Jan 29, 2022
कथामालिका

हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग ६

Read Later
हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग ६


हे बंध रेशमाचे भाग ६

       असेच बघता बघता काही दिवस सरतात. competition साठी आता फक्त 3/4 दिवस उरले होते. दोन्ही गाणी छान बसली होती. पण प्रेरणाची मात्र राधाला सारखी भुणभुण सुरू होती.

प्रेरणा: ए यार राधा, चल ना आपण shopping ला जाऊयात... अग मला बरीच खरेदी करायची आहे...

राधा: हम्म....

practice सुरू व्हायला वेळ असतो म्हणून ती कुठल्यातरी notes complete  करत असते. त्या करता करता ती उत्तर देते. ती नीट उत्तर देत नाही हे बघून प्रेरणा तिची वही काढून घेते...

प्रेरणा: ऐक ना...तू ऐकत पण नाहियेस माझं...

राधा: अगं काय हे?? वही दे बघू माझी....

प्रेरणा: जोपर्यंत तू हो म्हणत नाहीस, तोपर्यंत नाही देणार...

असं म्हणून वही लपवते....


राधा: बरं ठीक आहे. जाऊयात... खुश??

प्रेरणा:  होऽ हे बघ मला ना छान पैकी floor length अनारकली घ्यायचाय... आणि u know matching jwellery, cosmetics...

राधा: बरं बाई, जाऊयात उद्या ....

तेवढ्यात नील तिथे येतो.

नील: कोण कुठे जातयं???

राधा: अरे हिला शॉपिंग करायचीय...

नील( प्रेरणा कडे बघत): अगं ए, जरा बाकी लोकांना पण ठेव काही दुकानात??? आता दिवाळीला तर एवढी shopping  केलीस ना???

प्रेरणा: गप रे तू!! तुला कोणी विचारत नाहीये...

   थोडावेळ  त्यांची अशीच लुटूपुटूची भांडणं चालू होती आणि राधा ते सगळं खूप एन्जॉय करत होती....

   दुसऱ्या दिवशी  practice झाल्यावर त्या  mall मध्ये shopping साठी जायचं ठरवतात.खरंतर नीलला अजिबात इच्छा नसते जायची, पण काय ना, स्त्री हट्टा पुढे त्या जगंनियंत्या कृष्णाचं ही काही चाललं नव्हतं.  सत्यभामेच्या हट्टामुळे स्वर्गातून पारिजात पृथ्वीवर आणला होता त्याने.... मग हा तर काय बिचारा भूतलावरचा कृष्ण ... त्‍यामुळे प्रेरणा च्या हट्टापुढे तयार झाला बिचारा shopping साठी  mall मधे जायला....
      थोड्याच वेळात ते mall ला पोहोचतात.मी गाडी  park  करून येतो असं म्हणून , नील त्या दोघींना mall च्या समोर उतरवतो. तो जातो तोच राधाला एकदम आठवतं की तिची पर्स गाडीतच राहिलीय..

राधा:  ohh shit .... अगं मी पर्स गाडीतच विसरले.

प्रेरणा: नीलला सांगते ना फोन करून... तो आणेल....

राधा: अगं  basement मध्ये कदाचित फोन नाही लागणार ...असू देत मी जाते पटकन.

ती parking मध्ये पोहोचते नीलची गाडी बघून गाडी जवळ जाते तर नील मागे डोकं टेकून डोळे मिटून स्वतःशीच बोलत असतो.

नील:  नील, take a deep breath... tension नको घेऊस. घाबरू नकोस. be brave and be calm....

तो हे सगळं बोलत असतांना राधा driver seat बाहेर उभी राहून सगळं ऐकते...
नील डोळे उघडतो तशी राधा त्याला विचारते.

राधा: हे काय होतं सगळं???

नील: काही नाही...पण तू का आलीस??

तसं राधा गाडीतून पर्स काढत त्याला दाखवते..

राधा: विसरले होते म्हणून घ्यायला आले... पण तू माझ्या प्रश्र्नाचं उत्तर नाही दिलस???

नील: ते होय ??तयारी करत होतो....

राधा: तयारी? कसली???

नील: मनाची...

