Nov 26, 2020
प्रेम

वेड प्रेम

Read Later
वेड प्रेम

वेड प्रेम

अवनी दिसायला खुप सुंदर. कोणिही तिच्या प्रेमात पडेल इतकी सोज्वळ. नुकताच लास्ट ईयर ची परिक्षा दिली. आणि एका ऑफ़िस मध्ये receptionist च्या पोस्ट वर कामाला  रुजू झाली. नविन नविन असल्याने जरा घाबरली होती. त्याच ऑफ़िस मध्ये सुजल तिचा सीनियर होता. तिच्या मनाची घालमेल त्याने ओळखली होती. आणि तो बघता क्षणीच तिच्यावर मोहित झाला होता. तो तिला जमेल तसे काम सांगत होता. तीन चार दिवसात ती काम शिकली होती.  Receptionist च्या व्यतिरीक्त तिला बाकिच्या कामाची ही जबाबदारी सोपवली होती. सुजल मात्र तिला नेहमीच मदत करत होता. ऑफ़िस सुटल्यावर दोघेही एकाच बसने जात असे. तिचा स्टॉप आधी यायचा. आता असे नेहमीचेच झाले होते. ते एकमेकांच्या कधी प्रेमात पडले ते कळलेच नाही. तीन वर्षे झाली. ऑफ़िस पासुन सगळ्याना त्यांचे प्रेम समजले होते. तिचा घरी पण समजले तेव्हा  तिला खुप मारले. तिचा मोबाईल पण काढून घेतला. तिच ऑफ़िस ला जाण बंद केले. इथे सुजल खुप व्याकुळ झाला. काय झाले काहीही समजत नव्हते. शेवटी ऑफ़िस मधल्या एका मैत्रिणीला तिच्या घरी पाठवले. तेव्हा जाऊन त्याला तिची सगळी परिस्थिती समजली. पण दोघांचा ही contact होत नव्हता . घरातले कधिही लग्नाला परवानगी देणार नाही हे तिला समजले होते. पण तिही सुजल शिवाय आता राहू शकत नव्हती. शेवटी दोघेही पळून गेले आणि कोर्टात लग्न लावले.
ऑफ़िस जवळच एक खोली भाड्यावर घेऊन दोघांचा संसार सुरू झाला. एकदम राजा राणी सारखा. पण ह्यांचही संसार अर्ध्यावरती मोडला. एकदा असेच ते फिरायला समुद्रावर गेले होते. तेव्हा तिथेच लहान मुले खेळत होती. त्यातला एक मुलगा  खेळता खेळता पाण्यात जाऊन बुडायला लागला. 
तेव्हा सुजल त्याला वाचवायला पाण्यात गेला तो लहान मुलगा त्याने वाचवला पण त्याचा जीव एका मोठ्या लाटेने घेतला होता. हे इतक्या क्षणातच घडले का काही समजायला ही वेळ मिळाला नाही. तिच्या डोळ्या देखातच तिच्या  सुजल ला समुद्राच्या लाटेने तिच्यापासुन कायमचे दुर केले होते. तिला हा धक्का मात्र सहन झालाच नाही. ती तशीच घरी परतली. रडून रडून अश्रु ही सुकले तसाच तिचा डोळा लागुन  गेला.  मध्यरात्री तिला कसलातरी आवाज आला डोळे उघडले तो समोर तिचा नवरा सुजलच होता. तिने त्याला घट्ट मिठी मारली. आणि मग दोघेही जोपून गेले. सकाळी तो लवकर उठून ऑफ़िस ला जातो सांगून गेला. ती मात्र  कालची घटना त्याला समोर बघुन विसरुंन गेली. असेच काही दिवस गेले तो तिच्या बरोबर सगळी कडे येत होता पण मंदिरात मात्र जायचा टाळत होता. ती ही मग फोर्स करत नसे. तिला वाटायचे सगळे सुरळीत चालले आहे पण परिस्थिती काही वेगळीच होती. जेव्हा जेव्हा ती त्याच्या बरोबर बाहेर जात असे आणि त्याच्याशी बोलत असे तेव्हा लोकांना ती एकटीच बोलताना दिसत होती. एकटीच हसताना दिसायची. काहीना तर ती वेडी झाली असे वाटत होते. पळून