श्रीराम हे उत्तम वन पर्यटक होते

श्री रामचंद्र हे वनामध्ये असताना त्यांची पत्नी रावणाने पळवली. परंतु श्रीरामाने तिला परत आणली.
रत्नाकर उर्फ वाल्मिकी अर्थात वाल्मिकी ऋषींनी रामायणाची निर्मिती केली.
श्रीरामाचा जन्म झाला . थोडे दिवस  गेल्यानंतर . श्रीरामाने खेळण्यासाठी आकाशीचा चंद्र मागितला. त्याची आई कौशल्याने त्याला आरशामध्ये आकाशीचा चंद्र दिला. त्यामुळं तर श्रीरामाचे नाव रामचंद्र झाले. राम आणि त्यांच्या बंधूंची शस्त्र विद्या आणि इतर सर्व विद्या शिकून सोळाव्या वर्षापर्यंत पूर्ण झाली त्यानंतर राम तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले त्यांनी वशिष्ठ ऋषी कडून आशीर्वाद घेतला .वडील दशरथा कडून आशीर्वाद घेतले आणि शुभ दिवसांनंतर राम सेवका बरोबर तीर्थाटनी निघाले.

तीर्थाटन करीत उत्तर भारत, दक्षिण भारत, पूर्व पश्चिम अशी अनेक तीर्थक्षेत्रे त्यांनी पाहिली. महान तपस्वी यांची भेट घेतली. पृथ्वी पर्यटन करून श्रीराम परत आले. त्यावेळी अयोध्येमध्ये घरोघरी दीप लावले गेले रांगोळ्या काढल्या गेल्या. तीर्थयात्रा पर्यटन करून आल्यानंतर रामाचे मन विरक्त झाले.

त्यामुळे विश्वामित्र श्री रामाला वनात घेऊन आले. विश्वामित्र ऋषी होते. परंतु ते क्षत्रीय होते. ज्ञानाने ते ऋषी झाले होते. विश्व मित्र फारच रागीष्ट होते. राजा दशरथ रामाला विश्वामित्रास देण्यास तयार नव्हता .मात्र वशिष्ठ यांनी मध्यस्थी करून राम आणि लक्ष्मण या दोघांना विश्वमित्राकडे पाठवले. मात्र विश्वमित्राकडे जाण्याआधी रामाने विश्वामित्राची परीक्षा घेतली. म्हणजे गुरूला काही शंका विचारल्या.

राम विश्वामित्राला म्हणाले मानवी देह कुणास वश आहे .तो नाश होणार आहे. त्याचे कर्मही नाश पावते. या देहापासून कोणी खरा सुखी होत नाही. मग यांची फारकत घेताना त्याची विलक्षण तडफड होते. या दुःखमय संसारातून सुटण्याचा उपाय तुम्ही मला सांगा.
यावर विश्वामित्राने त्याला सांगितले की तू राम आहेस एक साधक म्हणून तु मला प्रश्न विचारतो आहेस. तुझे राम हे नाव श्री शंकरांनी ठेवलेले आहे.

ज्या व्यासांनी  महाभारत लिहिले. त्या व्यासांचा पुत्र शुक याची माहिती त्यांनी  सांगितली. शुक जन्मापासून ज्ञानी होता. परंतु त्याच्याकडे प्रखर वैराग्य होते .त्यामुळे व्यासांना न विचारता तो आश्रमाचा त्याग करून जंगलात गेला. त्याने सर्वांचे मन दुखावले होते. ते सर्व शुकाच्या मागे धावत गेले. त्याला सांगितले तू परत ये. परत तो परत आला नाही. शुक जनक राजाकडे गेला. शुकाचा ज्ञानगर्व जनक राजाने ओळखला होता. तो गर्व जनकाने दूर केला. त्याच प्रकारे वसिष्ठांनी रामाला सांगितले की तू ज्ञानी आहेस .शूर आहेस .पराक्रमी आहेस. मात्र कुलगुरूची आवश्यकता आहे .तो गुरूपदेश तू ब्रह्मर्षि होते विश्वमित्र यांच्याकडून घ्यावा. ते तुला गुरुपदी योग्य आहेत .मग वसिष्ठांनी श्रीरामाला गुरुपदेश केला.  त्यामुळे राम समाधानी झाला ..वशिष्ट श्रीरामाचे कुलगुरू होते.

