Login

शुभारंभ भाग १३

In this part prajkta got offer from school job as drawing teacher

शुभारंभ भाग १३

क्रमश: भाग १२

 प्राजक्ताची ओळख तर निर्माण त्या मनानं खूपच लवकर झाली . रेडिओ वरच्या प्रोग्रॅम मुळे अख्या शहराला माहित झाले कि प्राजक्ताचा एक यु ट्यूब चॅनेल आहे .. सोसायटी मध्ये माहित झाले कि हि किती चांगली  आर्टिस्ट आहे.

सध्या तरी तिला नक्की मला  पेंटिंग काढून त्याचे काय करायचंय हे माहित नाही . स्वतःचे अस्तित्व बनवायचे हे तर नक्की आहे पण कसे बनवायचे हे माहित नाही .

ओम मुलांना सोडून घरी आला आणि त्याच्या ऑफिस ला जायची तयारी करू लागला .

नाश्ता करता करता ओम " प्राजक्ता , आज दिवस भरात  मी तुला  काल जे सांगितले त्यावर जरा विचार कर .. हे बघ मला काय वाटतं आपण तुझी स्वतःची आर्ट गॅलरी बनवू पण त्या आधी आपण व्हर्चुअल आर्ट गॅलरी बनवू . तू पेंटिंग बनवलेस  कि लगेच ह्या चॅनेल वर टाकायचे हे न विसरता कर .. आज संध्याकाळी मी घरी आलो कि तुला दाखवून ठेवतो हे सगळे कसे करायचे ते ."

प्राजक्ता " नको .. ते तुझ्या लॅपटॉप ला काही माझ्यामुळे झाले तर .. उद्या  तुझ्या कामाची अडचण नको होयला "

ओम " काय होणार आहे लॅपटॉप ला .. तू काय लहान आहेस का ? उगाच घाबरते .. आणि काही झाले तर झाले ती वस्तूच आहे ना .. कधी ना कधी तरी खराब होणारच .. म्हणून  काय वापरायचा नाही का ?"

प्राजक्ता " नको अरे ओम .. उगाच  महागाची वस्तू ची वाट नको लागायला .. शिवाय तुझे काही महत्वाचे माझ्याकडून डिलीट  झाले तर उगाच मला ते टेन्शन नकोच .. मला  नाही जमणार ते  यु ट्यूब चॅनेल हॅन्डल करायला. "

ओम " काय प्राजक्ता ..  तू पण लहान मुलांसारखी करतेस कधी कधी .. "

प्राजक्ता  च्या मनात जरा सुद्धा सेल्फ कॉन्फिडन्स नावाची चीज राहिलीच नव्हती . नवऱ्याचा लॅपटॉप आपण हातात घेतला आणि उगाच बिघडायला नको म्हणून   ती त्याला हात सुद्धा लावायचा विचार सुद्धा करत नव्हती . याचा दोन कारण आहेत कि मुळात स्वतःला अजिबातच लेटेस्ट टेकनॉलॉजि बद्दल अपडेट्स दिले गेले नाहीत . सरळ सरळ हि माझ्या कामाची वस्तू नाही असे समजून आणि मनाला समजाऊन  बाजूला सारलेली होती .

तंत्र ज्ञानाची माहिती आणि शिक्षण घेतल्याने स्वतःचा कॉन्फिडन्स पण वाढला जातो .. आज किती तरी गृहिणी अशा आहेत कि त्यांना ATM मध्ये जाऊन पैसे काढायला भीती वाटते . सांगायचं मुद्दा हा आहे कि शिक्षण , ज्ञान , तंत्रज्ञान आणि मग तुमचा  अनुभव याची सांगड घालणे हि आता काळाची गरज आहे . सर्वात पहिले मनाने तयार  झाली पाहिजे . आपले ध्येय म्हणा , स्वप्न म्हणा , गोल म्हणा डोक्यामध्ये फिक्स झाले पाहिजे . जसे कि पुण्याहून नक्की कुठे जायचंय हे फिक्स झाले कि मग जाण्याचा  रस्ता  ठरवता येऊ शकतो .

