Jan 29, 2022
कथामालिका

हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग ४

Read Later
हे बंध रेशमाचे (पर्व १)...भाग ४


हे बंध रेशमाचे भाग ४

बेडवर पडल्या पडल्या तिचा रडवेला चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला आणि त्याला अगदी कसंसं झालं.


नील:( मनातल्या मनात) मी जरा जास्तच बोललो का तिला??? त्या माणसाचा सगळा राग मी त्या बिचारीवर काढला... किती रडवेली झाली होती ती... काय करु? प्रेरणा ला फोन करतो... तिचं काहीतरी बोलणं झालं असेल राधाबरोबर...
असं म्हणून तो प्रेरणा ला फोन लावतो....

प्रेरणा: बोल...

नील: प्रेरणा, माझं जरा चुकलंच का गं आज??

प्रेरणा: नाही रे... उलट तू अजून चिडायला  हवं होतंस तिच्यावर...

नील ला  तिच्या बोलण्यातला राग लक्षात येतो...

नील: सॉरी ना यार प्रेरणा....I know मी over react केलं... माझं मलाच कळलं नाही ग मी असं अचानक का चिडलो ते.... ती खूप चिडली असेल का माझ्यावर?? तुझं काही बोलणं झालं का???

प्रेरणा: मला सॉरी म्हणून काय उपयोग आहे नील??? जिला दुखावलं आहेस,  तिला म्हणायला हवं ना ??  आणि मी २/३  वेळा फोन केला पण बंद होता त्यामुळे माझं पण बोलणं झालं नाही...

नील: मला तिला  sorry म्हणायचंय... मी पण करू का फोन? नाहीतर मेसेज करतो तिला....

प्रेरणा: हम्म... मेसेजच कर... ती कदाचित चिडली असेल म्हणून फोन बंद केला असेल थोडा राग शांत झाला आणि  मेसेज बघितला की करेल ती reply तुला....

नील: चालेल... आणि थँक्स... भेटू उद्या बाय...

प्रेरणा: हम्म... बाय...

    फोन ठेवल्यावर तो लगेचच group मधून राधाचा नंबर घेतो... आजवर त्यांनी एकमेकांना कधीच personal message केलेला नसतो... तिचा dp बघून एक cute हसू त्याच्या चेहऱ्यावर पसरतं...

नील: i m really really sorry राधा.  i know मी over react केलं. त्या माणसाचा राग मी तुझ्यावर काढायला नको होता... please मला माफ कर... ?तू खूप hurt झाली असशील... i m really sorry for that....good night and take care...?

    तिला मेसेज सेंड केल्यावर... तिने वाचला का म्हणून सारखा सारखा तो फोन चेक करत असतो... मग त्याला प्रेरणाने सांगितलेलं आठवतं तिने फोन बंद केलाय..... शेवटी तिचा विचार करता करताच त्याला झोप लागते....
            
             *********
    दुसऱ्या दिवशी राधा ला जरा उशीराच जाग येते...
राधाची आई: काय ग बरं वाटतंय का? ताप नाहीये ना आता???
तिच्या कपाळाला हात लावत त्या विचारतात...

राधा: हो... जरा बरं वाटतय आता... पण डोकं खूप दुखतयं...weakness  पण आहे जरा...

राधाची आई: हम्म थोडा ताप आहे अजून...तू आवरून घे पटकन आणि बाबांबरोबर दवाखान्यात  जाऊन ये...

राधा: दवाखाना कशाला?? बरं वाटतंय मला आता...

राधाचे बाबा: नाही हं... अजिबात हट्टं नकोय...
काहीतरी खाऊन घे .. मी ऑफिस ला निघायच्या आधी आपण दवाखान्यात जाऊन येऊ.... आणि आज घरीच थांबायचंय कॉलेजला जायचं नाही अजिबात.... कळलं???

राधा: बरं...
म्हणून ती  आवरायला जाते....

    कॉलेजला जायचं नाहीये म्हणजे प्रॅक्टिसलाही  नाही जाता यायचं ...प्रेरणाला कळवून देते नाहीतर नील परत चिडायचा .. तिच्या लक्षात येतं  की काल तिने फोन स्विच ऑफ केला होता... फोन चालू केल्यावर ती नील ने तिला केलेला मेसेज वाचते...त्याचा राग गेलाय हे बघून तिला जरा बरं वाटतं. ती त्याला काही reply देणार तेवढ्यात तिचे बाबा तिला आवाज देतात आणि ती दवाखान्यात जायला निघते....
    दवाखान्यात जाऊन आल्यावर weakness जाणवत असल्याने ती पुन्हा झोपी जाते... मेसेजला reply द्यायचं पण तिच्या लक्षात रहात नाही..
आणि इकडे मेसेज वाचल्यावरही राधाचा काहीच reply नाही म्हणून नील ला राधाचा अजून राग येतो....
तो रागातच प्रेरणाशी बोलत असतो...

नील: आज ती येणार नाहीये का ?? काही मेसेज पण नाहीये तिचा. मी रात्री तिला सॉरी चा मेसेज टाकला...reply पण नाही केला ....एवढा कसला राग???

प्रेरणा: तुझा मेसेज वाचला नसेल तिने... नाहीतर reply केला असता ना???

