Jan 26, 2022
नारीवादी

कमिटमेंट - सात जन्मांचे वचन

Read Later
कमिटमेंट - सात जन्मांचे वचन


कमिटमेंट- सात जन्मांचे वचन

आज ती भलतीच खुश होती. दोन दिवसांनी तिच्या बाळाचं‌ बारसं होतं. आणि बाळाला बघायलाही येऊ न‌ शकलेल्या त्याने, बारशासाठी यायचं वचन दिलं होतं. वचन दिल्याप्रमाणे तो आला. पण .. तिरंग्यात लपेटून... त्याला असं भेटायची वेळ येऊ शकते, पण ती इतक्या लवकर येईल, हे तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले.

महिन्याभरापूर्वी दहशतवादी कारवायांना पुन्हा सुरुवात झाली होती. त्यामुळे बाळालाही बघायला तो येऊ शकला नव्हता. आज तो येणार, म्हणून सगळं घरदार आनंदी होतं. पण त्याला असं बघून सगळ्यांचाच बांध फुटला. त्याचं ते तिरंग्यात लपेटलेलं पार्थिव बघून त्यांचं लग्न झालं, तेव्हाचे त्याचे शब्द तिला आठवले.
मी जरी तुला साता जन्माचं वचन दिलेलं असलं, तरीही माझी पहिली कमिटमेंट, जन्मोजन्मीचं वचन मी मातृभूमीला दिलंय. हे आठवलं आणि घळाघळा वाहणारे अश्रू पुसत त्या विरपत्नीने काहितरी निर्धार केला.

कायम त्याच्या सोबत रहाण्याचं वचन दिलं होतं तिने. आणि तेच पूर्ण करण्यासाठी तिने अविरत परिश्रम घेतले आणि आज, ४ वर्षांनंतर तो आर्मीचा युनिफॉर्म चढवत त्याच्या हार घातलेल्या फोटोसमोर उभं राहून तिने एक कडक सॅल्युट ठोकला.

त्याची देशासाठी असलेली कमिटमेंट आर्मीत भरती होऊन , ती पूर्ण करणार होती.©® केतकी ❤️
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now