Jan 29, 2022
कथामालिका

हे बंध रेशमाचे (पर्व १)... भाग ७

Read Later
हे बंध रेशमाचे (पर्व १)... भाग ७


हे बंध रेशमाचे भाग ७

       नील आधीच पोहोचला होता. प्रेरणा आणि राधा एकत्रच हॉलवर आल्या. एवढ्यात प्रेरणा ला तिची कोणीतरी मैत्रीण भेटली म्हणून ती तिच्याशी बोलायला थांबली. राधा तिथेच उभं राहून नीलला शोधत होती. नील हॉल कडे जाणाऱ्या पायऱ्यांवर उभा होता. तेवढ्यात दोघांची नजरानजर झाली. राधा ला पाहून नील तिच्याकडे बघतच राहिला. मोरपंखी रंगाचा, मोत्याचं work असलेला floor length अनारकली, एका  हातात खड्याच्या बांगड्या, दुसऱ्या हातात घड्याळ,  छानशी hair style , हलकासा make up ....
राधा पायऱ्या चढून नील जवळ येत होती, तेवढ्यात घाईघाईत एक मुलगा पायर्‍यांवरुन उतरत होता. त्याचा राधाला धक्का लागेल आणि ती पडेल म्हणून नीलने पटकन तिला हाताला धरून स्वतःच्या जवळ ओढलं...राधा एकदम शहारली... लाजून ती त्याच्याकडे बघतच नव्हती असा हात धरलेला तिला आवडलं नसावं असं वाटून नील ने पटकन तिचा हात सोडला. दोघंही एकमेकांच्या खूप जवळ होते....

तिला बघताच नीलच्या  तोंडून शब्द बाहेर पडले wow beautiful ??

तशी राधा गोड लाजली. ती तर नील कडे बघतच नव्हती. नील मात्र एकटक तिच्याकडेच बघत होता... तेवढ्यात त्याची नजर तिच्या कानातल्यांकडे गेली... आणि त्याने अजूनच निरखून बघितलं...

नील: शेवटी मला आवडलेलेच कानातले घेतलेस ना? माहितीच होतं मला तू हेच घेणार....

नील ने असं म्हणताच तिने पटकन मान वर केली...
राधा: नाही. नाही...ते चुकून त्यांनी वेगळेच दिले.... मी नाही घेतले....

तिला असं गडबडलेलं बघून नील गालातल्या गालात हसत होता....??

त्याला असं हसतांना बघून आपलं खोटं पकडलं गेलय  हे राधाला कळलं, आणि ती पण  हसू लागली. तेवढ्यात प्रेरणा राधाला शोधत शोधत तिथे आली आणि ते सगळे हॉलमध्ये जाऊन बसले...
****
     बरोबर 7 वा.competition सुरू झाली. 3/4 गाण्यानंतर राधा प्रेरणाचं duet झालं. खूप सुंदर झालं होतं गाणं खास करून त्यांचे expressions तर खूपच सुंदर होते . आता नीलचं solo गाणं होतं.

      नील गाण्यासाठी stage वर आला आणि राधा त्याच्या कडे भान हरपून बघतच राहिली.... नील ही खूप handsome  दिसत होता. नीलच्या गोऱ्यापान रंगावर तसं तर कोणताही  रंग छानच दिसायचा पण  black jeans, sky blue t- shirt त्यावर black  leather jacket मधे तर तो कमालीचा handsome दिसत होता. guitar वाजवत त्याने गाणं म्हणायला सुरुवात केली,  तसा एक वेगळाच माहौल तयार झाला.  तेव्हा तर चित्रपटातला आमिर खानच समोर गातोय असं वाटत होतं. तो होताही तसाच  अगदी chocolate hero सारखा...

राधा (मनातल्या मनात): काय handsome दिसतोय हा.... मघाशी तर नीट पाहिलही नाही मी त्याला....


समस्त तरुणांचं college जीवनातलं अतिशय आवडतं गाणं त्याने गायला सुरुवात केली ...

पापा कहते है बडा नाम करेगा
बेटा हमारा ऐसा काम करेगा
मगर  ये तो कोई न जाने,
के मेरी मंजिल है कहा

मेरा तो सपना, है एक चेहरा
देखे जो उसको, झूमे बहार
गालों में खिलती, कलियों का मौसम
आँखों में जादू, होठों में प्यार
बन्दा ये खूबसूरत काम‌ करेगा
दिल की दुनिया में अपना नाम करेगा ।

राधाचं  तर गाण्याकडे लक्षही नव्हतं... ती तर फक्त त्यालाच बघत होती.
टाळ्यांचा कडकडाट झाला तशी ती भानावर आली.
      एव्हाना सगळे performances झाले होते. आता सगळे result announce होण्याची वाट बघत होते. आणि अखेर प्रतीक्षा संपली. राधा प्रेरणाला duet  साठी 3rd  तर अपेक्षेप्रमाणे solo मध्ये नीलला  1st prize मिळालं होतं. S.M. College ला singing मध्ये सलग तिसऱ्या वर्षी  1st prize मिळालं होतं. छानशी trophy  आणि काही cash असं बक्षीस मिळालं होतं. सगळ्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं.  photo session झालं. नील, प्रेरणा आणि राधा यांनी भरपूर फोटोज् काढले.....