प्राजक्ताला कुठे तरी जायचंय हे माहितेय पण कुठेतरी म्हणजे कुणीकडे ? पुण्याहून एकदा का मुबई ला जायचंय हे फिक्स झाले कि मग एक्सप्रेस वे ने जायचे का ओल्ड हायवे ने जायचे थे ठरवता येईल ..

ओम " बरं ते जाऊ दे .. नक्की तुला काय करायचंय ते तरी ठरव.. तुला पेंटिंग्स चे क्लास घ्याचेत का ? तुझे पेंटिंग्स  शॉप मध्ये सेल साठी ठेवू शकतो , किंवा तूला  कोणत्या स्पर्धेत भाग घ्यायच्या का ? किंवा govt च्या कोणत्या अवॉर्ड साठी पण आपण तुझे पेंटिंग देऊ शकतो .. किंवा तू कोणत्याही शाळेत ड्रायविंग आणि पेंटिंग चो टीचर बनू शकतेस ? या पैकी नक्की तुला काय करायचंय हे ठरव .. "

प्राजक्ता " खरच .. ओम मी या बद्दल काहीच विचार नाही केला अजून "

ओम " तेच तर मग कर आत्ता .. नुसतं मला काहीतरी करायचय असे म्हणुत बसून नकोस .. लगेच सुरुवात कर .. आणि काहीच सुचत नसेल तर तुझ्या सरांना जाऊन आपण भेटून येऊ .. ते नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करतील "

प्राजक्ता " मला हि असेच वाटतंय .नक्की काय करायचंय तेच मला कळत नाहीये "

ओम " ठीक आहे मग त्यांचा नंबर वगैरे असल्यास तू त्यांची अपॉंटमेंट घेऊन ठेव .. मी आलो कि जाऊ आपण एक दिवस "

प्राजक्ता " ठीक आहे .. "

ओम " आणि एक महत्वाचे तुला बोलायचेय .. कदाचित समीरा तुला परत भेटेल .. तू तिला काही सांगू नकोस . उगाच नको त्या गोष्टीत पडू नकोस .. त्याच्या दोघांचे ते बघून घेतील . "

प्राजक्ता " हमम.. "

झाले नाश्ता वगैरे झाला ओम ऑफिस ला निघायच्या आधी मुद्दामून प्राजक्ताला आत बोलावून

ओम " काल च्या कविते विषयी काही बोलली नाहीस ... "

प्राजक्ता " हो ना ..मी वाचे  पर्यंत तू झोपला  होतास.. कविता खूपच छान   लिहिली आहेस .. तूला सांगू ओम तू माझ्यावर अशी कविता करणे हाच माझा सत्कार आहे .. बाकी कशाची  मला ना आशा आहे ना ओढ "

ओम"आवडली का ? काल  तुझी रात्री बेडरूम मध्ये वाट बघताना लिहली ..  मी कॉलेज मध्ये असताना जशी तुझी वाट बघायचो ना तसेच काहीसे वाटत होते .. "

ओम बोलेपर्यंत प्राजक्ता भावना विवश झाली होती . " काय बोलू मला निःशब्द केले आहेस तू "

ओम ने तिला मिठीत घेतले आणि तिला म्हणाला " माझ्या वर विश्वास आहे ना तुझा ? का अजून मनात  शंका आहे "

प्राजक्ता " स्वतः पेक्षा जास्त माझा तुझ्यावर विश्वास आहे .. म्हणूनच  तू बोलवल्यावर त्यावेळी सुद्धा काहीही करून तुला भेटायला यायचे आणि आज बघ १० वर्षांचा संसार झाला पण "

