A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session69adc53fe7c6fc1e3dc501bc6e1fa2b5d2791a707a5f257cea161ce56c3159efb7cd4e91): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

shubharambh 14
Oct 25, 2020
स्पर्धा

शुभारंभ भाग १४

Read Later
शुभारंभ भाग १४

 

शुभारंभ भाग १४

 

क्रमश: भाग १३

 

प्राजक्ता एकदम उत्साहात  " ओम एक गुड न्यूज आहे " 

 

ओम " काय ? बोलतेस काय ? पण कशी काय ?" आणि हसायला लागतो .. म्हणजे पेंटिंग पुन्हा होल्ड वर कि काय ?"

 

प्राजक्ता "गप रे.."

 

ओम " बर बोल .. "

 

प्राजक्ता " अरे तू बिझी आहेस का ?"

 

ओम " नाही .. बोल ना .. सर्व ठीक आहे ना "

 

प्राजक्ता " ऐक ना ओम .. मला प्रिया च्या शाळेत ड्रॉईंग तुम्ही शिकवणार का असे विचारलय? "

 

ओम " मग तुला काय वाटतंय ?तेच तर ना .. एकतर शाळा  जवळ आहे त्यात मला ते एक्सटर्नल टीचर म्हणून अँपॉईंट करणार आहेत जेवढे लेक्चर होतील त्यावर पेमेंट . मला तरी ओके वाटतंय .. सध्या सुरुवात म्हणून  करायला काय हरकत आहे "

 

ओम " ठीक आहे .. मी पण थोडा विचार करतो .बाकीचे डिटेल्स घरी आल्यावर  बोलू"

 

प्राजक्ता " ओके . ठीक आहे "

 

असे म्हणतात एक पाऊल  तुम्ही टाकले कि दुसरे पाऊल पुढे टाकत संधी पुढे येऊ लागते .फक्त ती संधी तुम्ही ओळखून त्या संधीचे सोने करता आले पाहिजे . प्राजक्ताने एक पाऊल  पुढे टाकल्या टाकल्या तिच्या समोर उत्तम संधी चालून आलेली आहे ..

 

माणसाने असे एक तरी स्वप्न बघितले पाहिजे कि ते पूर्ण करण्यासाठी त्याची झोप उडाली पाहिजे आणि दिवस मेहनत करण्यात गेला पाहिजे . माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असेल तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असली पाहिजे . आणि हि मनस्थिती कशाने चांगली होते तर ती कष्ठाने . कारण कष्ट हि माणसाची क्षमता तपासते आणि विकासाच्या मार्गावर नेते . कष्ट हि प्रेरक शक्ती आहे .

 

अशी एक गोष्ट आहे कि एक माणूस नुसता त्याच्या नशिबाला कोसत असतो . मी नुसता गरीब च राहिलो .. तर त्याच्या मित्राने त्याला विचारले कि "का रे? तुमची तर शेती आहे ना ? मग तिथे शेती का करत नाहीस ?" तर त्यावर तो म्हणाला अरे मी गहू लावले असते तर त्यांना मुंग्यांनी खाल्ले असते आणि मी मका लावला असता तर पक्षांनी खाल्ले असते " त्याच मित्र म्हणाला "मग शेवटी तू काय लावलेस?"तर तो म्हणाला "उगाच नुकसान नको म्हणून मी काहीच लावले नाही .."

थोडक्यात काय यशस्वी होण्यासाठी  कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही . हातावर हात धरून आणि तोंडातून वाफा काढून काही होणार नाही.

 

प्राजक्ता मुलांना घेऊन घरी आली .. मुलांना नाश्ता वगैरे दिल्यावर तिने प्रिया ला विचारले

 

प्राजक्ता  " ते माझे फुलाचे पेंटिंग प्रिंसिपल मॅम ला तू दिलेस का ?"

 

प्रिया " नाही अग आई , ते मी माझ्या मैत्रिणीला दाखवायला नेले होते .. तेवढ्यात ते प्रिंसिपल मॅम नि बघितले आणि माझ्याकडून काढू घेतले "

 

प्राजक्ता " मग काय बोलल्या मॅम ?"

 

प्रिया " त्यांनी मला  विचारले हे पेंटिंग कोणी काढलंय तर मी सांगितलं माझ्या आई ने काढले. तर त्या लगेच म्हणाल्या हे पेंटिंग मी माझ्याकडे ठेवते तू आईला मला भेटायला सांग .. "

 

प्राजक्ता " ठीक आहे .. मी भेटले आज त्यांना .. त्यांनी दिलय परत मला ते "

 

प्रिया " काय ग आई , तू हि असली साडी नेसूल का आली होतीस प्रिन्सीपल मॅम ला .. जरा छान आवरून यायचं ना ?"

