Login

शुभारंभ भाग १५

Today is first day of school of prajkta

शुभारंभ भाग १५

क्रमश: भाग १४

दुसऱ्या दिवशी  प्राजक्ताने प्रिंसिपल मॅम ला कळवून  टाकले कि मी येईन . आणि प्राजक्ता तिच्या पुढे येणाऱ्या नवीन जवाबदाऱ्यांना पेलायला मनाने तयार झाली . आता मुलांचा डबा होतो तेव्हाच तीला ओम चा पण डबा आणि नाश्ता  तयार ठेवायला लागणार होता . तेव्हाच सासूबाईंचे जेवण तयार ठेवावं लागणार होते . या सगळ्याचा परिणाम हाच कि तिचे काम मात्र वाढलेले होते .

आज प्रजक्ताचं पहिला दिवस होता

प्राजक्ता  " ऐक ना , आज माझा पहिला दिवस आहे .. मी कोणती साडी नेसू .. ?"

ओम " हा काय प्रश्न आहे ? अरे तूला जे पाहिजे ते ठरव ना "

प्राजक्ता " नको अरे .. माझी चॉईस एकदम साधी असते .. आज पहिला दिवस आहे तर तुझ्या चॉईस ची नसेन म्हणते "

प्राजक्ताला खरं तर प्रिया चे वाक्य डोक्यात आहे .. तिच्या चॉइस ची साडी प्रियाला आवडली नव्हती ..

 ओम ने तिला एक मस्त कॉटन इरकल ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन मधली काढून दिली

ओम " मला वाटतंय हि छान दिसेल "

मग प्राजक्ता छान तयार  होऊन सासूबाईंना नमस्कार करून , देवाच्या पाया पडून शाळेत गेली

प्रिंसिपल मॅम नि तिची बाकीच्या स्टाफ शी ओळख करून दिली आणि तिला वर्गाच्या दिशेने घेऊन  गेल्या

प्रिंसिपल मॅम " गुड मॉर्निंग स्टूडेंट्स , हिअर इज अवर न्यू ड्रॉईंग टीचर .. से हॅलो टू  हर .

स्टुडंट्स " हॅलो मॅम "

प्राजक्ताने पण त्यांना हॅलो म्हटले .. आणि मग प्रिंसिपल मॅम निघून गेल्या

प्राजक्ता " टुडे व्युई विल लर्न हाऊ टू draw गणपती बाप्पा विथ कलर्स "

मुलांच्या पण लक्षात आले कि नवीन मॅम बोलायला चाचपडत आहेत आणि मग मुले एकमेकांशी गप्पा मारू लागले .. काही काही तर त्यांच्या जागेवरून उठून आपल्याला पाहिजे त्या मुलाच्या शेजारी जाऊन बसले .

त्यांना “बोलू नका , एका जागेवरच बसा “अशी अनेक वाक्य प्राजक्ता मनात बोलत  होती कारण तिला ह्या वाक्यांसाठी प्रॉपर इंग्लिश वाक्य सुचत नव्हतं . मराठी बोलले तर मुलं हसतील की काय अशा भीतीने ती गप्प उभी राहिली . पाच एक मिनिट ति काहीच बोलली नाही . त्याचा फायदा  मुलांनीं पुरेपूर घेतला .

प्राजक्ता " ओके .. सो आर यु रेडी ? शाल व्युई स्टार्ट ?"

आणि प्राजक्ताने व्हाईट बोर्ड वर मार्कर ने गणपती बाप्पा काढायला सुरुवात केली . जशी तिने पाठ वळवली कि मुले पुन्हा एकमेकांशी बोलायला लागायची .कोण्या एका वात्रट मुलाने तर एक विमान बनवूंन  तिच्या दिशेला भिरकावले . पण प्राजक्ताने दुर्लक्ष केले आणि तिने मन लावून तो गणपती बाप्पा काढले.

जेव्हा तिचा पूर्ण गणपती बाप्पा काढून झाला तशी वर्गात एकदम शांतता . सगळे त्या गणपती बाप्पाच्या डोळ्यात जसे हरवून गेले होते ..

सर्व एकत्र पणे उभी राहिली आणि त्यांनी लिटरली टाळ्या वाजवल्या . इतके सजीव गणपती बाप्पा प्राजक्ताने त्या व्हाईट बोर्ड वर नुसत्या मार्कर च्या साह्यायाने  काढले होते .

प्राजक्ता " सो डू यु लाईक इट ?"

स्टुडंट्स " यस मॅम "

प्राजक्ता " बीफोर यु draw इट इन युअर नोट बुक लेट मी नो हू थ्रो धिस ऐरोप्लेन at मी ?"

मुलांमध्ये कोणीच बोलायला तयार  नाही .

प्राजक्ता " टेल मी फास्ट अदरवाईज आय विल रब धिस बाप्पा "

मुले एकमेकांकडे बघू लागली .. एकमेकांशी पुन्हा बोलू लागली .

