Jan 19, 2021
नारीवादी

स्त्री ने स्वावलंबी असलंच पाहिजे

Read Later
स्त्री ने स्वावलंबी असलंच पाहिजे

स्त्री ने स्वावलंबी असलंच पाहिजे


आरती सकाळपासून कामे आवरून थकून गेली होती, 
म्हणून ती शरीराला व मनाला थोडा आराम मिळावा म्हणून 
पलंगावर पडली होती 
मुलगा अरविंद व मुलगी आराध्या 
दोघेही बाहेर खेळायला गेले होते,
त्यामुळे तिला हा निवांत वेळ मिळाला होता, 
नाहीतर एरव्ही कुठे मिळतो असा वेळ 

तेवढ्यात तिच्या मोबाईल ची बेल वाजली 
"आता  कोण तरमडले काय माहीत " असे मनाशी बोलून ती मोबाईल घेण्यासाठी उठली 

"हॅलो कोण बोलतय " 
आरती म्हणाली 

"ओळख पाहू "आवाज ओळखीचा वाटत होता पण आरती ला ओळखता येईना....
ती बिचकत च म्हणाली 
"सविता आहे का" 
 
"हो अगदी बरोबर " 

खुप दिवसांनी दोघी मैत्रिणी बोलल्या 
जुन्या आठवणी काढून झाल्या, एकमेकींची विचारपूस करून झाली, मग हळूच आरती ने कॉल कसाकाय केला हे विचारले तेव्हा तिला कळाले, 
तिच्या बालपणी च्या सर्व मैत्रिणी सहलीला जाणार आहेत , व त्यासाठी तिला दहा हजार रुपये भरायचे आहेत, पाच दिवस त्या राहणार आहेत व सर्व काही त्यातच आहे, तिला ऐकून आनंद झाला, तिने सविता ला यांना विचारून सांगते म्हणून फोन ठेवला, तिच्या अंगात एकच वीज संचारली, 
तिला त्या मैत्रिणी सोबत बाहेर जाण्याचे वेध लागले ,
पण विकास तिचा नवरा जाऊ देईल का याची देखील तिला भीती होती , पण तिने ठरवले होते आज काही झाले तरी परवानगी मिळवायची च 

तिने विकास ऑफिस वरून येईपर्यंत सगळं आवरून ठेवलं आज मुद्दाम त्याच्या आवडीची भाजी बनवली होती, 
तो आल्या आल्या तिने पटकन त्याची बॅग घेतली, 
आज ती त्याचा प्रत्येक शब्द झेलत होती 
ती नेहमी असेच करायची जर तिला काही हवे असेल किंवा कसली परवानगी हवी असेल तर ती त्याची मनधरणी करायची 
पण जशी आरती त्याला ओळखत होती तसा तोही तिला ओळखत होता, आज बायको इतकी पुढे पुढे करतेय म्हणल्यावर काहितरी हवे असेल हे त्याने हेरले 

"बोल काय पाहिजे " 
विकास ठामपणे म्हणाला 

"नाही कुठे काय " 
आरती चाचरत म्हणाली 

"आरती तुला मी आताच नाही ओळखत बोल " विकास शांतपणे म्हणाला 

"अहो माझ्या सगळ्या मैत्रिणी फिरायला जाणार आहेत
पाच दिवसासाठी 
मी जाऊ का ?"

आरती घाबरत च म्हणाली 

"पण मुलांचे काय"
विकास चौकशी करत म्हणाला 

"त्यांना आईकडे सोडते ना 
तसेही घरात घरात खुप बोर झालेत ते 
थोडा बदल त्यांना देखील " 
आरती समजावत म्हणाली 


"हो चालेल जा " 
विकास आनंदाने म्हणाला 


"पण पैसे" 
आरती हळू आवाजात म्हणाली 


"तुझ्याकडे असतील ना या महिन्याचे घर खर्चाचे दिलेले त्यातून घे तसेही 
तुम्ही सगळ्या बायका बायका च जाणार मग तुमचा काय खर्च असेल" 
विकास तिला तुच्छतेने म्हणाला 

"अहो दहा हजार भरायचे आहेत 
व सगळं त्यातच आहे " 
आरती थोडी घाबरत म्हणाली 

"दहा हजार आणि तेही तुला फिरण्यासाठी वेड लागलंय का ??
पैसे काय झाडावर येतात का ? 
मी दिवसभर काम करतो त्यासाठी 
पण तुला कशी किंमत कळणार ना 
त्यासाठी पैसे कमवावे लागतात मग कळेल असे वायफळ खर्च केले की किती त्रास होतो " 
विकास रागातच म्हणाला व ऑफिस ला निघून गेला 