ओम " आता आपण वेगळी स्वप्न बघायला सुरुवात करू .. खर तर मी तुला कधी बोललो नाही पण तू आतपर्यंत घरात भक्कम असल्यामुळे मी ऑफिस मध्ये खूप मन लावून काम करू शकलो .. तुझ्या स्वप्नांचा त्याग तू आपल्या संसारासाठी केलास म्हणून  मी स्वतःला कामात झोकून देऊ शकलो आणि घरात कोणाचे हाल पण झाले नाहीत .. यात तू कुठेतरी मागे राहिलीस . माझ्या एक गोष्ट लक्षात अशी आलीय काल.. कि तूला तू नुसती गृहिणी आहेस याचा तुला स्वतःलाच समाधान नाहीये ..याचे कारण तू ना स्वतःला पण कोणत्याच बाबतीत अपग्रेड केले नाहीस .. असो पण आता आपण तुझ्या स्वप्नांना साकार करू .. तू बाकीचं काही नाही केलेस तरी मन लावून सातत्याने पेंटिंग्स काढत रहा. तुझ्याकडे असलेल्या या कलेला तू जोपास .. वेळ आली कि आपल्याला पण चित्र स्पष्ट दिसायला लागले आणि संधी समोर येतील . आणि मग आलेल्या संधीचे सोने आपण करू .

प्राजक्ता " हो .. माझा प्रयत्न तसाच राहील पण कसे आहे ना ओम हे काम खूप खर्चिक आहे . रंग , कॅनवास ह्या गोष्टी सारख्या आणाव्या लागतील .

ओम " हो.. ते पण आलाय माझ्या लक्षात  पण सध्या आपण त्याकडे फारसे लक्ष नको द्यायला . योग्य वेळ आली कि प्रोफेशनल संधी पण शोधू . म्हणून तर तुला मी म्हटले कि तू सध्या पेंटिंग्सचे क्लास सुरु करू शकतेस त्यातुन  तुला मनी रोटेशन होऊ शकते . त्याशिवाय अजून ५ महिन्यांनी माझा  कार चा हप्ता पण संपणार आहे मग ती सगळी अमाऊंट आपण या कामासाठी वापरू शकतो . "

प्राजक्ता " हमम.. कसे आहे आता मुलांच्या शिक्षणाकडे पण बघितले पाहिजे .. त्यांच्या खर्च पण वाढत जाणार .. "

ओम " बघ अशी तू निगेटिव्ह विचार कशाला करतेस .. करू ना आपण मॅनेज .. कसे करायचे ते आपल्यावर आहे कि नाही ? हा खर्च नाही इन्व्हेस्टमेंट आहे असा विचार कर  तू बिनधास्त  सुरुवात कर "

प्राजक्ता " ठीक आहे .. "

ओम " आणि हो हे डोक्यातले खुळ  गेलेय का ? का अजून आहे ? हे तुझे पैसे आहेत मी खर्च नाही करणार वगैरे ? जर हा  समोर असलेला अख्खा ओम तुझा आहे तर त्याने कमावलेले पैसे पण तुझेच आहे ना .? काय ?"

प्राजक्ता  लाजली आणि शरमेने मान  खाली घातली " सॉरी मी खूप कठोर वागले  ना तुझ्याशी ?"

ओम " तू ना मला आता तुझ्या तोंडून सॉरी आणि थँक यु हे दोन शब्द ऐकायचेच नाहीयेत ..मी सांगून ठेवतो तुला .. माझे डोकं सणकत त्याने त्यापेक्षा दुसरे काही तरी बोल कि "

प्राजक्ता " चला जावा .. ऑफिस ला .. "

ओम " चाळीशी नंतर पुन्हा मी तुझ्या प्रेमात पडलो आणि याची जाणीव पण तूच करून दिलीस "आणि हसू लागला

प्राजक्ता " तुझे म्हणजे ना .. एकतर या टोकाला नाहीतर त्या टोकाला .. जरा मध्यावर ये .. "

ओम " शक्यच नाही . आता तुला त्या टोकाला मला घेऊन जायचंय .. तुला नेतो बघ हळू हळू .. येशील ना माझ्या बरोबर .. रस्ता तर तूच दाखवला आहेस .. समीरा मुळे तुला आणि तुझ्यामुळे मला बायकोच्या नवऱ्याकडून  काय काय अपेक्षा असतात हे तरी कळले .. साला उमेश .. खोटे का होईना बायकोला खूप खुश ठेवतो मग मी तर खरा आहे मी कशाला मागे राहू .. हो कि नाही ? "

प्राजक्ता " काय रे .. मला  तसे म्हणायचे नव्हते .... एका घरात राहून आपण दोन समांतर रेषे सारखे आयुष्य जगत होतो . ज्या  कधीच एकत्र येत नाहीत "

ओम " आता या समांतर रेषाच मिटवून टाकणार आहे .. त्याचे वर्तुळच बनवतो" .... आणि हसू लागतो ..

