Jan 29, 2022
कथामालिका

हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग ५

Read Later
हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग ५


हे बंध रेशमाचे भाग ५

     प्रेरणा चा फोन आल्यामुळे नीलला समजतं की, राधाला बरं नव्हतं त्यामुळे ती काल येऊ शकली नाही.... आणि तो तिची माफी मागायला म्हणून तिच्यासमोर जाऊन उभा राहतो.

राधा तिथेच भिंतीला टेकून खाली मान घालून उभी होती....

नील: राधा,  मला बोलायचंय तुझ्याशी....

  मघाशी नील चिडून बोलत होता ,त्यामुळे तिचे डोळे पाणावले होते. तो बोलायला आला तसं तिने पटकन डोळे पुसले... पण त्याच्या नजरेतून हे काही सुटलं नाही. खूप वाईट वाटलं त्याला. आपण पुन्हा किती rudely बोललो हिच्याशी असा विचारही मनात आला त्याच्या...

नील: राधा, कसं बोलू तेच कळत नाहीये एक तर त्या दिवशी मी त्या माणसामुळे तुझ्यावर चिडलो. आणि आज पुन्हा मी तुला काहीही बोलू न देता तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला... पण तू तरी सांगायचं ना त्यादिवशी मला ,की तुला बरं नाहीये म्हणून...
  I m really sorry राधा..

तो बोलत होता पण राधा त्याच्याकडे बघतच नव्हती....

नील: राधा, यार बोल ना गं काहीतरी.... त्यादिवशी कशी वसावसा ओरडत होतीस.... तशी ओरड हवं तर... पण  बोल ....

   ती अजूनही काहीच बोलत नाही हे बघून तो तिच्या अजून थोडं जवळ सरकला आणि कान धरून अगदी केविलवाण्या चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता...
    तिने एक नजर त्याच्याकडे फिरवली... तो तिच्या डोळ्यात बघत होता... ती पुन्हा एकदा त्याच्या घाऱ्या डोळ्यात हरवली....
     नील ने  परत तिला हाक मारली....

नील: राधाऽ  sorry ना गं.... परत नाही करणार मी असं प्रॉमिस.....?????

   खरतर त्याचा असा निरागस, केविलवाणा चेहरा आणि काकुळतीचा स्वर बघून तिच्या रागाचं कधीच पाणी झालं होतं.... पण तरीही तसं दाखवून न देता, ती फक्त बरं ठीक आहे... एवढंच म्हणाली...

नील: ठीक आहे म्हणजे??? माफ केलं की नाही??? हे बघ असं पण एका महान व्यक्तीने म्हणलय की जोपर्यंत समोरचा \"माफ केलं\" असं म्हणत नाही तोपर्यंत माफी मागावी... त्यामुळे तू माफ करत नाही तोपर्यंत मी तुला काही सोडणार नाही....

राधा:हो का??? आणि असं कोणत्या महान व्यक्तीने म्हटलं आहे... ते तरी कळू देत मला??? असं म्हणत ती हसली...

ती  जरा normal  झाली आहे बघून नील पण हसायला लागला आणि म्हणाला...

नील: अरे,  तुला नाही माहित ??? ही काय माझ्यासमोर उभी आहे साक्षात राणी एलिझाबेथ!!!
असं म्हणून तिच्या पुढे झुकून मुजरा केल्याची ॲक्टिंग करतो....
    तो असं म्हणल्यावर राधा एकदा मनापासून खळखळून हसते.? ? ?
 
   ती हसायला लागते तसं नील एकटक तिच्या हसर्‍या चेहर्‍याकडे आणि गालावरच्या खळ्यांकडे बघण्यात हरवून जातो ... तो असं एकटक  बघतोय हे लक्षात येताच राधा लाजून पटकन नजर खाली झुकवते आणि त्याच्या समोरून निघून जाते...

नील( मनातल्या मनात): काय हसते  यार ही.... या खळ्यांमध्येच अडकून राहतो मी.... तिच्या विचारात हरवलेला असतानाच राधा त्याला आवाज देते....

राधा:नीऽऽऽऽल....

नील( मनातल्या मनात): कसलं गोड वाटत ना... जेव्हा माझ्या नावाचा नी असा लांबवत ती माझं नाव घेते.....

नील: काय गं?

राधा: अरे ४ वाजत आले बाकीचे कसे आले नाहीत अजून?

नील: अगं प्रेरणा,आदित्य, सई तर त्यांच्या
department चा  program आहे त्यामुळे तिकडेच आहेत...so तसंही आज माझ्या एकट्याची practice होती. अजय येणार होता,  पण का आला नाही माहित नाही ...त्याने कळवले पण नाही ....
(तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसत तो बोलतो.)

राधा:  ohh कळवलं नाही त्याने?? आणि तू चक्क चिडला नाहीस त्याच्यावर???

राधा मुद्दाम डोळे बारीक करून त्याच्याकडे बघत त्याला विचारते..