विश्वमित्र त्याचे शिक्षक गुरु होते.श्रीरामाने त्यांना विचारले की जिवंत लोक ब्रह्म स्थितीला आले आणि शिव कशी ती अनुभवाला येते तात्काळ ब्रह्म ती कशी काय होते. सिद्ध आश्रमात प्रवेश झाल्यानंतर विश्वामित्रांनी त्या दोघांना चक्र गदा खडक शिकवले आणि शक्ती यांचे उपयोग शिकवले मंत्राचा जप करण्याची पद्धती शिकवली राम आणि लक्ष्मण यांना सर्व युद्धशास्त्र अवगत करून दिले .त्यांची विद्या पूर्ण झाली.
रामाने  यज्ञाचे रक्षण करण्याचे कार्य केले. त्यामुळे वनामध्ये रामाचा अवतार  प्रारंभ झाला होता .साधुसंत आणि धर्माचे रक्षण योजनाचे रक्षण असे यशस्वी प्रयोग त्यांचे सुरू झाले .त्याचवेळी सीतेचे स्वयंवर  होते .ही गोष्ट ऋषींना समजल्याने ते राम लक्ष्मण यांना तिकडे घेऊन गेले .मिथिलेचा राजा जनक याच्या सेवकांना निरोप पोहोचला होता. अयोध्येच्या अलीकडे पाच योजना अंतरावर ऋषी विश्वामित्र राम-लक्ष्मण आणि काही ऋषी थांबले.

त्याच वनांमध्ये रामाने अहिल्या शिळेचा उद्धार केला. एका दगडाला सजीव केले होते. त्या घटनेपासून राम दर्शन ही गोष्ट निर्माण झाली. श्रीराम दर्शनाने एक दगडाचा उद्धार झाला.

जनकाची मिथिला नगरी वैभव संपन्न होती .त्यामध्ये अनेक उपवने होती .वेगवेगळे वृक्ष वल्ली होते .फुले होते फळे होते.  त्यातल्या बागा समृद्ध झाल्या होत्या अनेक पक्षी होते. ते दृश्य पाहून राम. लक्ष्मणाचे भान हरपून गेले. आपण एका जंगलातून एक चांगल्या ठिकाणी पोहोचलो आहे. जिथे बाग-बगीचे आहेत याची त्यांना खात्री पटली.

जनकाची मुलगी सीता ती अयोनीजा होती. तिचा जन्म मानवी  योनीच्या मार्फत झालेला नव्हता. जनक राजाला सीता शेतामध्ये एका पेटी मध्ये सापडली होती. कदाचित ती अग्निकुंडातून निर्माण झाली होती


वशिष्ठ म्हणाले. भोग हीच इच्छा बंधनकारक असते आणि भोगाचा त्याग हाच मोक्ष आहे त्यासाठी मनाचा निग्रह पाहिजे.
अशाप्रकारे दोन्ही गुरूंची त्याने  नकळत परीक्षा घेतली. श्रीराम मित्रांसोबत जंगलात आला. त्याचे वनपर्यटन सुरू झाले . ते वन पर्यटन अध्यात्मिक स्वरूपाचे सुरू झाले होते. श्रीरामाचे दुसरे महागुरू विश्वमित्र एवढे पराक्रमी होते की त्या  विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी म्हणजे दुसरे  जग निर्माण केले होते. विश्वामित्र हे जन्माने छत्री होते परंतु त्यांनी ऋषी धर्म स्वीकारला होता. स्वतःच्या आचरणाने ज्ञानाने ते ऋषी पदाला पोहोचले होते. श्रीराम आणि लक्ष्मण दोघेही त्यांच्यासोबत होते. राम विनयशील आणि तत्पर होता .लक्ष्मण तेजस्वी व नम्र होता.

विश्व मित्रांनी त्यांना अद्भुत  मंत्र शिकवले त्यानंतर त्यांना शरयू आणि गंगा यांच्या संगमावर घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी नावेतून पलीकडे गेले. पलीकडे खूप मोठे अरण्य होते त्या अरण्याची भयानकता भरपूर होती .