 

प्राजक्ता " काय झालय या साडीला .. खूप  हलकी आहे .. मला नेसायला बरी पडते"

 

प्रिया " तू ना .. एकदम  काकूबाई सारखी रहतेस.. थोडी फॅशनेबल राहत जा ना "

 

सासूबाई " प्रिया असे बोलू नये आईला .. "

 

प्रिया " अग  आजी तुला माहित नाही शाळेत माझ्या मैत्रिणींच्या आई किती  मस्त दिसतात .. छान तयार  होऊन येतात "

 

प्राजक्ता " अग , आता काय लग्नाला जाते तशी नटून येऊ का तुझ्या मॅम ला भेटायला ?"

 

प्रिया " जाऊ दे .. तुला ना कळतच नाही मी काय बोलतेय ते "

 

प्रिया आता मोठी होतेय आणि या वयात मुलांना हळू हळू स्टेटस कळू लागते ..काय छान ? काय वाईट कळू लागते ? प्रिया ला आई ने एकदम साधी साडी नेसून शाळेत आलेलं अजिबात आवडले नाही. प्राजक्ताला जी भीती वाटतं होती तशी सुरुवात झाली होती .. आता नाही बदलले तर मुलांना पण आपली लाज वाटेल कि काय ?

 

  प्रिया ने सासूबाईंना सांगितले कि  असे असे प्रिंसिपल मॅम विचारत होत्या

 

प्राजक्ता " तुम्हाला काय वाटतं ?  मी जाऊ का शिकवायला ?"

 

सासूबाई " हो चालेल कि .. एकतर शाळा खूप जवळ आहे आणि आपली मुलं पण तिथेच आहेत त्यामुळे मुलांना पण बरे पडेल "

 

प्राजक्ता " मुलांचं ठीक आहे हो .. पण तुम्हाला थोडावेळ एकटीला घरात राहायला लागेल ? शिवाय जेवण पण हाताने वाढून घ्यायला लागेल "

 

सासूबाई " घेईन कि .. तू जाताना मला टीव्ही लावून देत जा . म्हणजे मला वाटेल कि घरात कोणीतरी आहे ?"

 

प्राजक्ता " पण बाहेरून कोणी आले तर ?

 

सासू बाईंचे वय झाले ले त्यामुळे प्राजक्ता ला त्यांची काळजी वाटणे साहजिकच होते आणि पहिल्या पासून एकट्या राहिली असत्या तर गोष्ट वेगळी होती आता अचानक या वयात त्यांना  एकट्याला राहायला जमेल कि नाही .

 सासू बाईंचे म्हणायचे तर त्यांनी आता नाही सांगतले तर प्राजक्ता ला नोकरी करावीशी वाटतेय हे ओम ने त्यांना बोललाच होता त्यामुळे तिच्या मनात काय आहे हे त्यांना माहित  होते . त्यामुळे त्या मनातून जरा घाबरल्या होत्या पण प्राजक्ताचा  हिरमोड नको होयला म्हणून तिला त्यांनी लगेच हो सांगून टाकले .

 

"इफ इट मेक्स यु हैप्पी , इट्स नेव्हर  वेस्ट ऑफ टाईम "

 

प्राजक्ताला पेंटिंग आवडते आणि पेंटिंग शिकवताना नक्कीच तिला आनंद होणार आहे हे तिला पण माहित आहे म्हणून तर ती आता सासूबाईं समोर हा प्रश्न घेऊन उभी राहिली होती . हे जरी खरे असले तरी " स्ट्रगल इज  पार्ट ऑफ जर्नी ". वर करणी दिसताना  प्राजक्ताला हि ऑफर एकदम इझी वाटतेय पण प्रत्यक्षात मुलांना शिकवताना तिची चान्गलीच गाळण उडणार  होती . वर्गात मुलांना कंट्रोल करायला तिला जमेल का ? मुलं तिचे ऐकतील का ? नाहीतर कला राहिली बाजूला " पळता भुई थोडी होयची " एकतर प्राजक्ता जाम हळवी आहे . बघू आता कशी  सामोरी जाते ते "

 

जेवणं  झाली . उद्याची तयारी झाली . प्राजक्ता बेडरूम मध्ये आली तर रात्री ओम मुद्दामून लॅपटॉप ऑन करून बसला .

