिस ला .. मी तेच म्हणतेय .. आपण उद्या जाऊ "

ओम " कल करें सो आज कर .. आज करें सो अभि कर " आणि तिला हाताला धरून बाहेर आणतो .

प्राजक्ता " थांब ना ... ओम .. किती घाई करतोस "

आणि प्राजक्ताला बेडरूम च्या बाहेर ओढत आणली .. बाहेर सासूबाई होत्या .. त्या तिच्या कडे बघतच बसल्या .. त्यांनी एक नजर तिच्यावर टाकली आणि ती खूप ओशाळली आणि मान खाली घालून उभी राहिली .

सासूबाई " अरे .. वाह .. छान दिसतेस ग या असल्या कपड्यामध्ये . ओम .. नालायका “

ओम " काय आता मी काय केले ?

आई "अरे हे आधीच का नाही केलेस ?"

ओम " बघ , तुला आईचे टेन्शन होते ना .. ती किती विचारांनी पुढारलेली आहे बघ "

आणि दोघे आज पहिल्यांदाच एकत्र असे सोसायटीच्या गार्डन मध्ये चालायला म्हणून बाहेर पडले .. प्राजक्ता चे चित्तच थाऱ्यावर नव्हते .. ती नुसते आजू बाजूला बावचळलया  सारखी  बघत होती .. कोणी ओळखीचे बघत तर नाही ना ..

ओम " काय चाललंय ना तुझे .. कोण नाही बघत आहे तुझ्याकडे .. बिनधास्त फिर जरा .. मी आहे ना आणि तुझ्या बरोबर .. "

प्राजक्ता " हो ना .. तेच तर .. आता काय आपले नवीन लग्न झालेय का ? लोक काय म्हणतील ..? "

ओम " काय म्हणतील ? काय नवरा बायको फिरत नाहीत का ?"

प्राजक्ता " फिरतात रे .. पण ते नेहमीचेच फिरतात .. लोकांना पण त्यांची सवय झालेली असते .. आपण असे कधी फिरलोय .. कधीच नाही .. त्यात मी असले कपडे सुद्धा कधीच घातले नाहीत . त्यामुळेच तर मला टेन्शन आलंय "

 तेवढ्यात  समोरून त्याच्या शेजाऱ्यांनी सुनबाई .. मस्त शॉर्ट्स मध्ये टीशर्ट वर .. कानात इअर फोन टाकून एकटीच जॉगिंग करत येताना दिसली ..

ओम " ती बघ .. ती किती बिनधास्त वावरतेय ते सुद्धा शॉर्ट्स मध्ये .आता आज पहिला दिवस आहे ना म्हणून तुला असे वाटतंय .. एकदा सवय झाली ना .. कि होईल .. मी समजू शकतो .. पण जर रिलॅक्स  होऊन नाही फिरलीस तर त्याचा काहीही उपयोग नाही ."

प्राजक्ता  न बोलता भराभर ओम बरोबर चालू लागली .... बोल बोलता दोघांनी जवळ जवळ अख्या गार्डन ला एक मोठा राऊंड मारला .. दोघेही घामाघूम झाले  आणि घरी आले . घरी आल्यावर पुन्हा अंघोळ करून मग प्राजक्ता किचन मध्ये गेली आणि ओम ची तयारी करू लागली .. ओम पण जास्त उशीर नको होयला म्हणून   पटापट आवरून ऑफिस ला गेला .

अशा प्रकारे प्राजक्ताचा सकाळी व्यायाम करायला पण शुभारंभ झाला.

आणि खरोखरच जरा अशा  पद्धतीने घाम गाळल्या नंतर आज दोघांनाही खूप छान आणि फ्रेश वाटत होते .

व्यायामे जडत्व जाई दुरी ।व्यायामे अंगी राही तरतरी ।

रक्त वयस्था उत्तम शरीरी । वाढे विचारी साजिवंपण ।।

कित्येकदा  महिला म्हणतात आम्हला खूप काम असते आम्हाला वेगळा व्यायाम करायची गरज नाहीये . पण तसे नसते काम करून नुसताच थकवा येतो पण व्यायामाने ताकद वाढते .. तेज वाढते , फ्रेश वाटते .. तर किमान अर्धा तास तरी प्रत्येकाने व्यायाम साठी काढलाच पाहिजे .

आज काय प्राजक्ताला शाळेत शिकवायला जायचं नव्हते त्यामुळे ती जरा आरामात होती .

साधारण दुपारच्या वेळेत ओम ने फोन केला

ओम " काय ग .. बरी आहेस का ?"