आरती विचार करू लागली 
"मी कमवत नाही म्हणजे मला काहीच किंमत नाही का? 
मी दिवसभर घरात काम करते त्याचे काहीच मोल नाही कधीच्या नवत पहिल्यांदा एवढे पैसे माघीतले तर लगेच माझ्यावर ओरडले व आता पर्यंत कित्येक वेळा याना गरज असताना मी घर खर्चातून काटकसर करून माघे ठेवलेले पैसे दिले त्याचे काहीच नाही, 
यांच्यासाठी कितीही करा पण मी घरात राहते म्हणजे मी काहीच करत नाही असे होते का ??

असा विचार करून तिच्याच डोळ्यात पाणी आले, 

मैत्रीनीला नाही म्हणून सांगण्यासाठी तिने कॉल केला 

"हॅलो सविता" 
ती खिन्नपणे म्हणाली 

"हो बोल ग तुझ्याच कॉल ची वाट बघत होते काय म्हणाले भाऊजी " 
ती उत्सुकतेने म्हणाली 

"अग ते हो म्हणाले पण माझ्या लक्षात नाही आले तेव्हा पूजा ठेवली आहे व मला नाही येता येणार " 
आरती खोटं सांगत होती 

"अरे यार 
मग अगोदर सांगायचे ना 
बर ऐक आपण तारीख बदलू तू सांग कधी ठेवायची 
तुझ्या सोईने सांग" 
सविता सहकार्य च्या भावनेने म्हणाली 

आता आरती ची फजिती झाली होती 
अगोदर तर ती खोटं बोलून बसली होती 

"मग सांग कधी जाऊयात "
सविता पुन्हा म्हणाली 

"मी नाही येत तुम्ही या ना ग जाऊन " आरती केविलवाण्या स्वरात म्हणाली 

"का ग 
काही अडचण आहे का 
हे बघ बिनदास्त सांग " 
सविता विश्वास देत म्हणाली 


तरीही आरती शांतच होती 
आता काहितरी गोम आहे हे सविता ने ओळखले 
व खुप फोर्स केल्यावर आरती बोलती झाली 
"अग हे नाही म्हणालेत पैशामुळे तसेही सध्या खुप टेन्शन आहेत त्यांच्या माघे म्हणून नाहीतर नसते म्हणाले ते " आरती पुन्हा सावरत म्हणाली 

"ते तू नको सांगू बर व तुला एक सांगू सगळे नवरे सारखे च स्वतः कितीही उडवणार पण बायकोच्या घरखर्चाचा हिशोब यांना पाहिजे असतो, 
यासाठी नेहमी म्हणते की आपल्या शिक्षणाचा उपयोग कर , नोकरी कर 
स्वतः च्या पायावर उभी रहा म्हणजे अशी दुसऱ्या समोर हात पसरायची वेळ येत नाही व मनमोकळे पणे आयुष्य जगता येत समजलं का?? 

सविता समजावत म्हणाली 


"हो 
आता खुप झालं 
आता काहीही झालं तरी मी नोकरी करणारच 
बघ तू 
व यावेळी जाऊ दे पुढच्या वेळी नक्की येणार तुमच्या सोबत सहलीला " 
आरती आनंदाने म्हणाली 

"बघ बर मी वाट बघतेय तुझी "
सविता उस्फुर्त पणे म्हणाली 

"हो ग बाई नक्की 
पुढच्या वेळी येईल " 

दोघीनि आनंदाने फोन ठेवले


@खरच आजही नोकरी करणारी स्त्री व घरात राहणारी स्त्री आर्थिक दृट्या वेगळी आहे का ?
खरच असेल का त्यांच्यात एक न दिसणारी दरी 
तुम्हांला काय वाटते नक्की कळवा 

कथा आवडल्यास लाईक करायला विसरू नका 

धन्यवाद

Circle Image

Geeta Suryabhan Ughade

Teacher

नमस्कार मी गीता उघडे M.A(english) मी व्यवसायाने शिक्षिका आहे .व 10 वर्षांपासून लेखन क्षेत्रात काम करते , मला लेखन करायला खुप आवडते विशेषतः समोरच्याच्या मनाचा वेध घ्यायला त्यामुळे जास्तीतजास्त कथा माझ्या या जीवनाशी निगडित असतात, ज्या कधीतरी कुणीतरी अनुभवलेल्या असतात, वाचून बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा Attitude नाहीये माझ्यात फक्त स्वाभिमानाने जगायला आवडते मला,