 

ओम " आलीस का ? हे बघ तुझे ते राधा कृष्णा चे पेंटिंग मी आत्ताच तुझ्या चॅनेल वर अपलोड केले . लगेच थडाथड लाईक्स येऊ लागलेत "

 

प्राजक्ता " हो का ? अरे वाह ..अरे ते फुलाचे पण टाक मग ..आणि तिने पर्स मधून ते पेंटिंग त्याला दिले "

 

ओम " तू करू नकोस पण कसे करायचे ते बघून घे "

 

प्राजक्ता " ठीक आहे "

 

ओम " हे बघ आधी त्याचा छान फोटो काढायचा .. असा काढायचा कि आपली सावली त्या फोटोवर आली नाही पाहिजे . मग हा फोटो लॅपटॉप वर घ्यायचा आणि मग तुझ्या चॅनेल वर जाऊन ऍड करायचा .. त्याला काहीतरी नाव द्यायचे . "

 

प्राजक्ता ने सगळे बघितले " अरे वाह .. पटकन झाले "

 

ओम " हो .. आता  मी तुला दाखवत केले म्हणून इतका वेळ लागला नाहीतर ४ मिनिटाचे काम आहे .. आता उद्या तू करून बघ "

 

प्राजक्ता इतक्या वर्षांनी त्या लॅपटॉप कडे बघत होती .. तिला थोडा फार कॉम्पुटर तर येत होता .. बेसिक माहित होते पण लॅपटॉप ला तर तिने कधीच हातात नाही घेतेलेले .. ओम ने मुद्दामून तिला बघ तुझ्या हाताने बघ .. चॅनेल चेक कर .. असे म्हणून म्हणून तिच्या हातात लॅपटॉप दिलाच आणि ती पण तिच्याच नकळत बघत बसली .. सुरुवातीला जास्त इकडे तिकडे कुठेही हात न  लावता .. फक्त वर खाली करून बघत होती .

 

ओम " मग काय ठरवलंयस ? नोकरी करणार आहेस का तू ?"

 

प्राजक्ता " अरे ती नोकरी नाहीये .. त्यांना नवीन टीचर मिळेपर्यंत मुलांचे नुकसान नको होयला म्हणून टेम्पररी टीचर म्हणून घेणार आहेत . जेवढे लेक्चर घेऊ तेवढ्याच पैसे मिळणार "

 

ओम " हो .. पण तरी नोकरीच आहे ना .. कोणी सांगावे ती परमनंट टीचर तूच असशील . "

 

प्राजक्ता " सध्या तरी त्या मला लेक्चर च्या वेळेत जायचे आणि शिकवून यायचे असे त्यांनी सांगितलंय "

 

ओम " ठीक आहे मग .. तू काय ठरवलंयस ?"

 

प्राजक्ता " तुला काय वाटतं ?"

 

ओम " अरे .. तुला नोकरी करायचीय .. मला नाही .. त्यामुळे तू ला स्वतःचे मत असले पाहिजे ... मी सांगितले म्हणून नको करुस "

 

प्राजक्ता " मला वाटतं  हे मी करावं "

 

ओम हसून  " ठीक आहे .. मग उद्याच मॅम ला सांगून टाक "

 

प्राजक्ता " हो चालेल .. पण ओम आईचे काय ? त्यांना एकटीला  राहायला लागेल ?"

 

ओम " अग .. तू काहीही काळजी करू नकोस आणि सध्या तर एक तासच असणार आहे ना .. तेवढं तर ती नक्की मॅनेज करेल .. तरी पण मी एकदा तिला विचारतो उद्या "

 

प्राजक्ता " ठीक आहे .. मी विचारल्यावर त्या म्हणाल्या मी करेन मॅनेज पण तरीही तू पण एकदा विचार "

 

ओम " हो चालेल .”

 

प्राजक्ता " शाळेतली मुलं माझे ऐकतील ना ? मला जमेल का हे काम ? तुला काय वाटतं ?"

 

ओम " अरे त्यात काय ? नक्कीच जमेल .. का नाही जमणार ? तुझ्या या हातात जी जादू आहे ना ती त्यांना नक्कीच तुझे ऐकायला भाग पाडेल "

 

प्राजक्ता " हल्लीच मुलं पण वात्रट असतात . त्यात ९ वी , दहावी ची तर बघायलाच नको "

 

ओम " होईल ग .. काय एवढं टेन्शन घेऊ नकोस .. आणि कधीतरी पहिली वेळ असणारच आहे "

 

मनातली भीती तेव्हाच नाहीशी होते जेव्हा आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव असते . कितीतरी वेळा माणसाला त्याची खरी क्षमता माहीतच नसते . प्राजक्ताची पण तीच अवस्था आहे ..जोपर्यंत ती ते करणार नाही तोपर्यंत तिची ताकद आणि क्षमता तिला कळणार नाही .