नील गाडीतून उतरत गाडी lock करतो आणि ते दोघेही mall च्या दिशेने चालायला लागतात.

राधा: तू काय बोलतोएस ना,  मला काहीच कळत नाहीये...

नील: अगं,  प्रेरणा बरोबर shopping ला यायचं म्हणजे मनाची तयारी करून यावं लागत  माहितीये का तुला??? आज घरी जायला 10 वाजतील बघ.... mall मधून हाकलेपर्यंत shopping करते ही बया...

तो असं बोलतो तसे दोघेही एकमेकांकडे बघून जोरात हसायला लागतात.????

राधा: हे जरा तू अतीच बोललास असं नाही वाटत तुला????

नील: ठीक आहे.मग आज बघच  तू ...

तेवढ्यात ते प्रेरणा उभी असते तिथे पोहोचतात.

प्रेरणा( राधा कडे बघत):  चल ग, आपण आधी कपड्यांच्या section मध्ये जाऊयात त्यानंतर मग  matching  jwellery,cosmetics ...

   ती बोलत असतांनाच नील तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणतो....

नील: प्रेरणा, तू एवढं सगळं make up  चं सामान घेणार makeup करणार,jwellery घालणार...पण कितीही काहीही केलं तरी चेटकीण  कधी अप्सरा होईल का ग?

प्रेरणा अगदी मन लावून त्याचं बोलणं ऐकत असते, आणि एकदम निरागसपणे बोलून जाते...

प्रेरण: काहीतरीच काय नील??? चेटकीण ती चेटकीणच राहणार अप्सरा कशी होईल ती ???

नील:हो ना??  मग हे तुला कधी कळणार??

असं म्हणून तो जोरजोरात हसायला लागतो...तसं प्रेरणाला कळतं तो हे सगळं आपल्याला बोलतोय..... तशी  चिडून ती पाय आपटत आत मध्ये निघून जाते....
आणि नील अजून जोरात हसायला लागतो...??

राधा: काय रे?? पुन्हा त्रास दिलास ना तिला!!!?

नील: मज्जा येते ग तिला छळायला....?

राधा: हो पण आता तीचा मूड ठीक करता करता माझ्या नाकी नऊ येतील त्याचं काय???

नील: छे छे ...you don\"t worry... shopping च्या नादात ती विसरुन पण जाईल हे सगळं....

तेवढ्यात प्रेरणा राधाला आवाज देते.

राधा: चल ती बोलवतेय मला.

नील: हो जा तू... मी इथेच digital section मध्ये headphones आणि power bank बघतो तोपर्यंत...

  प्रेरणाने परवाच्या competition साठी बरेच १०/१२ floor length अनारकली dress select केलेले असतात.. राधा तिथे जाते तसं प्रेरणा तिला विचारते.

प्रेरणा:  हे बघ हे एवढे select केले आहेत मी..आता एक एक करुन सगळे  dress try  करते...

राधा: एवढे सगळे dress try करणार तू??

प्रेरणा: हो अर्थात मला सगळेच आवडले आहेत..

तशी राधा  कपाळावर हात मारून घेते.. ??

राधा: ठीक आहे कर.... आता राधाला नील चे शब्द आठवतात आणि अजून हसायला यायला लागतं. ??
   
बराच वेळ बरेच dress try केल्यानंतर शेवटी ती एक dress select करते. मग दोघीही  matching jwellery घ्यायला जातात. राधा पण तिथे earrings बघत असते. तिच्यासमोर प्रेरणा उभी असते. राधा प्रेरणाला एक एक कानातले कानाला लावून दाखवत विचारत असते. तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की प्रेरणाच्या बरोबर मागे  नील उभा आहे आणि तो राधाला तिथेच उभा राहून नजरेनेच कानातले छान आहेत/ नाहीयेत असं खुणावत असतो. शेवटी दोन कानातले ती select करते आणि पुन्हा प्रेरणाला विचारते.

राधा: ए यार प्रेरणा , मी confuse झालेय. आता या दोन मधले कोणते घेऊ सांग ना??