नील (थोडा रागातच): कळतात हं मला टोमणे!!!! आणि म्हणलं ना मी sorry.... राणी एलिझाबेथ, परत कान पकडू का???
कान पकडायची एक्टिंग करत तो विचारतो....

राधा: नको.... काही गरज नाहीये... नौटंकी नुसता....एक  मिनिट... मला आत्ता आठवलं... तू काय म्हणालास मघाशी??? मी वसावसा ओरडते??? हां???

असं म्हणत त्याला फटके मारायला लागते.

नील: अगं ए???? मारतेस काय??? हे बघ, तसही इतक्या नाजूक हाताने मला काहीही लागत नाहीये... मग कशाला उगाच कष्ट घेतेस तू???

तो हसत असतो आणि त्याला हसताना बघून ती अजून जोरात फटके मारते....

राधा: हसू येतंय का तुला???  आणि काय म्हणालास???  लागत नाहीये???
असं म्हणत ती अजून जोरात त्याला मारायला लागते.....
आणि अचानक तो तिचा हात धरतो.... अचानक  त्याच्या धरण्याने, त्याच्या स्पर्शाने ती शहारते....
नील पुन्हा तिच्याकडे एकटक बघत असतो...

राधा( मनातल्या मनात): सारखी सारखी का हरवते मी याच्या डोळ्यांत असं नको ना बघूस  नील माझ्याकडे....

तो तिचा हात सोडतो तशी ती भानावर येते.... काही वेळ कुणीच कुणाशी बोलत नाही..
शेवटी शांतता भंग करत नील निघुयात का म्हणून विचारतो.
आणि ते दोघेही तिथून निघतात...

कॉलेज बाहेर पडता पडता दोघेही गप्पा मारत असतात...
नीलला पुन्हा तिची चेष्टा करायची लहर येते.

नील: ए, पण काही म्हण हं, तुझ्याकडे बघून वाटत नाहीये तू आजारी होतीस ते.....

राधा: म्हणजे??? काय म्हणायचयं तुला???

नील: आजारी माणूस एवढं मारतो का कुणाला??? मारकुटी नुसती!!!!

असं म्हणत , जोरजोरात हसत तो  पुढे पळतो....

राधा: एऽऽ... थांब तू बघतेच तुला....

असं म्हणत ती पण  त्याच्यामागे मारायला धावणार तेवढ्यात तिला मघाशी नीलने तिचा हात धरला होता ते तिला आठवतं आणि लाजून ती जागच्या जागीच थांबते...

तिला असं थांबलेलं बघून, नील तिला आवाज देतो....

नील:काय गं??? काय झालं???

राधा मानेनेच काही नाही म्हणून सांगते...
नीलला वाटतं तिला पुन्हा राग आला म्हणून तो तिच्या जवळ येतो...

नील: ए अगं, चिडलीस कि काय पुन्हा??? गंमत केली मी!!! बर चल, तुझा राग घालवण्यासाठी आज आपण तुझ्या आवडत्या टपरीवर जाऊन चहा पिऊयात....

राधा: काय??? तू चक्क चहा पिणार???
राधा एकदम आश्चर्याने विचारते...

नील: अजिबात नाही ....मी फक्त तुझ्या सोबत येतोय... तू पी चहा...  I love coffee... तुला तर माहितीच आहे....

असं म्हणून ते चहा प्यायला त्यांच्या नेहमीच्या टपरीवर गेले. 

      पहिल्यांदाच ते दोघंच असे चहा प्यायला आले होते. नेहमी त्यांचा सगळा ग्रुप असायचा... राधा चहा पीत होती. त्यांच्या गप्पा चालू होत्या..   तेवढ्यात तिथे एक म्हातारे, पायाने जरासे अधू  असलेले आजोबा भीक मागायला आले...
    नील ने त्यांना पैसे देण्यासाठी पटकन खिशात हात घातला, तेवढ्यात राधाने त्याला नजरेनेच थांब असं खुणावलं आणि पुढे होऊन त्या चहाच्या टपरीवरुन एक चहा आणि छोटा बिस्कीट चा पुडा त्या आजोबांना घेऊन दिला. त्या आजोबांनी चहा घेतला आणि थरथरत्या हाताने तिला नमस्कार केला.... खूप मोठी हो पोरी ...असं पुटपुटत तिथून निघून गेले....
      नील एकदम थक्क होऊन तिच्याकडे बघत होता.... राधा ने भुवई उडवून त्याला काय झालं म्हणून विचारलं ....

नील: राधा, तुला कसं सुचतं गं असं???

राधा: त्यात काय??? मी काही एवढं मोठं केलं नाहीये...त्या आजोबांच वय आणि परिस्थिती बघून मी त्यांच्यासाठी चहा घेतला...हेच भिक मागणारी एखादी तरुण धडधाकट व्यक्ती असती, तर मी नक्कीच असं काही केलं नसतं.... आणि त्यांना चहा घेऊन देणं आपल्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे रे...पण त्या कपभर  चहामुळे त्यांच्या चेहऱ्यावर येणारं समाधान बघ किती अनमोल आहे ते.... आणि कसयं ना नील, आपण जर कोणाचं दुःख वाटून घेऊ शकत नसू, तरीपण  आपल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक छोटसं हास्य तर नक्कीच फुलवू शकतो.. हो ना??