प्राजक्ता " हो .. आज सकाळी चालून आलो तर खूप छान वाटले .. एकदम हलके वाटतंय .. मस्त वाटले रे "

ओम " मग .. तू उगाच नाटक करत होतीस .. आणि खरं सांगू का त्या ट्रॅक पॅन्ट टी शर्ट मध्ये खूप मस्त दिसत  होतीस . तशी तू मेंटेन आहेस एक पाच टक्के एक्सट्रा आहे ते असे रोज थोडा व्यायाम केला कि निघून जाईल ."

प्राजक्ता " हमम.. "

ओम " बरं .. ऐक ना ते कालचे पेंटिंग फ्रेम बनवायला द्यायच्या आधी त्याला अपलोड करायचेय.. तर तू ते करशील का ? म्हणजे TRY तरी तर कर .. नाहीतर मी संध्याकाळी आल्यावर करेनच ."

 ओम हे मुद्दामून जाणून बुजून तिला करायला  सांगत होता .. जोपर्यंत ती लॅपटॉप  जास्तीत जास्त वेळा वापरणार नाही तोपर्यत ती युझर फ्रेंडली होणार नाही आणि आता तिला हे सर्व जमायला पाहिजे असे ओम ला वाटत होते . त्यात काय मोठे रॉकेट सायन्स नाहीये .. प्रॅक्टिस केल्याने  येणार आहे .

प्राजक्ता " अरे .. नको ना .. उगाच काहीतरी बिघडले तर "

ओम " बिघडला तर चालेल .. आता मी नवीन घेणारच आहे तो फार जुना झालाय . "

प्राजक्ता " ठीक आहे बघते .. थोड्या वेळाने "

ओम " का ?आता काही करतेस का?

प्राजक्ता " नाही .. अशीच बसलेय .. माझी कामं झालीत सगळी .. "

ओम" मग कर आता .. आणि ते आपला मिठाईवाले आहे ना त्याच्या मागे एक दुकान आहे फोटो फ्रेम वाल्याचे .. त्याला देऊन ये .. म्हणजे लवकर ते पेंटिंग बेडरूम मध्ये लागेल. राहिले कि राहून जाते .. "

प्राजक्ता " ठीक आहे .. जर मला अपलोड करायला जमले तर .. नाहीतर मग उद्या "

ओम " उद्या तुला शाळा असेल ना पण .. आणि हो तो स्विमिंग कॉश्च्युम पण घालून बघ आपण उद्या स्विमिंग ला जाणार आहोत .. आणि आज सारखा वेळ नको फुकट घालवू .. मला उशीर होतो मग यायला .. आज थोडा उशीरच झाला "

प्राजक्ता " ठीक आहे "

फोन ठेवल्यावर प्राजक्ताने मोठया धीराने ओम चा लॅपटॉप बाहेर काढला . त्याने तिला कालच दाखवले होते कसा चालू करायचा ते .. पण त्याने तिला पासवर्ड  सांगितला नव्हता .

प्राजक्ताने लॅपटॉप ऑन तर केला पण आता पुढे काय ? आता पासवर्ड माहित नाहीये त्यामुळे इथून पुढे बंद कसा करायचा हे हि तिला येत नव्हते . उगाच काहीतरी बिघडण्यापेक्षा  तिने लगेच ओम ला फोन केला

प्राजक्ता " ओम .. पासवर्ड काय टाकू ?"

ओम "  व्हेरी गुड .. चला पहिल्या स्टेप पर्यंत तुझे तुला जमले म्हणायचे. आता तुला मी सांगतो पासवर्ड ची गम्मत . तू जर हा पासवर्ड स्वतः विचार करून तर शोधून काढलास ना तर तू मागशील ते गिफ्ट मी तुला देईन .  पण एक  मिनिट ओन्ली ३ चान्स .. जर तू जास्त वेळा चुकीचा टाकलास तर कदाचित लॅपटॉप लॉक होईल आणि मग दुकानात न्यायला लागेल . सो तूला फक्त 3 चान्स आहेत असे समज .. आणि नाही आलें तर त्या लॅपटॉप शी खेळ नको .. मी तुला उद्या पासवर्ड सांगेन .. मग तू मला मी जे मागेन ते द्यायचे "

प्राजक्ता " अरे पण आता काय करू .. ते राहू दे तसेच .. किंवा मिटून ठेव .. "

ओम " चला म्हणजे मला जे पाहिजे ते आता मला मिळेल .. बी रेडी फॉर दयाट !"

🎭 Series Post

View all