शुभारंभ  भाग १६

In this part prajkta is not happy on surprise received from om

शुभारंभ  भाग १६

क्रमश: भाग १५

आज प्राजक्ता मनातून इतकी खुश होती कि तिला शारीरिक थकवा डबल काम करून सुद्धा जाणवला नाही . घरातील कामं आणि शाळा करून सुद्धा ती आज नवीन पेंटिंग काढायला बसली . आणि मुख्य म्हणजे  हे पेंटिंग तिला आपले ओम वरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी  तिला तो यायच्या आधी करायचे होते म्हणून तिने ह्या वेळेला पेंटिंग सुरु केले .

आज प्राजक्ताला ओम विषयी खुप आदर वाटत होता . त्याने आणि सासूबाईंनी तिला समजून घेऊन तिला  आवडणाऱ्या क्षेत्रात  काम करायची संधी उपलब्ध करून दिली . तिच्या कामा  चे कौतुक  करून तिला प्रोत्साहन पण दिले  होते हि तिची जमेची बाजू होती हे तिला आता चांगलेच कळले होते . त्यामुळे काही दिवसांपूर्वी तिने जे ओम वर आरोप केले होते त्या बद्दल तिला आता खुपत होते .

मुळात प्राजक्ता स्वभावाने सात्विकच होती . तिला राधा कृष्ण यांच्या पवित्र प्रेमावर खूप आस्था होती आणि जेव्हा पण ती मन लावून  पेंटिंग काढायला जायची तेव्हा आपोआप राधा कृष्णच यायचे .. आज पण तसेच झाले . आज तिला जसे ओमने  तिला काल लॅपटॉप हातात दिला तसेच श्रीहरी आपली बासरी  राधेच्या हातात सुपूर्त करत आहेत असा काहीसा विचार येत होता . आणि हि कलपना पण खर तर ओम ने च तिला दिली होती ..

प्राजक्ता रंगांची उधळण त्या कॅनवासवर  करू लागली . निळ्या कृष्णाची कातरवेळ वेळ सुद्धा निळीचं असावी अशी कल्पना करत. प्राजक्ताने नदीचा काठ .. आणि काठा  जवळ असणाऱ्या झाडाखाली राधा आणि कृष्ण एकमेकांच्या डोळ्यात हरवले आहेत . कृष्णच्या चेहऱ्यावरचे तेज राधेच्या चेहऱ्यावर पडत आहे आणि त्यामुळे राधाच्या चेहऱयावर आपोआप तेज आले आहे .. कृष्णा तिला बासुरी कशी वाजवायची याचे धडे देत आहे आणि राधा त्याच्या प्रेमात इतकी मग्न झाली आहे कि तिचे हात त्या बासुरीवर आपोआप सप्तसूर छेडायला तयार होत आहेत आणि या तेजस्वी  प्रेमाचा चंद्र आहे साक्षीला . असे एक राधा कृष्णाच्या प्रेमाचे अद्भुत पेंटिंग प्राजक्ताने तयार केले ..

Love Of Radha Krishna Sparkle Coated Self Adesive Poster Without Frame  Paper Print - Religious posters in India - Buy art, film, design, movie,  music, nature and educational paintings/wallpapers at Flipkart.com

मुले पण आज आई पेंटिंग करतेय म्हटल्यावर त्यांच्या अभ्यासाला न सांगता बसली होती . प्रथमेश च मध्ये मध्ये येऊन  जाऊन बघणे चालू होते .. मधेच एखादा रंग घेऊन जात असे " आई  मी हा रंग घेऊ का ? मला पण पेंटिंग करायचंय "प्राजक्ता त्याला नुसत्याच इशाऱ्याने 'घे "असे सांगायची .

थोड्याच वेळात ओम आला .. लगचेच प्राजक्ता ने पोळ्या करायला घेतलया . ओम फ्रेश होऊन येई पर्यंत जेवायला वाढले आणि सगळे एकत्र जेवले . तिच्या हातावरूनच ओम ला कळले होते कि आज पण हिने पेंटिंग काढले आहे ..

ओम " अरे वाह .. आज मेरा फेव्हरेट मेनू पालक पनीर है "

प्रथमेश " नाही .. बाबा ते माझ्या साठी  केलय आई मला मगाशी म्हणाली "

ओम " हो का ? बरं मग मी खाऊ का नको ?"

प्रथमेश "अहो , माझ्यासाठी म्हणजे मी अभ्यास पूर्ण केला म्हणून तिने माझ्यासाठी म्हटलंय पण खायचे तर सगळ्यांनीच ना "

ओम " ठीक आहे .. आता तू म्हणतोस तर खातो "

प्रिया आणि ओम एकमेकांकडे बघून हसू लागले .

प्रिया " बाबा .. आज ना शाळेत आईचे प्रिंसिपल मॅम खूप कोतुक करत होत्या .. आईने खूप मस्त गणपती बाप्पा काढले होते "

ओम " हो .. का ? अरे वाह !"