राधा बोलत होती पण नील मात्र तिच्याकडे बघत मनात तिचाच विचार करत होता....

    नील (मनातल्या मनात): काही वेळापूर्वी लहान मुली सारखी डोळ्यात पाणी आणून रडणारी राधा आणि आत्ता आजूबाजूच्या परिस्थितीचा इतका गांभीर्याने विचार करणारी राधा.... दोन्ही रूपं किती वेगळी पण तितकीच लोभस....
    किती साधी गोष्ट होती ही पण आपल्याला कधीच का नाही सुचली आजवर...

राधा: काय झालं? कसला विचार करतोयस? निघायचं ना???
त्याच्या चेहऱ्यासमोर हात हलवत तिने विचारलं....

नील: हो.. तू थांब मी गाडी आणतो. drop करतो तुला घरी...

राधा: अरे, तू कशाला येतोयस??? तू नको येऊस... मी जाते...

नील: मी तुला विचारत नाहीये... सांगतोय. आधीच काल ताप होता... अजूनही weakness आहे तुला. चेहरा बघितलास का , किती ओढल्यासारखा दिसतोय ... त्यामुळे मी तुझं काहीही ऐकणार नाहीये... मी तुला घरी सोडायला येतोय... कळलं???

तिच्या डोळ्यात डोळे घालुन तो बोलत होता... आणि hypnotise झाल्यासारखी तिच्याही नकळत तिने होकारार्थी मान हलवली ...

नील: that\"s like a good girl....

थोड्याच वेळात तो गाडी घेऊन आला .राधाला  door open करून देत म्हणाला...

नील: बसा ... राणी एलिझाबेथ!!!!

राधा: ए,  हे काय लावलयं मघापासून राणी एलिझाबेथ ???

नील: तुझं नवीन नाव... छान आहे ना???

तशी राधा पुन्हा खळखळून हसते...???

राधा: छान आहे...चल आता..

नील: seat belt लावा madam ...

राधा  seat belt लावते आणि ते निघतात...
गाडीत बसल्या बसल्या तिच्या मनात नीलचेच विचार चालू असतात ....

राधा (मनातल्या मनात):  किती caring आहे ना नील!!! मघाशी तो बोलत होता, तेव्हा किती काळजी होती त्याच्या नजरेत.... त्याचा असा काळजी घेणं मला  आवडायला लागलयं का???

त्याचे विचार करत असतानाच नील एकदम म्हणतो....

नील: by the way राधा, मला माहीत नव्हतं तुला मी आवडतो ते?

तशी राधा एकदम shock लागल्यासारखी त्याच्याकडे बघते...
राधा :( मनातल्या मनात) ह्याला मनातलं पण कळायला लागलं की काय माझ्या???
अं??

नील: अगं काल तुझा dp बघितला... माझा dp लावलाएस ना म्हणून म्हटलं...?(राधाच्या whatsapp dp ला कृष्णाचा  फोटो असतो म्हणून मुद्दाम नील तिला असं म्हणतो....) एवढा आवडतो मी तुला??? असं म्हणून तिच्याकडे बघत डोळे मिचकावतो. ??

राधा: एऽऽ गप रे... तो कृष्णाचा फोटो आहे. तू उगाच काहीतरी गैरसमज नको करून घेऊस हां...
तिला असं गोंधळलेलं बघून नील गालातल्या गालात हसतो....

नील: अगं हो हो....  chill... गंमत करतोय.  केवढी serious होतेस.
तोपर्यंत ते दोघं तिच्या घराच्या गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत येतात.

नील: काय ग कोणती building??

राधा: अरे ती कोपऱ्या वरची आहे .पण तू इथेच लाव गाडी पुढे dead end आहे तर वळवता येणार नाही. इथूनच जाऊ आपण चालत...

नील: आपण???

राधा: हो. आता इथवर आला आहेस ,तर घरी पण चल ना!!!

नील: अगं खरंच नको... पुन्हा कधीतरी नक्की येईन... तू आराम कर आता आणि गोळ्या घे आठवणीने .... bye?

राधा: बर ठीके. bye.

   घरी आल्यावरही ती नीलच्याच विचारात होती. रात्रीही त्याने आठवणीने गोळ्या घेतल्या का?  म्हणून मेसेज केला. त्याचं असं काळजी घेणं, हक्काने \" मी सोडायला येतोय\" असं सांगणं तिला आवडू लागलं होतं. शेवटी त्याच्या आठवणीतच ती निद्रादेवीच्या अधीन झाली.

   इकडे नीलला सुद्धा राधा भेटल्यामुळे बरं वाटत होतं. राधाचं खळखळून हसणं, त्याच्या डोळ्यात हरवणं, सगळं आठवून  चेहऱ्यावर एक गोड  smile घेऊनच तोही झोपी गेला.....

क्रमश: 

©® केतकी❤️

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now