श्री तशी सौ ( विनोदी संवाद)

नवरा बायकोचे विनोदी संवाद


श्री.तशी सौ. ( विनोदी संवाद)

सौ.:: अहो ऊठा ऊठा वेळ झाली.दुधवाला यायची.
श्री ::: झोपू दे गं दुधावाला भैय्या कोठे पळून जात नाही.
सौ :: एक वेळ दुधवाला भैय्या पळून गेला तर चालेल पण माझी शांताई पळून जायला नको.
श्री ::: शांताईला भैय्या नाही आवडत.
***********************
श्री ::: जरा बाहेर जाऊन फेरफटका मारुन येतो गं.
सौ ::: हे घ्या पिशवी येताना भाजी घेऊन या.
श्री :: अगं ही पिशवी.
सौ::: हो नाहीतर रोज प्रमाणे म्हणाल कि भाजी घेतली असती पण..पिशवी नव्हती.
************************
श्री ::: ऐक ना पाऊस पडतो आहे जरा गरमागरम चहा पकौडै हो जाये.
सौ ::: कालच डॉ.नी सांगितले आहे तुम्हाला तेलकट, तळलेले पदार्थ वर्ज्य.
श्री :: अगं एक दोन खाल्ले तर काही नाही होतं.
सौ:: मग हेच नियम औषधं घेण्यासाठी असावी .एक दोन इन्सुलिन इंजेक्शन चुकले तर काय होतं नाही म्हणतात न तेव्हा.
************************
सौ ::: आई आई गं आज पाय फार दुखत आहेत.
श्री :: फिरायला चल म्हटले तर येत नाहीस .जरा पाय मोकळे होतील.
सौ ::: फिरुन येऊन घरी पुन्हा काम करायचा कंटाळा येतो.
श्री :: कसे शक्य आहे.मी बघं माॅर्निग वॉक करुन किती फ्रेश होतो.
सौ :: हो हो का फ्रेश होतात माहीत आहे मला.ती सटवी येते न या वयात ही ट्रक सुट कि काय ते घालून माकड उड्या मारायला.
************************
श्री ::: अगं बघं नातवाने चांगले मार्क्स घेऊन पहीला नंबर मिळवला आहे वर्गात.
सौ :: हो घेणारच हुशार आहे तो खूप.
श्री ::: हो ग
सौ ::: बरं झालं माझ्यावर गेलय म्हणून . नाही तर तुमच्या वर गेलं असतं तर शंख.

©® परवीन कौसर...
९७४०१९७६५७