श्रद्धा अंधश्रद्धा यातील फरक....

श्रद्धा आणि अंधश्रद्धा! खरंतर यातला फरक कसा करावा यावर अनेकांची अनेक प्रकारची मतं आहेत. त्यामुळे कोणती श्रद्धा आणि कोणती अंधश्रद्धा हे आपल्याला सांगता येणार नाही....


श्रद्धा अंधश्रद्धा यातील फरक


श्रद्धा आणि अंधश्रद्धा! खरंतर यातला फरक कसा करावा यावर अनेकांची अनेक प्रकारची मतं आहेत. त्यामुळे कोणती श्रद्धा आणि कोणती अंधश्रद्धा हे आपल्याला सांगता येणार नाही....

जेष्ठ कवी, लेखक आणि साहित्य समीक्षक डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या वक्तव्या नुसार श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक करणे शक्य नही. तसेच ते अशी म्हणतात की जर तर्काला मूठमती दिल्यावर श्रद्धा जन्माला येते आणि तर्काची हत्या केल्यावर अंधश्रद्धा जन्माला येते.... श्रद्धा आणि अंधश्रद्धा तर्क विज्ञान आणि बुद्धिप्रामाण्याला मानत नाही त्यामुळे दोन्हीही एकच आहेत...

खरं तर या विधानाला मी माझ्या दृष्टीने योग्य मानेन... म्हणजे उदाहरण बघा पॅरानॉर्मल ऍक्टिव्हीटिज जिथे काही लोकं खरं मानतात तर काही लोकं खोटं. हा विचारांचा फरक आहे. तसेच जादू, काही लोकं जादू ला चमत्कार मानतात तर काही हातसफाई मानतात...
डॉन लोकांच्या विचारांमध्ये असलेली तफावत म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा असं मला वाटतं...

आता माझं म्हणणं कोणाला पटेल किंवा कोणाला नही पटणार यालाच विचारांची तफावत म्हणतात.

समाजातील सगळ्यात मोठी विचारांची तफावत ही दैवशास्त्र आणि विज्ञानशास्त्र यांच्यात आहे. देवाला मानणारे लोकं विज्ञानाला मिथ्या मानतात तर वैज्ञानिक दैवी चमत्काराला मिथ्या मानतात... आता मिथ्या या शब्दाला कोण किती समजून घेत यावर चर्चाचं करू नये.... करणं मिथ्या च्या अर्थामध्ये ही प्रकार आहेत... असुदे, चंद्राच्या दर दिवशी आकार बदलण्याच्या नैसर्गिक कृतीला देखील प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळे स्थान आहे.

माझ्या मते श्रद्धा ही मन पोखरते तर अंधश्रद्धा ही समाज पोखरते... अंधश्रध्येचा सगळ्यात जास्त प्रभाव हा राजकारणात कार्यकर्त्यांवर पडतो... एका नेत्याला अंध पणे फॉलो करून फक्त त्याच्या म्हणण्यानुसार पुढे चालतं राहणं म्हणजे अंधश्रद्धा. आणि फक्त एखाद्या ग्रंथाचे श्लोक पाठ करून त्याचा सार किंवा त्यातला खरा अर्थ समजून न घेता फक्त अंध पणे फॉलो करने म्हणजे अंधश्रद्धा...
जसं मी आधी म्हणाले तसं प्रत्येकाच्या विचारतील तफावत ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांना जन्म देते... आता ही तफावत का???? तर प्रत्येकाच्या जगण्याचे उद्देश वेगवेगळे त्यामुळे प्रत्येकाच्या विचारांमध्ये ही तफावत आढळून येणारच... आता एखाद्या पंथाला लाभलेले अनुयायी हे कोणत्या विचाराने त्या पंथाला फॉलो करत असतील हे सांगता येणार नाही. काही लोकं आपलंच चांगलं व्हावं आपल्याला सुख मिळावं किंवा आपलाच उद्धार व्हावा या विचाराने देखील त्या पंथाला फॉलो करत असतील... मी असं नाही म्हणत यात काही गैर आहे पण आपण एक लिमिट सेट करावी की किती त्या गोष्टीच्या आहारी जावं... आणि हिचं लिमिट श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजावते....

बाकी हा झाला माझ्या दृष्टीने श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक.... काहींना माझं म्हणणं पटेल तर काहींना पटणार नाही. यातच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून येईल....

धन्यवाद ?

- अंकिता भोईर (आराक्षी)