नील: वाचलाय मेसेज सकाळीच... एवढा कसला इगो आहे गं तिला???

प्रेरणा: नील, शांत हो बरं... काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. ती अशी नाही वागणार. थांब मी तिला फोन करते...

नील: काही गरज नाही हं तिला फोन करायची?? तिला तिची जबाबदारी कळायला नको ??? काल फोन बंद करून बसली... मी मेसेज केला त्याला रिप्लाय दिला नाही... आता तिने आपण होऊन फोन करायला पाहिजे.... तू अजिबात फोन करायचा नाही तिला... कळलं???

प्रेरणा (मनातल्या मनात): काय यार हि राधा?? पण का फोन केला नसेल तिने?? नील  म्हटला तरी घरी गेल्यावर मी तिला फोन करणार आहे...

    राधा नसल्यामुळे आज ही त्यांची प्रॅक्टिस होत नाही ते घरी जातात....  रात्री प्रेरणा राधाला फोन करते. weakness मुळे आणि गोळ्यांमुळे ती  झोपलेली असते. त्यामुळे राधाची आई फोन उचलते, कालपासून राधाला ताप आहे बरं नाहीये असं तिला सांगते...
    प्रेरणा लगेच हे सांगायला नीलला फोन करते पण नेमका त्याचा फोन लागत नाही...२/३ वेळा ती फोन लावते शेवटी उशीर झालेला असतो म्हणून ती झोपून जाते....
    इकडे नील मात्र खूपच अस्वस्थ असतो. रागाची जागा काळजीने घेतलेली असते‌...
               
                    *********
दुसऱ्या दिवशी सकाळी

राधा: आई, मला आज बरंच बरं वाटतंय मी
जाते कॉलेजला....

राधाची आई: नक्की बरं वाटतंय ना??? आणि हो त्या प्रेरणाचा काल फोन आला होता... पण तू झोपली होतीस ना रात्री ... मी सांगितलं तिला,तुला बरं नाहीये म्हणून... तिला एकदा फोन कर...

राधा: हो आई... करते मी तिला फोन... आणि weakness नाहीये आता... practice पण बुडाली ना काल त्यामुळे आज जायलाच हवं.... त्यामुळे जाते मी...

राधाची आई: ठीक आहे जा... पण चालत जाऊ नकोस... रिक्षाने जा आणि खाऊन जा तशीच घाईघाईत जाऊ नकोस....

राधा: हो आलेच मी पटकन आवरून....

    सकाळी उठल्यापासून राधा 2/3 वेळा नीलला फोन करते ....पण हे महाशय रागात असतात ना त्यामुळे  तिचा फोन उचलत नाहीत.... राधाला ही लक्षात येतं की तो तिच्यावर चिडला असेल. म्हणून ती लगेच प्रेरणा ला फोन करते. तिला सगळं सांगते. पण नेमकी आज प्रेरणा प्रॅक्टिसला येणार नसते कारण त्यांच्या Bba department चा दिवसभर काहीतरी प्रोग्राम असतो त्यामुळे तिला तिथे जायचं असतं ...

इकडे नील मात्र रागातच असतो. राधा परत त्याला फोन करते....

नील (मनातल्या मनात): आत्ता आठवण आली का हिला माझी???  मी मात्र इथे परवापासून तळमळतोय हिला भेटायला.... उचलतच नाही मी तुझा फोन...बघू काय करतेस??

राधा कॉलेजला गेल्यावर ही सारखा नीलला फोन करत असते.... पण तो उचलतच नाही....
शेवटी ३ वाजता ती प्रॅक्टिस साठी हॉलवर जाते...
तिला बघताच नीलला खरं तर खूप आनंद झालेला असतो.पण तो  रागात असल्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करतो  शेवटी राधाच त्याच्याशी बोलायला जाते...

राधा: नील...

नील: या राणी एलिझाबेथ, काय सेवा करू आपली??? आपणही कॉम्पिटिशनमध्ये आहात हे लक्षात आहे म्हणजे तुम्हाला??? मला वाटलं विसरला असाल दोन दिवसात.....

राधा: नील ऍक्च्युली...

नील: काय समजते गं तू स्वतःला?? त्यादिवशी जरा जास्त काय बोललो मी तर लगेच चिडून फोन बंद करून बसलीस... मेसेज केला  त्यालाही उत्तर नाही... काल पण आली नाहीस??? मी इथे दिवसभर तुझाच विचार करतोय...पण तुला काय ना त्याचं???

    नील आज त्यादिवशी पेक्षा जास्त चिडून बोलत होता.... तो अजून काही बोलणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. प्रेरणा चा फोन होता. सकाळी राधाचा आणि तिचा फोन झाल्यानंतर ती direct program  ला गेली होती त्यामुळे तिची आणि नीलची भेटच झाली नव्हती.... म्हणूनच राधा आजारी आहे हे सांगायलाच तिने नीलला फोन केला होता....
तिचा फोन झाल्यावर नीलचा राग क्षणार्धात निवळला....

नील (मनातल्या मनात): चलो नील बेटा, अब फिर से माफी मांगनी पडेगी.... करेल का ती माफ मला??

क्रमशः

©® केतकी ❤️
     


   
   
   
   
   
   
   
  

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now