सुखाचे दुकान

सुखाची परिभाषा न कळल्यामुळे दुकानात घेतला जातोय त्याचा शोध

#राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

कविता फेरी

विषय: सुखाची परिभाषा....


सुखाचे दुकान


पालथ्या घातल्या खूप बाजारपेठा,
तुडवल्या कित्येक मॉल्सच्याही वाटा...
Online शॉपिंगच्या भेटींनीही केले परेशान,
पण सापडलेच नाही \"सुखाचे दुकान\"


\"सगळं काही मिळते येथे\",
म्हणणारे वाटतात आता वेडे...
न मिळाले सुख कोठे ,
सुखाची कुठलीच परिभाषा न मना पटे....


जवळ असेल गाडी, बंगला, पैसा,
तरी का रे तू फिरशी ऐसा...?
जंग जंग पछाडले , कुठे आहे \"सुख\"?
Genius तू पण तरी सुखाची रुखरुख!


माणसा, \"सुख\" असावी तुझी निवड,
तुज आहे तुजपाशी, त्या मिळवण्या कशास काढतो वेगळी सवड?
ते भरलंय तुझ्याच क्षणाक्षणात,
पण त्याला तू शोधतो आहेस \"दुकानात\".....


रोज जागव मनात ,सकारात्मकतेची आशा,
नको होऊ देऊस थोड्या अपयशाने निराशा,
चाल पुढे, ठेवून जनकल्याणाची मनिषा,
सांग बरं, वेगळी असेल का सुखाची परिभाषा?

©️®️डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

#जिल्हा : पुणे