    त्यांचा सगळा group नील कडे party मागत होता.


नील: अरे हो उद्या कॉलेजला गेलो की करूयात की celebration...


तेवढ्यात प्रेरणा ओरडली ,


प्रेरणा : ए ते बघ समोर Ice - cream shop आहे. At least ice cream तरी खाऊ घाल आत्ता.

असं म्हणल्यावर तो सगळ्यांना ice cream खायला घेऊन गेला....
तेवढ्यात प्रेरणा म्हणाली,

प्रेरणा: ए  कोण कोण कोणता कोणता flavour घेणार आहात?

राधा आणि नील एकत्रच  बोलले मी butter - scotch... आणि दोघंही एकमेकांकडे पाहून हसले...


राधा icecream खात असतांना नेमका समोरून  येणाऱ्या एका मुलीचा तिला धक्का लागला आणि तिच्या हातातून  ice cream चा cup पडला... ते बघून नील म्हणाला,

नील: मी आणतो दुसरं.


असं म्हणून तो   ice cream आणायला गेला.

नील: अगं नेमकं butter scotch flavour शिल्लक नाहीए.. दुसरं आणू का कोणतं?

राधा: नको अरे असूदे...

नील: हे घे माझ्यातला खा. पण उष्टं आहे चालेल का तुला? 

ice cream म्हणजे राधाचा weak point....त्यामुळे तो  म्हणायचा अवकाश ती नाही म्हणणं शक्यच नव्हतं.

राधा: हो त्यात काय.. उष्टं खाल्ल्यामुळे प्रेम वाढतं so चालेल मला..


असं ती बोलली आणि आपण काय बोललो हे लक्षात येऊन तिने जीभ चावली..?

राधा: I mean मैत्री वाढते असं म्हणायचं होतं मला.


सारवासारव करतच ती म्हणाली.


नील : हो हो कळालं हं खा आता ...वेडू.. ?


राधाला त्याच असं वेडू म्हणणं फार आवडायचं.. ती खूप गोड हसली...

हे सगळ बघून प्रेरणा ला जरा रागच आला होता. नील त्याचं आवडतं ice cream राधा बरोबर share करतोय हे बघून तिच्या चेहऱ्याचा रंग पार बदलला होता...

   ती रागातच नीलला म्हणाली ,


प्रेरणा: मला लवकर जायचंय घरी. तुला वेळ आहे का निघायला? नाही ,तू खा आरामात ice cream मी जाते.

तिचा बदललेला सूर दोघांनाही लक्षात आला..

नील: अगं हो झालंच आहे... मी आलोच गाडी घेऊन तुम्ही दोघी gate  जवळ थांबा.

राधा:  नील मी जाते auto ने. तुम्ही जा..

नील: वेडी आहेस का तु? अगं 9 वाजून गेलेत. आणि मी तुला drop करणारे हे आधीच सांगितलं होतं.. गुपचूप चल माझ्याबरोबर..

राधा: ठीक आहे..

पण  प्रेरणा ला आवडलं‌ नव्हतं हे तिच्या लक्षात आलं.

नील गाडी घेऊन आला. तेवढ्यात प्रेरणा ला घरून phone आला म्हणून ती बाजूला जाऊन phone वर बोलत होती. नील ने राधाला पुढच्या सीटवर बसायला सांगितलं.. ती नकोच म्हणत होती.. Phone ठेवून प्रेरणा गाडीत बसायला वळली, राधाला front seat वर बसलेलं पाहून तिच्या रागाचा पारा अजूनच चढला.


प्रेरणा: अरे तू तर माझी जागा घेतलीस... घेशील हे ठाऊक होतं पण इतक्या लवकर घेशील असं वाटलं नव्हतं.

रागाने नील कडे बघत ती‌ बोलली.. राधाला तिच्या बोलण्याचा रोख लक्षात आला..

राधा: ohh... I m really sorry प्रेरणा. मी मागे बसते तू बस ना पुढे.

असं म्हणत ती उठायला लागली.

प्रेरणा: असू देत आता. बसते मीच मागे.

