Mar 04, 2024
स्पर्धा

शोध... तिच्या अस्तित्वाचा.... भाग -1

Read Later
शोध... तिच्या अस्तित्वाचा.... भाग -1


शोध… तिच्या अस्तित्वाचा…!( ही गोष्ट आहे \" ती \" ची.
\" ती \" तुमच्या माझ्या प्रमाणेच एक सामान्य स्त्री..! पण लहानपणापासून तर वार्ध्याक्यापार्यंतचा तिचा प्रवास खरंच सामान्य होता का..??
जाणून घेण्यासाठी वाचा कथामालिका…
शोध.. तिच्या अस्तित्वाचा…!

**********************

…. नुकतीच ती बेडवर उठून बसली. मोठया प्रयत्नाने..!

" साधं उठायचं म्हटलं तरी किती यातना सहन कराव्या लागतात.. संपूर्ण शरीर नुसतं अकडलेलं असतं. "

तिच्या मनात आलं.

तोच लतिका… तिची लेक तिथे आली.

" मम्मी.. उठली का गं..?? थांब तुझे केस विंचरून देते. "
ती म्हणाली.

" नको गं बाई..! असू दे. तुलाही किती त्रास द्यायचा ना..??
तेवढा आरसा दे. चार दिवस झालेत चेहरा बघितला नाही बघ.. "

ती म्हणाली तसे लतिका तिला आरसा देऊन निघून गेली. थोडया वेळाने तिलाही ऑफिसला निघायचं होतं.


मोठया प्रयासाने तिने आरसा चेहऱ्यासमोर पकडला.

खोल गेलेले डोळे…! चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या…!
पिंजरलेले केस..! त्या पांढऱ्या केसात मोजता येतील एवढेच उरलेले काळे केस…!!

" चित्रे..! फारच लवकर म्हातारी झालीस गं बाई…!! "

ती स्वतःशीच पुटपुटली.

" किती आवडीने बापानं नाव चित्र ठेवलं होतं.., णी आता अगदीच विचित्र दिसतेस..! "

ती पुन्हा बोलली… स्वतःशीच.


बापाची आठवण येताच तिचं मन झारकन मागे गेलं… पन्नास पंचांवन्न वर्ष…!
.
.
.
.
.
.
.

" चित्रा ss चित्रा ss..
ये पोsरी…
अगं.. कुठे आहेस तू..??

अगं बघ काय आणलंय तुझ्यासाठी..! "

सदाभाऊ आवाज देतच आत आले.

" काय रे बा..?? काय आणलंस..?? "

सात - आठ वर्षांची एक चिमुरडी धावत आत आली.

" वा..! काय मस्त खमंग वास येतोय. शेव नी चिवडा आणलाय ना..? "
ती नाकाने जोरात वास घेत म्हणाली.

" हो गं माझे बाय..! तूझ्या आवडीचं आणलंय. "

सदूभाऊ हसून म्हणाले.

" हो, तिच्याच आवडीचं आणा.. आमच्या नाही. "

लहानगा सुरेश बोलला.

" अरे, तूझ्या आवडीची जिलबी आणलीय की.. "

सदूभाऊ.

" जिलबी आमच्या कुठं ताईच्याच आवडीची आहे हं बा..
आमची आवड तूझ्या लक्षात नसतेच कधी.. "

मोठा रघु बोलला.

तेवढ्यात हातात पाण्याचा ग्लास घेऊन येत चित्रा म्हणाली..
" बा.. आधी पाणी पी. एवढया दुरून आलायस. थकला असशील. "

" गुणाची गं पोर माझी..
एवढी काळजी करते म्हणून बा ची लाडकी आहे बरं का..! "

एवढा वेळ सगळ्यांचे बोलणे ऐकत असलेली बायजाबाई लेकीचं कौतुक करत म्हणाली.