ओम " बाय .. "  मग बेडरूम च्या बाहेर आला . आणि आई कडे बघून " आई बाय .. येतो ग "

आई " आज मला कसे काय बाय बोलावेसे वाटले रे .?. "

ओम " असचं .. म्हटलं तुला  बाय  नाही म्हटले म्हणून तू रागवायचीस नाहीतर .."

प्राजक्ताने असे लुक्स दिले ना .. आणि तो निघून गेला ..

ओम गेल्यावर प्राजक्ताने पटापट सगळे आवरले आणि आज  प्रिन्सिपॉल मॅडम ला भेटायला गेली.

सर्वात पहिल्यांदा प्रिन्सिपल मॅम नि तिचे अभिनंदन केले . तिला काल मिळालेल्या अवॉर्ड बद्दल . आणि मग त्यांनी तिला सांगितले कि तुमचा इंटरव्हूह माझ्या मुलीने ऐकला .. ती म्हणत होती मला कि तुमच्या कोणत्या तरी पेंटिंग ला ५०००० लाईक्स मिळालेत.

प्राजक्ता " हो .. ते माझ्या मिस्टरांनी ते यु ट्यूब चॅनेल काढले .. "

प्रिन्सिपॉल मॅम " तर माझे असे काम होते कि मला तुमचं हे पेंटिंग प्रियाकडून मिळाले . आणि हे पेंटिंग पाहिल्या नंतरच मी  तुम्हला मला भेटायला  बोलवले होते. "

प्राजक्ता : हो मी कालच येणार होते पण  अचानक  त्या रेडिओ स्टेशन मधून  आला म्हणून तिकडे जावे लागले .

प्रिंसिपल मॅम " आपल्या शाळेत ड्रॉईंग च्या टीचर ची जागा रिकामी आहे . तुमचे पेंटिंग मी पहिले तेव्हाच मला तुम्हाला हे विचारायचे होते . तर तुम्ही इंटरेस्टेड आहेत का ?

प्राजक्ता " पण मला जमेल का ? म्हणजे खर तर मी कधी असे कोणाला शिकवलेले नाही . "

प्रिंसिपल मॅम " मला असे वाटतं  एकदा चान्स घेऊन बघा .. तसेही पहिले ३ महिने तुम्हला तुमचे लेक्चर होतील त्या नुसार पेमेंट मिळेल म्हणजे आठवड्यात तुम्हाला ४ लेक्चर्स असतील म्हणजे महिन्याला १६ लेक्चर्स असतील त्याचे साधारण तुम्हला १६०००/- रुपये मिळतील . पण रजा , जॉब सिक्युरिटी वगैरे काही नसेल जर तुम्ही पर्मनंट झालात तर मग पुढे बघता येईल .. "

प्राजक्ता " ठीक आहे मी विचार करून सांगेन "

प्रिंसिपल मॅम " ठीक आहे मला जास्तीत जास्त लवकर कळवा .. कारण मुलांचे नुकसान नको होयला "

प्राजक्ता " हा नक्की .. सांगते "

प्रिंसिपल मॅम च्या केबिन मधून  प्राजक्ता बाहेर आली.. तिचे हात पाय लिटरली थरथर कापत  होते.. हे काय आहे .. अचानक कसली संधी माझ्या पुढे उभी राहिली आहे .. आनंद , उत्सुकता , भीती ,दडपण  काय होतंय .. तिला लगेच ओम ला सांगायचे होते .तिने कसलाही विचार ना करता ओम ला फोन लावला .

🎭 Series Post

View all