सासूबाई " अरे पण पूर्ण दिवस ती शाळेतच होती आज  "

ओम " हो का ? का ग ? तू एकच लेक्चर करणार होतीस ना? "

प्राजक्ता " तेच तर ना .. गणपती चे चित्र मॅम नि अख्या शाळेतल्या मुलांना दाखवले आणि मला पण थांबवून घेतले "

ओम " ओके .. मग आई .. तुला जमले का थांबायला एकटीला ? का घाबरलीस ?"

आई " घाबरते कशाला ? पण मला धड झोपता येईना काय करावे ते कळेना .. त्यामुळे जरा अवघडले .. बाकी काही नाही "

प्राजक्ता " आता उद्या शाळा नाहीच  आहे ..परवा आहे त्या दिवशी मी लॅच  लावून चावी माझ्याकडे घेऊन जाईन .. म्हणजे तुम्हला दार उघडायचे टेन्शन नको .. "

सासूबाई " ठीक आहे "

 जेवण झाली .. कामं झाली .. उद्याची तयारी झाली मुलांना झोपवून प्राजक्ता बेडरूम मध्ये आली .

प्राजक्ता " बघू माझे सरप्राईझ ?"

ओम " अरे .. आधी तुझे ? सरप्राईझ चा विषय तू काढला होतास "

प्राजक्ता "  मी तुझ्या आवडीचे पालक पनीर केले ना .. हेच माझं सरप्राईझ होते "

ओम " हे बरं आहे .. मला आणि प्रथमेश ला एकाच भाजीत पटवतेस का ?"

प्राजक्ता हसायला लागली " बरं मी आलेच आज मी एक पेंटिंग खास तुझ्यासाठी केले आणि तुला जर हे आवडले तर आपण त्याची फ्रेम करून आपल्या बेडरूम च्या वॉल वर लावूया "

ओम " ओके .. मंजूर है । आपका पेंटिंग हमारे सामने पेश किया जाय "

प्राजक्ताने गॅलरी मधून  पेंटिंग बेडरूम मध्ये झाकून  आणले .

प्राजक्ता  " ओके .. रेडी .". आणि त्यावरचा प्लेन कागद बाजूला केला .

ओम लिटरली डोळे विस्फारून त्या पेंटिंग कडे पहात च राहिला .. पुढील १० मिनिटे तो काही बोलायच्या मनस्थितच नव्हता . श्रीकृष्णाचे डोळे  आणि डोळ्यातले भाव . दोघे एकमेकात इतके हरवलेत कि नक्की कोणाचे तेज कोणाच्या चेहऱ्यावर पडत आहे हे कळत नाहीये .

ओम" अमेझिंग यार प्राजक्ता .. कायच्या काय तूझी हि आर्ट अदभुद आहे .. "

प्राजक्ता " आवडले का .. यातली स्पेशालिटी कळाली का ?"

ओम " अग .. मी हे सुंदर आहे या पलीकडे काही मला तेवढी कलेतली नजर पण नाही ग "

प्राजक्ता " अरे .. यात मी तू दिलेली कल्पना वापरली आहे " बासुरी राधेच्या हातात दिली आहे "

ओम " अरे .. हो .. आता मला कळले .. "

प्राजक्ता " खूप छान कल्पना होती तुझी .. सो क्रेडिट गोज तो यु .. बरं आता तू मला काहीतरी आणणार होतास ना त्याचे काय ?"

ओम " अरे यार या तुझ्या पेंटिंग पुढे त्याला आपण सरप्राईझ नको म्हणायला .. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलय हे नक्की ..तुला आवडते कि नाही काय माहित ?"

प्राजक्ता " तू मला छान ओळखतोस . तु बरोबर आणलीच असशील मला माहितेय .. दाखव ना "

ओम " बघ हा .. दार लाव ते आणि काहीही झाले तरी आवाज मोठा करू नकोस .. नाहीतर आई लगेच जागी होते आणि मला ओरडते मग "

प्राजक्ता हसायला लागते .. " ठीक आहे "

ओम ने एक बॅग तिच्या हातात दिली .. बाहेरून बघताच आत मध्ये काहीतरी कापडाचे असेल हे लगेच कळत होते . प्राजक्ताला वाटले कि ओम ने तिला छान शाळेत घालता येईल अशी साडी आणली असेल  . तिने घाई घाईने बॅग ओपन केली तर त्यात दोन पॅकेट्स होते .. "अरे वाह दोन .. "मज्जाच आहे मग माझी "

बायकांना कितीही साड्या असल्या तरी कमीच असतात नाही का !

तिने अधिरपणाने एक पॅकेट ओपन केले

तर त्यात ट्रॅक पॅन्ट , जॅकेट आणि टी शर्ट होते .. तिचा जरा मूड ऑफच झाला होता . ते बाजूला ठेवले आणि तिने अधीरतेने दुसरे पॅकेट ओपन केले तर ते गिफ्ट रॅपर काढल्यावरच त्या ड्रेस चे नाव तिला कळाले आणि तिचा पुन्हा मूडच गेला ..