सदूभाऊ घटाघटा पाणी प्याला.
आज तालुक्याच्या ठिकाणी आठवडी बाजार होता, म्हणून त्यानं पोरांना खाऊ आणला होता.
.
.
.
.
सदूभाऊ आणि बायजाबाई…
एकमेकांना पूरक जोडपं.
त्यांना सात लेकरं झाली पण काळानं चार हिरावली.
उरली तिघं… चित्रा, रघु, आणि सुरेश.
तिघांत चित्रा मोठी.
चुनचुणीत आणि हुशार..!
सदुभाऊचा तिच्यावर जरा जास्तच जीव.
काळीसावळी.. पण चेहऱ्यावर एक तेज होतं तिच्या.
काळ्याभोर केसांना चापुणचोपून टेल लावून घातलेला वेणीचा शेपटा…
अंगावर परकर पोलकं…
असा तिचा अवतार…!

खाऊ खाऊन झाला तसा पोरांचा गलका सुरु झाला.
ओरडतच रघु आणि सुरेश बाहेर खेळायला गेले.
चित्रा मात्र चिवड्याच्या तेलाचा डाग लागलेला पेपर बघत होती.

" काय गं..? काय बघतेस..?? "

सदूभाऊनी विचारलं.

" अक्षर.. "

ती आपल्याच तंद्रित उत्तरली.

" वाचायला आवडेल..?? "

सदूभाऊ.

" हो "

-चित्रा.

" बघू तुझा हात कानाला पोहचतो का..?? "

सदुभाऊंनी तिचा उजवा हात डाव्या कानाला डोक्यावरून लावून बघितला.

" अगं खरंच पोचला की..
बायजे, ह्या वर्षी चित्राचं नाव शाळेत टाकावं लागेल.. "

ते बायकोला म्हणाले.

त्यावर ती म्हणाली..
" बा.. मला खरंच शाळेत टाकणार..?? मी खरंच शाळेत जाणार..?? "

" हो गं बाय माझे..! "

ते बोलले तशी आनंदाने ती शाळा शाळा म्हणून नाचू लागली…
.
.
.
.
.
.
.

… हाताचा जोर कमी झाला तसा आरसा बेडवर पडला आणि ती भानावर आली.
बालपणीची उड्या मारणारी चित्रा तिच्या डोळ्यासमोर पिंगा घालू लागली, तसं तिच्या डोळ्यातून अलगद एक थेंब गालावर ओघळाला.
मोठया कष्टाने तिने केस बांधले.
चेहरा पुसून पुन्हा एकवार आरशात नजर टाकली…
.
.
.

" आई s.., जेवली का गं..??

नुकताच कॉलेजमधून आलेल्या नाताने विचारलं.

" नाही रे बाळा!
वेळ व्हायचा आहे नं..? "

चित्रा म्हणाली.

" काय गं आई.. इतका उशीर नको करत जाऊ जेवायला.
थांब, मी घेऊन येतो. "

असं म्हणून जेवणाचे ताट घेऊनही आला तो.


… हा पार्थ..!
लतिकाचा मुलगा आणि आपल्या कथेची नायिका चित्राचा नातू.
लहानपणापासून तिनेच त्याचं केलं त्यामुळे दोघांचं अगदी घट्ट नातं होतं.
पार्थ फारच हळवा होता. आईची ही अवस्था त्याला बघवेना म्हणून जमेल तशी तिला मदत करायचा.
त्याच्या हृदयात तिचं एक वेगळंच स्तन होतं.
जेवण झाल्यावर त्यानंच ताट नेऊन ठेवलं.
थोडया गप्पा मारल्या दोघांनी. नंतर तो अभ्यास करायला निघून गेला.
चित्राही थोडी पडते म्हणून वळली तोच खिडकीतून बाहेर तिची नजर गेली.

बाहेर अचानक खूप अंधारून आलं होतं. गार वारा सुटला होता आणि अचानक धो - धो पाऊस बरसु लागला.

… आता आराम करायची ती विसरून गेली. त्या मुसळधार पावसात रंगून गेली.