प्राजक्ता " शु.. कीप  क्वाइट . टेल मी द नेम ऑफ ऐरोप्लेन बॉय . अदरवाईज आय विल नॉट टीच यु "

स्टुडंट्स " सॉरी मॅम ."

प्राजक्ता " नो डोन्ट से सॉरी ऑल .. हू थ्रो ऐरोप्लेन ?. इफ यु विल नॉट  रिस्पेक्ट युअर टीचर देन यु आर नॉट एलिजिबिल टू लर्न आर्ट . आर्ट इज गॉड अँड यु शूड रिस्पेक्ट इट "

थोड्याच वेळात एक द्वाड मुलगा पुढे आला आणि प्राजक्ताला सॉरी म्हणू लागला ..त्या मुलाने त्याने केले कृत्य  मानले आणि त्या बद्दल क्षमा पण मागितली .

प्राजक्ता " सो व्हॉट इज युअर पनिशमेंट यु ओन्ली डिसाइड "

तो मुलगा " सॉरी मॅम , आय विल नॉट डू इट अगेन "

प्राजक्ता " ओके .. गो अँड सीट "

तो मुलगा " सॉरी मॅम वन्स अगेन "

आणि मग वर्गात जी पिनड्रॉप शांतता होती आणि सगळी मुले छान चित्रात रंगून गेली .

वर्गातून अजिबातच आवाज येई ना म्हणून प्रिंसिपल मॅम पुन्हा वर्ग बघायला आल्या तर ते गणपती बाप्पा बघून मॅम पण भारावून गेल्या . त्या बाप्पाच्या डोळ्यात आईची माया होती असे वाटायचे कि डोळ्यात बघतच राहावे . मुले पण एकदम शांतपणे त्यांना जमेल तसा बाप्पा वहीत काढत होते . प्रिंसिपल मॅम नि बाकीच्या वर्गातील मुलांना पण एका मागोमाग एक रांगेत आणून  सर्वांना ते चित्र दाखवले .

एका रांगेत प्रिया पण येत होती तिला प्राजक्ताने सांगितलेच नव्हते कि ती त्यांच्या शाळेत टीचर म्हणून येणार आहे ते . प्रिया ने ते चित्र बघितले आणि नवीन ड्रॉईंग टीचर कोण आहे ते वाकून बघितले कि जिची अख्खी शाळा तारीफ करतेय  तर तिची आई .. आहे हे बघितल्यावर तिच्या डोळ्यात एक वेगळाच अभिमान होता .. तिने लगेच तिच्या मैत्रिणीला सांगितले " ती माझी आई आहे ".

आज प्रिया ची कॉलर ताठ झाली होती .. आज तिला तिची आई जगातली सर्वात सुंदर बाई दिसत होती . कसे आहे ना सुदंरता हि तुमच्या आत असते .. बाहेर फक्त दिखावा असतो . हे बहुधा आज तिला कळले होते . तिने सर्वांच्या समोर आईला एक घट्ट मिठी मारली

प्रिया " आई तू खूप ग्रेट आहेस .. सॉरी मी तुला काल खूप वाईट बोलले . तेवढ्यात प्रथमेश पण धावत आला .. त्याने तर चित्र पण पहिले नाही त्याला प्राजक्ता शाळेत  आतमध्ये आलीय याचाच आनंद जास्त होता .

चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या  अंतःकरणातल्या  विचारांवर अवलंबून असते

मनात आत्मविश्वास असला कि चेहरा तेजस्वी दिसतो

मनात इतरांविषयी प्रेम असले कि चेहरा सात्विक दिसतो

मनात इतरांविषयी आदर असला कि चेहरा नम्र दिसतो

मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात

एव्हाना सर्व मुलांना कळले  होते कि प्राजक्ता हि नवीन  ड्रॉईंग टीचर आहे आणि ती प्रिया आणि  प्रथमेश ची आई आहे

प्राजक्ताला स्वतःला कल्पना नव्हती कि ती इंग्लिश मध्ये इतके छान बोलू शकते . ज्या प्रकारे पहिला दिवस तिचा गेला त्यावरून तिला नक्कीच कळले कि मी आता हे काम चांगलेच करू शकते .

आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.