जाऊन लग्न केल्यामुळे घरचे ही दुरावले होते. तिची अशी परिस्थिती त्याना माहित ही नव्हती. ती मात्र खुश दिसत होती. आजुबाजुचे बोलायचे का हिच्यावर परिणाम झाला आहे. असेच एकदा तिचा ऑफ़िस मधली मैत्रीण तिला भेटायला आली. सुजल या जगात नाही हे सत्य अवनीने स्विकारलेच नव्हते. कसे स्विकारेल? कारण तिच्या साठी तर सुजल जिवंत होता. नेहमी सारखा. कारण तो तिला दिसायचा. फक्त तिलाच. हे सगळे तिच्या मैत्रिणीला समजले. ती तिला तिथुन घेऊन तिच्या आईवडिलांच्या घरी घेऊन गेली. सगळी परिस्थिती आईवडिलाना मैत्रिणीने सांगितली. तिच्या मनावर परिणाम झाला आहे म्हनुन ती एकटीच बोलत असते हसत असते असे दिसत होते. पण अवनिला मात्र हे पटत नसते. कारण आताही ती ला तो दिसत असतो नेहमीसारखाच.वडीलानी तिला एका चांगल्या डॉक्टरकडे नेऊन तिच्या वर औषधं उपचार सुरू केले. पण तिच्यात मात्र काहीच फरक दिसत नव्ह्ता. पण हळूहळू तिला स्वत: समजत होते का सुजल आता या जगात नाही. पण त्याचा आत्मा तिला भेटायला रोज येतो कारण ते एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हते.  तिच्याही मनातून त्याचे प्रेम कमी होत नव्हते. तिला तो पाहीजे होता कायमचा. पण ती जिवंत होती आणि तो आत्मा म्हणून ते शक्य नव्हते. अवनी ही खुप प्रेम करायची. त्याच्याशिवाय जगणे आता तिला नकोसे झाले होते. 
असेच एक दिवस ते दोगेही त्याच समुद्रावर फिरायला गेले होते. जिथे त्याचा जीव गेला होता. ती संध्याकाळ अमावस्येची होती. अथांग वहाणारा समुद्र एकटक बघत होते. तो बोलला तिला आता ही शेवटची भेट इथून पुढे आपल्याला भेटता येणार नाही. आता कायमचा दुरावा येईल. ती फक्त त्याच बोलणे ऐकत होती. खुप वेळ दोघेही शांत राहिले.  ती म्हणाली त्याला माझ्यावर खुप प्रेम करतोस ना? तो बोलला हो म्हनुनच तर मरुन सुध्हा तुझ्यासाठी  जिवंत राहिलो. आत्मा माझा मुक्त झाला नाही. ती म्हणाली त्याला  चल मला तुझ्या दुनियेत घेऊन चल. तिथे संसार करू. तिथे आपण दोघेही एकत्र राहु. या दुनियेत आपल्या ला एकत्र रहाता येणार नाही.  तो ऐकतच नव्ह्ता पण ति मात्र हट्टालच पेटली. दोघांनीही हातात हात धरले अन अथांग सागरात चालायला लागले. समोरुन एक मोठी लाट आली आणि तिला त्या अथांग समुद्रात घेऊन गेली. तिथेच तिने जीव दिला होता जिथे सुजल चा जीव गेला होता. नितांत प्रेम करणारे ते जीव आता एकमेकांजवळ कायमचे आले होते. एक वेगळ्याच दुनियेत ते परत त्यांचा मोडलेला संसार करू लागले.  आता त्याना कोणिही एकमेकांपासून लांब करू शकत नव्हते. त्यांचे मिलन झाले होते ते पण कायमचेच....

मिलन झाले त्यांचे 
वेगळ्याच दुनियेत समुद्राकाठी ,
जीव द्यावा लागला तिला 
फक्त त्याच्या प्रेमासाठी.
 
सौ .राजेश्री मराठे. 
कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे.

Circle Image

Rajeshri Anand Marathe

House wife

Hobbies reading n writing,, cooking,, teaching children's.