लेखक श्रीकांत कुंभार : नव्या पिढीचे मार्गदर्शक

ईरा : शब्दांची मैफिल
लेखक श्रीकांत कुंभार : नव्या पिढीचे मार्गदर्शक

मुलांनी शाळा भरलेली असावी.आनंदाने बागडणारी मुले दिसावी.शाळेचे अंगण बागबगीच्याने बहरले असावे .शाळेतील फलक सुविचारांनी नटलेले असावेत. उत्साही मुलांनी " गुरुजी …गुरुजी …" म्हणून हाक मारावी.मग शिक्षकांनी मुलांच्यात रममाण व्हावे.शाळेच्या अशा मनोहरी वातावरणात शिक्षक रुळतात आणि नवी पिढी सुसंस्कारक्षम करण्यात मंत्रमुग्ध होतात .असेच उत्साही आणि प्रेरणादायक शिक्षक म्हणून श्रीकांत कुंभार यांची ख्याती आहे.

शिक्षक आपले शिक्षणाचे काम प्रामाणिकपणाने करुन कांही छंद मनापासून जोपासत असतात.वेळात वेळ काढून लेखनासारखा छंद जोपासत ईरावर अनेक शिक्षक , शिक्षिका लेखन करत आहेत.आपल्या अनुभवाचा प्रभाव त्यांच्या लेखनात उतरला आहे.श्रीकांतसर यांनीही असेच ईरावर लेखन करुन लेखनातून चांगला संदेश देण्याचे कार्य केले आहे.मिळालेल्या वेळेचे सोनं करुन त्यांनी कथेना सामाजिक बांधिलकीची किनार दिली आहे.ईरावरील चॕम्पियन स्पर्धेत त्यांना उत्कृष्ट लेखकाचा सन्मान मिळाला आहे.सध्याच संपलेल्या स्पर्धेत त्यांनी छान लघूकथा सादर केली होती.उत्तम निरीक्षणशक्ती , भाषेतील नजाकत , सामाजिक विषयात रस , शैक्षणिक ओढ , मुलांच्यात रममाण होण्याची आवड , गोड लाघवी स्वभाव अशा विविध गुणांनी परिपूर्ण असलेले श्रीकांतसर एक गुणी , उपक्रमशील व हरहुन्नरी शिक्षक आहेत.त्यांचे हे शैक्षणिक कार्य असेच चालू रहावे , त्यांच्याकडून दर्जेदार नवी पिढी निर्माण व्हावी , त्यांचे लेखन असेच बहरत जावे यासाठी ईराकुटुंबाकडून खूपसा-या शुभेच्छा …!!
©नामदेवपाटील