ढग फुटल्यागत कोसळणारा पाऊस अंगणातून वाहत होता..
तिच्या मनात मात्र लहानपणी नाल्यात कोसळणारा पाऊस वाहत होता…

.
.
.
.
.
.
.

… चित्रा आता सहावीला गेली गावात चौथी पर्यंतच शाळा होती. म्हणून मागच्या वर्षापासून ती तालुक्यातील शाळेत जायला लागली.
चौथी पासून होणारी चित्रा गावातील पाहोली पोर..
सदुभाऊला फार आनंद झाला. पुढे शिकवायचं म्हणूनतीला तालुक्याच्या शाळेत टाकली. ह्या वर्षी रघु पाचवीला गेला तशी दोन्हो मुलं सोबत शाळेला जाऊ लागली.

त्या दिवशी शाळा आटोपून दोघे बहीण भाऊ गावाकडे परतत होते तोच अचानक खूप अंधायेंऊं आलं आणि असाच मुसळधार पाऊस कोसळू लागला.
तेव्हा ह्या मुलांचा सर्व प्रवास हा पायीचं व्हायचा. गावाला जोडणारा एक ओढा होता त्याला कसेतरी पार करुन मुलं एका घरी आसरा घेऊन थांबली.

इकडे पावसाचा जोर वाढतच होता. सायंकाळ झाली तरी पोरं घरी पोहचली नाही. सदूभाऊचा जीव टांगणीला लागला होता..
तेवढ्या पावसात ते निघाले.. मुलांचा शोध घेण्यासाठी…

आता पावसाचा वेग ओसरला होता.
मुलं घराकडे निघाली आणि सदूभाऊ ओढ्याकडे पोहचले.
रस्त्यात मुलं भेटली नाही म्हणून तालुक्याला गेले. शाळेला कुलूप होतं तर मास्तरांच्या घरी गेले.
… शाळा दुपारीच कुठे हे ऐकून परत गावाकडे निघाले.
.
.
आता पाऊस थांबला होता पण ओढा तुडुंब भरलेला होता. त्याबरोबरच सदुभाऊचे डोळेही भरून आले त्या ओढ्याप्रमाणेच…
तुडुंब…!

त्यांना वाटलं आपली मुलं वाहत गेली ह्या प्रवाहासोबत. आता कधीच भेटणार नाहीत आपल्याला.

बाहेरचा पाऊस थांबला होता पण सदूभाऊंच्या डोळ्यातला पाऊस आत्ता कुठे बरसायला लागला होता…

रात्रीचे नऊ वाजायला आले घरी बायजाबाई आणि मुलं कंठाशी प्राण आणून सदूभाऊची वाट पाहत होते.

सदूभाऊ घरी आले नी तसेच ओसरीवर बसून रडू लागले.

" बायजे ss आपली चित्रा आणि रघु ओढ्यामध्ये वाहत गेली गं s.
आता कधीच भेटणार नाही आपल्याला.. "

असं म्हणून पुन्हा रडायला लागले.
तेवढ्यात चित्रा बाहेर आली.

. " बा.., आम्ही आलोय घरी..
ठीक आहोत आम्ही.. बघ काही झालं नाही आम्हाला..! "

तीही रडतच बोलत होती.

त्यांनी बघितलं.. दोन्ही मुलं सुखरूप होती. दोघांनाही पकडून ते पुन्हा रडायला लागले.
पण आता हे अश्रू आनंदाश्रू होते.

रघु खुश होता…
त्याला कळलं.. चित्रा ताई बरोबरच आपणही बा चे लाडके आहोत…

ह्या प्रसंगानंतर मात्र सदूभाऊंनी एक निर्णय घेतला.
मुलांच्या शिक्षणाबद्दल…


काय असेल तो निर्णय..??
सदाभाऊ चित्राचे शिक्षण बंद करतील की त्यांच्या मनात काही वेगळेच आहे…


बघूया पुढील भागात….

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//