आणि पहिल्याच दिवशी प्राजक्ताकडे आवड तर नक्कीच होती  आणि  आता आत्मविश्वास पण कमावून तिच्या करिअर ला एक प्रकारे शुभारंभ केला होता

 तिचे  लेक्चर झाल्यावर लगेचच तिला खरे तर घरी यायचे होते म्हणजे तसे तिने सासूबाईंना सांगितले होते पण तिने काढलेले चित्र  प्रिंसिपल मॅम  नि दाखवायचे ठरवले  आणि तिला थांबायला सांगितले त्यामुळे आज पहिल्याच दिवशी तीचा शाळेत खूप वेळ गेला . आणि या सगळ्या  गडबडीत प्राजक्ता थोडा वेळ सासू बाई ना विसरून गेली होती. प्राजक्ता जी सकाळी गेली ती डायरेक्ट दुपारी मुलांना घेऊनच घरी आली . घरात आल्यावर त्यांचा जरा मूड खराब होता . नेहमी जशा हसून  खेळून बोलतात तश्या बोलल्या नाहीत . त्यांच्यात झालेला बदल लगेचच प्राजक्ताच्या  लक्षात आला

प्राजक्ता " अहो आई ते प्रिंसिपल मॅम ने मला थांबवूनच घेतले .. मी काढलेले चित्र सगळ्या मुलांना दाखवले "

सासूबाई " बरं .. शाब्बास "

प्रिया " आजी , आज आईचे शाळेत सर्व जण खूप कौतुक करत होते "

आजी " हो .. का .. मग तुझी आई आहेच मुळात गुणांची "

आणि त्यांनी पण जास्त विषय न ताणता नॉर्मल झालया .

तेवढ्यात ओम चा फोन आला..

ओम " हॅलो , मॅडम कसा होता आजचा पहिला दिवस ?"

प्राजक्ता " ओम .. खूप छान .. तुला माहितेय का .. मी आज सर्व इंग्लिश मध्ये बोलले मुलांशी "

ओम " मग काय .. ते तर तुला  येतेच ना .. मुलांचा सगळा  अभ्यास तर तूच घेतेस  तोही इंग्लिश मधेच असतो ना "

प्राजक्ता " अरे हो .. घरात बसून शिकवणे वेगळे असते पण इतक्या मुलांसमोर बोलणे वेगळे .. आधी मला खूप टेन्शन आले होते .. पण फायनली मला छान जमले .. ओम मी आज खूप खुश आहे .. "

ओम " वाह.. वाह .. ग्रेट .. अशीच खुश रहा .. तुझ्या खुशीतच आमची सर्वांची ख़ुशी आहे "

प्राजक्ता " ओम .. थँक यु .. तू मला किती समजून घेतोस "

ओम " तू विसरलीस का ? आज सकाळी मी तुला काय सांगितले ते "

प्राजक्ता " ओह  .. सॉरी .. सॉरी "

ओम " अरे .. पुन्हा तेच .. "

प्राजक्ता " मग काय बोलू .. "

ओम " ते पण मीच सांगू का ?"

प्राजक्ता " चल .. तू घरी आल्यावर तुला एक सरप्राईझ माझ्या कडून "

ओम " मी पण तुला एक सरप्राईझ आणणार आहे आज .. बी  रेडी फॉर दयाट "

प्राजक्ता " ओके .. "

आता मुल्ला कि दौड मस्जिद म्हटल्या सारखे प्राजक्ताने ओम च्या आवडीची पालक पनीर बनवायचे ठरवून टाकले आणि त्याच्या तयारीला लागली . आता  ओम चे काय सरप्राईझ असेल काय माहित .?

संसारातल्या  प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना , सुखाची साधनं ,हि वयानुसार , कालानुरूप निरनिराळी असतात . प्रत्येक जण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही . पण संसार टिकतो कसा ? तर जेव्हा दुःख सगळ्यांचं एकच होतं तेव्हा . प्राजक्ताचे दुःख ओम ने आणि त्याच्या आईने पण समजून घेतल्यामुळेच आज प्राजक्ताला हा आनंद , सुख आणि मुख्य म्हणजे समाधान मिळाले .

प्राजक्ताचे आता स्वतःचे अस्तित्व निर्माण होऊ लागले होते . आता ती अख्या शहरात एक पेंटिंग्स बनवणारी आर्टिस्ट म्हुणुन माहित झाली होती . लगेच च तिला शाळेत ड्रॉईंग टीचर म्हणून टेम्पररी का होईना पण नोकरी मिळालीच होती . आणि हे सगळे तिला अपेक्षित नसताना झाले होते . थिंक बिग ऍज  यु कॅन असे म्हणतात  ते उगाच नाही . मनातल्या विचारांना गती मिळतच असते. तसे हार्मोन्स  शरीरातून वाहू लागतात . 

नुसता शुभारंभ होऊन उपयोगाचा नाही .. तो टिकवता आला पाहिजे . त्यातुन काहीतरी करता आले पाहिजे .

प्राजक्ता पालक पनीर  चे  सामान आणायला गेली ते येताना तिचे पेंटिंग चे सामान जे संपले होते ते पण घेऊन आली . मुले खाली खेळआयला गेली होती आणि सासूबाई मंदिरात गेल्या होत्या . हिने थोडी फार जेवणाची तयारी केली फक्त पोळ्या करायच्या बाकी ठेवल्या आणि एक पेंटिंग काढायला सुरुवात केली..

🎭 Series Post

View all