     नीलने आधी राधाला drop केलं आणि मग प्रेरणा च्या घरा खाली गाडी थांबवली. ती जायला निघाली,तसं  त्याने तिला आवाज दिला आणि थांबवलं...

नील : थांब प्रेरणा...मला बोलायचंय तुझ्याशी. काय झालंय तुला?? अशी का वागतेस तू?
   
     प्रेरणा:  काही नाही... दमलेय मी आज. निघते. बाय...

ती जायला निघाली तसं नील ने तिचा हात धरला आणि तिला थांबवलं...

नील: तुला नेमका कशाचा राग आलाय प्रेरणा? मी माझं ice cream share केलं याचा, की ते राधा बरोबर share  केलं याचा??की राधा  front seat वर बसली याचा? अगं मीच तिला म्हणलं पुढे बस म्हणून... आणि अगदी सहज म्हणलं... त्याचा तुला इतका राग येईल असं मला वाटलंच नाही... sorry really sorry...

प्रेरणा: हे बघ नील, तुझी best friend फक्त मीच असायला हवी. माझ्या ऐवजी दुसरं कोणी तुझ्या इतक्या जवळची मैत्रीण आहे ही कल्पनाच मी नाही करू शकत... तुझ्या life मधली माझी मैत्रिणीची जागा राधा घेतेय का? माझ्या ऐवजी राधा तुझी best friend होतेय कां?
  असं म्हणून ती रडायला लागली... ? ?

नील: अरे देवा.... तू ना खरंच वेडूच आहेस. जितक्या दिवसांची आमची ओळख आहे त्यापेक्षा जास्त वर्षांची आपली मैत्री आहे वेडाबाई!!! मग असं तुला वाटलंच कसं की तुझ्या मैत्रीची माझ्या मनात जी जागा आहे, ती दुसरं कोणी घेईल??  नेहमीच माझ्या आजूबाजूला सुंदर सुंदर मुली असतात आजवर तुला कधीच असं insecure वाटलं नाही. मग आजच असं का वाटलं?? आणि वेडाबाई, तू माझी मैत्रीण म्हणून फक्त या जन्मात नाही पुढच्या सात जन्मात हवी आहेस मला... मैत्रीण म्हणून तुझं स्थान माझ्या मनात ध्रुवताऱ्या सारखं आढळ आहे. अगं राधा काय, पण उद्या १६१०८ जरी आल्या तरी ते कोणालाही मिळवता येणार नाही...
असं म्हणत तो तिचे  डोळे पुसतो... आणि ती  त्याला मिठी मारते..

नील:  तू पण ना चिडका बिब्बाच आहेस.. ?

नीलच्या अशा बोलण्याने प्रेरणा थोडीशी normal झाली.

प्रेरणा:  बापरे??? ? १६१०८ मिळणार!!! वाट बघ... तोंड बघितलंयस  का आरशात? ?

नील: हो पाहिलंय ना... तुझ्यापेक्षा तर नक्कीच चांगलं आहे... ?

असं म्हणल्यावर ती लटक्या रागाने नीलला फटके मारू लागली...

नील: बरं चल उशीर झालाय जा तू घरी... आणि ए बाई डोळे पूस आधी... नाही तर uncle ओरडतील मला माझ्या लेकीला रडवलं म्हणून..

प्रेरणा: गप रे असं म्हणत ती पुन्हा त्याला बिलगली.. चल बाय भेटू उद्या... आणि  हो sorry.. really sorry..

नील: bye dear... भेटू उद्या.

     घरी आल्यावर प्रेरणा सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागली..


प्रेरणा (मनातल्या मनात): खरचं इतकं का चिडलो आपण? नील म्हणाला तसं त्याच्या तर बऱ्याच मैत्रिणी आहेत, पण त्या आजूबाजूला असल्या तरी मला असं insecure कधीच वाटलं नव्हतं. पण मग आत्ताच ही insecurity का वाटतेय? मला नील बद्दल मैत्री पेक्षाही जास्त काही वाटतंय का? हे प्रेम आहे की?? मी प्रेमात तर नाही पडले ना त्याच्या?
  
        इकडे नील ही घरी गेल्यावर त्यांचे सगळे फोटोज् बघत राधाचाच विचार करत होता. मी प्रेरणा ला तर समजावलं पण मलाच काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीयेत... खरंच इतक्या मुली आजूबाजूला असतात, पण आजवर कधीच कोणाबद्दल अशा feelings नाही वाटल्या कधीच... पण  का कुणास ठाऊक राधा बद्दल अशी ओढ का वाटतेय मला? सवय झालीये का मला तिची? कशी मिळणार ही सगळी उत्तरं??

     
   
    क्रमशः

©® केतकी ❤️

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now