दोन्ही कानाला दोन वेगवेगळे कानातले लावून ती विचारते आणि नेमकं प्रेरणा जे कानातले सांगते ते नीलला आवडलेलं नसतं... शेवटी राधा, प्रेरणाला आवडलेलं कानातलं pack करायला सांगते. नील थोडासा नाराज होतो. त्याला नाराज बघून तिला हसू येतं....प्रेरणा पण स्वतःसाठी matching jwellery घेते.

प्रेरणा: राधा, ते ancklet बघ ना किती क्युट आहे...

राधा: हो ना ...खरंच खूप मस्त आहेत... घेऊयात का??? असं म्हणून दोघीही same same ancklet घेतात. आणि shopping संपवून बाहेरच थोडसं खाऊन घरी जायला निघतात.

नील:  finally झालं ना मनासारखं  shopping???
प्रेरणा कडे बघत नील विचारतो.

प्रेरणा: हो झालं ना ... पण राधाने काहीच नाही घेतलं. फक्त कानातले आणि ancklet घेतलं.

नील: मग ती काय तुझ्या सारखी नाहीये नवऱ्याला लखपती बनवणारी??? ? ?
असं म्हणून जोरजोरात हसतो...

राधा: म्हणजे? मला नाही कळलं?

नील:  तुला माहितीये का राधा?aunty काय म्हणतात प्रेरणाला ते??

राधा: काय म्हणतात ग??

प्रेरणा: ए गप हं नील,  आता परत चिडवू नकोस....

नील: प्रेरणाशी जो लग्न करेल तो वर्षभरात लखपती होईल....

राधा: चांगलंय ना मग??

नील: अगं, करोडपती असलेला नवरा लखपती होईल असं म्हणायचं असतं त्यांना!!! ???? एवढं shopping करते ही!!!! दिवाळीत आख्खा  मेन रोड पालथा घालते आणि तरीही function साठी घालायला चांगला dress कधीच नसतो तिच्याकडे... हो ना ग प्रेरणा???

नील असं म्हणल्यावर तिघेही मनापासून हसतात. ??

अखेर competition चा दिवस उजाडतो. Competition संध्याकाळी 7 वा. होती. त्यामुळे final practise साठी सगळे college मध्ये जमले होते. नील सगळ्यांना काही सूचना देत होता. सगळ्यांना tension आलं होतं.

नील : So guys, tension घेऊ नका. Performance छानच होईल. Be confident...Result काही ही असो, आपण फक्त आपलं 100% द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आता तीन वाजत आले आहेत, सगळ्यांनी घरी जा थोडं खाऊन घ्या आणि आवरून ५:३०- ५:४५ पर्यंत सायखेडकर  hall वर पोहोचा. ठीक आहे.  All d best...

नील( राधा आणि प्रेरणा कडे बघत):
आणि बायांनो , हात जोडतो पण वेळेत पोहोचा... लग्न नाहीये तिकडे तेव्हा लग्नासारखा makeup करत बसू नका... कळलं ना?

प्रेरणा: ए गप रे शहाण्या... आम्हाला मेकअपची गरजच नाहीये... आम्ही अशा पण सुंदरच दिसतो हो ना गं राधा?

राधा: हो ना!!!  पोहोचतो आम्ही वेळेत तू नको काळजी करुस...असं म्हणून त्या दोघी निघतात.

नील राधाला परत आवाज देतो.
नील: राधाऽ

राधा: काय रे?

नील: tension आलाय ना??
राधा मानेनेच हो म्हणते.

नील: don\"t worry नको घेऊस tension... छानच होणारे तुमचा performance...

असं म्हणून हलकेच तिला खांद्याला थोपटतो. आणि आश्वासक smile देतो.

त्याच्या एवढ्याशा बोलण्याने सुद्धा राधाचं अर्ध टेन्शन कमी होतं.

नील:  चल वेळेत पोहोच तिकडे... आणि हो रात्री उशीर होईल त्यामुळे मी घरी सोडेन तुला....

असं म्हणल्यावर राधा त्याला बाय म्हणून तिथून निघते...

नील पण  college मधून निघतो आणि ठरल्याप्रमाणे hall वर पोहोचून राधाची वाट बघत असतो....
   
क्रमशः

©® केतकी ❤️

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now