ओम " काय ग ? ओपन तरी करून बघ हे दुसरे पॅकेट "

प्राजक्ता " नको .. मला नवा वरूनच कळाले आत काय आहे ते "

ओम " ठीक आहे .. मग घालून बघ .. मी अंदाजे साईज आणलीय .. नाही झाला तर उद्या चेंज करता येईल "

प्राजक्ता " नको .. सॉरी पण उद्या दोन्ही आपण रिटर्न करू .. त्या बदल्यात  दुसरे काही तरी घेऊ "

ओम " अरे .. का ? रिटर्न कशाला ? "

प्राजक्ता " काय रे ओम .. हे असले कसले गिफ्ट आणलेस ? शी .. मी आता हे ट्रॅक पॅन्ट घालून मिरवू का घरात ?"

ओम " बावळटच आहेस . ट्रॅक पॅण्ट कुठे घालतात ? जिम ला .. उद्या पासून आपण दोघे सोसायटी मधल्या जिम मध्ये जायचे आहे म्हणून तर आणले हे .. "

प्राजक्ता " नको .. मला नाही जायचंय जीम ला .. आता तेवढंच राहिलंय पुरुषांसारखी डंबेल्स उचलते "

ओम " झाली वेड्या सारखे बोलायला सुरुवात झाली "

प्राजक्ता " हो .. मग .. काय बोलू ? "

ओम " हे बघ प्राजक्ता .. उद्या पासून आपण जिम ला जाणार आहोत म्हणजे जाणार आहोत .. मला काही माहित नाही "

प्राजक्ता " अरे तू काय सगळे मनात घेऊन बसलास का ? त्यावेळी मी जे रागात बोलले ते?"

ओम " कधीचे ? मी काय त्या हिशोबाने नाही आणलेय .. मलाच पार्टनर हवाय जिम साठी .. तू आलीस तर तुझा  पण एक्सरसाईज होईल ना "

प्राजक्ता "मला नाही जमणार अचानक उठून हे असले कपडे घालायला ..

ओम " त्यात काय ? ती काय फॅशन आहे का ? तो जसा शाळेचा युनिफॉम असतो तसा जिम चा युनिफॉर्म आहे असे समजायचे आणि घालायचे आणि दुसरा जो आहे तो स्विमिंग चा युनिफॉर्म आहे असे समजायचे नि  घालायचे .. तुझ्या पेक्षा मला पण कळतंय ना माझ्या बायकोला काय घालू द्यायचे आणि काय नाही घालू द्यायचे ते .. तो स्विमिंग कॉश्च्युम आहे थ्री फोर्थ आहे .. तू ओपन पण केला नाहीस .. मी काय बिकिनी आणलीय का तुला घालायला ? बावळट "

प्राजक्ता " हो असुदे मी बावळट .. मी काही असले कपडे घालणार नाहीये तुला आधीच सांगून ठेवते "

ओम " मग स्विमिंग साडी नेसून करणार आहेस का ?"

प्राजक्ता " अरे पण मला करायचेच नाहीये स्विमिंग ?"

ओम " नाही .. आपण आता आपले शेड्युल ठरवून घ्यायचे आहे एक दिवस जिम , एक दिवस  चालायचे आणि एक दिवस स्विमिंग "

प्राजक्ता " नको ना ओम प्लिज नको ना "

ओम " अरे .. तुला बारीक होयचय ना .. मग हे सगळं करावेच लागेल .... चल गुड नाईट .. उद्या सकाळी मी मुलांना सोडून आलो कि ट्रॅक पॅन्ट घालून तयार रहा "

प्राजक्ता " अरे ओम .. आईनां नाही आवडणार हे सगळे .. म्हणतील हिला बाहेरचं पाणी लगेच लागलं "

ओम " जोपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे तोपर्यंत  तुला असे कोणीच म्हणणार नाही . प्राजक्ता हा बदल नाहीये याला अपग्रेडेशन म्हणतात . जसा तुम्ही तुमची स्किल वाढवण्यासाठी  एखादा कोर्स करता ना तसेच हे असे बदल चांगलेच आहेत . व्यायाम करणे हि गोष्ट केव्हाही चांगलीच आहे .. आज तुला सांगतो माझ्या ऑफिस मध्ये माझ्याच वयाचा मुलगा त्याला ऑफिस मध्ये बसल्या बसल्या माईल्ड अटॅक आला . लगेच ट्रीटमेंट मिळाली म्हणून तो वाचला .. आपण सगळे करतो पण आपल्या शरीरासाठी अर्धा तास आपण काढत नाही . त्यामुळे माझे तर ठरलंय कि आपण उद्या पासून लगेच व्यायामाला जायचं आहे . आणि आपल्याला कुठे बाहेर जायचंय . सगळे सोसायटीमध्ये आहे .

प्राजक्ता च्या लक्षात आले कि हा आता काही मागे हटणार नहिये .. ओम आता प्राजक्ताला या जगाला फेस करण्यासाठी तयार करू लागला . तिच्यातल्या काकूबाईला थोडासा मॉडर्न टच देणे गरजेचे होते . बदल हीच एक गोष्ट अशी आहे कि जी स्थिर आहे . काळानुरूप बदल हे करावेच लागतात नाही तर तुम्ही मागे पडू शकता

🎭 Series Post

View all